Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: अक्षरबंध / बातमी

Monday, 21 June 2021

अक्षरबंध / बातमी

 अक्षरबंध / बातमी .

बी. ए. भाग:१

अभ्यासक्रमपञिका :२

सञ :२

पाठ्यपुस्तक: अक्षरबंध

विभाग:३

बातमी

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

🔹परस्तावना:  आजच्या काळात वृत्तपञ, रेडिओ आणि दूरदर्शन ही सर्वाधिक प्रभावी प्रसारमाध्यमे आहेत. यातही वृत्तपञ हे या माध्यमातील सर्वात जुने माध्यम आहे.

वृत्तपञात बातम्या असतातच पण अग्रलेख, व्यक्तिविशेष लेख, मुलाखती, बाजूचे लेख वाचकांचा पञव्यवहार , स्फुटलेख ,चिञपट, नाटके, पुस्तके यांची समीक्षा शब्दकोडी, दैनंदिनी, जाहीर निवेदन, जाहिराती, मृत व्यक्तींना श्रद्धांजली अशा अनेक गोष्टी वृत्तपञात छापलेल्या असतात.

    तरीही प्रत्येक व त्तपञात बातमी  केद्रस्थानी असते.बातमीलाच सर्वाधिक महत्व दिलेले असते.'बातमी' या शब्दाला वार्ता, खबर, घटना, वृत्तांत,समाचार, वृत्त असे कितीतरी पर्यायी शब्द वापरले जातात. यालाच इंग्रजीत NEWS म्हटले जाते.NEWया शब्दावरुन NEWSहा शब्द आला असावा असेही मानले जाते.NEW हा शब्द लॅटिनमधीलNowa या शब्दाचे रुप आहे.

'न्यु' म्हणजे नवीन. बातमी नवीनच असायला हवी. जी घटना नेहमीच घडते त्यात बातमी नसते. म्हणून डाॅ. राजन गवस म्हणतात,'वाचकाना ज्या विषयात स्वारस्य म्हणजे इंटरेस्ट असतो, अशा नुकत्याच घडलेल्या घटनेची वस्तुनिष्ठ माहिती म्हणजे बातमी होय.'

   घडलेली प्रत्येक घटना ही बातमी नसते. त्या घटनेत बातमी होण्याची क्षमता असली पाहिजे.म्हणजेच पूर्वी कधी ऐकले नव्हते, पाहिले नव्हते,अनुभवले नव्हते अशा घडामोडींचा अहवाल म्हणजेच बातमी होय.

बातमी होण्यासाठी त्या घटनेत काही वेगळेपणा असायला हवा. वाचक ती बातमी वाचणार असतात. म्हणून वाचकांना त्या बातमीत रस हवा, तरच बातमीचे वार्तामूल्य वाढेल. ज्या बातमीने वाचक प्रभावित होतात त्या बातमीला वार्तामूल्य असते.

उदा. एका राञीत हजार रुपयाची नोट चलनातून बाद होणे या घटनेला फार महत्व आहे. ही घटना नवीन आहे आणि वाचकांच्चा दृष्टीने तिला अतिशय महत्व आहे

   स्पष्टता,ताजेपणा, अनपेक्षितता, मानवी स्वारस्यता, लोकांची आवड निकटता, सत्यता, स्पष्टता, प्रभावक्षमता ही महत्वाची वार्तामूल्ये आहेत.

'रुढघटनेपेक्षा वेगळी, ताजेपणा असणारी, कुतूहल क्षमन करणारी  घटना म्हणजे बातमी. थोडक्यात सांगायचेझाले तर बातमी ही वाचकांचे लक्ष  वेधून घेते.

उदा. पत्नीच्या चारिञ्यावरुन संशय घेऊन पतीने पत्नी व तीन मुलांचा खून केला' ही बातमी वाचकांचे लक्ष निश्चितच  वेधून घेईल. पणही घटना केवळ या एका वाक्यात सांगून उपयोग नाही तर ही घटना वर्णन करुन सांगायला हवी.तसेच ही घटना घडून गेल्यावर आठ दिवसांनी सांगून उपयोग नाही तर लगेच समजायला हवी ताजी हवी. लगेच समजायला हवी ताजी हवी.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...