Patil B K
राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.
बी ए भाग :३
अभ्यासक्रमपञिका क्रमांक १६
मुलखावेगळी माणसं
विभाग :१
विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील
प्रस्तावना : वाड:मयाच्या सर्व प्रकारामध्ये निबंध हा गंभीर प्रकृतीचा मानला जातो. त्याच्या मांडणीची बैठक वैचारिक असते. त्याचे माणसाच्या बौद्धिकतेला आवाहन असते विचाराचे खंडनमंडन, तर्कशुध्द विवेचन आणि विद्धत्ताप्रचुर शैली यांचा सुमेळ निबंधात साधला जातो
वैचारिक निबंधाप्रमाणेच लघुनिबंधाची मूळ भूमी फ्रान्स हीच होती. गुजन गिनो या फ्रेंच लेखकाकडे त्याचे जनकत्व जाते. इंग्रजी साहित्य वगळता अन्य युरोपियन देशात त्याचा प्रसार झाला नाही इंग्रजी साहित्याच्या परिशीलनामुळे आपल्याकडील लेखकांनी तो स्वीकारला.
प्रा. ना. सी फडके 'रत्नाकर' मासिकातून'गोजगोष्टी' या सदराखाली लेखन करु लागले. हा मराठीतील आधुनिक स्वरुपाच्या लघुनिबंधाचा प्रारंभ होय
१९४५ ते १९७५ या कालखंडात ललितगद्य म्हणून गणले गेलेले ललित निबंध लेखन विपुल प्रमाणात झाले. कुसुमावती देशपांडे, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गो, वि करंदीकर, माधव आचवल, ग्रेस ,श्रीनिवास कुलकर्णी या साहित्यिकांचे योगदान महत्वाचे आहे.मधु मंगेश कर्णिक, आनंद यादव , व्यकटेश माडगुळकर हे या क्षेञातील नामवंत लेखक आहेत
मराठी साहित्यातील व्यक्तिचिञे जशी असामान्य व्यक्तिविषयी आहेत, तशीच ती सामान्य व्यक्तींची असतात मागच्या कालखंडात प्रा ना सी फडके, आचार्य प्र के अञे, वि स खांडेकर आणि ग ञ्य माडखोलकर यांनी साहित्य, नाट्यकला, संगीत आणि अन्य कला या क्षेञातील नामवंतांची व्यक्तिचिञे लिहिली. केशव भोळे यांनी संगीत ,नाट्य आणि चिञपट या व्यवसायातील श्रेष्ठ असामीविषयी लिहिले प्रा, रा. भि.जोशी यांनी'सोन्याचा उंबरठा' मधून गतकाळातील समृध्द व्यक्तिमत्वांचे दर्शन घडविले. प्रा, शरच्यंद्र चिरमुले यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तिमत्वाना'वास्तुपुरुष' या पुस्तकातून आकार दिला. पु. ल. देशपांडे यांनी 'गणगोत' आणि गुण गाईन आवडी' यांची व्यक्तिचिञे म्हणजे म्हणजे विविध क्षेञातील माणसांच्या सहवासातील रंगलेल्या मैफलीच आहेत. 'व्यक्ति आणि वल्ली' मधील व्यक्तिरेखांचे चिञण त्यांनी विनोदी ढंगाने केले असले तरी मानवी स्वभावाचे पेश केलेल्या नमुन्यांना तोड नाही.
प्राचार्य राम शेवाळकर यांनाही पु. ल. देशपांडे यांच्याप्रमाणे गुणिजनांचा सहवास लाभला. सकारात्मक अनुभूती हा शेवाळकरांच्या प्रतिभेचा गुणधर्म विधायकतेचा मार्ग पत्करुन ज्यांनी ज्यांनी आपले जीवन सार्थ केले त्यांची व्यक्तिचिञे त्यांनी रंगविली.
मधू मंगेश कर्णिक यांनी आपल्या कथा कादंर्यातून कोकणच्या परिसराचे चिञण तन्मयतेने केले. माती आणि माणूस यांमधील अनुबंध अधोरेखित करणे हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य.
नाटककार वसंतराव कानेटकर यांनी'मी माझ्याशी' हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले. कानेटकरांनी आई, वडील आणि निकतवर्तियांची रेखाटलेली स्वभावचिञे संस्मरणीय झालेली आहेत.
रविंद्र पिंगे यांनी निबंधाच्या क्षेञात विलोभनिय भावविश्व निर्माण केले. सुरुवातीला'मौज' साप्तहिकात युसुफ मेहेरअल्लींची व्यक्तिरेखा लिहिली.'शतपावली', 'देवाघरचा पाऊस','दिवे-लामणदिवे' आणि अंगणातले चांदणे' या चार संग्रहात साठ व्यक्तिचिञणात्मक लेख पिंगे यांनी लिहिले.
डाॅ. अनिल अवचट यांची 'शिकविले ज्यांनी', जिवाभावाचे' आणि 'कार्यरत' ही महत्वाची व्यक्तिचिञणात्मक पुस्तके आहेत.
