Friday, 4 December 2020

बी. ए. भाग१/ ऐच्छिक मराठी(अक्षरबंध) / अभ्यासक्रमपञिका क्रं १ / विभाग ४ / चिञपट :आस्वाद प्रक्रिया / चिञपट 'ध्वनी' व 'प्रकाश योजना': तांञिक बाबी.

बी. ए. भाग१

ऐच्छिक मराठी(अक्षरबंध)

अभ्यासक्रमपञिका क्रं १

विभाग ४ 

चिञपट :आस्वाद प्रक्रिया

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

चिञपट 'ध्वनी' व 'प्रकाश योजना': तांञिक बाबी.

    प्रस्तावना: 

           चिञपटासाठी केवळ कथानक,नायक-नायिका आणि दिग्दर्शक यांचीच आवश्यकता असते असे नाही,तर एका चिञपठासाठी शेकडो कलाकार,तंञज्ञ काम करत असतात.अनेक कला मिळून एक चिञपट तयार होत असतो. यामध्ये

ध्वनीला अनन्यसाधारण महत्व आहे

'श्रवणेंद्रियाला ज्या उद्दीपनामुळे संवेदना होऊ शकते ते उद्दीपन म्हणजे ध्वनी होय'. असे अक्षरबंध या पाठ्यापुस्तकात म्हटले आहे.

      आपण चिञपट पाहत असतांना असंख्य प्रकारचे ध्वनी ऐकू येत असतात.पाञांच्या हालचालीमुळे काही ध्वनी निर्माण होतात. जसे एखाद्या स्ञीपाञाच्या बंगड्यांचा किंवा पायातल्या पैंजणांचा आवाज होतो.पुरुपाञ चालत आले की त्याच्या बुटाचा आवाज होतो. स्वंपाक घरातील शिट्टीचा आवाज...अशा असंख्य ध्वनींनी आपले जग भरले आहे.या ध्वनीच्या आवाजावरुन त्या त्या दृश्याचा विशिष्ट परिणाम अधोरेखित होतो.या शिवाय घोंघावणार्‍या वार्‍याचा,ढगांचा गडगडाट, पावसाचे कोसळणे हे आवाज ध्वनीआलेखनामुळे शक्य झाले आहे.

       एखाद्या चिञपटाचे आउटडोअर शूटींग होत असते तेव्हा चिञपटात नको असलेले आवाजही राहतात. यासाठी 'डबिंग' चा शोध लागला. नायकाचे वा अन्य पाञांचे संवाद बोलून ते 'डब' केले जाऊ लागले यामुळे  चिञपट प्रभावी झाला. काही वेळा हिंदी बोलता न येणार्‍या नटनटीसाठी दुसरेच कोणीतरी संवाद म्हणते. यामुळे चिञपट अधिक दर्जेदार झाला आहे.

   चिञपटासाठी प्रकाश योजना हा देखिल महत्वाचा घटक आहे. आज अत्याधुनिक कॅमेरे उपल्बध आहेत.  हे कॅमेरे अतिसूश्म गोष्टींची नोंद घेतात पण कॅमेरा उत्तम असून उपयोगाचा नाही. तर कॅमेर्‍यासाठी 'प्रकाशयोजना अतिशय गरजेची असते. 

     उत्तम प्रकाशयोजनाकार हा योग्य दर्जाचा प्रकाश योग्य वस्तूवर वा पाञावर टाकतो.यामुळे जसे हवेतसे दृश्य घेता येते. चिञपटाच्या प्रत्येक युनिटबरोबर स्वतंञ जनरेटरची व्यवस्था असते. त्यावर प्रकाशयोजना राबवली जाते. प्रकाशयोजनेचे दोन प्रकार आहेत. पहिला, वास्तववादी प्रकाश आणि दुसरा नाट्यात्मक प्रकाश होय प्रकाश योजनेसाठी काळे कापड, थर्मोकोल, सॅटीनचे कापड, वेगवेगळे आरसे हॅलोजन दिवे यांचा वापर केला जातो. यामुळे परिणामकारक व उठावदार दिसते.

