(Ekal K Y)
राधानगरी महाविद्यालय राधानगरी
बी. ए. भाग 1. सेमीस्टर
2 पेपर नंबर 2
सामान्य मानसशास्त्र
टॉपिक 1 बुध्दीमत्ता
बुद्धिमापन टॉपिक मधील महत्त्वाचा मुद्दा बुद्धिमत्ता चाचण्या
व्यक्तीच्या बौद्धिक चाचणीचे संख्यात्मक मापन काढण्यासाठी बुद्धिमत्ता चाचण्या
तयार करण्यात आल्या . शैक्षणिक व व्यावसायिक निवडीत योग्य प्रकारे मापन करण्यासाठी
बुद्धिमत्ता चाचण्याचा वापर केला जातो. शालेय अभ्यास किंवा प्रगतीसाठी मुलाकडे
लक्ष देण्याची गरज लक्षात घेऊन फ्रेंच सरकारने ‘ बिने' यांच्याकडे कार्य सोपविण्यात आले. बोधात्मक समस्येचे निदान करण्यासाठी तसेच
शैक्षणिक निवड योग्य प्रकारे करण्यासाठी बौद्धिक चाचणीचा चांगल्या प्रकारे उपयोग
होऊ शकतो असे निदर्शनास आले.
बुद्धिमत्तेचे मूल्यमापन या घटकात दोन घटक महत्त्वाचे आहे
1)
बिने आणि बुद्धिमत्ता चाचणीचा विकास
2)
समकालीन बुद्धिमत्ता चाचणी
बुद्धिमापनाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने सुरुवात फ्रेंच
मानसशास्त्रज्ञ बिने यांनी केली. बौद्धिक क्षमतांचा मापनासाठी बीने यांनी पायाभूत
कार्य केले आहे . सन १८९६ मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतांचा
अभ्यास केला मानसिक मागासलेपणा किंवा कमी बुद्धीच्या विद्यार्थ्यांच्या
अभ्यासासाठी फ्रेंच सरकारने बिने यांना पाचारण केले वर्गात शिकवल्या जाणाऱ्या
शिकवण्याचा सर्व विद्यार्थ्यांना समान लाभ मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्या
विद्यार्थ्यांचे कृतीनुसार गट कारण्यात यावे अशी सूचना बीने यांनी केली. विद्यार्थ्यांची वर्गवारी करण्यात आली व वर्गातील विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट करण्यात आले . बुद्धी मापनासाठी वस्तुनिष्ठ व विश्वसनीय तंत्र हवे असे बिने यांना वाटले व इथून पुढे बुद्धिमापनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली बुद्धी मापनासाठी दोन संकल्पना महत्त्वाच्या आहेत.
मानसिक जे वय/बौद्धिक वय - व्यक्तीचे मानसिक वय हे बौद्धिक क्षमतेशी जोडले जाते बिनेच्या चाचणी च्या आधारे मुलांना त्यांच्या मानसिक वयाशी संबंधित गुणांक दिला . त्या-त्या वयो गटासाठी असलेले चाचणी प्रश्न बरोबर सोडणाऱ्या मुलाचे मानसिक व
सरासरी किंवा सामान्य असते याउलट त्यांच्या निर्धारित वयासाठीचे चाचणी प्रश्न
सोडवण्यात अपयश आले तर त्या मुलाचे मानसिक वय सरासरी किंवा सामान्य पेक्षा कमी
येईल असे दिसून आले.
