Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: महाराष्ट्रातील दूध उद्योग- आरे दूध डेअरी

Monday, 21 June 2021

महाराष्ट्रातील दूध उद्योग- आरे दूध डेअरी

 (Dhere V. D.)

B.A.II History Paper IV( भाग २)

महाराष्ट्रातील दूध उद्योग- आरे दूध डेअरी


महाराष्ट्राच्या अर्थकारणात आमूलाग्र बदल घडवून आणणारा उद्योग म्हणजे दूध उद्योग होय. शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा उद्योग केला जातो. महाराष्ट्र शासनाने राज्यात दुधाचे संकलन वाहतूक प्रक्रिया पॅकेजिंग या करता सुविधा निर्माण करुन दिलेले आहेत. दुधाची स्थानिक गरज पुरवल्या वर ग्रामीण भागातून दुधाचे संकलन करुन शहरी भागात ते आणण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावपातळीपासून शासकीय दुध योजनेपर्यंत एक साखळी निर्माण करण्यात आलेली आहे. 1960 पर्यंत फक्त मुंबई साठी असलेले शासकीय दूध वितरण हळूहळू महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये सुद्धा सुरू करण्यात आले यामध्ये पुणे नागपूर नाशिक इ. शहरांचा समावेश होतो. शासकीय दूध योजना 36 जिल्ह्याच्या ठिकाणी राबवली जाते. विकी आठ ठिकाणी सहकारी दूध योजना आहेत. राज्यात 122 शीतकरण केंद्र आहेत. दूध, दुधापासून भुकटी, लोणी, चीज, तूप, आईस्क्रीम, पेढे, इत्यादी उपपदार्थ तयार करून त्यांची विक्री केली जाते.  मिरज, उदगीर, अकोला येथे दूध भुकटी तयार करणारे कारखाने आहेत.

महाराष्ट्राचे दुग्ध प्रशासन...

दुग्ध उत्पादन व्यवसाय विकसित करण्यासाठी आवश्यक संरचना शासनाने 1958 पासून सुरू केलेली आहे शासकीय यंत्रणा पुढील प्रमाणे आहे.

१). दुग्ध आयुक्त.. हे दूध प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांच्या मदतीसाठी पाच उपायुक्त निर्माण केलेले आहेत. त्यातील उपायुक्त १. हे प्रशासनाचे काम पाहतील ;उपायुक्त २. दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व दुधाच्या उत्पन्न वाढीकडे मदत करण्याची काम करतील ; उपायुक्त ३. दुध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण प्रक्रियेची जबाबदारी असेल. ; उपायुक्त ४. अभियांत्रिकी व तांत्रिक जबाबदारी पार पडतील ; उपायुक्त ५. आर्थिक जबाबदारी पार पडतील.

२). सहाय्यक आयुक्त... 

               दूध प्रशासनात सहाय्यक आयुक्त हा दुग्ध आयुक्ताला मदत करत असतो सहाय्यक आयुक्त च्या मदतीसाठी (१) कार्यासन अधिकारी प्रशासन; (२) लेखाधिकारी सर्वसाधारण (३) परिवहन अधिकारी सामग्री (४) भू सर्वेक्षण अधिकारी गुणनियंत्रण (५) दक्षता अधिकारी लेखा हे पाच अधिकारी असतात.

३). सहनिबंधक...

     तालुका व जिल्हा दूध संघ व सहकारी दूध संस्था यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम सहनिबंधक करतात आणि शेवटी उपनिबंधक सहनिबंधकाला मदत करतात.

  ४). उपनिबंधक...

         खेडेगावातील सहकारी दूध संस्था व इतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शनाचे काम उपनिबंधक करतात त्याशिवाय ती थेट दूध उत्पादक व नागरिकांशी संपर्क ठेवून कामे करतात.

         बृहन्मुंबईमध्ये आरे, वरळी व कुर्ला या तीन दुग्धशाळा आहेत त्यांचे नियंत्रण महाव्यवस्थापक बृहन्मुंबई दूध योजना यांचे मार्फत करण्यात येते. या विभागाकडे आरे, पालघर व दापचरी ही तीन प्रक्षेत्रे असून मुंबईतील जनावरे व तबेलेधारक  यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रक गुरे नियंत्रण यांचे मार्फत करण्यात येते. आरे दूध वसाहत येथील कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते.