Thursday, 3 December 2020

बी. ए. भाग २/ मराठी अभ्यासक्रम पञिका ४ सञ ३ / काव्यगंध/ नारायण सुर्वे (श्रमविषयक कविता) /५ नेहरु गेले त्या वेळची गोष्ट

(E-content created by Patil B. K.)

बी. ए. भाग २

मराठी अभ्यासक्रम पञिका ४

सञ ३

काव्यगंध

नारायण सुर्वे  (श्रमविषयक कविता)

५ नेहरु गेले त्या वेळची गोष्ट

          नेहरु गेले त्या वेळची गोष्ट: राजकीय भान व्यक्त करणारी कविता

              ही सुर्वे यांची महत्वाची कविता आहे. १९६४ च्या मे महिन्यात एका संध्याकाळी रेडिओवर नेहरु गेले ही बातमी प्रसृत झाली. ही बातमी ऐकताच सुर्वे यांना धक्का बसला, आता प्रकाश संपला हे पार्लमेंटमध्ये उच्चारलेले वाक्य त्यांच्या कानात घुमत होते.

      या कवितेचे एक वैशिष्टे म्हणजे कवीने पं. नेहरु यांच्या निधनानंतर लिहिलेल्या या कवितेत नेहरुंचे कार्य, त्यांचे चरिञ याविषयी एकही ओळ नाही.पण सुर्वे यांच्या कवितेतील सुचकताफार बोलकी असते.अनेक संदर्भांना ही कविता सहज स्पर्श करते.

   "पाठ शेकवत बसलेली घरे कलकलली

      शहर कसे करडे होत गेले

       नंतर अजिरी

 पुढे..... काळोखाने माणिक गिळले."

  इथे शहर करडे होणे नंतर अजिरी होणे व काळोखाने माणिक गिळणे या सगळ्या अवस्था एकाचवेळी शहराच्या व देशाच्याही आहेत,सगळ्यासमोर अंधार पसरला. कारखाने बंद पडले.  ओले खमीस खांद्यावर टाकून सगळे घरी गेले. म्हणजे जणू प्रत्येकाच्या घरातील  माणूस दिवंगत झाला आहे व सगळे ओलेत्याने, दहनानंतर घरी परतणारे अंतेवासी आहेत.

"क्या हुआ ए सुंद्रे!

'आज लोबन मत जला!...,नेहरु गये।।'

'सच, तो चलो आज छुट्टी!....'

     वेश्यावस्तीतले हे चिञ रंगवताना जीवनाची शुद्र पातळीही गाठली आहे. सुट्टी मिळाली हा आनंद काहींना वाटतो आहे,

   पण कवीला याचा राग नाही तर यांनाही समजून घेण्याची व्यापक सहानुभूती कवीकडे आहे. या दृष्टीने 'लोबन मत जला' हे वाक्य महत्वाचे आहे. सबंध पीडित जगाचा हुंदका या कवितेत कवीने साध्या शब्दांत टिपला आहे.

पुढे कवीला एक हातगाडीवाला भेटतो. तो कागदी खोळीत उजेड घेऊन चाचला होता. एका उदास वृत्तीला या हातगाडीवाल्याच्या रुपाने प्रकाशाने उजळले आहे.

  पं. नेहरुसारखा युगंधर नेता गेला. यामुळे राष्टीय व आतरराष्टीय पातळीवर काय घडले हे इतिहासात लिहिले जाईल .पण या घटनेने सामान्यांच्या जीवनात काय घडले हे टिपण्याचे काम या ललित कवितेने केले आहे.

बी. ए.भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका -४ /सञ-३ / काव्यगंध

बी. ए.भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका -४

सञ-३

काव्यगंध

विषय प्राध्यपक प्रा. बी. के पाटील

 नारायण सुर्वे यांची "पोष्टर" : कामगारांच्या हक्कासाठी लढणार्‍या तरुणांचे भावविश्व.