लालित्यपूर्ण लेखनातून वैचारिकता अशी आणता येते आणि वाचकाला अंतर्मूख करता येते याचा उत्तम नमुना म्हणजे डाॅ. अवचट यांची प्रदीर्घ स्वरुपाची व्यक्तिचिञे समाजभिमुखता आणि कल्पकता यांचा समतोल राखणारी व्यक्तिचिञे लिहून या रचनाबंधाचा नवा आदर्श डाॅ. अनिल अवचटांनी निर्माण केला आहे असे नि:संदिग्धपणे म्हणता येईल
मारुती चित्तमपल्ली यांनी मराठीसाहित्यक्षेञात वनविद्या आणि अरण्यवाचन यांच्या माध्यमातून वेगळ्या वाटा चोखाळल्या प्राणिसृष्टी व पक्षिसृष्टी यांचा धांडोळा घेऊन आपल्या समृध्द अनुभवविश्वाचे प्रत्ययकारी दर्शन घडविण्यासाठी त्यांना लेखनविद्या गवसली
प्रा. गंगाधर गाडगीळ यांनी 'आठवणीच्या गंधरेखा' हे संस्मणात्मक लेखन केले. आठवणीच्या ओघात समकालीन लेखक-कवींची स्वभावचिञे रेखाटली आहेत. त्यांची प्रगल्भ जीवनजाणीव येथे व्यक्त झाली आहे.
ग. दि. माडगूळकर हे कवीप्रकृतीचे असले तरी त्यांनी सकस ललित गद्यलेखन केलेले आहे. त्यांच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झालेल्या व्यक्तिचिञांचा संग्रह'तीळ आणि तांदूळ' या नावाने प्रसिद्ध झाला आहे. निकतवर्तियासंबंधी त्यांनी अतिशय जिव्हाळ्याने लिहिले आहे. प्रभाकर पाध्ये यांचा जीवनप्रवास पञकारीतेतून वाड:मयनिर्मितेकडे झाला. परदेशातील भ्रमंतीतून त्यांनी प्रवासवर्णने लिहिली 'प्रकाशातील व्यक्ति','तीन तपस्वी', 'व्यक्तिवेध' आणि'आगळी माणसे' ही निरनिराळ्या क्षेञातील माणसांची व्यक्तिचिञे लिहिली.
प्रा.वसंत बापट यांनी' जिंकूनी मरणाला' या पुस्तकात बालगंधर्व,झू आचार्य अञे, साने गुरुजी बॅ. नाथ पै,आवाबेन देशपांडे आणि नाना नारळकर या व्यक्तींविषयी समरसतेने लिहिले.
डाॅ.सुभाष भेंडे यांनी आपल्यावर वाड:मय संस्कार करणार्या व सहवास लाभलेल्या सुह्रदांविषयी 'ऐसी कळवळ्याची जाती' या व्यक्तिचिञणात्मक पुस्तकात लिहिले आहे.
डाॅ. सरोजजिनिबाई वैद्य यांनी'पहाटपाणी' आणि ' शब्दायन' या आत्मपर लेखणातून नाट्यछटाकार दिवाकरांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक अज्ञात पैलुंवर प्रकाश टाकणारे व्यक्तिचिञण रसरशीत झाले आहे.
डाॅ. विजया राजाध्यक्ष यांच्या 'कदंब', आणि'अनुबंध' या ललितबंधसंग्रहात 'कदंब' मध्ये'स्वामी' कार (रणजितदेसाई) 'पाठीवरचा हात'(वि. स.खांडेकर)'अजून यौवनात मी'(अनिल) 'फुलवात मालवली' (कुसुमावती देशपांडे)'सप्रेम द्या निरोप'(चिं. ञ्य्. खानोलकर)ही व्यक्तिचिञे या दृष्टीने महत्वाची आहेत
डाॅ. रामदास भटकळ यांनी 'जिगसाॅ' आणि 'जिव्हाळा' या पुस्तकातून सकस स्वरुपाची व्यक्तिचिञे लिहिली.जिगसाॅ या व्यक्तिचिञणपर लेखसंग्रहात 'वारसा' या लेखातून मोकळेपणाने लिहिले.
प्रा. श्री. म. माटे यांच्यासारख्या द्रष्ट्या प्रज्ञावंताला आणि प्रतिभावंताला भविष्यकालीन क्षितिज स्पष्टपणे दिसत होते म्हणून स्वातंञ्याचा उदय होण्यापूर्वीच १९४३ मधील सांगलीच्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरुन साहित्यिकांना आवाहन केले होते.
🔹सारांश : या ठिकांनी व्यक्तिचिञण म्हणजे काय? मराठीतील व्यक्तिचिञलेखनाची परंपरा, स्वरुप आणि वैशिष्ट्ये या अनुषंगाने विचार केला आहे. तसेच मराठीतील व्यक्तिचिञणांचा आणि त्या व्यक्तिचिञ लेखकांचाही स्थूल स्वरुपात एक दोन वैशिष्ट्यांचा विचार केला आहे,'मुलखावेगळी माणसं' मधील व्यक्तिचिञांची आशयसूञे थोडक्यात मांडली आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.