राधानगरी महाविद्यालय,राधानगरी.
बी. ए. भाग ३
अभ्यासक्रमपञिका क्रमांक १२
सञ :६
पाठ्यपुस्तक :साहित्यविचार
विभाग :२
घटक :काव्यानंदमीमांसा
🔹विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील🔹
🔹रसिकाचा आनंद: रसिकाला होणारा आनंद अर्थात वरील तीन गोष्टीपेक्षा वेगळ्या कारणांनी होतो. तो निर्माता नसतो म्हणून त्याचा आत्माविष्कारही होत नसतो. वाचकाची वृत्ती लेखनापेक्षा वाचनाची अधिक असते.क्रोचे या अभ्यासकांच्या मतानुसार रसिक वाचकाला दुसर्याची कलाकृती वाचन करीत असताना मनातल्या मनात निर्मितीच करीत असतो. त्याचा आत्माविष्कारही होत २असतो.परंतु ही निर्मिती अमुर्त असते व आत्माविष्कारही सूक्ष्म असतो, त्यामुळे त्याला मान्यता दिली तरीही,रसिकाच्या आनंदाची काही कारणे आहेत का? त्याबद्दलची मते
रसिकाला होणार्या आनंदामध्ये भावनाजागृतीचा भाग महत्वाचा असतो. ही भावना जागृती सर्व प्रकारचा अर्थ किंवा आशय समजल्याशिवाय होत नसल्याने अर्थग्रहण करण्यासाठी हे बुद्धीचे कार्य व्हावे लागते.अर्थामध्ये किंवा आशयामध्ये काही चमत्कृती असल्यास ते बुध्दीनेच वाचकाला समजते. येथे भावनाजागृती होण्याची गरज नसते. काव्यानंदामध्ये शारीरिक, बौध्दिक आणि भावनिक अशी तीनही अंगे असतात. यापैकी भावनिक अंगास सर्वात अधिक महत्व प्राप्त होते.
🔹१) ज्ञानानंद: काव्यानंदामध्ये ज्ञानानंदाचा भाग बराच असतो. नवीन काही वाचले, कळले, समजले यामध्ये मनुष्यातील जिज्ञासा या प्रवृत्तीचे दर्शन अधिक होते. या ठिकाणी प्रथम केवळ ज्ञानानंदाचाच आनंद असतो. जगातील पुष्कळशी वाड:मयाची निर्मिती या जिज्ञासावृत्तीमुळे झालेली आहे. व अशी तृप्ती झाल्याने आनंद होत असल्याचा अनुभव सर्वांचा असतो.
काव्यात व इतर ललित वाड:मय प्रकारात जिज्ञासावृती करण्याचे जे साधन आहे ते इतर ललित कलामध्ये आहे असे म्हणता येणार नाही. एखादे सत्य कळल्यामुळे होणारे मनाचे समाधान, औचित्य दर्शनाने होणारा आनंद, उच्च नैतिक तत्वे पटल्याने होणारी प्रसन्न वृत्ती, एखाद्या कलावंताच्या कृतीचे अवलोकन केल्याने वाटणारे कौतुक, पूर्ण लेखन वाचल्यामुळे वाटणारी चमत्कृती, या सर्वांमध्ये बौध्दीक आनंदालाच प्राधान्य असते. बहुतांशी वाचक तटस्थच असतो व तटस्थ राहूनच आस्वाद घेण्यात त्याला मौज वाटत असते. याला सेंद्रिय आनंद म्हणण्यापेक्षा ज्ञानानंद म्हणने अधिक संयुक्त होईल.
🔹२)जिज्ञासापूर्ती : जिज्ञासापूर्ती ही उपपत्ती माधव ज्युलियन यांनी मांडली, जिज्ञासापूर्ती म्हणजे कुतूहलपूर्ती होय. नवीन ज्ञान किंवा अनुभव यांचे काव्यानंदातील महत्व लक्षात घेऊन जिज्ञासापूर्तीमूळे होणार्या काव्यानंदाला मीमांसेत प्राधान्य दिले आहे. डाॅ. माधवराव पटवर्धन यांनी जिज्ञासापूर्ती हा काव्यानंदाचा गाभा आहे असे म्हटले आहे. मानवविषयक कुतूहलाच्या पूर्तीलाच काव्यानंदमीमांसेमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे. सामाजिक शास्ञांच्या अभ्यासानेही मानवविषयक कुतूहलाची पूर्ती बर्याच अंशी होण्यासारखी आहे. वाचकाला काही भावनिक आस्वाद मिळवून देण्याचे कार्य झाल्याखेरीज केवळ कुतूहलपूर्तीला महत्व नाही. म्हणूनच काव्यानंदामध्ये रसिकाला होणार्या भावानानुभवालाच प्राधान्य आहे.