उदाहरणार्थ विशाल चे जन्मवय आठ वर्ष आहे तर त्याचे शारीरिक
वय आठ वर्ष होय याच वयात साठीचे त्याने सर्व प्रश्न सोडवलतो तसेच दहा वर्षे
वयोगटासाठी तयार केलेली ही सर्व प्रश्न सोडवतो अशावेळी त्याचे शारीरिक वय अथवा
जन्म वय आठ वर्ष असले तरी याचे मानसिक वय दहा वर्ष इतके मानले जाते त्यामुळे त्या मुलास
हुशार म्हणून संबोधले जाते हे मानसिक वय बुद्धिमानासाठी उपयुक्त ठरते
सर्वसाधारणपणे ज्या वयोगटासाठी प्रश्न तयार केलेले प्रश्न सोडवण्यात
यशस्वी झाला तर तो सर्वसाधारण बुद्धिमत्तेचे व्यक्ती असे संबोधले जाते.त्याचबरोबर
आपल्या वयोमानापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी च्या प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यास
अशा विद्यार्थ्यांचे मानसिक मागासलेपणा अढळतो उदाहरणार्थ आठ वर्षाच्या मुलांने
फक्त सहा वर्षाच्या मुलासाठी चे प्रश्न सोडवले तर त्याचे मानसिक वय सहा वर्षे इतके
आढळून येतो म्हणून त्याचे त्यांना वयात असले तरी मानसिक वय सहा वर्षे इतके दिसते
म्हणून तो बौद्धिक मागासलेले व्यक्ती म्हणून संबोधले जाते मानसिक व अधिक असण हे
उच्च बौध्दिक पातळीचे लक्षण मानले जाते मानसिक वय ही संकल्पना बुद्धी मापनासाठी साठी
वापरली जातेत्याच प्रमाणे बुद्धिमापन ही संकल्पना बुद्धी मापनासाठी वापरली जाते पुढे
विल्यम स्टर्न या मानसशास्त्रज्ञाने बुद्धी मापनासाठी चे सुत्र विकसीत केले मानसिक
वय व शारीरिक वय याच्या गुणोत्तरस बुद्धिगुणांक
असे संबोधले जाते या सुत्रवरून व्यक्तीचा बुद्धीगुणाक
कढता येतो बुद्धिगुणांकाचे सूत्र पुढीलप्रमाणे बुद्धिगुणांक बरोबर
मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 होय
बुद्धिमापनचा पहिला प्रयत्न फ्रान्स माध्ये झाला आहे बिने व
त्यांचा सहकारी सायमन यांच्या मदतीने पहिली चाचणी 1905 दुसरी 1908 व तिसरी चाचणी
1911 साली विकसित केली 1905च्या बुद्धीमापन चाचणी त एकूण तीस प्रश्न होते त्या
चाचणी च्या आधारे लहान मुलांच्या बुद्धी मापनाचे मपन केले जाऊ लागले ही चाचणी तीन
ते अकरा वर्ष वयोगतासठी उपायुक्त हाती त्याचक्षणी तीस प्रश्न काठींनतेच्य पातळीवर आधारित होते वय
जस जसे वाढेल तसे प्रश्न कठीण दिले जात या चाचणीतिल किती प्रश्न सोडवतो या वरून व्यक्तीचा
मानसीक स्तर ठरतो ही 1905 ची चाचणी भाषिक व
वैयक्तिक स्वरूपाची आहे 1905 च्या चाचणी दोष कमी करण्यासाठी 1908 सली दुसरी
चाचणी विकसित केली 1908च्य बुद्धिमापन चाचणीत एकूण 49 प्रश्न होते ही चाचणी 3 ते 13 वयोगटासाठी कठीणतेच्य पातळीवर आधारित होते या
चाचणीमध्ये ही काही दोष आढळून आले हे दोष कमी करण्यासाठी बिने यांनी 1911 साली
तिसरी आवृत्ती विकसित केली 1911 चाचणी 3 ते 15 वयोगटासाठी होतीया चाचणीत एकूण 54 प्रश्न
होते हे प्रश्न वयोमानाला अनुसरून होते प्रश्नांची मांडणी कठिण तेच्या पातळीवर
आधारित होते
अशाप्रकारे बिने व त्याचा सहकारी सायमन याने 1905 1908 1911 साली बुद्धी मापनाच्या एकूण तीन चाचण्या विकसित केल्या या चाचण्या बिने सायमन बुद्धिमापन चाचणी या नावाने विकसित झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.