Friday, 4 December 2020

बी. ए. भाग 1 / मानसशास्त्र परिचय / प्रकरण-1----मानसशास्त्राची ओळख

 

            के. वाय. एकल (मानसशास्त्र विभाग)

                                                   बी. ए. भाग 1

                    मानसशास्त्र परिचय

            प्रकरण-1----मानसशास्त्राची ओळख

          मानसशास्त्र म्हणजे कायआधुनिक जगामध्ये मानसशास्त्र हे प्रगत शास्त्र मानले जाते मानवी प्रेरणांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून मानवी वर्तन व मानसिक प्रक्रियांचे गुड करण्याचा यशस्वी प्रयत्न मानसशास्त्र करत आहे यशस्वी प्रयत्न मानसशास्त्र करत आहेजीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे जग जवळ आले आहेमानसशास्त्राच्या अभ्यासामुळे मानवी वर्तन या मागील कारणांचा उलगडा करता येणार आहे 1850 नंतर मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला चालना मिळाली

        मानसशास्त्राची व्याख्या--मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये Psychology हा इंग्रजी प्रतिशब्द आहे या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील दोन शब्दापासून झाली आहे Psyche म्हणजे आत्मा आणि Logas म्हणजे शास्त्र किंवा कारण होय पूर्वी मानसशास्त्र हा स्वतंत्र अभ्यास विषय नव्हता तत्वज्ञानाचा एक भाग म्हणून त्याचा विचार केला जात असेल एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळालीग्रीक विचारवंतांनी आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्र होय असे सांगितले हरीश ऑरी स्टाउटल मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र बोथावस्तचे शास्त्र वर्तनाचे शास्त्र अशा स्वरूपात मानसशास्त्राच्या व्याख्या मध्ये बदल होत गेले विल्यम वुट यांनी 1879 साली जर्मनीमध्ये पहिली लिफझिक येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि इथून पुढे मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला

          मानसशास्त्राच्या आधुनिक व्याख्या

  “” वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय” रॉबर्ट एस फेल्डमन

,” वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र” लेस्टर ए लॅपटॉन

वर्तन आणि बोधनिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय” रॉबर्ट ए बॅरोन@@

      थोडक्यात--मानसशास्त्र म्हणजे मानव व मानवेतर प्राण्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय

           मानसशास्त्रामध्ये मानव व मानवेतर प्राण्यांचे या शारीरिक हालचाली चा समावेश वर्तनात होतोशब्दांची रचना इत्यादी घडामोडींचा समावेश होतो,'उद्या पक्का ला अनुसरून व्यक्ती किंवा एखाद्या सचिवाकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय उडवत या मानसशास्त्रज्ञाने वर्तनाचे सूत्र पुढील चौकटीत मांडले आहे त्या सूत्रातील संज्ञांची माहिती घेतल्यास वर्तनाचा अर्थ लक्षात येतो

                      वर्तन = उद्दीपक + सजीव +. प्रतिक्रिया

                 Behaviour = stimulus + organism + response

                      B.           =.       S.      +.         O.       +.    R

    1) उद्दीपक

    2) सजीव किंवा व्यक्ती

     3) प्रतिक्रिया

मानसिक प्रक्रिया

बोधनिक प्रक्रिया

मानसशास्त्र एक विज्ञान किंवा शास्त्र

                  मानसशास्त्रातील आजचे (आधुनिक) दृष्टिकोन

   मानसशास्त्रातील दृष्टिकोन त्या शास्त्रातील वेगवेगळ्या घटकांवर प्रकाश टाकतातमानसशास्त्रातील वेगवेगळे दृष्टिकोन त्यांच्या विचारसरणीनुसार वेगवेगळ्या घटकांना महत्त्व देतात त्यानुसार व्यक्ती वर्तनाचा अभ्यास करतात मानसशास्त्रामध्ये आज चार प्रमुख दृष्टिकोनाला महत्त्व आहे हे चार दृष्टिकोन व्यक्ती वर्तनाच्या शारीरिक व मानसिक घटकावर लक्ष केंद्रित करत आहेत ते दृष्टिकोन पुढील प्रमाणे

