Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: चलनवाढीची कारणे

Sunday, 27 June 2021

चलनवाढीची कारणे

 

(J. D. Ingawale)

 बीए. 2 सेमी. 4 पेपर नं. 5.   स्थूल अर्थशास्त्र

चलनवाढीची कारणे

    . कागदी चलन पद्धती :  आधुनिक काळात जगातील सर्व राष्ट्रांत अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धतीचा वापर केला जातो. अशा चलनाच्या निर्मितीसाठी मौल्यवान धातूचे पाठबळ आवश्यक नसते. सरकारला इच्छेप्रमाणे चलनपुरवठा वाढविता येतो. सरकार वाढता खर्च भागविण्यासाठी चलनाचा पुरवठा वाढविते तेव्हा उत्पादनामध्ये वाढ झाल्याने भाववाढीला चालना मिळते.

    . वाढता पतपुरवठा :  अर्थव्यवस्थेत तेजीची अवस्था असते तेव्हा व्यापारी, उद्योगपती मोठ्या प्रमाणात बँकांकडून कर्जाची मागणी करतात. काही वेळा लोक टिकाऊ वस्तूंच्या खरेदीसाठी उदा. स्कूटर्स, फ्रीज, टी.व्ही. इत्यार्दीसाठी बँकांकडून कर्ज घेतात. अशा वेळी बँका भांडवलाचा पुरवठा करणाऱ्या संस्था मोठ्या प्रमाणात कर्जे देऊन पतनिर्मिती करतात. अर्थव्यवस्थेत पतपुरवठा वाढला की, भाववाढीला सुरुवात होते.

    . तुटीचा अर्थभरणा :    सध्याच्या काळात सर्व देशांतील सरकारांचा खर्च त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो. विशेषतः अप्रगत राष्ट्र नियोजनाद्वारा विकास साधण्यासाठी प्रचंड खर्च करतात. उत्पन्नातील ही तूट भरून काढण्यासाठी तुटीचा अर्थभरणा केला जातो. पण वस्तू सेवांचे उत्पादन वाढत नाही. तुटीच्या अर्थभरण्याने लोकांच्या हातातील पैसा वाढतो, त्यांची वस्तू सेवांची मागणी वाढते. त्यामुळे चलनवाढ निर्माण होते.

     . सार्वजनिक खर्चातील वाढ :   सार्वजनिक क्षेत्रातील खर्चवाढीने वस्तू सेवांची मागणी वाढून भाववाढीस प्रेरणा मिळते. विशेषतः युद्धप्रसंगी नियोजन काळात सरकारला अधिक प्रमाणात खर्च करावा लागतो. कल्याणकारी राज्याच्या कल्पनेमुळे सामाजिक हिताच्या अनेक बाबींवर सरकारला प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. अशा वेळी अर्थव्यवस्था पूर्ण रोजगारीच्या अवस्थेत असल्यास उत्पादन वाढत नाही. त्यामुळे अतिरिक्त मागणी निर्माण होऊन चलनवाढ उद्भवते.

    . कर कपात कर्जफेड:     सरकारने काही कर कमी केल्यास अगर काही कर घेण्याचे पूर्णपणे बंद केल्यास लोकांचे उत्पन्न वाढते. त्यांच्याकडे पूर्वपेिक्षा अधिक पैसा शिल्लक राहिल्याने वस्तू सेवांची मागणी वाढते. भाववाढ होते. तसेच सरकार जेव्हा घेतलेले कर्ज व्याजासह परत करते तेव्हाही लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. नवीन कर्ज घेण्याचे बंद झाल्यास समाजाजवळ जास्त पैसा शिल्लक राहतो. त्यांची मागणी वाढून भाववाढ होते.

     . पैशाचा भ्रमणवेग : व्यवहारात पैशाचा भ्रमणवेग वाढतो तेव्हा लोकांची रोकड प्राधान्य प्रवृत्ती कमी होते. लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळेही चलनवाढ वेगाने होते.

      . वाढता खाजगी खर्च : औद्योगिक तांत्रिक प्रगतीने अर्थव्यवस्थेतील उत्साहपूर्ण वातावरणामुळे खाजगी उत्पादक गुंतवणूक वाढवितात. त्यामुळे विविध उत्पादन साधनांची मागणी वाढते. पण पूर्ण रोजगारीची अवस्था असल्यास उत्पादन साधने उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या किमती वाढतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून किंमतवाढीला चालना मिळते. त्याचप्रमाणे उत्पादन घटकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांची वस्तू सेवांची मागणी वाढून भाववाढीला सुरुवात होते.

     . लोकसंख्या वाढ :    लोकसंख्या वाढीचा वेग विशेषतः विकसनशील राष्ट्रात अधिक असतो. त्याचप्रमाणात देशातील उत्पादन वाढत नाही लोकांना अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी अनेक गोष्टींची गरज असते. साहजिकच वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण होत नसेल तर किमती वाढून भाववाढीची स्थिती निर्माण होते.

    . उत्पादन घटकांची दुर्मिळता : श्रम, भांडवल, कच्चा माल . उत्पादन घटकांची अगर यांपैकी एखाद्या उत्पादन घटकांची दुर्मीळता असल्यास वस्तूंचा पुरवठा वाढविता येत नाही. काही वेळा देशात योग्य हवामान खनिज संपत्ती, जंगल संपत्ती यांच्या अभावी उत्पादन वाढविणे शक्य नसते. अशा वेळी किंमतवाढ होणे अपरिहार्य असते.

   १०. अधिक निर्यात     काही वेळा विविध कारणाने वाढलेले परदेशी देणेमर्यादित ठरून भाववाढीला चालना मिळते. त्याचप्रमाणे निर्यातीद्वारा मिळणारे उत्पन्न आयातीवर खर्च झाल्यास, ते देशातील वस्तूंवर खर्च केले जाते त्यामुळे देशांत किंमतवाढीला चालना मिळते.

    ११. आर्थिक विकासाची अवस्था : आर्थिक विकासाच्या प्राथमिक टप्प्यात जर देश असेल तर त्यास मूलभूत उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. दीर्घकालीन उत्पादन वाढीच्या योजना आखल्या जातात. दळणवळणाच्या सोई निर्माण कराव्या लागतात. समाजकल्याण योजना राबवाव्या लागतात. यावर सरकारला प्रचंड खर्च करावा लागतो. उत्पादन होण्यास कालावधी लागतो. दरम्यानच्या कालावधीत भाववाढीला सुरुवात होते.

     १२. क्षेत्रीय चलनवाढ : अर्थव्यवस्थेतील एका क्षेत्राचा दुसऱ्या क्षेत्राशी निकटचा संबंध असतो. एखाद्या क्षेत्रातील मागणी वाढल्याने तेथील किमती नफा वाढतो. त्या क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ दिली जाते. त्यामुळे पुन्हा किमती वाढतात. अशा वस्तू इतर व्यवसायांत वापरल्या जात असतील तर उत्पादन खर्च बाढून तेथेही किंमतवाढ होते. अशा प्रकारे एका क्षेत्रातून भाववाढ दुसऱ्या क्षेत्रात पसरते.

    १३. वाढत्या खर्चाचा नियम : काही वेळा उत्पादनात वाढत्या खर्चाचा नियम प्रत्ययास येतो. कारण पूर्णपणे पर्यायी घटक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उत्पादन मर्यादित करावे लागते. साहजिकच वस्तूंचा पुरवठा कमी होऊन चलनवाढीला प्रोत्साहन मिळते.

    १४. साठेबाजी : काही वेळा वाढत्या किमतीच्या अपेक्षेने व्यापारी मक्तेदारी संघटना वस्तूंची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करतात. प्रसंगी उपभोक्तेही वस्तूंची साठेबाजी करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा कमी होऊन किंमतवाढ होते.

    १५. नैसर्गिक आपत्ती : देशामध्ये काही वेळा महापूर, तीव्र दुष्काळ, भूकंप, वाईट रोगग्रस्त हवामान . नैसर्गिक आपत्तींमुळे वस्तूंचे उत्पादन कमी होते. अशा आपत्तीने वस्तूंचा पुरवठा कमी पडतो. चलनवाढ घडून येते.

