Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: काव्यानंदमीमांसा

Wednesday, 9 June 2021

काव्यानंदमीमांसा

 बी. ए. भाग: ३

अभ्यासक्रमपञिका :१२

सञ :६

पाठ्यपुस्तक :साहित्यविचार

सञ :६

विभाग :२ काव्यानंदमीमांसा

विषय प्राध्यापक : प्रा बी. के.पाटील

🔹 परास्ताविक : आनंद हे प्रयोजन काव्याच्या प्रयोजनापैकी एक सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे. त्या आनंदाचा एक महत्वाचा भाग म्हणजे रसास्वाद .काव्याचे आनंद हे प्रयोजन द्विविध आहे. एक काव्यरचना करणार्‍या कवीचा आनंद आणि दुसरा काव्याचा आस्वाद घेणार्‍या सहद्य रसिकाना होणार्‍या आनंदाचीच चर्चा अधिक झाली आहे

🔹कविचा आनंद: कवीच्या आनंदाचा विचार करतांनाही त्या आनंदाचे स्वरुप आणि कारणे असा दुहेरी विचार करावा लागतो आनंद म्हणजे सुख व सुख म्हणजे काही अनुकूल संवेदना  या पलीकडे कोणत्याही आनंदाचे स्वरुप तपशीलासह सांगणे अशक्य असते. काव्यरचना करतांना कवीला स्वत:चे भान राहात नाही. आजुबाजूच्या परिस्थीचे भान लेखकाला नसते .एक प्रकारची तादात्म्याची अवस्था निर्माण होते. समाधी लागल्यासारखी वाटते. इतकेच वर्णन या आनंदाच्या अवस्थेचे आपण करु शकतो, पण ही आनंदाची केवळ लक्षणे आहेत. प्रत्यक्ष आनंद कसा असतो? हे वर्णन करुन सांगण्यापेक्षा केवळ अनुभवानेच कळू शकते  काव्यरचन करुन झाल्यानंतर  कवीला समाधान वाटत असावे. आपण हातात घेतलेले कार्य तडीस गेले किंवा आपल्या हातून एखादी चांगली कलाकृती निर्माण झाली. या भावनेतून आनंद वाटणे स्वाभाविक आहे, माञ हा भाग निर्मितीनंतरचा आहे ते समजुन घेणे अधिक महत्वाचे आहे. पण या अवस्थेचे केवळ वर्णन करण्यापलीकडे काही सांगता येणे शक्य नसते. त्याची कारणे पाहू.

🔹करीडेचा आनंद :   काव्य ही कला आहे. सर्व प्रकारच्या कला म्हणजे क्रीडा आहेत,असे क्रीडावादी मंडळींचे मत आहे. त्यामुळे कवीला होणारा आनंद म्हणजे क्रीडेमध्ये होणारा आनंद असेच म्हणावयास हवे. क्रीडेमुळे होणार्‍या आनंदाविषयी हर्बर्ट स्पेन्सरने सांगितलेली उपपत्ती आजही मान्य केली जाते." जीवनामध्ये जीवनास आवश्यक असणारी जीवनशक्ती खर्च होऊन गेल्यावरही जी अधिकची जीवनशक्ती माणसामध्ये शिल्लख राहाते, तिचा विनियोग होण्याचा मार्ग म्हणजे माणसामध्ये असलेली क्रीडाप्रवृत्ती होय. " असे त्याचे म्हणणे आहे. जीवनशक्ती उपजीविकेच्या व्यवसायातच खर्च होऊ लागली तर मनुष्य क्रीडेला प्रवृत्त होणार नाही. जीवनशक्ती आवश्यकतेपेक्षा अधिक झाली तर तिचा विनियोग व्हायलाच  पाहिजे, तो तसा झाला नाही, तर शरीरात काही विकार उत्पन्न होईल म्हणून तो आपोआपच क्रीडेला प्रवृत्त होतो. आपल्यामध्ये असलेल्या जीवनशक्तीचा हा विनियोग शारिरीक स्वास्थ्यासाठी लाभदायकच होतो.

