Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: व्यापारी चिन्हाचा अर्थ (Trademark: Meaning)

Monday, 12 July 2021

व्यापारी चिन्हाचा अर्थ (Trademark: Meaning)

(Parit V B) 

Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari


B.Com -1    Sem - II


Subject- Principles of Marketing


Topic - वस्तू : अर्थ व महत्त्व 


* व्यापारी चिन्ह *


 व्यापारी चिन्हाचा अर्थ (Trademark: Meaning)


"जेव्हा चिन्हनाम संबंधित कायद्यानुसार नोंदवून त्यास कायदेशीर मान्यता घेण्यात येते तेव्हा त्या चिन्हनामाला 'व्यापारी चिन्ह' असे म्हणतात.


"When the brand name is duly registered under the concerned Act for legal protection, the brand name is known as trademark." व्यापारी चिन्ह हे कायदेशीर नोंदणीची व मान्यतेची प्रक्रिया आहे. चिन्हनाम हेच व्यापारी चिन्ह नोंदविले जाते. 


* व्यापारी चिन्हाची ठळक वैशिष्ट्ये :-


 १. संबंधित कायद्याखाली नोंदविलेल्या चिन्हह्नामास व्यापारी चिन्ह असे म्हणतात. त्या अर्थाने चिन्हनाम व व्यापारी चिन्ह एकच असते.


२. ट्रेड अँड मर्चंटाईज मार्क अॅक्ट १९५८ च्या कायद्याखाली व्यापारी चिन्हाची नोंदणी करावी लागते.


३. हा नोंदणी विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून विहित केलेल्या कार्य पद्धतीनुसार व आवश्यक ते शुल्क भरून ही नोंदणी करावी लागते.


४. नोंदणीमुळे व्यापारी चिन्हास कायदेशीर मान्यता व कायदेशीर संरक्षण मिळते. 


५. नोंदविलेले व्यापारी चिन्ह वापरण्याचा अधिकार संबंधित कंपनीसच / उत्पादन संस्थेसच प्राप्त होतो. दुसऱ्या कोणत्याही उत्पादन संस्थेला ते व्यापारी चिन्ह वापरता येत नाही. व वापरल्यास तो फौजदारी गुन्हा समजला जातो.


६. व्यापारी चिन्हाची नोंदणी करताना संबंधित कायद्यातील अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. अटींची पूर्तता केली तरच नोंदणी केली जाते.


७. व्यापारी चिन्ह वेष्टनावर छापताना/वापरताना त्या चिन्हाच्या डोक्यावर उजव्या बाजूस (R) (चौकटीमध्ये 'आर') असे लिहिणे आवश्यक असते. 'आर' हे (याचा अर्थ 'रजिस्टर्ड) इंग्रजी अक्षर व्यापारी चिन्ह नोंदणीकृत असल्याचे दर्शविते.


८. राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रपुरुषांची नावे, केंद्र/राज्य/स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रतीके इत्यादी स्वरूपाची व्यापारी चिन्हे नोंदविता येत नाहीत. तसेच समाजातील कोणत्याही घटकाच्या/पंथाच्या धार्मिक भावना दुखविणारे व्यापारी चिन्हसुद्धा नोंदविता येत नाही.


९. व्यापारी चिन्हाची नोंदणी करणे ऐच्छिक आहे. त्यामुळे प्रत्येक चिन्हनाम नोंदविलेले असतेच असे नाही.

    इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...