         १९५८ मध्ये महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र दुग्धव्यवसाय विभाग सुरू केला त्याच्या प्रमुखाला दुग्ध आयुक्त (Milk Commissioner) असे संबोधण्यात येते.१९६० चाली राज्याचे प्रतिदिन दूध संकलन १ लाख लिटर होते. २०१५-१६ साली प्रतिदिन शासकीय दूध संकलन 114 लाख लिटर इतके झाले. ग्रामीण भागातून दूध संकलन करण्यासाठी गाव स्तरावर प्राथमिक सहकारी संस्था. तालुका आणि जिल्हा स्तरावर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी या पदांची निर्मिती 1978 चाली करण्यात आली.

         दूध महापूर योजना.

उद्देश १. दुधाचे उत्पादन वाढविणे २. भाकड जनावरांची संख्या कमी करून दूध देणाऱ्या जनावरांची पैदास करणे.३. जनावरांना सकस आहार मिळवून देण्यासाठी प्रयत्न दूध व्यवसायात गरीब शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे.

पहिली दूध महापूर योजना (१९७५-१९८१)....(ऑपरेशन फ्लड) या योजनेअंतर्गत कुर्ला दुग्धशाळा कोल्हापूर आणि जळगाव येथे सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येणार्‍या दुःख शाळांची उभारणी करण्यात आली.

दुसरी दूध महापूर योजना (२९८१-१९८७)... या योजनेत जळगाव, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अकलूज येथे शीतकरण केंद्रांची उभारणी करण्यात आली तसेच इतर दुग्ध शाळांचे विस्तारीकरण करण्यात आले. 


तिसरी दूध महापूर योजना (१९८७-१९९२)...       महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही राबवण्यात आली २३ करोड रुपयांची गुंतवणूक करून दूध वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. 

एकूण 81 कोटी रुपयांची गुंतवणूक करून  दूध उत्पादन वाढविण्यात आले. यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला. तो सोडवण्यासाठी शालेय पोषण आहारात दूध वितरण सुरू करण्यात आले.१९८५-८६ मध्ये शालेय पोषण आहार सुरू केला यात ४७७२९६ विद्यार्थ्यांना ७१५९४ लिटर प्रतिदिन दुधाचा पुरवठा करण्यात आला. पूर्वी 1983 पर्यंत बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात वितरणासाठी दूध आणले


Dhere Sir, [10.06.21 10:07]

जाई. आता आपल्या राज्यातून आंध्र, बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली इत्यादी राज्यांमध्ये दररोज दूध पाठवले जाते. महाराष्ट्रातील 14 लाख शेतकऱ्यांना यामुळे जोड धंदा मिळाला यापैकी 70 टक्के शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरीब आहेत.

                          'आरे' डेअरी मुंबई

  स्थापना..१९४९ सालीमुंबई शहरातील गोरेगाव येथे असलेल्या उपनगरात आरे दुग्ध वसाहतीची स्थापना झाली.

   उद्देश ...१. मुंबई शहरातील दूध उत्पादनाच्या बाबतीत क्रांतिकारी सुधारणा दुग्ध वसाहतीतील दुधावर प्रक्रिया दूध दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग दुध वसाहतीतील दुधावर प्रक्रिया करून निर्जंतुक बाटल्यांत भरून मुंबईतील ग्राहकांना पुरवणे.

   मुंबईतील आद्य दुग्ध व्यावसायिक दादा खुरोडी यांच्या संकल्पनेतून आरे दुग्ध उत्पादने विकसित केली गेली. त्यांनी 1963 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे डॉ. वर्गीस कुरीयन यांच्या सहकार्याने दुधाचे उत्पादन व मार्केटिंग करण्याचे काम केले. सुरूवातीला 1970 पर्यंत आरे येथे उत्पादित होणारे दूध वितरित केले जात होते. 1970 नंतर ग्रामीण भागातून दूध संकलित करून ते वितरित करण्यास सुरुवात झाली.

     अरे दूध कॉलनी चे एकूण 3166 एकर जमिनीचे क्षेत्र आहे. त्यातील चारशे एकर क्षेत्र सारा आणि गवत लागवडीखालील आहे. प्रचंड विस्तार असल्यामुळे यातील काही जमीन राज्य केंद्र व विविध संस्थांना भाडेतत्त्वावर दिली आहे.