🔹निर्मितीचा  आनंद:   केवळ हालचाल, परिश्रम  किंवा काही वृत्ती एवढ्यानेच कवीला होणार्‍या आनंदाची सारी उपपत्ती लावता येणार नाही. तसे असते तर प्रत्येक हमाल, मजूर किंवा बौद्धिक काम करणारा कारकून यानाही कामाचा आनंद मिळाला असता. परीश्रमाचा विनियोग निर्मितीसाठी व्हावा अशी अपेक्षा काव्यामध्ये असते. एखाद्या कृतीमध्ये जसा आनंद आहे तसाच किंबहूना त्यापेक्षा अधिक आनंद काव्यनिर्मितीमध्ये आहे. लौकिक व्यवहारातही बागकाम करुन फळे-फुले निर्माण करण्यात, मोठमोठ्या राजकीय व सामाजिक योजना आखून त्या पूर्ण करण्यात सुख व आनंद असतो. याचे कारण त्या कार्यात केवळ अनुत्पादक परिश्रम किंवा हमाली झालेली नसते. सर्व कला आणि काव्य यामध्येही बर्‍याच अंशी अशीच  स्थिती असतेज

🔹आत्माविष्कारानंद :   निर्मितीच्या आनंदाचे एक महत्वाचे अंग म्हणजे आत्माविष्कार किंवा अभिव्यक्ती होय. मनूष्य जे काही करतो त्यातून त्याचे स्वत:चे व्यक्तित्व प्रकट होत असते. विशेषत: स्वत:च्या स्फूर्तीने जर त्याने काही केले असेल तर त्यामध्ये आत्माविष्कार हा असतोच असतो. कवीला सृष्टीतील विविध प्रकारचे सौंदर्य पाहून, त्याचे ग्रहण करुन ते सौंदर्य कसे असते हे वाचकाने सांगावेसे वाटते, म्हणून तो काव्यरचना करतो. त्यामध्ये त्याचा आत्माविष्कारच व्यक्त होतो. ही त्याची स्वत:ची अभिव्यक्ती त्याला सुख देवून जाते.अभिव्यक्तीएवढी सुखात्मक जाणीव इतर कशानेही त्याला होणार नाही, व्यवहातही नोकरीपेक्षा स्वत:च्या उद्योगात किंवा संयुक्त कुटुंबापेक्षा विभक्त कुटुंबात सुख वाटते, त्याचे कारण म्हणजे तेथे व्यक्तीचा आत्माविष्कारास वाव मिळतो, त्या ठिकाणी घर सजविणे, पोषाख करणे, स्वत:चे मत प्रतिपादन करणे यासारख्या प्रत्येक हालचालीतून आत्माविष्कार घडत असतो.

    प्रथम केवळ कृती मग त्यापेक्षा अधिक म्हणजे अभिव्यक्ती होय. अखेर निर्मिती या विविध क्रियाप्रक्रियातून असणारे गुण हाच काव्यलेखकाचा आनंद होय. यशप्राप्ती व अर्थप्राप्ती या आनंदात भर पडते. पण आनंदाचे हे प्रकार अनुषंगिक दुय्यम दर्जाचे व तितकेसे विशुद्ध नसणारे असे होत. यश व अर्थ हे निर्णयाची खाञी नसतानाही वाड:मय निर्मिती करीत राहतात, ते वर उल्लेखलेल्या तीन कारणामुळेच. कवीला कवी म्हणून जो आनंद होतो तो या स्वरुपाचा असतो.


स्वाध्याय: सराव प्रश्नपत्रिकेसाठी खालील लिंक गुगलमध्ये कॉपी करावी व प्रश्नपत्रिका सोडवावी.

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeppqfzXArBLmXhsBRUhku0PUAg3wjgUHlP64LoqTvCcLqWHw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link



1 comment:

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...