कुतूहलपूर्ती हवीच त्यातून भावनाभूतीचा जन्म व्हावयास हवा अशी आवश्यकता वाटत नसती तर शाकुंतल ते नटसम्राट या सारख्या सर्वमान्य कलाकृती वाचण्याची प्रवृत्ती एकाच वाचकाला पुन:पुन्हा झाली नसती. इतिहासासारख्या विषयात कुतूहलपूर्ती लगेच संपते. कारण त्यामध्ये भावानुभव नसतो. अक्षरग्रंथांचे दुसरे, तिसरे, चौथे वाचन केल्यानंतरही भावानुभव संपत नाही. म्हणून केवळ जिज्ञासापूर्ती म्हणजे काव्यानंद नव्हे, तर जिज्ञासापूर्तीबरोबरच भावनानुभवही काव्यानंदामध्ये महत्वाचा घटक मानला जातो.
🔹 करुणरसानंद
करुनरसानंद: करुणरसाचा विचार काव्यानंदाच्या विचाराशिवाय अपूर्णच राहतो. करुणरसपूर्ण लेखनात काव्यगत प्रधान व्यक्तीस दु:खच झालेले वर्णन येत असल्याने रसिकाससुध्दा दु:खानुभव यावा असे म्हणने क्रमप्राप्त होते. मग काव्यानंद हा आनंद तरी कसा मानावयाचा? अशी अडचण उभी राहते. आपल्यापेक्षा पाश्यात्य देशात या मीमांसेचा विचार अधिक झाला आहे. कारण तिकडे शोकांतिकेचा संप्रदाय रुढ होता. त्या विचारात अॅरीस्टाॅटलच्या कॅथार्सिस या उपपत्तीला अधिक महत्व मिळाले काहीनी उपपत्या सुचविल्या. शोक हा करुणरसाचा स्थायीभाव आहे, करुणरसाची आस्वाद्यता मान्य केल्याबरोबरच शोकात नाटकाच्या दर्शनाने आनंदाची प्राप्ती होते, असे म्हणावे लागेल. ही आस्वाद्यता मान्य केली नाही तरी करुण नाटकांच्या प्रयोग दर्शनासाठी प्रेक्षक हे उत्सुक असतात. याचे उत्तर द्यावे लागेल. मग असामान्य लोकप्रियता लाभलेल्या शोकाला नाटकाच्या लोकप्रियतेचा खुलासा करणे भाग पडेल
🔹१) केवलानंदवाद:
संस्कृत अभ्यासक विश्वनाथ यांनी केवलानंदवादाचा पुरस्कार केला. करुणरसातसुध्दा अत्यंत सुख होते असे विश्वनाथालाळू वाटते अर्थात असा अनुभव ज्यांना येत नाही तो अरसिकच म्हणावा लागेल कोणीही साहित्यिक किंवा रसिक स्वत:स दु:ख व्हावे म्हणून करुनरसपूर्ण नाटक वाचण्यास किंवा पाहण्यास प्रवृत्त होतात, त्याअर्थी त्यांना या कलाकृतीपासून सुखच होत असले पाहिजे. रामायणासारखी महाकाव्ये दु:खकारक असली तरी या दु:खापासून सुख कसे प्राप्त होते याचे विवेचन करताना विश्वनाथ म्हणतो." व्यवहारात ज्या गोष्टी दु:खदायक होतात त्या काव्यात वर्णन केल्यानंतर त्यांना काव्यातील कल्पनेमुळे अलौकिक स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे त्या गोष्टी काव्यात सुखकारक ठरतात". करुणरसाचा भाग पाहून किंवा वाचून कित्येक रसिक अश्रु ढाळतात तेव्हा त्यांना दु:ख होत असले पाहिजे, असे अनुमान करणार्यास विश्वनाथाचे उत्तर असे आहे की, अश्रुपात हा सुखामुळेच होऊ शकतो.
करुण घटनेच्या दर्शनाने प्रेक्षकांना आनंदच होतो असे विश्वनाथाने मांडलेले मत बरोबर नाही. कारण रसपूर्ण घटनेच्या दर्शनाने दु:खच होते व असे दु:ख होते हे माहित असूनही प्रेक्षक पुन:पुन्हा' एकच प्याला' 'नटसम्राट' या सारखी नाटके पहावयास जातात याची चिकित्सा केली पाहिजे
२)विरेचन(कॅथार्सिस) : अनिष्ट विकारांच्या भावनांना वाट देवून मन थोडेसे हलके झाल्याने जे समाधान होते त्या स्वरुपाची मनाची अवस्था करुणरसाची असते. असे पाश्यात्य टीकाकारांचा गुरु असलेले अॅरिस्टाॅटल यांचे मत आहे. आपल्याकडे रससंबंधी भरतमुनींचे सूञ जसे प्रमाण मानले जाते व त्याच्या भोवतीच भाष्य व चर्चा घोटाळतात,त्या स्वरुपातच🔹१) केवलानंदवाद:
संस्कृत अभ्यासक विश्वनाथ यांनी केवलानंदवादाचा पुरस्कार केला. करुणरसातसुध्दा अत्यंत सुख होते असे विश्वनाथाला वाटते अर्थात असा अनुभव ज्यांना येत नाही तो अरसिकच म्हणावा लागेल कोणीही साहित्यिक किंवा रसिक स्वत:स दु:ख व्हावे म्हणून करुनरसपूर्ण नाटक वाचण्यास किंवा पाहण्यास प्रवृत्त होतात, त्याअर्थी त्यांना या कलाकृतीपासून सुखच होत असले पाहिजे. रामायणासारखी महाकाव्ये दु:खकारक असली तरी या दु:खापासून सुख कसे प्राप्त होते याचे विवेचन करताना विश्वनाथ म्हणतो." व्यवहारात ज्या गोष्टी दु:खदायक होतात त्या काव्यात वर्णन केल्यानंतर त्यांना काव्यातील कल्पनेमुळे अलौकिक स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे त्या गोष्टी काव्यात सुखकारक ठरतात". करुणरसाचा भाग पाहून किंवा वाचून कित्येक रसिक अश्रु ढाळतात तेव्हा त्यांना दु:ख होत असले पाहिजे, असे अनुमान करणार्यास विश्वनाथाचे उत्तर असे आहे की, अश्रुपात हा सुखामुळेच होऊ शकतो.
करुण घटनेच्या दर्शनाने प्रेक्षकांना आनंदच होतो असे विश्वनाथाचे मांडलेले मत बरोबर नाही. कारण रसपूर्ण घटनेच्या दर्शनाने दु:खच होते व असे दु:ख होते हे माहित असूनही प्रेक्षक पुन:पुन्हा' एकच प्याला' 'नटसम्राट' या सारखी नाटके पहावयास जातात याची चिकित्सा केली पाहिजे
२)विरेचन(कॅथार्सिस) : अनिष्ट विकारांच्या भावनांना वाट देवून मन थोडेसे हलके झाल्याने जे समाधान होते त्या स्वरुपाची मनाची अवस्था करुणरसाची असते. असे पाश्यात्य टीकाकारांचा गुरु असलेले अॅरिस्टाॅटल यांचे मत आहे. आपल्याकडे रससंबंधी भरतमुनींचे सूञ जसे प्रमाण मानले जाते व त्याच्या भोवतीच भाष्य व चर्चा घोटाळतात,त्या स्वरुपातच. यालाच अरिस्टाॅटल कॅथार्सिस म्हणतो.
स्वाध्याय: सोबत सरावासाठी प्रश्नपत्रिका दिलेली आहे. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करावी.
https://docs.google.com/forms/d/1VwqPyr1DIdh7YnS5KxAURNokkmVFhpMxWOlgzatOz3s/edit
Comments
Post a Comment