(Sawant S. R.)
BA-- 3 -- इतिहास मध्य युगिन भारताचा इतिहास पेपर--13
पुरातत्वीय साधने
मध्यकालातील इतिहासाची माहिती होण्यास फार उपयुक्त आहेत मुगल काळातील स्थापत्य भारताच्या इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. या साधनांमध्ये किल्ले नकाशे क्षेत्रे काष्ठशिल्प कालवे शिलालेख ताम्रपट नाणी याचा उल्लेख करावा लागतो.कील्याचा विचार करता मध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पाचशे किल्ले असून उत्तर भारतात 104 दक्षिण भारतात 380 किल्ले आहेत किल्ल्याचे पुढील प्रकार होते डोंगरी गिरिदुर्ग जलदुर्ग भुईकोट किल्ला असा त्यामध्ये समावेश होता अकबराने आग्याचा किल्ला तसेच लाहोर चा किल्ला बांधला पुराना किल्ला शेरशहाने बांधला .त्याच बरोबर शहाजहानने लाल किल्ल्याचे बांधकाम केले. अकबराने अजमेर मेरट कटक इत्यादींमध्ये देखील किल्ले बांधले. शिवाजीमहाराजांनी किल्ल्याचे महत्व ओळखून रायगड प्रतापगड सिंहगड राजगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग इत्यादी किल्ले उभारले या किल्ल्याला वेग-वेळ-अंतर बुरुज त्यावरील तोफा दारुगोळ्याची कोठारे इमारती बाजारपेठा इत्यादी विभाग निर्माण केले. आज देखील मध्ये इतिहासातील याची साक्ष देत आहेत. त्याच्यानंतर शस्त्रास्त्रे व अवजारे याच्या जोरावर मध्ययुगीन व्यवस्था बर्यापैकी अवलंबून होती शस्त्रास्त्रे सैन्यबळावर राज्य मोठी होत होती वाढत होती. मध्ये कालखंडाचा तो न्याय होता ज्याच्याकडे शशाञे भरपूर तो लढाई चांगल्या पृकारे तोच सरस ठरत होता. ढाल तलवार भाला धनुष्यबाण कट्यार खंजीर दानपट्टा वाघ नखे बंदुका तोफा यांचा यामध्ये समावेश होता. राजवाडे गढ्या मधून भारताच्या इतिहासातील अनेक गढ्या राजेवाडे त्या काळातील वैभवाची साक्ष देतात मुघल राजपूत राजानीअतिशय भव्य राजवाडे बांधले त्यांच्या संरक्षणासाठी खंदक खोदून भक्कम तटबंदी या राजवाडा मध्ये अनेक दालने असून राज्याचे राजकुमार राजकुमारीची दास दासींच्या निवासाची सोय त्याचबरोबर संरक्षणासाठी असलेल्या सैनिक सैनिकांची राहण्याची व्यवस्था केली होती.दिल्ली दक्षिण भारत फत्तेपूर सिक्री दतिया अंबड येथील राजवाडे महत्त्वपूर्ण आहेत. राजा जयसिंग यांनी जयपूर येथे हवा महल बांधला. तर पहिल्या बाजीरावाने पुणे ते शनिवार वाडा बांधला. कोल्हापूर येथील राजवाडा देखील इतिहासाची साक्ष देण्यास प्रसिद्ध आहेत. यानंतर नकाशे ज्या भूप्रदेशावर राज्य करायचे त्यांचा भूगोल माहित असणे गजे गरजेचे असते मुगल खंडात साम्राज्य दर्शवन्यानासाठी अनेक नकाशे बनविण्यात आले होते .अनेक व्यापारी मार्गाचे आराखडे बनवण्यात आले होते .यामध्ये युरोपियन लोकांनी महत्त्वपूर्ण मदत केली होती फृचं विद्वान् सॅमसंग डी एम बी वेल इ.स.16 54 मधील मुघलसाम्राज्याचा दिशा दर्शवणारा नकाशा उपलब्ध आहे .