         पोष्टर ही कविता कामगारांच्या हक्कासाठी लढणार्‍या ,कामगार चळवळीतील पडेल ते काम करणार्‍या आणि त्यासाठी मिळेल ती जबाबदारी उचलणार्‍या तरुणांचे भावविश्व अतिशय समर्थपणे व्यक्त करते.

   कवितेचा निवेदक ,हणम्या, शिंदे आणि इसल्या असे हे चार घरातले चौघेजण कामगार वस्तीतल्या तरुणांचे प्रतिनिधी आहेत. कामगार आंदोलनाचे पोष्टर डकवण्याचे काम ते राञीच्या वेळी करतात. एकजण शिडी घेतो. ,दुसरा खळ लावतो. तिसरा पोष्टर चिकटवतो आणि चौथा सगळ्यांना मदत करतो. हे काम अर्थातच चळवळीसाठी विनामूल्य चालले आहे.

    हे काम करतांना ते एकमेकांशी मिञत्वाच्या नात्याने बोलत आहेत. पोष्टर खिडकीपाशी चिकटवायचे नाही. कारण तिथे इसल्याची "मैना" राहते.खडूस बुढ्याची तक्रार ते करतात.

     दुसरे दिवशी मीटिंग आहे पण इसल्याला झोप अनावर होते.तेव्हा तू ह्या शिडीवर झोप. तुला तिघेही असच उचलून कबरस्तानात नेतो अशी त्याची चेष्टा करतात.इसल्याच्या शादीचे बेत रचतात. आणि आपल्याही घरात एक दुल्हन येईल असे स्वप्न बघतात. बुढ्यासाठी चश्मा घेण्याचाही त्याचा विचार आहे,त्यांची स्वप्ने किती साधी आहेत... या तरुणांचे हे भावविश्व कवीने या कवितेत अचूक पकडले आहे.

 कवी हा कामगार वस्तीत राहणारा,तेथील विश्व काव्यात मांडणारा आहे.म्हणून त्याची शब्दकळाही तशीच आहे.या कवितेतही मराठी, हिंदी, उर्दूमिश्रित भाषा कवी वापरतो.

   उदा: इसल्याची माॅं बडी कडक बाई.नजर बचाके भागा.

शू शोर मत कर.

    कवी प्रसिध्द शायर मिर्झा गालिबच्या एका जगप्रसिध्द शेरावर आधारित ओळी इसल्याबाबत वापरतो.

    यासगळ्यामुळे कवितेची उंची  फार वाढते. अशी ही पोष्टर कविता कामगारांच्या हक्कासाठी लढणार्‍या तरुणांचे भावविश्व रेखाटणारी महत्वाची कविता आहे.

............................................

बी ए भाग २/ इतिहास/सेमिस्टर ३, पेपर क्र. ४/भारताचा इतिहास

 

बी. ए. भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका ४ / काव्यगंध/ सञ -३/ गिरणीची लावणी- कामगारांच्या घामाची कहाणी

बी. ए. भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका ४

काव्यगंध

सञ -३

विषय प्राध्यापक- प्रा. बी. के. पाटील

गिरणीची लावणी- कामगारांच्या घामाची कहाणी.

         प्रस्तावना-  सुर्वेचा ऐसा गा मी ब्रह्म १९६२ साली प्रकाशित झाला आणि मराठी कवितेला एक नवा आयाम मिळाला. चिञमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष ठरला.

     "चाक फिरे गरगरा। सूत निघे भरभरा।

        नटवया वसुंधरा। आमच्या घामातून।

         नाना रुतुंच्या हो कळा।खुलवी माझा वस्ञमळा।

           मरवा मोतिया पिवळा। तुरा खोवून।।"

            अशी ही नारायण सुर्वे यांच्या" गिरणीची लावणी" आहे. लोककलांशी सुर्वे यांचा जवळचा संबंध आहे.या संस्कारातून या गीताची निर्मिती झाली असावी. सुर्वे यांच्या गीतातील अनुभवाचा घाट गझल सदृश रचनेप्रमाणे साधाच राहिला आहे.

