Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: निकोलास मनुची

Sunday, 27 June 2021

निकोलास मनुची

(S. R. Sawant) 

BA---- 3 इतिहास --पेपर--- नं--- 13-- मुघल  भारताचा  इतिहास 

निकोलास मनुची 

निकोलस मनुची हा शहाजान च्या कालखंडामध्ये सतराव्या वर्षी भारतात इटालियन प्रवासी म्हणून आला.  1656  मध्ये तो सुरतला आला. त्यानंतर तो दिल्लीला  आला. दिल्ली तक्ता मध्ये दारा शिकोह ची त्याने मर्जी संपादन केली. त्यामुळे दिल्ली दरबारामध्ये मनूची ला भारतामध्ये फिरण्यासाठी अनेक सवलती मिळाल्या. दारा शिकोह व  पोर्तुगीज इंग्रज इत्यादींच्या पदरी नोकरी केली नोकरी करत असताना प्रत्येकाचा दरबारातील त्याने वेगवेगळा अनुभव घेतलेला होता संघर्ष मोगल सत्तेचे होणारे परकीयांशी संबंध या काळात त्याने अनुभवले होते आणि त्याचा अनुभव त्याने मोगला चा इतिहास या नावाने प्रसिद्ध केला. त्याने आपल्या प्रवासवर्णनात महत्त्वाचे प्रसंग रंगवले आहेत .औरंगजेबाने सत्ता हाती घेऊन शहाजहान ला कशा पृकारे तुरुंगात टाकले व त्याचे हाल केलेयाचे वणृन मनुचीनेआपल्या गृथांत केले आहे. अनेक वेळा तुरुंगात जाऊन शहाजहानची  भेट घेतली असे तो वर्णन करतो. तुरुंगात इतक्या भयंकर हाल-अपेष्टा प्रत्यक्ष बादशहाला सहन करावा लागत असतील. तर सर्वसामान्य माणसाचे काय. अशी भयंकर शिक्षा शहाजहानला दिली होती. शहाजहानला भयंकर  यातना   औरंगजेबाने तुरूंगामध्ये दिल्या होत्या.या यातना देताना निकोलस ने पाहिल्या होत्या. शहाजान चा गुलाम एक बारखिन याला शहाजान ची व्यवस्था ठेवण्याचे कार्य दिले होते. परंतु बादशहाच्या आज्ञेने त्याला शहाजानला तुरुंगवास अत्यंत त्रासदायक आणि कष्टकारक सहन करावा लागला.त्या पद्धतीचे माहीती निकोलस मनुचीने आपल्या गृथांत दीली आहे.  मोगलाचां अतगृत संघर्ष औरंगजेब मराठा संघर्ष शिवाजी महाराजमुघल संघर्ष  मुघलाचीं प्रशासन व्यवस्था यासंबंधीची माहिती निकलास मनुचीने आपल्या मोगला चा इतिहास या ग्रंथात करून ठेवलेली म्हणून इतिहास माहित होण्यासाठी आणि त्या काळातील शासन व्यवस्था  याची माहिती होण्यासाठी निकोलस मनुचीचे गृथं लिखाण अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...