1)      मनोगतीक दृष्टिकोन -व्यक्तीचे अंतरंग समजून घेणे/स्वतःला समजून घेणे

2)      वर्तनवादी दृष्टिकोन- व्यक्तीच्या बाह्य वर्तनाचे निरीक्षण

3)      बोधनिक दृष्टिकोन- अर्थ समजून घेणे

4)      मानवतावादी दृष्टिकोन- अद्वितीय गुणांनी युक्त मानव

                मानसशास्त्रीय संशोधन

   मानव हा स्वभावताच जिज्ञासू आहे जेव्हा एखादी वस्तू तो प्रथम पाहतो तेव्हा त्या वस्तू बद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण होते ती वस्तू केव्हा कुठून कशी आली असावी याचा तो विचार करू लागतो त्यातून संशोधनाला दिशा प्राप्त होते

   संशोधन या संकल्पनेची व्याख्या पुढीलप्रमाणे

--संशोधन म्हणजे नवीन तत्य व तत्त्वे यांच्या शोधासाठी केलेले सातत्यपूर्ण चिकित्सात्मक व सखोल परिक्षण होय;

,--संशोधन म्हणजे नव्या ज्ञानाच्या शोधासाठी पद्धतशीर केलेली चौकशी होय

मानसशास्त्रीय संशोधनामध्ये एखाद्या घटने मागील कार्यकारण संबंध शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो यासाठी विविध पद्धतीचा अवलंब केला जातो

या ठिकाणी आपण मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या सहसंबंध संशोधन आणि प्रायोगिक संशोधन पद्धती ची माहिती घेणार आहोत

   सहसंबंधात्मक संशोधन

          1)   धनात्मक सहसंबंध

           2)ऋणात्मक सहसंबंध

           3) शून्य संबंध

प्रायोगिक संशोधन

     वर्तना मागील कारण नेमकेपणाने निश्चित करणारी शास्त्रशुद्ध पद्धती म्हणजे प्रयोग होय संदर्भात कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी एका परीवर त्यात हेतुपुरस्सर बदल करून वर्तनामध्ये त्याला अनुसरून बदल होतो का हे पाहणे म्हणजे प्रयोग होय एका अर्थाने नियंत्रित वातावरणातील निरीक्षणाला प्रयोग असे म्हणतातपरिणाम आहे असे तो खात्रीपुर्वक सांगु शकतो

     व्याख्या—"प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केले जाणारे वस्तुनिष्ठ निरीक्षण होय;

      प्रयोगशाळेत एखादी घटना मुद्दाम व योजनापूर्वक निर्माण करून व परिस्थितीवर संपूर्णतः नियंत्रण ठेवून केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय;

            मानसशास्त्रीय प्रयोगाच्या पद्धतीचे स्वरूप लक्षात येण्यासाठी पुढील संकल्पना महत्त्वाच्या आहेत 

1)      प्रयोगकर्ता

2)      प्रयुक्त

3)      परिवर्त्य- परिवर्त्याचे प्रकार

अ.    स्वतंत्र परिवर्त्य

आ.  परतंत्र परीवर्त्य

इ.      स्थिर परीवर्त्य

प्रयोग यामधील काही टप्पे किंवा पायऱ्या

1)      समस्या

2)      सिद्धांत कल्पना

3)      प्रायोगिक आराखडा

4)      नियंत्रण

5)      सिद्धांत कल्पना तपासणे

6)      प्रदत्त विश्लेषण

7)      फलीते तेव्हा निष्कर्ष

8)      पडताळा

             समूह

          प्रायोगिक पद्धती मध्ये दोन प्रकारचे समूह वापरले जातात त्यामध्ये प्रायोगिक समूह आणि नियंत्रित समूह असे दोन प्रकार आहेत

          प्रायोगिक अडथळे/धोके हॅलो

 मानसशास्त्र प्रयोग हे व्यक्तीवर आणि प्राण्यावर केले जातात व्यक्तीचे वर्तन हे गुंतागुंतीचे आहे तरीसुद्धा आधुनिक मानसशास्त्रीय तंत्रे प्रायोगिक उपकरणे या आधारेमानसशास्त्रज्ञ व अभ्यासक संशोधन करीत आहेत संशोधन करताना अनेक अडथळे येतात ते पुढील प्रमाणे

1)      प्रयुक्त न मिळणे

2)      नियंत्रणाचा अभाव

3)      प्रयोग शाळेतील सुविधा

4)      कृत्रिम परिस्थिती

5)      वातावरणीय परिणाम

प्रयोग पद्धतीमध्ये जरी काही अडथळे असले तरी मानसशास्त्राच्या अभ्यासाची सर्वश्रेष्ठ व शास्त्रीय अभ्यास पद्धती म्हणून या पद्धतीला मान्यता प्राप्त झाली आहे वरील अडथळे जर कमी केले तर निष्कर्ष अचूक मिळतील

 

 

 

 

 

 

 

   

 

 

 

 

 

 

 

बी.ए. भाग ३ /मराठी अभ्यासक्रमपञिका७ / सञ पाचवे/ साहित्यविचार घटक १/ ललित साहित्य म्हणजे काय ?

बी.ए. भाग ३

मराठी अभ्यासक्रमपञिका७

सञ  पाचवे

साहित्यविचार घटक १

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

ललित साहित्य म्हणजे काय ?

    प्रस्तावना :

               साहित्याचा अभ्यास करतांना एक गोष्ट लक्षात येते की,सर्व सामान्य माणसाच्या व्यावाहारिक जीवनात साहित्य हा शब्द अनेकदा वापरला जातो. हा शब्द साधन या अर्थी वापरला जातो. जसे चिञकलेचे साहित्य म्हणजे ब्रश,पेन्सिल, रंग, कागद इ,होय. तर बांधकाम साहित्य म्हणजे वाळू, सिमेंट पाणी, घमेली इ. होय.

   तर कथा, कविता, इतिहास, भूगोल रसायनशास्ञ हे सर्व साहित्य आहे.पण कथा, कविता, कादंबरी नाटक इ. उल्लेख केला तर ते ललित साहित्य आहे असे म्हणता येईल आणि इतिहास, भूगोल, गणित, भूमिती हे सर्व ललितेतर अगर शास्ञीय वाड्मय म्हणता येईल. 

   काही साहित्य हे समूहनिर्मित असते, त्याला लोकसाहित्य म्हणतात तर काही साहित्य हे व्यक्तिनिर्मित असते त्याला ललित साहित्य म्हणतात. 

       ललित साहित्याचा अभ्यास करत असतांना वाड्मयाच्या परंपरेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. भारतीय साहित्यशास्ञात सर्वप्रकारच्या वाड्मयालाकाव्य या एका शब्दात बांधले होते. कथा, कविता, कादंबरी, नाटक इ. वाड्मयाचे सर्व प्रकार या एका शब्दाने व्यक्त होत होते.

      पण काळाच्या ओघात कितीतरी बदल घडत जातात. तसेच बदल वाड्मयीन शेञात झाले आहेत.वाड्मय, सारस्वत, ललित साहित्य अशी नवनवी नावे काव्याला मिळाली या बाबत डाॅ यशवंत मनोहर म्हणतात,"संस्कृत साहित्य विचारात साहित्याला उद्देशून काव्य ही संज्ञा वापरली जात असे. वाड्मयाचा केवळ पद्य भाग म्हणजेच काव्य नव्हते. कथा,कविता,नाटक अशा सर्व साहित्याला उद्देशून काव्य ही संज्ञा वापरली जात होती. 

        थोडक्यात म्हणजे आजचे वाड्मय किंवा साहित्य आणि पूर्वीचे काव्य यात मूलभूत फरक नाही तर काळानुरूप झालेला तो एक शब्दबदल आहे. रसिकांना आनंद देण्याचे काम पूर्वीही काव्य करत होते आणि आजही ललित साहित्य करत आहे.

   ललित साहित्याची व्याख्या :

       १)    "जे लालित्यपूर्ण असते ते ललित साहित्य होय " अशी ललित साहित्याची एक व्याख्या करता येते

        २) प्रतिभाशक्तीने प्रेरित केलेले व आनंद देणारे लेखन म्हणजे ललित साहित्य    -रा.ग. जाधव.

  थोडक्यात "ललित म्हणजे सुंदर. ललित म्हणजे काव्यपूर्ण.

     ललित म्हणजे विदग्ध. ललित म्हणजे Beautful ,Fine.

 ललित साहित्य हे लालित्यपूर्ण असणारे,भावनांचा आविष्कार करणारे तसेच कल्पनेचा विलास दाखविणारे ते ललित साहित्य होय.

