(P A Mokashi)
B.A.II SEMESTER - 4
SOCIOLOGY PAPER - 6
आरोग्याचे समाजशास्त्र
प्रकरण - 3
जीवनशैली आणि आरोग्य
ब.आधुनिक जीवनशैली आणि आरोग्य
(Modern Lifestyle and Health)
आधुनिक जीवनपद्धतीतील तोटे
आधुनिक विचारसरणीचा प्रभाव काही प्रमाणात आरोग्याला हितकारक असला तरी बहुतांश प्रमाणात
आरोग्याला घातक दिसून येतो.
आधुनिक जीवन हे
धावपळीचे, धकाधकीचे व तणावग्रस्त बनत
चालले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, व्यायामाचा अभाव, बौद्धिक तणाव, बैठे काम, अधिक मांसाहार अशा अनेक गोष्टींचा व्यक्तीच्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम
होत आहे. काही विपरित गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत :
१. आहार :
सध्या संकरित बी-बियाणे, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर यामुळे याचा
आरोग्यावर घातक परिणाम होतो.
आधुनिक जग धावपळीचे
बनले आहे त्यामुळे वेळच्या वेळी जेवण करणे आवश्यक असले तरी मागे पडत चालले आहे. जेवणाची वेळ न पाळल्यामुळे डोकेदुखी, अस्वस्थता, निरुत्साही वाटणे, अशक्तपणा यासारखे दुष्परिणाम आरोग्यावर होतात.
२. नोकरी, व्यवसाय व उद्योग यामुळे धावपळ :
एकतर नोकरीचे वा व्यवसायाचे ठिकाण राहत्या घरापासून दूर असेल तर
जाण्यायेण्याच्या अंतरामुळे मानसिक संतुलन बिघडते, कामाचा
उत्साह राहात नाही.
नोकरी करणाऱ्या
महिलांना धावपळ करावी लागत असल्यामुळे अंगदुखी, अस्वस्थता निर्माण होते.
बऱ्याचदा आठ-आठ तास बसून कामे करावी लागतात. त्यामुळे पचन व्यवस्था व्यवस्थित होऊ शकत नाही. इतर अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात.
३. झोप आणि विश्रांती :
कामाच्या वेळांप्रमाणे विश्रांती व झोप यांच्याही वेळा बदलल्या जातात. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी लवकर उठणे शक्य होत
नाही.
४. शारीरिक कष्टाची कामे कमी त्यामुळे स्थूलता अधिक
निर्माण होते. लठ्ठपणामुळे रक्तदाब, धाप लागणे, अस्वस्थता, कोलेस्ट्रॉल यासारख्या व्याधी निर्माण होतात.
५. कामाच्या वेळेच्या बदलांमुळे व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. व्यायाम न केल्याने शरीर स्थूल होते.
६.
आधुनिक काळात
माणसाचे चालणे कमी झाले आहे.
वाहनांचा वापर अधिक
केला जातो. त्यामुळे पाठदुखी, स्पाँडेलायसिससारख्या व्याधी होतात.
७.
जीवन ताणतणावग्रस्त बनत चालले आहे. ऑफिसचा, कामाचा, अधिकाऱ्यांच्या दबावाचा तणाव
वाढतो आहे.
८. ऑफिसमध्ये काम करत असतील तर ए.सी.मध्ये बसल्यामुळे अशक्तपणा येतो. कॅल्शिअम कमी होते.
९.
उन्हात न जाण्यामुळे
'ड' जीवनसत्त्वाची कमतरता होते.
१०. कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रदूषित वातावरणात राहावे लागते. त्याचा विपरीत परिणाम शरीरावर नक्कीच होतो.
११.
कामाच्या तणावामुळे
व्यसनाधीनता, बिडी, सिगारेट ओढणे, मद्यपान करणे, गुटखा खाणे अशा वाईट सवयी
लागतात.
आधुनिक जीवनशैली अत्यंत धावपळीची झाली आहे. त्यामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.
जंक फूड, फास्ट फूड खाणे, फ्रिज केलेले अन्न खाणे,
आहाराची वेळ न पाळणे, व्यायाम, चालणे यासारख्या गोष्टी मागे पडत आहेत. व्यसनाधीनता वाढत चालली आहे.
सतत चिंताग्रस्त व
तणावग्रस्त जीवन जगावे लागत आहे.
त्यामुळे
रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.
थोडक्यात, जीवनशैलीचा विचार करता
स्वतःची जीवनशैली आरोग्यपूर्ण करणे हे काही प्रमाणात प्रत्येक व्यक्तीला स्वतःला
शक्य आहे. एकटा माणूस सभोवतालचे
प्रदूषण कदाचित थांबवू शकणार नाही, पण स्वतः बिडी-सिगारेट टाळू शकतो. दारू, स्वैर लैंगिक संबंध टाळणे,
व्यायाम, विश्रांती,
स्वच्छता इ. आरोग्य विषयक नियमांचे काही प्रमाणात तरी स्वतः
पालन करू शकतो. या वैयक्तिक आरोग्याच्या
नियमांकडे जर दुर्लक्ष झाले तर आरोग्य राखणे कठीण आहे.
तेव्हा सभोवतालच्या निसर्गाचा विनाश न करता बदलती जीवन पद्धती स्वीकारणे ही
परिपूर्ण आरोग्याची एक महत्त्वाची अट मानायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.