     १६. कामगार संघटना : सध्याच्या काळात कामगार संघटना बळकट असल्याने त्या मालकाशी विविध प्रश्नांवर तंटा निर्माण करून उत्पादनात खंड पाडतात. वेतनवाढ, • बोनस इत्यादी विविध मागण्यांसाठी संप, हरताळ, घेराव इत्यादी मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे वस्तूचे उत्पादन घटते. पुरवठा कमी होऊन किमती वाढतात. तसेच कामगारांना वेतनवाढ मिळाल्यास उत्पादन खर्च वाढून किमती वाढतात. कामगारांचे उत्पन्न वाढल्याने त्यांची वस्तू सेवांची मागणी वाढून चलनवाढीला प्रेरणा मिळते.

चलनवाढीचे परिणाम (Effects of Inflation)

   . उत्पादनावर परिणाम : जेव्हा चलनवाढ सौम्य असते तेव्हा वाढत्या किमती उत्पादन वाढीला चालना देतात. वाढत्या किमतीने नफा मिळत असल्याने उत्पादकांमध्ये चैतन्य निर्माण होते. विविध वस्तूंचे उत्पादन वाढविले जाते. त्यामुळे उत्पादनाच्या विविध घटकांना काम मिळते. त्यांचे उत्पन्न वाढून मागणी वाढल्याने परत उत्पादन वाढीला चालना मिळते. तथापि पूर्ण रोजगाराची अवस्था गाठल्यानंतर उत्पादन वाढविणे शक्य नसल्याने होणाऱ्या चलनवाढीचा मात्र समाजाला त्रास होतो.

   . किंमत यंत्रणेत बिघाड : चलनवाढीच्या काळात किंमत ठरण्याची यंत्रणा बिघडते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत विस्कळीतपणा निर्माण होतो. अंदाजबाजी साठेबाजीने पैसा मिळविण्यावर लक्ष केंद्रित होऊन वस्तूंची टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे मागणी-पुरवठ्याच्या संघर्षातून निर्माण होणारी किंमत यंत्रणा पूर्णपणे बिघडते.

    . साठेबाजीला सट्टेबाजीला उत्तेजन : या काळात उत्पादक कार्यातील भांडवल गुंतवणूक कमी होते. साठेबाजीला सट्टेबाजीला उत्तेजन मिळते. उद्योग व्यापारात अनिश्चित वातावरण निर्माण होते. जादा नफा मिळविण्याच्या अनिष्ट प्रवृतमधून वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी केली जाते. सोने, जडजवाहीर, इमारती अशा अनुत्पादक कार्यातील गुंतवणूक वाढते. चोरटा व्यापार, काळाबाजार अशी समाजहितविरोधी कृत्ये वाढतात.

     . बचत गुंतवणुकीवर अनिष्ट परिणाम : चलनवाढीचा बचत गुंतवणुकीवर अनिष्ट परिणाम होतो. कारण या काळात पैशाचे मूल्य सतत घसरत असल्याने समाजाची बचत प्रवृत्ती कमी होते. वाढत्या किमतीने लोकांना उत्पन्नाची जास्त भाग खर्च करावा लागतो. त्यामुळे भांडवलाची निर्मिती कमी होऊन गुंतवणूक कमी होते. भविष्यात भांडवल पुरवठा कमी होण्याचे संकट निर्माण होते. काही वेळा देशातील पैसा बाहेर जाण्याचा धोका असतो.

    . वस्तूंचा दर्जा घसरतो : चलनवाढीच्या काळात सर्व वस्तूंच्या किमती वाढत असतात. त्यामुळे वस्तूंचा दर्जा घसरतो. वस्तू टंचाईच्या भीतीने ग्राहक वाटेल ती किमती देऊन वस्तू खरेदी करीत असल्याने हलक्या प्रतीच्या वस्तू तयार केल्या जातात. त्याचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा संभव असतो.

    . अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण होते : भाववाढीच्या काळात श्रीमंत, उद्योगपती, व्यापारी यांचे उत्पन्न वाढते. त्यांच्या विविध प्रकारच्या चैनीच्या वस्तूंची मागणी वाढते. या वस्तूंच्या उत्पादनात अधिक फायदा असल्याने उत्पादन घटकांचा वापर चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनासाठी होतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादकास साधनसामग्री कमी पडते. उत्पादन कार्यातील समतोल नष्ट होऊन अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण होते.