     १) केंद्र सरकारच्या (सेंट्रल पोल्ट्री फार्म, मॉडर्न बेकरी, एन. डी.डी.बी., आर. बी.आय.) या संस्थांना २२९.९२ इतके क्षेत्र दिलेली आहे.

    २) महाराष्ट्र शासनाच्या (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, एस. आर. पी.; म्हाडा, एम. सी. जी. बी. फिल्म सिटी व फिशरी) यांना ७२९.१२इतके क्षेत्र दिलेली आहे.

    ३) रस्ते व इमारती खालील क्षेत्र ४६०.०० एकर.

    ४) नाले तलाव शेत बंधारे शेत रस्ते नदी केलेले क्षेत्र नापीक जमीन १,०२०.२० एकर.

    ५) लोन बगीच्या फळबागा ५३७.००एकर.

    ६) सामाजिक वनीकरण व जमीन १८३.००एकर.

    ७) एकूण आरे कॉलनी क्षेत्र ३१६०.००एकर

           अरे वसाहत उभारण्याचे मुख्य उद्दिष्ट.

 अ. शहराच्या हद्दीतून जनावरे/  म्हशीचे स्थानांतर करणे.   

 ब. मुंबई शहर वासियांना तुलनेने स्वस्त दरात उच्च प्रतीच्या दुधाचा पुरवठा करणे.

 क. आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने पशुपालन व प्राण्यांची देखभाल करणे.

             जनावरांच्या तबेल्याची व्यवस्था 

आरे कॉलनीत प्रत्येकी 500 ते 550 गुरेढोरे राहण्याची क्षमता असलेले 30 गोठे तबेले आहेत. त्या लगेच साहेब ठरणारा इमारती शेड आहेत त्यामध्ये गवत गोडाऊन चारा कापणी यंत्र वासरांची सोय कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. १६०७९ इतक्या जनावरांची येथे सोय आहे. परवानाधारकांना परवाना शुल्क, पाणी, वीज शुल्क, व्यवसाय शुल्क व इतर सुविधांचे शुल्क भरावे लागते.                   

  यशवंत जनावरांची देखभाल कॉलनीतील रहिवाशांच्या मुलांच्या हितासाठी प्राथमिक शाळा आणि 24 बीडचे रुग्णालय हे उपक्रम अरे प्रशासनाने चालवलेले आहेत.

          पशुसंवर्धन योजना व गाय विभाग  

जवळपास 700 देशी व संकरित गाईंचे पालन केले जाते देशी वाना बरोबरच परदेशी संकरित कालवडी यांची पैदास करण्यासाठी क्रॉस ब्रीड वापरले जाते. या अभ्यासाचा उपयोग महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना दूध उत्पादनासाठी व उच्च प्रतीच्या जनावर पैदाशीसाठी केला जातो.

     २००१-०२ सालापासून  महसूल तूट भरून काढण्यासाठी पुढील उपाय योजना करण्यात आलेले आहेत.

     १) पवई,मालाड बोरवली दिंडोशी गोरेगाव अंधेरी मरोल मरोशी ते अरे दूध कॉलनी मुख्य रस्ता वापरणाऱ्या वाहनांना टोल सार्वजनिक निविदेतून संकलित केला जातो.

     २) आरे कॉलनीतील तळाचा वापर नौकाविहारा साठी भाडेतत्त्वावर दिला जातो. 

     ३) रिकामी असणारी गोडाऊन आधुनिक निविदा मागवून विविध पक्षांच्या सभा मीटिंग व इतर उपक्रमासाठी भाड्याने दिले जातात. 

     ४) विविध वस्तू व पदार्थ विक्री केंद्रासाठी विक्रेत्यांना स्टॉल्स रेस्टॉरंट जनरल स्टोअर्स सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा दिली जाते.

     ५) नारळ आंबे काजू इत्यादी कृषी उत्पादनासाठी कंत्राटी पद्धतीने दिली जातात.

     ६) विविध संसाधने आणि उत्पादने उदाहरणार्थ पाणी, चारा प्लांट, गुरेढोरे भाडेतत्त्वावर कराराने दिली जातात.

     हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आरे कॉलनी यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबवले जातात.    

     असे असले तरी तिथल्या रिकाम्या जागेवर शासनाचा सतत डोळा असतोच, सध्या मेट्रो कार शेड साठी आरे ची रिकामी जागा वापरण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, यासाठी तेथील वृक्षांची कत्तल करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...