Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: सामाजिक चळवळी

Monday, 21 June 2021

सामाजिक चळवळी

 (Dhere V. D.)

B A.II History Paper IV सामाजिक चळवळी

(भाग १)

इ.स.१९६० ते २००० हे चाळीस वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेत कोणकोणते बदल आपला सुधारणा झाल्या त्यासाठी संघटनात्मक व संस्थात्मक काय प्रयत्न झाले? याचा अभ्यास या प्रकरणांमध्ये करणार आहोत.

          अ. मुस्लिम सत्यशोधक समाज...

भारत हा विविध जात, धर्म, भाषेच्या एकत्रित रहिवाशांचा देश आहे, विविधतेतून एकता हीच आपल्या राष्ट्रीयत्वाची खास ओळख आहे. बहुसंख्येने असलेल्या या देशात हिंदू धर्मात सुधारणा व्हाव्यात, अनिष्ट रूढी नष्ट व्हाव्यात यासाठी जाणकार, सुधारक व विचारवंतांनी अनेक प्रयत्न केले. त्याचप्रमाणे इतर धर्मातील पुरोगामी विचारवंतही पुढे सरसावले त्यापैकी इस्लाम धर्माच्या सुधारणेसाठी हमीद दलवाई यांनी केलेल्या प्रयत्नांचा आपण अभ्यास करणार आहोत.

         हमिद दलवाई (१९३२ ते१९७७)

29 सप्टेंबर 1932 रोजी हमीद दलवाई यांचा जन्म कोकणात चिपळूण जवळ मिरजोळी या गावी झाला. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. प्राथमिक शिक्षण चिपळूणला घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले. पण आर्थिक अडचणीचा सामना त्यांना करावा लागला. त्यांच्या शिक्षणाची फी त्यांच्या शिक्षकांनी भरली व सांगितले की तू ही इतरांना मदत कर. याचा परिणाम म्हणून ते 1946 साली साने गुरुजींच्या राष्ट्र सेवा दलात सामील झाले व दै. मराठा मध्ये पत्रकारिता करू लागले. आपल्या समाज बांधवांचे प्रबोधन केले पाहिजे त्याशिवाय समाजातील स्त्रियांचे तलक, बहुपत्नित्व, पोटगी, दत्तक-विधान इत्यादी प्रश्न सुटणार नाहीत. ही त्यांची खात्री होती. त्यांचा संविधानावर विश्वास होता. उर्दू ऐवजी स्थानिक भाषेतून समाजबांधवांनी शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. त्यामुळे त्यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. "दारिद्र्यामुळे शिक्षण नाही आणि शिक्षण नसल्याने दारिद्र्य संपत नाही."या दृष्टचक्रातील मुस्लिमांनी शिक्षण घ्यावे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, राष्ट्रीयत्व, विज्ञाननिष्ठा यांचा पुरस्कार करावा असे त्यांचे मत होते.       

         वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी "मुस्लिम सत्यशोधक मंडळा"ची स्थापना केली. कन्या नंतर केव्हा सातच वर्षात त्यांचे निधन झाले. त्यामुळे धर्ममार्तंडांना आनंदही झाला, पण त्यांचे सर्व कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्या विचारांची ही ज्योत त्यांनी पुढे नेली.

         "मुस्लिम सत्यशोधक समाज/ मंडळ"(२२ मार्च १९७०)

 हमिद दलवाई यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य सदभावना सहकार्य व इस्लाम धर्मातील चुकीच्या प्रथांना विरोध करण्यासाठी प्रचार सुरू मध्ये धनी साथ तलाकपीडित मुस्लीम महिलांना घेऊन मोर्चा काढला व समान नागरी कायदा झाला पाहिजे असे निवेदन त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना दिले व कार्याची सुरुवात केली. सुरुवातीला अत्यंत खडतर अवस्था होती प्रारंभी दलवाई एकटेच होते. नंतर भाई वैद्य, डॉ.आढाव यदुनाथ थत्ते यांची त्यांना मदत झाली. 

     मुस्लिम सत्यशोधक समाज/ मंडळाची उद्दिष्टे..

शासनाकडे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची रितसर रजिस्टर स्थापना करण्यात आली. त्यामध्ये त्यांची स्वरूप, रचना, उद्दिष्टे, सदस्यत्व, कार्यपद्धती, संचालक मंडळ, पदाधिकारी यांची नोंद आहे.  

      

    उद्दिष्टे...१) भारतीय समाजामध्ये प्रबोधनाच्या मार्गाने इहवादी (सेक्युलर) मुल्ये रुजविणे.

