(J D Ingawale)
बीए. भाग 3 सेमी.६ आर्थिक विचारांचा इतिहास भाग 2
महात्मा जोतीराव फुले यांचे शैक्षणिक व शेतीविषयक विचार
प्रास्ताविक
एक खंदा समाजसुधारक, दूरदृष्टी असलेला शिक्षणतज्ज्ञ, वास्तवाचे भान असलेला कृषितज्ज्ञ, थोर मानवतावादी आणि समाजातील शूद्रातिशूद्रांचा तारणहार म्हणून महात्मा जोतीराव फुले यांना आपण ओळखतो. त्यांचा जन्म १८२७ मध्ये झाला. त्याचे संपूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई. जोतीरावांची आई जोतीराव एक वर्षाचा असतील तेव्हा वारली. वडील
गोविंदराव यांनी जोतीरावांना वयाच्या ७ व्या वर्षी शाळेत पाठविले. परंतु एका ब्राह्मण कारकुनाच्या सल्ल्यामुळे ३-४ वर्षांतच जोतीरावाना शाळेतून काढून टाकले.
पुढे गोविंदरावांना गफव्हार बेग मुनशी आणि मे.लिजिट साहेब यानी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांनी जोतीरावांना १८४१ ला स्कॉटीश मिशनच्या इंग्रजी शाळेत दाखल केले. स्कॉटीश शाळेत शिक्षण घेत असताना जोतीरावानी केलेले वाचन, चिंतन त्यांना पुढील आयुष्यातील संघर्षात खूप उपयोगी पडले.
समाजातील अज्ञान दूर केल्याशिवाय समाजातील असमानता दूर होणार नाही, शूद्रातिशूद्रांना माणुसकीचे जीणे प्राप्त होणार नाही, समाजातील गुलामगिरीचा अंत होणार नाही. हे करावयाचे असेल तर हे काम मुलींच्या शिक्षणापासून सुरू करणे आवश्यक आहे हे ओळखून जोतीराव फुले यांनी १८४८ ला पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. १८५१
ला रास्ता पेठेत चिपळूणकराच्या वाड्यात दुसरी मुलींची शाळा सुरू केली. अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी १८५१ ला नानापेठेत शाळा उभी केली. १८५५
ला रात्रशाळा सुरु केली. बहुजन समाजाच्या शिक्षणास चालना मिळावी म्हणून १९ ऑक्टोबर, १८८२
रोजी हंटर आयोगास निवेदन सादर केले.
याशिवाय पुनर्विवाहास चालना देण्यासाठी १८६४ ला शेणवी जातीत पहिला पुनर्विवाह घडवून आणला. १८६३
ला बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. अस्पृश्य समाजासाठी आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद १८६८ ला खुला केला. ते१८७६ते १८८२ या काळात पुणे नगरपालिकेचे सदस्यही होते.
शूद्रातिशूद्रांचे हाल कमी व्हावेत आणि गुलामगिरी विरोधातील लढा यशस्वी व्हावा या दृष्टीने चळवळ उभी राहिली पाहिजे हे ध्यानी घेऊन जोतीराव फुले यांनी १८७३ ला 'सत्यशोधक समाज' स्थापन केली. त्याचे वैचारिक मूलाधार खालीलप्रमाणे होते -
१. ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे व सर्व मनुष्यप्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत. २. ईश्वराची भक्ती करण्यास प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार आहे. आईस
संतुष्ट करण्यास अगर बापास विनविण्यास जशी त्रयस्थ दलालाची जरुरी नसते, त्याप्रमाणे सर्वसाक्षी परमेश्वराची भक्ती करण्यास भट-दलालांची आवश्यकता नाही.
३. कोणीही जातीने श्रेष्ठ नसून फक्त गुणाने श्रेष्ठ ठरतो.
आपल्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी अनेक ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यामध्ये (१) तृतीय कला (१८५५) (२) छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा (३) ब्राह्मणांचे कसब (१८६९) (४) गुलामगिरी (१८७३) (५) शेतकऱ्याचा आसूड (१८८३) (६) सत्सार (१८८५) (७) इशारा (१८८५) (८) सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक (१८९१) आणि (९) अखंडादि काव्यरचना (प्रकाशन वर्ष उपलब्ध नाही.) यांचा समावेश होतो.
या थोर कृतिशील समाजसुधारकाच्या कार्याने प्रभावित होऊन जनसामान्यांनी ११ मे, १८८८
रोजी कोळीवाडा (मुंबई) येथे
आयोजित जाहीर सभेत जोतीराव फुले यांना 'महात्मा' ही पदवी बहाल केली. अशा
थोर समाजसुधारकाच्या शैक्षणिक आणि कृषीविषयक विचारांचा मागोवा या भागात घेणार आहोत.
महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार
१. शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा पाया - शूद्रातिशूद्रांना गुलामगिरीतून बाहेर काढणे आणि समाजात समानतेचे तत्त्व अधिष्ठित झाले पाहिजे हा महात्मा फुले यांचा आग्रह होता. हे करावयाचे असेल तर शूद्रातिशूद्रांना शिक्षण देण्यावाचून पर्याय नाही हे फुले यांनी ओळखले होते. 'समाजात शब्दप्रामाण्य, जुने आचार-विचार, जुन्या रूढी, कर्मकांड, जपजाप्य, पूर्वसंचित, पूर्वजन्म, ईश्वरी संकेत, स्वर्गनरक कल्पना प्रस्तुत करणाऱ्या आणि मानवी कर्तृत्व दास्यशृंखलात बद्ध करून टाकणाऱ्या भोळ्या समजुर्तीवर जोतीरावांना सतत आघात करावे लागले होते. त्यासाठी ना जोतीरावांनी शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणावर भर दिला. ब्राह्मणांचे कसब, विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी, अखंडादि काव्यरचना या लिखाणात त्यांनी विद्याप्रसारावर भर दिला. हंटर शिक्षण आयोगासमोर शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणाची कैफियत मांडली.त्यांच्या 'शेतकऱ्यांचा आसूड' मधील पुढील पंक्ती अविद्येमुळे होणाऱ्या शोषणाचा पंचनामाच आहे. विद्येविना मति गेली, मतिविना नीति गेली,
नीतिविना गती गेली ।
गतिविना वित्त गेले; वित्ताविना शूद्र खचले;
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
२. सक्तीचे प्राथमिक शिक्षण - १९ व्या शतकातील शिक्षणव्यवस्थेत शूद्रातिशूद्रांचा सहभाग नगण्यच होता, सरकारच्या धोरणाप्रमाणे अशी काही मुले हजेरीपटावर असावीत म्हणून हजेरीपटावरच काही मुलांचा प्रवेश दाखवला जात असे. त्यामुळे शूद्रातिशूद्र शिक्षणाला वंचितच होते.
या संदर्भात महात्मा फुले यांनी सांगितले आहे की, “शेतकरी आणि इतर तत्सम वर्गांना प्राथमिक शिक्षणाचा लाभ घेता येत नाही. या वर्गापैकी काही थोडी मुले प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत घातली जातात. परंतु दारिद्र्यादी कारणांमुळे ती या शाळात टिकून राहू शकत नाहीत. घरकाम किंवा एखादा कामधंदा मिळाला की, ती स्वाभाविकच शाळा सोडून जातात." यावर उपाय म्हणून महात्मा फुले यांनी जे उपाय सुचविले त्यामध्ये (१) काही ठरावीक वयापर्यंत, निदान वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे आणि (२) शेतकरी व इतर वर्गाला आपली मुले शाळेत पाठविण्यास उत्तेजन मिळावे आणि त्यामध्ये विद्येची गोडी उत्पन्न व्हावी म्हणून शिष्यवृत्त्यांची व सहामाही वा वार्षिक बक्षिसांची विशेष प्रलोभने ठेवावीत. याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल
याशिवाय प्राथमिक शिक्षण प्रसारा संदर्भातील महात्मा फुले यांच्या खास शिफारशी पुढील प्रमाणे सांगता येतील.
१. प्रत्येक शाळेत प्रमाणपत्रित शिक्षक नेमले पाहिजेत.
२. ज्या शाळांत प्रमाणपत्रित शिक्षक नेमले आहेत यांना सढळ हाताने अनुदान द्यावे.
३. स्थानिक कराच्या निधीपैकी ५० टक्के निधी प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा. ४. नगरपालिकेने आपल्या हद्दीतील प्राथमिक शाळा स्वखर्चाने चालवाव्यात.
५. प्रांतिक किंवा मध्यवर्ती निधीतून पुरेसे अनुदान मिळण्याची तरतूद करावी. ६. ज्या ठिकाणी ज्या जातीची वस्ती पुरेशी मोठी असेल, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा उघडाव्यात.