     सुर्वे यांची गिरणीची लावणी ही अनेक गुणांनी युक्त आहे. हे गीत फार गाजले या गीतात कापड गिरणीच्या दुनियेचे शब्दचिञ आले आहे. सकाळी सात वाजता भोंगा भूपाळी गातो आणि मोठ्या डौलात गिरणीची पहिली पाळी सुरु होते. चाके गरगरा फिरतात. सुत भरभरा निघते.

       कामगार स्वत:च्या घामातून वस्ञे निर्माण करतो. ही वस्ञे वसुंदरेलाही नटवितात. नऊवारी सूत परिधान केलेल्या बाबिणीचा नखरा भारी असतो. साच्यातून गोल कांडी फेरे मारते. झडपीने वारा घातला जातो.तुटलेल्या ताराही जुळवून घेतल्या जातात.ही घामाची कहाणी आहे.

     ही नाना रंगांची दुनिया आहे. इथे आभाळाचा रंग घेऊन,हिरव्या सोनाळ शेताचा गंध घेऊन, सात रंगी   इंद्रधनूत वस्र भिजवले जाते. 

      कवितेत नाना रुतुंचे खुबीदार वर्णन आले आहे रुतुचक्रांचे स्पंदन आणि वरदान या वस्रमळ्यात आहे.भोळा कबीर शेले विणतो आहे व जगाला नटवतो. वेगवेगळ्या रंगांची ,वेगवेगळ्या कपड्यांची ही दुनिया आहे.कवी आपल्या लावणीचे नाते थेट कबीरांशी व दौपदीशी जोडतो. पण आज ही वस्रे बनवणार्‍या कामगाराची लज्या कोण राखणार आहे? आज राबणारा चोर ठरला आहे. ऐतखाऊ शिरजोर झाला आहे.

         लावणी या काव्यप्रकाराचा पूर्वीच्या शाहिरांनी  वापर केला पण सुर्वे कितीतरी वेगळ्या दृष्टिकोणातून लावणी वापरतात.यामुळे गिरणगावातील ही घामाची कहाणी जणू जिवंत होते.

बी.ए. भाग२ / मराठी अभ्यासक्रमपञिका ४/ सञ ३/ माझी आई- नारायण सुर्वे

बी.ए. भाग२

मराठी अभ्यासक्रमपञिका ४

सञ ३

माझी आई-   नारायण सुर्वे.

विषय प्राध्यापक- प्रा. बी. के. पाटील.

  माझी आई-  कामगार वस्तीतील  आईचे रेखाटन.

          अनेक कवीनी आई या विषयावर कविता केल्या आहेत. तसे पाहाता सुर्वे याला अपवाद नाहीत काव्यगंध या कवितासंग्रहात त्यांच्या माझी आई या कवितेचा समावेश आहे अर्थात आई या विषयावरची ही फार वेगळी कविता आहे.

      याचे कारण म्हणजे ही कामगार जगतातील आई आहे.सुर्वे यांच्या सर्वच कवितामध्ये कामगार जगाचे प्रतिबिंब पडले आहे  

       सुर्वे म्हणतात, जेव्हा तारे विझू लागतात, उंच भोंगे वाजू लागतात तेव्हाकामगारांच्या दींड्या रोजच भोंग्याच्या दिशेने वळतात. आईही झपझप पावले टाकत,मुलाकडे सतत मागे वळून बघत जात असते. जाताना ममतेने सांगे "कुणाशु भांडत बसू नका" आणि दोन पैसेही मुलांच्या हातात ठेवत असे.