    २) भारतीय समाजातील विभक्ततावादी प्रवृत्तीविरुद्ध झगडा करून राष्ट्रीय एकात्मता साध्य होण्यास पोषक वातावरण निर्माण करणे.

     ३) भारतीय समाजातील कालविसंगत अशा श्रद्धा घालविणे.  

     ४) भारतीय स्त्रियांना समाजात समान हक्क मिळावेत यासाठी कार्य करणे.

     ५) इहवादी मूल्ये रुजविण्यासाठी शाळा, महाविद्यालये चालवणे संशोधन केंद्र स्थापन करणे.  

     ६) वाचनालये चालवून त्यात मुख्यत्वे लोकशाही, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता असे साहित्य ठेवणे.

     ७) इहवाद, लोकशाही,धर्म-सहिष्णुता इ.मूल्ये रुजवणारी नियतकालिके,पुस्तके,ग्रंथ इ. प्रसिद्ध करणे.

    ८) जाहीरसभा,व्याख्यानमाला,चर्चासत्रे,अभ्यासवर्ग, परिषदा व संमेलने याद्वारे इहवाद, लोकशाही, धर्म- निरपेक्षता इत्यादी मूल्यांचा प्रसार करणे.

    ९) या उद्दिष्टांना पूरक अशा भारत किंवा भारताबाहेर संस्थांशी/ व्यक्तींशी संबंध जोडणे. पण यासाठी जमा झालेला निधी भारताबाहेर वापरता येणार नाही.

    १०) वर निर्देश केलेले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे.

         हमीद दलवाई यांचे विचार...

  इस्लाम संस्कृतीतील काही अंगाबद्दल त्यांना प्रेम व अभिमान होता. पण तिची अनिष्ट बाजूही त्याला माहीत होती. ज्याप्रमाणे हिंदू आणि ख्रिश्चन धर्माची  चिकित्सा त्या-त्या धर्मातील विचारवंतांनी केली, तशी इस्लाम धर्माची कठोर व बुद्धिनिष्ठ चिकित्सा अजून कोणीही मुस्लिम विद्वानाने केली नाही. याची त्यांना खंत होती. अशी चिकित्सा झाल्याशिवाय मुस्लिम समाजाचे प्रबोधन होऊन तो


Dhere Sir, [12.06.21 11:25]

समाज समानतेच्या नात्याने इतरांच्या बरोबर राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी होऊ शकणार नाही. त्याची कायम अधोगती होत राहील. या अर्थाने दलवाई मूलगामी विचारवंत होते.  पारंपरिक धर्मकल्पनांच्या शृंखलातून जोपर्यंत हा समाज मुक्त होत नाही, तोपर्यंत त्याचे प्रश्न सुटणार नाहीत. पिक्चर इस्लामपूर ते सांगावयाचे झाल्यास मुस्लिम समाजाचे प्रबोधन मुस्लिमांनी सुरू केले पाहिजे. अन्य धर्मीयांनी केल्यास त्यांना इस्लाम विरोधक ठरवले जाईल. यासाठी "इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट" निर्माण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. दलवाई स्वतः नास्तिक व अश्रद्ध होते, पण मुस्लिम समाजाने वा मंडळाने तसे झालेच पाहिजे असा त्यांचा आग्रह नव्हता.  इस्लाम धर्मात ही कुटुंब नियोजन करून लोकसंख्यावाढीला नियंत्रण घालण्याची गरज आहे असे त्यांचे मत होते. हिंदु अथवा मुस्लिम सनातनी जातीयतावादी न बनवता सुधारक बनवले पाहिजेत असे त्यांचे मत होते. याबाबत प्रा. समशुद्दिन तांबोळी म्हणतात "हमिद दलवाई यांना आपल्या नावे कोणतेही स्मारक होऊ नये असे वाटत होते. त्यांना अपेक्षित असलेली समाज प्रबोधनाची चळवळ मुस्लीम सत्यशोधक समाजामार्फत रुजविणे आणि विशुद्ध विज्ञानवादी दृष्टिकोन असणारे, परिवर्तनशील, सेक्युलर, लोकशाही, अशी संविधानिक मुल्ये अंगीकृत करणारे तरुण-तरुणी निर्माण करणे हेच त्यांचे खरे स्मारक ठरेल". 

    मुस्लिम सत्यशोधक मंडळाची कार्य...

मंडळाच्या स्थापनेनंतर सात वर्षातच दलवाई यांचे निधन झाले. त्यातही शेवटची दोन वर्षे ते आजारी होते. 

१). मुस्लीम सत्यशोधक पत्रिका... प्रबोधन प्रशिक्षण व प्रकाशन या त्रिसूत्री नुसार त्रेमासिक पद्धतीने ही पत्रिका प्रकाशित होत आहे. 