३. शिक्षक मूलतः शेतकरी असावा -. शूद्रातिशूद्रांचे शिक्षण चांगल्याप्रकारे व्हावयाचे असेल तर ते ब्राह्मण शिक्षकांकडून होणार नाही कारण उच्च-नीचतेच्या पूर्वग्रहदूषितपणामुळे ब्राह्मण शिक्षकांकडून शेतकऱ्यांच्या मुलांस शिस्तवार व सोईची विद्या दिली जाणार नाही असे महात्मा फुले यांचे स्पष्ट मत होते. त्यासाठी ते शूद्रांच्यामधूनच शिक्षकांची नियुक्ती व्हावी यावर भर देताना सांगतात,
"कारण उच्च-नीचतेच्या पूर्वग्रहदूषितपणामुळे ब्राह्मण शिक्षकांकडून शेतकऱ्यांच्या मुलांस शिस्तवार व सोईची विद्या दिली जाणार नाही असे महात्मा फुले यांचे स्पष्ट मत होते. त्यासाठी ते शूद्रांच्यामधूनच शिक्षकांची नियुक्ती व्हावी यावर भर देताना सांगतात,
अशा शिक्षकांचे शिक्षणप्रसारात योगदानही महत्त्वाचे राहील. कारण 'ब्राह्मण' वगतिले शिक्षक धार्मिक पूर्वग्रहामुळे कनिष्ठ वर्गीयांशी फटकून वागतात. शेतकरी वर्गातले शिक्षक त्या वर्गात अधिक सहजपणे मिसळतील. त्यांच्या गरजांशी आशाआकांक्षांशी अधिक चांगल्या रीतीने समरस होतील. प्रसंगी नांगराची तुमणी किंवा सुताराची तासणी हाती त्यांना कमीपणा वाटणार नाही. समाजातील कनिष्ठ थरांशी ते तत्परतेने एकरूप होतील. त्यामुळे अन्य वर्गातून आलेल्या शिक्षकांपेक्षा हे शिक्षक बहुजन समाजावर हितकारी असा प्रभाव पाडू शकतील." अशी महात्मा फुले यांची धारणा होती. तथापि, गुणवत्तेच्या बाबतीत तडजोडीस फुले तयार नव्हते. त्यामुळे बहुजन समाजातील शिक्षक प्रशिक्षितच असले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. शेती व्यवसायाचे शिक्षण लक्षात घेऊन 'स्वतः पाभरी, कोळणी व नांगर हाकून दाखविणारे शिक्षक तयार करावेत' असे फुले आवर्जून सांगतात.
या संदर्भात महात्मा फुले यांचे विचार सूत्रबद्धपद्धतीने पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१. शिक्षक हा प्रशिक्षितच असला पाहिजे.
२. ज्या शाळेत प्रशिक्षित शिक्षक आहेत त्यांना सढळपणे अनुदान देण्यात यावे.
३. प्रशिक्षित शिक्षक नसणाऱ्या शाळांना अजिबात अनुदान देऊ नये.
४. शिक्षकांना चांगले वेतनमान देऊन त्यांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणाव्यात.
५. जादा अटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकास जादा भत्ते देण्यात यावेत.
४. कौशल्यवृद्धी अभ्यासक्रम असावेत
मूलभूत शिक्षणाबरोबरच कौशल्यवृद्धी अभ्यासक्रमावर फुले यांचा भर होता. शिक्षणाची व्यावहारिक बाजू त्यांना महत्त्वाची वाटत होती. जर आर्थिक सुधारणा व्हावयाच्या असतील तर व्यावहारिक शिक्षणास पर्याय नाही असे त्यांना वाटत असे. "अभ्यासक्रमात मोडी, बालबोध, शिषवाचन, हिशेबाची माहिती, सर्वसाधारण इतिहास, भूगोल, व्याकरण यांचे प्राथमिक ज्ञान तसेच नीती आणि आरोग्य यासंबंधीचे सोपे धडे अंतर्भूत करावे. शहरातील व मोठ्या गावातील शाळांच्या अभ्यासक्रमापेक्षा खेड्यातील शाळांमधील अभ्यासक्रम कमी असावा. मात्र व्यवहारोपयोगी होण्याच्या दृष्टीने त्यात कसलीही उणीव नसावी. विद्यार्थ्यांना शेतकीच्या पाठांच्या जोडीने प्रत्यक्ष व्यावहारिक शिक्षण देता यावे म्हणून एक 'आदर्श' शेतीची छोटीशी योजना आखल्यास फायदेशीर ठरेल." असे महात्मा फुले यांना वाटते.
५. उच्च शिक्षण.
-. महात्मा फुले यांनी उच्च शिक्षणविषयक मांडणी 'हंटर शिक्षण आयोगा' समोर केली होती. ती संक्षिप्तपणे अशी -
१. कोणत्याही पातळीवर शिक्षण व्यवस्था खाजगी यंत्रणेकडे सोपविणे योग्य नाही.
२. शाळां महाविद्यालये सरकारी नियंत्रणाखाली असावीत.
३. महाविद्यालयांमधून दिले जाणारे शिक्षण दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यास
समर्थ असावे.
४. उच्च शिक्षणाची व्यवस्था सर्वांना सुलभपणे उपलब्ध व्हावी.
५. उच्च शिक्षणाच्या परीक्षा बहिःस्थ विद्यार्थी म्हणून देता याव्यात.
६. मागासवर्गीय समाजातील मुलांसाठी खास शिष्यवृत्त्या देण्यात याव्यात.
७. उच्च शिक्षणात तांत्रिक व व्यवहारोपयोगी अभ्यासक्रमांचा अंतर्भाव असावा.
६. स्त्री शिक्षण
एक पुरुष शिकला की तो एकटा शिकतो आणि एक स्त्री शिकली की एक कुटुंब शिकते या भूमिकेतून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाकडे पाहिले. तत्कालीन समाजातील चालीरीतींच्यामुळे अनेक निरपराध स्त्रियांचे जीवन हालअपेष्टांचे झाले होते. बालविवाह सर्रास चालत होते. विधवाविवाह निषिद्ध मानला जात असे. बालविधवेचे केशवपन हा धर्म मानला जावयाचा. स्त्रिया पुरुषांपेक्षा जन्मतः दुय्यम दर्जाच्या अशा गोष्टी दूर व्हावयाच्या असतील तर स्त्री शिक्षण महत्त्वाचे. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे 'स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे तरच ईश्वर कृपेने त्यांचे अज्ञान दूर होऊन त्या आपल्या पतीच्या चांगल्या साह्यकर्त्या व आवडत्या होतील. आपल्या मुलांस उत्तम बोध व शिक्षण करतील व आपला संसार दक्षतेने चालवतील.' या हेतूने महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये पहिली शूद्रातिशूद्रांच्या मुलींची शाळा सुरू केली. १८५१ ला मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली. उपवर स्त्रियांसाठी रात्रीची शाळा १८५५ ला सुरू केली. या शाळांमध्ये स्वतः जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले शिक्षकांचे काम करीत होते.
"स्त्री-पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या
!! विद्या शिकविण्या
!! भेद नाही
!! हा महात्मा फुले यांचा स्त्री शिक्षणविषयक दृष्टिकोण होता. हंटर शिक्षण आयोगापुढे साक्ष देताना स्त्रियांचे मागासलेपण दूर व्हावयाचे असेल तर त्यांना लहानपणापासूनच शिक्षण दिले गेले पाहिजे. त्यासाठी 'स्त्रियांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा"
अशी मागणी केली होती.
७. शिक्षणाचे अर्थकारण
महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार मूलतः लक्षात घेतले तर ते पूर्णतः विकासाभिमुख स्वरूपाचे असल्याचे आढळून येते. समाजाच्या मानसिक आणि भौतिक विकासामध्ये शिक्षणाची महत्त्वाची भूमिका राहते. महात्मा फुले यांनी शिक्षणासाठीच्या निधीच्या उपलब्धतेपासून विनियोगापर्यंत त्यामधून हाती येणाऱ्या फलनिष्पत्ती आणि त्यामधून विकास प्रक्रिया गतिशील करण्यावर भर दिल्याचे लक्षात येते. त्यांच्या शैक्षणिक धोरणास पायाभूत ठरणारा अर्थविचार संक्षेपाने असा सांगता येईल-
१. धोरणात्मक पातळीवर या गोष्टीसाठी निधी निश्चित केलेला असतो त्यावर तो खर्च होण्यावर विकास अवलंबून असतो. त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या मुलास विद्या देण्याची थाप देऊन वसूल करीत आलेला एकंदर सर्व लोकल फंड तेवढा तरी निदान शेतकन्यांच्या मुलास मात्र इमानेइतबारे विद्या देण्याच्या कामी खर्ची घालावा असे महात्मा
२. शिक्षण क्षेत्रामधील शिक्षकीपेक्षा हा रोजगारनिर्मितीचे एक महत्वाचे क्षेत्र होय. त्याठिकाणी शेतकन्यांच्या मुलांना शिक्षक म्हणून नियुक्ती करावे यामुळे त्यांची बेरोजगारी कमी होईल आणि पर्यायाने दारिद्र्य निर्मूलनास हातभार लागेल.
३. कौशल्यवृद्धी अभ्यास विषयावर महात्मा फुले भर देतात. एवढेच नव्हे तर 'शूद्र गावकन्यांची मुले जी मराठी सहावी इयत्तेसह नांगर, पाभर व कोळणी हाकण्याची परीक्षा देऊन सद्गुणी निवडतील, त्यास मात्र पाटीलक्या द्याव्यात' अशी मागणी महात्मा फुले करतात. याचा फायदा शेतीसाठी आवश्यक कौशल्यात वृद्धी आणि परिणामतः शेती उत्पन्नात वाढ होण्यात होणार आहे. आज कृषी विद्यापीठे जी कामे करीत आहेत तो विचार फुले यांनी १९ व्या शतकात व्यक्त केला होता. आदर्श शेती योजनेची संकल्पना मांडली होती..
४ महात्मा फुले यांनी तंत्र शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. त्याचबरोबर व्यवहारोपयोगी शिक्षणासही प्राधान्य दिलेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवसायाभिमुख शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी वाढतात आणि परिणामतः समाजाच्या राहणीमानाचा दर्जा वाढू शकतो.
५. वंचितांच्या शिक्षणाचा विचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यामधून त्यांचा आणि पर्यायाने विकास साधण्याच्या बाबींवरही महात्मा फुले यांनी भर दिलेला आहे. थोडक्यात, गर्तेत सापडलेल्या शूद्रातिशूद्रांना त्यामधून बाहेर काढणे आणि 'वित्ताविना शुद्र खचले' असे होऊ नये यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी घेतलेली शैक्षणिक भूमिका, विकासाभिमुख समाजरचनेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे असे वैचारिक पाऊल आहे असे म्हणता येईल.
महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार
प्रस्तावना. -. महात्मा फुले स्वतः शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेची जवळून माहिती झाली होती.१९ व्या शतकातील महाराष्ट्र आणि तत्कालीन शेतकऱ्यांची स्थिती यावर अत्यंत परखड मते ‘शेतकऱ्यांचा आसूड' या पुस्तकात मांडली आहेत. इतर ठिकाणीही संदर्भानुसार महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली आहे. तथापि, शेतकऱ्यांच आसूड' हा ग्रंथ शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा पंचनामाच करतो.
या ग्रंथामध्ये ने शेतीविषयक विचार महात्मा फुले यांनी मांडले आहेत ते साररूपाने धनंजय कीर आणि सं. गं. मालसे यांनी अत्यंत समर्पकपणे पुढील शब्दांत मांडले आहेत. 'शेतकऱ्यांचा आसूड' हा जोतीरावांचा ग्रंथ अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. या ग्रंथात त्यांनी शेतकन्यांच्या अवनत स्थितीचे विदारक चित्र रेखाटून त्या अवनत स्थितीची मूलगामी मीमांसा केली आहे आणि ती सुधारण्यासाठी सर्वांगीण उपाययोजनाही सुचविली आहे. जमिनीची सुधारणा कशी करावी, धरणे, पाटबंधारे कोठे बांधावेत, गुरांची उत्तम निपज कशी करावी, जमिनीची धूप थांबविण्यास काय करावे, शांततेच्या काळात शेतीसुधारणेच्या विधायक कार्यासाठी सैनिकांचा उपयोग कसा करता येईल, अन्य सुधारलेल्या राष्ट्रांत शेती कशी केली जाते, याचे शिक्षण देऊन भारतीय शेतक-यांच्या मुलांना परदेशांत पाठवून आपण कसे अगत्याचे आहे. शेतकीची वार्षिक प्रदर्शन भरवून उत्तम पीक काढणाऱ्या शेतकन्यास पारितोषिके देणे कसे उपकारक ठरणार आहे, यांसारख्या विधायक सूचनांबरोबर, शेतांतून चोन्या झाल्यास पोलिसांना दंड का केला पाहिजे. वाढीदिदी करणाऱ्या सावकार व्यापाऱ्यांवर करडी नजर कशी ठेवली पाहिजे, ब्रिटिश भांडवलदारांचे अवाच्या सवा व्याज का बंद केले पाहिजे, शेतीस आवश्यक असलेल्या पशुधनाच्या रक्षणासाठी गोवधबंदी कशी आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचा नैतिक अधःपात होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत. अशांसारख्या संरक्षक सूचनाही या ग्रंथात अनेक आहेत.
शेतीविषयक विचार. (अ) शेतकऱ्यांविषयी
१. महात्मा फुले यांच्या लिखाणात मुख्यतः १८५० ते १८९० या कालखंडातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील आणि विशेषतः पुणे परिसराशी निगडित असलेल्या शेती व शेतकऱ्यांविषयक उल्लेख आलेला आहे.
२. विशेष म्हणजे त्यांच्या इतर सर्व साहित्यात जरी ठिकठिकाणी शेती, शेतकरी त्यांच्या बायका आणि मुले यांच्याबद्दल अनेकविध पद्धतीने भौतिक जीवनासंबंधी विचार व्यक्त झालेले असले तरी खऱ्या अर्थाने त्यांनी लिहिलेल्या शेतकल्याचा आसूड' या ग्रंथात त्यांचे विचार व्यक्त झालेले आहेत. हा त्यांच्या कालखंडातील आहे. जवळजवळ ३५ ते ४० वर्षांचा शेती, शेतकरी आणि शेती अर्थव्यवस्था याबद्दल अतिशय जवळून त्यांनी घेतलेले सर्व अनुभव, पूर्ण उकललेल्या स्वरूपात आणि प्रौढत्वाच्या पूर्ण जबाबदारीने या ग्रंथात आलेले आहेत.
३. या कालखंडात शेतकन्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती असा निष्कर्ष मांडता येतो व या हलाखीची मुख्य तीन कारणे तीन प्रकारच्या पिळवणुकीत आहेत असे फुले यांना वाटते. या प्रकारच्या पिळवणुकी म्हणजेच (अ) धर्म आणि धर्माच्या ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची केली जाणारी नाडवणूक (ब) नोकरशाहीकडून शेतकऱ्यांची केली जाणारी पिळवणूक आणि (क) सावकारशाहीकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक.
४. वरील पैकी धर्म आणि धर्माच्या ठेकेदारांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक वेगळ्या अर्थाने समाजातील उत्पादन घटकाने पूर्णाथन अनुत्पादक असणाऱ्या अशा धर्मव्यवस्थेतील घटकांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणे हा जो प्रकार मध्ययुगीन २. विशेष म्हणजे त्यांच्या इतर सर्व साहित्यात जरी ठिकठिकाणी शेती, शेतकरी त्यांच्या बायका आणि मुले यांच्याबद्दल अनेकविध पद्धतीने भौतिक जीवनासंबंधी विचार व्यक्त झालेले असले तरी खऱ्या अर्थाने त्यांनी लिहिलेल्या शेतकल्याचा आसूड' या ग्रंथात त्यांचे विचार व्यक्त झालेले आहेत. हा त्यांच्या कालखंडातील आहे. जवळजवळ ३५ ते ४० वर्षांचा शेती, शेतकरी आणि शेती अर्थव्यवस्था याबद्दल अतिशय जवळून त्यांनी घेतलेले सर्व अनुभव, पूर्ण उकललेल्या स्वरूपात आणि प्रौढत्वाच्या पूर्ण जबाबदारीने या ग्रंथात आलेले आहेत. म्हणूनच शेती व शेतकल्यासंबंधी महात्मा फुलेंचे विचार संक्षिप्त रूपाने मांडत असताना मुख्य आधार म्हणून 'शेतकल्यांचा आसूड' हा ग्रंथ लक्षात घ्यावा लागतो.
३. या कालखंडात शेतकन्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती असा निष्कर्ष मांडता येतो व या हलाखीची मुख्य तीन कारणे तीन प्रकारच्या पिळवणुकीत आहेत असे फुले यांना वाटते. या प्रकारच्या पिळवणुकी म्हणजेच (अ) धर्म आणि धर्माच्या ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची केली जाणारी नाडवणूक (ब) नोकरशाहीकडून शेतकऱ्यांची केली जाणारी पिळवणूक आणि (क) सावकारशाहीकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक.
५. ब्रिटिश कालखंडात आणि विशेषतः फुले यांच्या कालखंडात ब्रिटिशांची शासन व्यवस्था जवळजवळ पूर्ण प्रगत स्वरूपात अस्तित्वात आली होती. ब्रिटिश शासन आणि कायदा यांची भारतीय नागरिकांच्या दृष्टीने होणारी अंमलबजावणी परत धर्माला जवळ असणाऱ्या ब्राह्मण वर्गाच्या माध्यमातूनच होत होती. यालाच महात्मा फुले यांनी भटशाही असे नाव दिलेले आहे. कुलकर्णी, महालकारी, मामलेदार, चिटणीस, दप्तरदार अशा विविध अधिकारपदावरून ब्राह्मणच शासनव्यवस्था राबवत होते. कारण त्यांच्या हातात विद्या होती. हे लोक ब्रिटिशांना सामान्यजनांची भाषा कळत नसल्याने दिशाभूल करणारे मध्यस्थ म्हणून काम करीत होते. दोन्ही बाजूच्या न समजण्याचा नेमका आर्थिक फायदा हा ब्राह्मण वर्ग करून घेत होता. आश्चर्याची गोष्ट अशी की महात्मा फुले यांच्या काळा देखील शेतीची गैरपद्धतीने पिळवणूक हे लोक करीत होते. वेगळ्या शब्दांत प्रत्येक कामासाठी ब्राह्मण मंडळी या ना त्या स्वरूपात लाचलुचपत करीत होते हे फुले यांनी स्प केले आहे. त्याचा एकच नमुना या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे खोट्या हजेरीवर शूद्रांच्या सह्या घेऊन त्यांची मजुरी आपल्या खिशात टाकण्याचा धंदा सर्रासपणे या इंजिनिअरिंग खात्यातील भट कामगार करीत असत.
६. महात्मा फुले यांनी शेतकन्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक देखील स्पष्ट केली आहे. याठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की, दामदुपटीची न्याय पद्धत ब्रिटिश व्यवस्थेत नष्ट झाली व शेतकऱ्याला वर्षानुवर्षे व्याजाच्या माध्यमातून मिळण्याचा आणि त्याची जमीन शेवटी लाटण्याचा मार्ग सावकारांच्या हातात आला. या काळात गावकामगार पाटील, ग्रामसभा यांचे अधिकार नष्ट झाले आणि गावात एका अर्थाने आर्थिक मक्तेदारीचे प्रतीक म्हणून सावकार ही संस्था अधिक बलशाली स्वरूपात निर्माण झाली.
(ब) शेतीविषयक
१. महात्मा फुले यांच्या शेतीविषयक आर्थिक विचारात आणि पर्यायाने शेतकऱ्यांविषयक विचारांत देखील सर्वांत अधिक महत्व त्यांनी विद्येच्या संबंधात मांडलेल्या विचाराला दिले पाहिजे. शेतकऱ्याची आणि शेतीची दुरवस्था होण्याचे मुख्य कारण शेतकऱ्याचे अशिक्षितपण आहे अशी आग्रही पण तितकीच समर्थनीय भूमिका महात्मा फुले यांनी मांडली.
२. शेतीमधील प्राथमिक श्रमविभागणीचे विवेचन महात्मा फुले यांनी केलेले दिसते. या विभागणीप्रमाणे कुणबी, माळी व धनगर हे तीन गट शेतीशी संबंधित असलेले त्यांनी सांगितले. कुणबी फक्त शेतीशी संबंधित कार्य करतो. माळी पारंपरिक शेती अधिक बागाईत शेती करतो. तर मेंढरे, बकरी यांचे कळप जे बाळगू लागले ते धनगर अशी महात्मा फुलेंची भूमिका होती. एका अर्थाने मूळ धंद्यात होत गेलेल्या व्यावसायिक वाढ आणि भेदांमुळे झालेली ही श्रमविभागणी होती.
३. महात्मा फुले यांच्या म्हणण्याप्रमाणे तत्कालीन शेतीची परिस्थिती अत्यंत असमाधानकारक होती. ती परिस्थिती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल त्यांनी केलेले विवेचन कोणत्याही जबाबदार अर्थतज्ज्ञासारखेच आहे. त्यांच्या मते, शेतीच्यादुरवस्थेचे एक कारण शेतीवर असलेली अतिरिक्त लोकसंख्या से होते. पूर्वी राजेरजवाड्यांच्या दिमतीत राबणारी मंडळी ब्रिटिशांच्या काळात राजेशाहीचा न्हास झाल्यामुळे बेकार झाली व त्यांचा भार शेतीवर पडला. लोकसंख्या कमी केल्याशिवाय ही परिस्थिती सुधारू शकत नाही असे महात्मा फुलेंचे मत होते व त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बायका नयेत व कमी वयात लग्ने केली जाऊ नयेत यासाठी आवश्यक ते कायदे केले पाहिजेत असे सुचविलेले दिसून येते.
४. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी तिला पाणीपुरवठा होणे आवश्यक ठरते. याची जाणीव महात्मा फुले यांना होती. त्यासाठी त्यांनी शक्य तितक्या ठिकाणी तळी आणि बंधारे बांधावेत व जमिनीची धूप थांबवावी हे जसे सुचविले तसेच जिथे जिथे शक्य होईल तिथे तलाव बांधावेत, तळी बांधावीत, विहिरी खोदाव्यात अशी सूचना केली आहे. भूपृष्ठांतर्गत पाण्याचा शोध घेण्यासाठी सर्व जमिनींची पाहणी पाणाड्याकडून करून घेण्यात यावी असेही त्यांनी सुचविलेले आहे. एवढेच नव्हे तर नदी, नाले व तलावातील गाळ खतासाठी शेतकऱ्यांनी फोडत न्यावा असाही व्यावहारिक विचार त्यांनी मांडलेला आहे. सरकारी यंत्रणेचा वापर (लष्कर, पोलीस इत्यादी) बांध बांधण्यासाठी केला जावा असे सुचवत असताना सरकारच्या इरिगेशन खात्यामधील भ्रष्टाचार निपटून काढला पाहिजे आणि पाणीपट्टी संकलित करण्यामधील पिळवणूक टाळली पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केले.
५. शेतीवरचा भार कमी करण्यासाठी आणि नोकरशाहीतील ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करण्यासाठी महात्मा फुले यांनी सरकारी नोकरीत आणि शिक्षण क्षेत्रात शेतकन्यांची मुले असली पाहिजेत असा विचार मांडला. त्यातून पुन्हा आर्थिक विषमता वाढू नयेत म्हणून जातीजातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरया राखीव करण्यात
६. शेती विकासाच्या दृष्टीने पशुधन विकसित करणे देखील आवश्यक आहे व त्यासाठी चांगल्या जातीच्या जनावरांची पैदास करणे, तशा प्रकारचे चांगले बेणे आयात करणे आणि गोबंदी कायदा करावा असेही त्यांची सुचविलेले आहे.
७. शेतकन्यांमध्ये नवनव्या गोष्टींचा प्रसार होण्यासाठी दरवर्षी शेतीप्रदर्शन भरवावीत. त्यात शेतकल्यांच्या विविध स्पर्धा असाव्यात व त्यांना बक्षिसे दिली जावीत हा विचार महात्मा फुले यांनी मांडलेला दिसतो.
८. शेतीवर बसवला जाणारा शेतसारा दर तीस वर्षानी सुधारित केला जातो पण त्या सुधारणेमध्ये शेतकऱ्यांकडून जास्तीतजास्त महसूल कसा गोळा करता येईल हाच विचार प्रमुख असतो हे महात्मा फुले यांनी दाखवून दिले. शेतसाऱ्यावर लोकल फंड बसवूनशेतकऱ्यावरील एकूण करभार अतिरिक्त होण्याचाच परिणाम होतो असेही त्यांनी मत मांडल्याचे दिसते.
९.शेतीचा अप्रत्यक्ष फायदा होईल असा एक विचार महात्मा फुले यांच्या लिखाणात व्यक्त होतो. खरे तर एकूण उत्पन्न वाटणीतील विषमता कमी व्हावी असा विचार सांग असताना शंभर रुपयांपेक्षा अधिक पगार किंवा पेन्शन असणान्यांच्या उत्पन्नात कपात के जावी परंतु लोहार, सुतार, शेतमजूर यासारख्यांच्या पगारात मात्र कपात केली जाऊ नये अ त्यांनी सुचविलेले आहे.
१०. शेती विकासाचा मार्ग शेतकन्यांच्या सर्वसाधारण शिक्षणातून जातो हे सांगत असतानाच महात्मा फुले यांनी शेती शिक्षणाचा विचार देखील मांडलेला आहे. शेतकन्यांच्या मुलांना शेती उपयुक्त (लोहारकी, सुतारकी) शिक्षण मिळाले पाहिजे, झाल्यास सरकारी खचनि युरोपमधील शेती शाळांमध्ये पाठवावे आणि आवश्यक असेल तेथे शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात शासकीय मदत देण्यात यावा असेही त्यांनी सुचविलेले आहे.
महात्मा फुले यांनी १२५ वर्षांपूर्वी सहकार, कृषी औद्योगिकीकरण, लोकसंख्या बाढीचा शेतीवर पडणारा बोजा, पर्यावरणाचा न्हास, जलसंधारण अशा अनेक विषयांवर मांडली .
एकंदरीत पाहता इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे शेती प्रश्नाविषयक यंग यांनी केलेल्या लिखाणाचे महत्त्व स्पष्ट केले जाते, कारण ते सर्वप्रथम होते. तसेच भारताच्या बाबतीत महात्मा फुले यांचे शेतीविषयक विचार महत्त्वाचे मानावे लागतील. १९६० नंतर शिक्षणाचे अर्थशास्त्र हा एक स्वतंत्र विषय विकसित होत गेला. आज तर अशी अवस्था आहे की, आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण आणि संशोधन यांना दिले जाणारे महत्त्व. विकासासाठी मनुष्यबळ विकास ही प्राथमिक आवश्यक आणि कायमस्वरूपाची अट आहे असे आज जगमान्य झाले आहे. शिक्षणाच्या अर्थशास्त्रांचा हा आधुनिक विचार महात्मा फुले यांच्या लिखाणातून अत्यंत साध्या सोप्या शब्दांतून पण जबरदस्त कळकळीने देशी भाषेत सन १८९० पूर्वीच व्यक्त झाला हे लक्षात घेता एका अर्थाने महात्मा फुले यांना शिक्षणाच्या अर्थशास्त्राचे जनक आणि कृषी अर्थशास्त्राचे अनुभवजन्य विवेचक होते असे म्हणणे पूर्णतः समर्थनीयआहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.