     . उत्पादन घटीचा धोका : श्रीमंतांच्या अनुकरण प्रवृत्तीने अल्पकाळात विनासायास श्रीमंत बनण्याची लालसा चलनवाढीने वाढते. त्यामुळे दीर्घकालीन भांडवल गुंतवणूक होत नाही. भविष्यात उत्पादन घटण्याचा धोका असतो.

     . सरकारवरील विश्वास नष्ट होतो : वाढत्या चलनवाढीने सामान्य जनता त्रस्त होते. भाववाढीच्या प्रमाणात कामगारांचे वेतन वाढत नाही. त्यासाठी वारंवार संप, हरताळ झाल्याने उत्पादनात खंड पडतो. कामगार, मालक राष्ट्राचे नुकसान होते. प्रसंगी जनतेचा सरकारवरील विश्वास नष्ट होतो.

सारांश, सौम्य चलनवाढ उत्पादनासाठी योग्य असली तरी तीव्र चलनवाढ अयोग्य समजली जाते.

   () चलनवाढीचे विभाजनावर होणारे परिणा

    . कामगार वर्ग : देशात काम करणाऱ्या कामगारांचा वर्ग मोठा असतो. चलनवाढीने हा वर्ग त्रस्त होतो. कामगारांचे वेतन पूर्वीच निश्चित झालेले असते. त्यामुळे भाववाढीच्या काळात पूर्वीच्या उत्पादनात पुरेशा वस्तू सेवा विकत घेता येत नाहीत. त्यामुळे त्यांचे राहणीमान घसरते. वेतनवाढीसाठी कामगारांना संप, हरताळ करावा लागतो. उत्पादनात खंड पडतो. मात्र चलनवाढीने रोजगार भरपूर वाढत असल्याने कामगारांना बेकारीचे भय नसते.

      . ठरावीक प्राप्तीचे लोक : समाजातील काही लोकांची प्राप्ती ठरावीक असते. स्थिर असते. उदा. नोकरवर्ग, पेन्शनर, घरमालक इत्यादी. या वर्गाची प्राप्ती चलनवाढीच्या काळात वाढत नाही. पूर्वीइतक्या वस्तू सेवा त्यांना विकत घेता येत नाहीत. त्यांचे राहणीमान घसरते. भाववाढीचा या वर्गावर अनिष्ट परिणाम होतो.

    . उपभोक्ता : सर्वसामान्य उपभोक्त्यावर चलनवाढीचे अनिष्ट परिणाम होतात. वाढता उत्पादन खर्च किंमत वाढवून उत्पादक उपभोक्त्यावर ढकलतात. भाववाढीने त्याला आपला उपभोग कमी करावा लागतो. व्यापारी, उत्पादक कृत्रिम टंचाई निर्माण करतात. कमी प्रतीच्या वस्तू निर्माण केल्या जातात. त्यामुळे उपभोक्त्याचे राहणीमान निकृष्ट प्रतीचे बनते.

    . उत्पादक वर्ग : चलनवाढीच्या काळात वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा उत्पादक वर्गाला भरपूर नफा मिळतो. वाढत्या किमती म्हणजे अधिक नफा. त्यामुळे उत्पादनाची प्रेरणा वाढते. वस्तूंच्या किंमतवाढीपेक्षा उत्पादन खर्चात होणारी वाढ कमी असल्याने उत्पादन वाढ मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे या वर्गाचा नफा वाढतो.

    . व्यापारी वर्ग : व्यापारी विक्रेता हा वर्ग चलनवाढीचे नेहमी स्वागत करतो. व्यापारी प्रसंगी वस्तूंची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करतो वाढत्या किमतीने प्रचंड नफा मिळवितो. चलनवाढीमध्ये वाढणाऱ्या किमतीचा हा वर्ग फायदा उठवितो.

    . शेतकरी वर्ग : वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा शेतकरी वर्गाचा फायदाहोतो. भाववाढीने शेतमालाला चांगली किंमत मिळून शेतकरी वर्गाचा फायदा होतो.

    . धनको : पैसे कर्जाऊ देणारी व्यक्ती म्हणजे धनको होय. चलनवाढीने या वर्गांचा तोटा होतो. कारण व्याजदर अगोदरच ठरलेला असल्याने तो वाढत्या किमतीच्या प्रमाणात वाढविता येत नाही. चलनवाढीच्या काळात कर्जाऊ रक्कम आल्यास धनकोस कमी रक्कम स्वीकारीत आहोत असे वाटते. कारण पैशाचे कमी झालेले असते.

    . ऋणको      पैसे कर्जाऊ घेणारी व्यक्ती म्हणजे ऋणको होय. चलनवाढ काळात या वर्गाचा फायदा होतो. कारण अशा वेळी व्याजदर पूर्वी ठरल्याप्रमाणे दिला जातो. तो वाढत नाही. चलनवाढीच्या काळात पूर्वीचे कर्ज परत केल्यास त्याला पूर्वीपेक्षा कमी रक्कम परत केल्यासारखे वाटते. कारण पैशाचे मूल्य कमी झालेले असते.

     . गुंतवणूक करणारा वर्ग : कर्जरोखे, ऋणपत्रे इत्यार्दीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या वर्गाचा चलनवाढीच्या काळात तोटा होतो. कारण गुंतवणुकीचे मूल्य कमी होते. त्यामुळे मध्यम वर्गाची बचत प्रवृत्ती कमी होते. मात्र कंपन्यांचा फायदा असल्याने शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची असते.

     १०. करदाते सरकार : भाववाढीच्या काळात कर भरणाऱ्या लोकांचा फायद होतो. कारण चलनवाढीने पैशाचे मूल्य कमी होते. तेव्हा त्यांना पूर्वी ठरलेल्या दराने कर भरावा लागतो. त्यामुळे भरावा लागणारा कर कमी वाटतो. मात्र असा कर घेणाऱ्या सरकारचा तोटा होतो. कारण कराचा दर वाढविला जात नाही. पैशाचे मूल्य कमी झाल्याने करापासून मिळणारे उत्पन्न कमी भासते.

     ११. आंतरराष्ट्रीय व्यापारी : भाववाढीचा आंतरराष्ट्रीय व्यापारी वर्गावर अनिष्ट परिणाम होतो. कारण देशातील वाढत्या किमतीच्या वस्तू परदेशी निर्यात कराव्या लागल्याने त्यांचा नफा कमी होतो. किंमत वाढविल्यास परदेशी मागणी घटण्याचा, व्यापार कमी होण्याचा धोका असतो.

() चलनवाढीचा रोजगारावरील परिणाम

चलनवाढीचा रोजगारावर अनुकूल परिणाम होतो. कारण वस्तूच्या सतत वाढत्या किमतीने नफ्याचे प्रमाण वाढत असते. त्याने उत्पादकांमध्ये उत्पादन वाढीची प्रेरणा निर्माण होते. देशातील जुन्या उद्योगांचा विस्तार केला जातो. अनेक नवीन उद्योगांचा उदय होतो. त्यामुळे विविध उत्पादन साधनांची मागणी वाढते. अर्थव्यवस्थेतील बेकार उत्पादन साधनांना काम मिळते. त्यांचे उत्पन्न वाढून परत मागणी वाढते उत्पादन वाढीला चालना मिळते. अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराकडे वाटचाल करते.

() चलनवाढीचे इतर परिणाम

चलनवाढीने समाजात आर्थिक विषमता वाढते. श्रीमंत-गरिबामध्ये वर्गकलह निर्माण होण्याची भीती असते. अप्रामाणिक श्रीमंत होतात. प्रामाणिक निराश होतात निरोगी समाजजीवन उद्ध्वस्त होते. चलनवाढीच्या वाढत्या किंमतीने सरकार लोकशाहीवरील विश्वास नष्ट होतो. त्यातून हुकूमशहा निर्माण होतात. उदा. जर्मनीत हिटलरचा उदय होण्यास प्रचंड भाववाढ कारणीभूत झाली. भाववाढीच्या काळात साठेबाजी, काळाबाजार, भेसळ इत्यादी अनैतिक कृत्ये वाढतात. श्रीमंत होण्यास अनैतिक, वाममार्गाचा अवलंब केला जातो. सारांश, चलनवाढीने सामाजिक, राजकीय, नैतिक इत्यादी सर्व घटकांवर अनिष्ट परिणाम होतात.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...