        दसर्‍यात खंडेनवमीला ती मुलांना घेऊन कारखान्यात जात असे.कारखान्यातील आरास बघण्यासाठी कवी जात असे

"किती मज्जा म्हणून सांगू

  शब्दसाठे झालेत पंगू"

     यावेळी कवी फुग्यांचे पतंग झोकून कवी पक्षीच होत असे

        पण एक दिवस काही घडले.आईला गाडीतून आणले .तिचे डोळे उघडे होते व तोंडातून रक्त भळभळत होते.तिच्याबरोबर तिची जोडीवाली साळू होती तिने मुलांना जवळ घेतले मुले मिटीमिटी बघत होती 

       कामगार जगतातील भावंडांच्या वियोगाने झालेली कमालीची निराधार अवस्था त्यातून येणारे कलंदरपण याचे सुर्वे यांनी प्रत्ययकारी शैलीत चिञण केले आहे. 

        ही कविता म्हणजे एका अनुभवाचे कथन आहे. कवितेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कष्टकरी जीवनातील वेदना, आईचे वात्सल्य, तिच्या मृत्युचे कारुण्य हे परस्पर संवादभाव संघटित केले आहे. कायम लक्ष्यात राहावी. मनाला चटका लावून जावी अशी सुर्वे यांची ही कविता.

बी ए भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ / सञ ३/ नारायण सुर्वे- कविता - दोन दिवस

बी ए भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

सञ ३

विषय प्राध्यापक - बी के पाटील

नारायण सुर्वे- कविता - दोन दिवस

         कवी नारायण सुर्वे परिचय :

                   कवी नारायण गंगाराम  सुर्वे यांचा जन्म मुंबईत १५ आॅक्टोबर,१९२६ रोजी झाला. गंगाराम सुर्वे यांनी नारायण सुर्वेचे संगोपण केले .गंगाराम सुर्वे गिरणीकामगार होते. नारायण सुर्वेंचे बालपण याच परिसरात गेले.

      वयाच्या ३६व्या वर्षी १९६२ साली ऐसा गा मी ब्रह्म हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 

साहित्यसंपदा  :ऐसा गा मी ब्रह्म ,माझे विद्यापीठ, जाहीरनामा इ. पुस्तके नावावर आहेत.

    मिळालेली पारितोषिके :

            माझे विद्यापीठ हा काव्यसंग्रह १९६६ मध्ये प्रसिध्द झाला याला ११ पारितोषिके मिळाली,

 १९७३ सोव्हिएत लॅन्ड नेहरु अॅवार्ड माझे विद्यापीठ' ला.

१९९८पदमश्री पुरस्कार


    मराठी कवितेत स्व:ताचे वेगळे स्थान निर्माण करणारे नारायण सुर्वे यांचे१६ आॅगस्ट २०१० रोजी ठाणे येथे निधन झाले.

          दोन दिवस

दोन दिवस ही कविता दोन दिवस वाट पाहाण्यात गेले, दोन दु:खात गेले असे सांगत या दिवसांचा ताळेबंद मांडते. आता डोईवर  किती उन्हाळे राहीले याचा हिशोब कवी मांडतो आहे, कवी उन्हाळे मोजतो आहे, कारण हे जीवनच तसे आहे.

      आकाशात चंद्र, तारे आले. राञी धुंद झाल्या. पण हे निसर्गसौंदर्य कवीने कधी पाहिलेच नाही, हा आनंद घेतलाच नाही कारण....

 भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली असे कवी म्हणतात. कवीने कधी स्वत:पुरता विचार केलाच नाही. सदैव जगाचा, भोवतालचा विचार केला . म्हणूनच

   " दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो" असे कवी म्हणतात.

   भट्टीमध्ये पोलाद गरम करुन त्याला आकार दिला जातो. आपल्याही आयुष्याला असाच आकार येत गेला असे मोठ्या अभिमानाने कवी सांगतो. कवी कधीच तक्रार करत नाही.तर हे आयुष्यच बदलून टाकेन असा विश्वास व्यक्त करतो ही आशावादी  वृत्तीच कवीच्या कवितेचे वेगळेपण आहे यात शंका नाही.

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing