*मराठी विभाग*
बी.ए.भाग- 3 सत्र-6 पेपर क्रमांक- 13 ( *भाषाविज्ञान आणि मराठी भाषा)*
प्रा.डॉ.विश्वास पाटील
*मराठीचा उगम काळ*
मराठी भाषेचा उगम काळ आपणास निश्चित करावयाचा आहे मराठी भाषेची सुरुवात आपण यादव काळापासून म्हणजे तेराव्या शतकापासून मानतो समाजामध्ये मराठी भाषा व व्यापार स्थिर होत असताना म्हणजेच मराठी ही बोली भाषा किंवा लोक भाषा होताना या भाषेमध्ये या शतकात लिहिले बोलले जात होते त्यामुळे मराठीचा उगम का शोधताना आपणास यादव काळापासून मागे जाऊन विविध ग्रंथ शिलालेख आणि ताम्रपट यांचा मागोवा घ्यावा लागतो.
सन 1960 मध्ये भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र हे राज्य प्रामुख्याने मराठी भाषा बोलणाऱ्यांची आहे महाराष्ट्राच्या सीमा गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गोवा या राज्यांनी मर्यादित झाले आहेत महाराष्ट्राचे कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा असे स्थूलमानाने विभाग पडतात. मराठी भाषेचा उगम काढणे शेतीच्या साधनांमध्ये ग्रंथांना खूप महत्त्व आहे ग्रंथात असणारी भाषा त्यातील शब्द रुपये नाम क्रियापद विशेषण ए याचे स्वरूप पडताळून पाहिल्यास तत्कालीन मराठी भाषेची एक निश्चित रूपरेषा आपणास उभी करता येते आपण इथे काही ग्रंथांची माहिती घेऊ.
१) वररुचि- (इसवी सनाचे पाचवे शतक) या प्राकृत व्याकरणकारणे प्राकृत प्रकाश या आपल्या ग्रंथात महाराष्ट्री या प्राकृत भाषेला जणू प्रमुख प्राकृत भाषा म्हणून तिचे वर्णन पहिल्या आठ प्रकरणांमध्ये केले आहे. त्यानंतर शौरसेनी, मागधी व पैशाची या प्राकृत भाषांवर एकेक प्रकरण दिले आहे. ज्यावर ती महाराष्ट्री या प्राक्रुत भाषेवरच आठ प्रकरणे आहेत. तसेच तिचे व्याकरण लिहिले जाते त्यावर ती महाराष्ट्री प्राकृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती तसेच तिचा प्रसार वाढून ही जिवंत स्वरूपात विकसित होत होती हे लक्षात येते वररुची प्रमाणेच हेमचंद्रा नेही प्राकृत चंद्रिका या ग्रंथ नामाने प्रकृतीचे व्याकरण लिहिले.
२) कुवलयमIला - इ.स.७७८ ज्या कुवलयमला या ग्रंथाचा कर्ता कवी उद्योतनसूरी याने अठरा देशी भाषांचा उल्लेख केला आहे. त्यात मरहट्टे भाषेचा उल्लेख करून त्या देशातील माणसांचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे. दडमडह सामलंगे सहीरे आहीमाने कल हसिले ये गहिले डुलवी रे तत्व मरहट्टे आठव्या शतकाच्या सुमारास दिसणारी गहिले अशी शब्द रूपे मराठी भाषेचे विशिष्ट तत्त्व व्यक्त करतात. सर्वसामान्यांच्या व्यवहाराची ती लोकं भाषा बनली होती याचे ते निदर्शक आहेत.
३) नव्या शतकाच्या सुमारास विठ्ठल कविता वैद्यकचकोरचंद्रिका हा वैद्यक शास्त्रीय संस्कृत ग्रंथ अधून-मधून मराठी भाषेचा आधार घेताना दिसतो श्रीपती कवीचा ज्योतिष रत्नमाला हा ग्रंथ 1039 मधील आहे. या ग्रंथात श्रीपती कवी तिथी, वार, नक्षत्र, मुहूर्त या विषयाची खगोलशास्त्रीय माहिती मराठी भाषेत देतो.
४) राजमतीप्रबोध - इसवी सनाच्या अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात यशचंद्र जैन यांनी राजमती प्रबोध नावाच्या संस्कृत नाटकात राजीमती या नायिकीचे वर्णन मराठी भाषेत केले आहे. या नाटकात केला. त्यांनी महाराष्ट्र म्हणजेच मराठी स्त्री म्हटले आहे.
५) मानसोललास - चालुक्य वंशीय दुसऱ्या विक्रमादित्याचा मुलगा सोमेश्वर याने इस 1129 मध्ये मानसोल्लास अथवा अभिलासीतार्थचिंतामणनी नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात मराठी स्त्रिया जात्यावर दळण दळताना म्हणत असलेल्या ओव्यांचा उल्लेख आहे. यावरून मराठी लोकगीतांची जुनी परंपरा व तत्कालीन मराठी बोलीचे अस्सल रूप येथे पाहायला मिळते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.