नकाशा बाबत मुगल कालखंडात फारशी प्रगती झाली नव्हती. वस्त्रे व अलंकार याचा विचार करता कापड उद्योग भरभराटीला आला होता गुजरात बंगाल कापडनिर्मितीची मोठी केंद्रे होती. रेशीम कापडासाठी पैठण आग्रा खंबायत ठिकाणे प्रसिद्ध होती. पुरुषांची वेशभूषा चूडीदार पायजमा अंगरखा दुपट्टा असा होता गळ्यांचे प्रकार अस्तित्वात होते आणि मुगल बादशहाच्या पगडी वेगळेपणा दिसून येतो. त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये पेशवाई पगडी शिंदेशाही पगडी प्रसिद्ध आहे स्त्रियांच्या बाबतीत घागरा ओढणी प्रसिद्ध होती. बुरखा पद्धत पडदा पद्धतीचा अवलंब केला जात होता. या काळातील इतिहास हा छोट्या मोठ्या साधनांमधून व्यक्त होतो .चित्र कलेचा विचार करता चित्रकलेची भरभराट झाली होती. बाबराने भारतात येताना अनेक चिञे चित्रकार आपल्या सोबत आणले होते त्याच्याकडे 240 चित्रे होती हुमायून हादेखील चिञ कलेचा चाहता होता.त्याने इतर अनेक चित्रकारांना राजाश्रय दिला होता.मुघल काळातील चित्रांमध्ये राजा त्याचा दरबार त्याच्या जीवनातील प्रसंग त्याच्यावर निसर्गचित्रे प्राणी-पक्षी इत्यादीचा समावेश होतो .मात्र या काळातील धातूच्या मूर्ती काष्ठशिल्प मध्ये फार मोठी काय प्रगती झाली नाही. कारण मध्ययुगातील जे मोगल राज्यकर्ते होते त्यांच्या दृष्टिकोनातून मूर्तीपूजेला अजिबात स्थान न्हवते परिणामी धातूच्या मूर्ती आणि काष्ठशिल्प यामध्ये फार काही प्रगती झाली नाही .मात्र कालवे आणि बगीचे याविषयी त्यावेळच्या समृट राजे याच्या मध्येआवड होती. त्यातील राजे राजवटीत त्याचबरोबर मोगल राजे बगिचे कालवे निर्माण केले. त्यामुळे अनेक नदीच्या किनारी राजवाड्याबाहेर किलवे बागितयार केल्या गेल्या .काश्मीर दिल्ली आग्रा येथे बगीचे सध्या देखील अस्तित्वात आहेत. त्यानंतर शिलालेख व ताम्रपट ही महत्त्वपूर्ण पुरातत्वीय साधने होत. किल्ला मंदिर तलाव इत्यादी ठिकाणी शिलालेख आढळून येतात. रायगडच्या किल्ल्यावर शिलालेख पहायला मिळतो विजय नगर च्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक शिलालेख आढळून येतात. मध्ययुगीन काळात कर्नाटकात शिलालेखांची निर्मिती झालेली दिसते. त्याचबरोबर तामृपट हे इतिहास जाणून घेण्याचे महत्त्वाचे साधन आहे राजाकडून मिळणारे वतन व इनामी जमीन काही का काहीवेळा ताम्रपटावर आज्ञा दिल्या जात होत्या तांब्याच्या धातूवर कोरलेल्याला ताम्रपट असे म्हटले जाते. त्याचा नंतर त्या व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणजे नानी 15 26 मध्ये बाबराने दिल्ली ताब्यात घेऊन इस्लाम सत्तेची स्थापना केली .आणि बाबर व हुमायुन दोघांनीही आपली रुप्याची व तांब्याची नाणी बनवली. मात्र मोठ्या प्रमाणात आणि सोन्याची नाणी सुद्धा निर्माण केली .सम्राट अकबराने नाण्यावर वर्ष कलमे व वचने दिलेले आहेत. त्याचा कारकीर्दीत बऱ्यापैकी व्यवस्थेमध्ये सुधारणा आणली आणि अनेक प्रकारची नाणी निर्मिती केली गेली .मुघल भारताचा किंवा मध्ययुगीन भारताचा इतिहास माहीत होन्यास.पुरातत्विय साधने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात असे म्हणावे लागते .
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.