राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.
बी.ए. भाग ३
अभ्यासक्रमपञिका १२
सञ: ६ विभाग :३
साहित्याचे माध्यम
🔹परस्तावना: साहित्याचे स्वरुप समजून घेण्यासाठी साहित्याचे माध्यम म्हणजे भाषा आणि साहित्यकृतीचा घाट(Form)याविषयी समजून घेणे आवश्यक आहे.एका घटकाचा दुसर्या घटकाशी संबंध जोडताना ज्या एका तिसर्या घटकाचा उपयोग होतो-त्याला माध्यम म्हणता येईल.
अॅरिस्टाॅटलने साहित्याचे माध्यम म्हणून(Speech) विचार केला. त्याने साहित्याला शब्दकला(Verbal Art)मानले.
चिञाचे माध्यम रंगरेषा शिल्पकलेचे माध्यम घनपदार्थ(संगमरवर, दगड, प्लास्टर आॅफ पॅरिस इ.) तर संगीताचे माध्यम नाद व ध्वनी हे आहे. सर्वसामान्यपणे आज हे मानले जाते की साहित्याचे माध्यम शब्द-म्हणजे पर्यायाने भाषा हे आहे.
इतर कलांच्या माध्यमात आणि साहित्यकलेच्या माध्यमात फरक आहे.आपण भाषाविज्ञानात हे शिकलो की भाषा ही काही साहित्यासाठी निर्माण झालेली नाही. भाषेचे मुख्य कार्य आहे विचार विकांराचे दळणवळण(Communication) वा अभिव्यक्ती(expression) भाषेचा शब्दांचा वापर खुणेसारखा होत नसून प्रतिकासारखा होतो. भाषिक प्रतीक (चिन्हन) व त्याने निर्देशित केलेली वस्तू(चिन्हित)यात कोणतेही साम्य नसते. उदा.' झाड' या भाषिक चिन्हाने जी वस्तू निर्देशित केली जाते त्या वस्तूत (म्हणजे प्रत्यक्ष झाडात)व 'झाड' या चिन्हात काही साम्य नसते. या दोन्हीतील संबंध सांकेतिक आहे. तो त्या त्या समाजाने निर्माण केला आहे.
भाषा या माध्यमाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ते स्वत:च अर्थयुक्त असते. अन्य कला अशा स्वत:च अर्थयुक्त नसतात. शब्दांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करुन किंवा कधी कधी 'शब्दांच्या पलीकडे' जाऊन- केवळ एखादी कविता लिहिने शक्य आहे.अर्थयुक्त असणे,अशय सापेक्ष असणेहा जो साहित्याचा विशेष मानला जातो, तो मुळात साहित्याच्या माध्यमाशी- म्हणजे भाषेशी संबंधित आहे.
व्यवहारात वापरली जाणारी भाषा-हीच आपण साहित्यातही वापरतो पण तरीही साहित्याच्या भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत .आता पाहू.
🔹साहित्याची भाषा : उत्तम काव्याची भाषा कशी असते या संदर्भात व पाश्यात्य ते संस्कृत विशारदांनी चर्चा केली आहे या अनुषंगाने भारतीय व पाश्यात्य समीक्षकांच्या विचारातून काही ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे
१)भाषेच्या साह्याने लेखक आपला जीवनानुभव व्यक्त करत असतो. त्यामुळे त्यामुळे लेखकाची स्वत:ची अशी भाषा असते.
२)सुचकता: साहित्याची भाषा विविध संवेदनांची सूचक असते ललित साहित्यातील सौंदर्य हे सौंदर्याच्या या सुचकतेवर अवलंबून असते.
३)चिञदर्शित्व : ललित साहित्य विविध रुपात अवतरते. कधी कवित्व तर कधी कथारुप धारण करुन त्यामधून लेखकाचे विविध अनुभव गोचर होतात खरं तर शब्दांच्या मधून अनुभवांचे चिञण करत असतात. चिञातील रंगछटांचे कार्य गोचर करणे हे त्याचे कार्य असते.
४) लय आणि ताल: साहित्यातून साकार झालेल्या अनुभवाला स्वत:ची एक लय असते. लयीनुसार शब्दांचा एक क्रम असतो. जो अनुभव प्रकटला आहे त्याची लय व ताल सांभाळला जातो की नाही याची काळजी भाषा घेते.
५) सौदर्यनिर्मितीची क्षमता : साहित्याची भाषा ही सौंदर्य सर्जक असते व्यवहाराच्या भाषेची निर्मिती अशी होईलच असे नाही. त्यामुळेच साहित्यभाषेत कलात्मक अनुभव देण्याचे सामर्थ असते.
स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdneMgip_-QKqpE9h6-2eXrsxFGB8-p2QN2no2l2ZX3xRs8qw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.