२). हमीद दलवाई स्टडी सर्कल.. मुस्लिमच नव्हे तर सर्व धर्मियांसाठी कार्यकर्त्यांची अभ्यास शिबिरे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गरजू विद्यार्थ्यांना विशेष मदत या केंद्राद्वारे केली जाते.

३). मुस्लिम सत्यशोधक महिला मंच... महिलांच्या सुमारे 50 संघटना यामध्ये कार्यरत आहेत जागतिक पातळीवरील "वूमेन अंडर मुस्लिम लॉ"ही संघटना या अंतर्गत कार्यकर्ते तिहेरी तलाक विरुद्ध सध्या भारत सरकारने केलेला कायदा हा याचेच फलित आहे.

४). मुस्लीम सत्यशोधक युवा मंच.... मुस्लिम तरुणांना भडकवले जाते व ते जमातवादकडे वळतात  या विचारा विरुद्ध तरुणांना उदारमतवादी पुरोगामी विचार पटवून देणे त्यांची प्रश्न समजून घेणे योग्य मार्गदर्शन करणे योग्य व्यक्तिमत्व घडविणे हा या मागचा उद्देश आहे.

५). बकरी ईद निमित्त रक्तदान अभियान... नरेंद्र दाभोळकर यांनी अनिष्ट धार्मिक रूढी विरुद्ध कार्य केले त्यांचा मुलगा हमीद हेच कार्य पुढे नेत आहे डॉक्टर दाभोळकरांना पासून प्रेरणा घेऊन आम्ही दलवाईंनी देखील "रक्ताचं नातं जास्त धर्मापलीकडे मानवतेकडे" हा उपक्रम सुरू केला. बकरी ईद हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी कुर्बानी या शब्दाचा अर्थ कळावा यासाठी या मंडळामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

६). वर्धापन दिन कार्यक्रम (२३ मार्च) या दिवशी चर्चासत्र, प्रकाशन, पुरस्कार इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हमीद दलवाई पुरस्कार, समाज प्रबोधन पुरस्कार, ही रोख रक्कम, मानपत्र,स्मृतीपत्र,सन्मानपत्र इ. मार्फत दिले जाते. याशिवाय मौलाना आझाद जयंती हमीद दलवाई व दिनकरराव जवळकर यांचा ३मे हा स्मृतिदिन साजरा केला जातो. या वेळी विविध संस्थांमार्फत गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली जाते.

७). समविचारी संघटना बरोबर चे उपक्रम.. राष्ट्रीय एकात्मता समिती, विषमता निर्मूलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकशाही, उत्सव इत्यादी समविचारी संघटनांबरोबर हे मंडळ संविधान सन्मान, सामाजिक समता, हिंसाचार निषेध, धर्मनिरपेक्ष लोकशाही इ. विषयांवर उपक्रम राबवते.


  हमीद दलवाई यांची ग्रंथसंपदा....

  १). राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

  २). इस्लामचे भारतीय चित्र

  ३). मुस्लिम जमात वाद कारणे व उपाय

  ४). भारतातील मुस्लिम राजकारण

  ५). मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया

  ६). इंधन

  ७). लाट

  ८). जमिला जावेद

  इतरांची ग्रंथसंपदा:

  मेहरुसिन्ना दलवाई : मी भरून पावले ( हमीद यांचे चरित्र)

 सय्यद : दगडावरची पेरणी

 हुसेन जमादार : जिहाद

 अ.का. मुकादम : दास्तान, चंद्रकोरीच्या छायेखाली    

 प्रा. शमशुद्दीन तांबोळी :

 १) हमिद दलवाई-क्रांतिकारी विचारवंत-शहाबानो ते शबानाबानो.

 २). मुस्लिम समाज-व्यक्ती-विचार-साहित्य,आझाद कलाम.

 ३).  मुस्लिम समाज-प्रबोधन आणि विकास

 ४). समान नागरी कायदा-अपेक्षा आणि वास्तव

 ५). महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास-नवे दालन,नव्या संधी.

 डॉ.बेनझीर तांबोळी:

 १). प्रभावशाली शिक्षणतज्ञ.

 २). शिक्षण शब्दकोश.

 तमन्ना इनामदार:

 १).  एक नजर.... तलाक नंतर

 २). मुस्लिम महिलांच्या समस्या-शोध आणि बोध.

 मुस्लिम सत्यशोधक पत्रिका (त्रीमासिक)

 मुस्लिम सत्यशोधक मंडळ-उद्देश व भूमिका.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...