बी. ए भाग ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ / सञ पाचवे/ साहित्यविचार / घटक १/ आधुनिक मराठी साहित्यिकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या

बी. ए भाग ३

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७

सञ  पाचवे

साहित्यविचार     घटक  १

विषय प्राध्यपक प्रा. बी. के. पाटील

  आधुनिक मराठी साहित्यिकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या :

    प्रस्तावना : 

        आपण पाहिले शेकडो वर्षापूर्वी पौर्वात्य म्हणजे संस्कृत साहित्यकारांनी काव्य म्हणजेच साहित्याची व्याख्या करुन ठेवली आहे

     आधुनिक मराठी साहित्यातही ना. सी. फडके यांच्याही आधीपासून मराठी साहित्याची व्याख्या लेखक करत आहेतच. या बाबत पुढील  साहित्यिकांचा विचार पाहू

   १. विनोबा भावे  : विनोबा भावे म्हणजे विनायक नरहरी भावे. हे भारतीय स्वातंञ्य सैनिक होते.भूदान चळवळीचे महत्वाचे काम त्यांनी केले अहींसा व करुणा ही त्यांच्या जीवनातील मोठी दोन तत्वे होती. त्यानी आयुष्यभर 'भगवदगीतेला मतृस्थानी मानले. ते स्थितप्रज्ञ वृतीचे होते.निष्काम कर्मयोग ही त्यांची साधना होती.त्यानी समाधी मरण स्वीकाले.

     स्वत:च्या आईला गीता समजावी म्हणून त्यांनी गीताई हे गीताचे मराठीत भाषांतर केले.या पुस्तकाच्या २४४ आवृत्या आणि अडतीस लाख प्रती खपल्या आहेत 

भारत सरकारने त्यांना भारत रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.

 विनोबा भावे यांचीसाहित्याची व्याख्या  :

         "साहित्य म्हणजे सत्यनिष्ठ आणी सत्यानुभवाचे, जे समाजजीवनाला संस्कारित आणि संपन्न करुन सोडते असे अलिप्त चिंतन होय".

२. अरविंद वामन कुलकर्णी :

     मराठीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून अ वा कुलकर्णी जाणकारांना माहित आहेत.नाट्यतंञाविषयी त्यांचा संशोधन प्रबंध मौलिक आहे. सामाजिक जाणिवा व्यक्त करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली तसेच १९६० चे महत्वाचे कवी म्हणूनही ओळखले जातात.

अ. वा.  कुलकर्णी यांची व्याख्या :

      " साहित्य म्हणजे एका व्यक्तिमनाला भावलेल्या कलात्मक सत्याचा आविष्कार होय". या व्याखेत कलात्मक सत्याला महत्व दिले आहे.

गंगाधर गाडगीळ:

     यांना ८५वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभले.५० वर्षापेक्षा अधिक काळ दर्जेदार लेखन ,अर्थशास्ञाचे प्राध्यापक, कुशल प्रशाशक सहा कादंबर्‍या. सहा नाटके,सात समीक्षा ग्रंथ मुंगीचे महाभारत सारखे आत्मचरिञ त्यांच्या  नावावर आहे

  गंगाधर गाडगीळांची व्याख्या

         जीवनात जे भीषण असतं, जे अटळ पराजय असतात, ज्या जीवघेण्या वेदना असतात, एकाकीपणा असतो, माणसामाणसांच्या संबंधातून निर्माण झालेले शोकनाट्य असतं त्याचा लाव्हारस साहित्यातून व्यक्त होत असतो". 

  अशा प्रकारच्या मराठी साहित्यातील लेखक समीक्षकांनी  केलेल्या साहित्यविषयक व्याख्या आहेत.

बी.ए भाग ३/ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ / सञ पाचवे/ साहित्यविचार/ पौर्वात्य साहित्य लक्षणा व भामहाची साहित्य व्याख्या

बी.ए भाग ३

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७

सञ   पाचवे

साहित्यविचार

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

पौर्वात्य साहित्य लक्षणा व  भामहाची साहित्य व्याख्या :

        प्रस्तावना:

                     संस्कृतमध्ये साहित्याला 'काव्य' हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला जातो.काव्याच्या केवळ पद्यभागासच तो वापरला जातो असे नसून सगळ्याच साहित्याचा अंर्तभाव या 'काव्य' शब्दात केला जात असे." वाणीच्या माध्यमातून जे-जे व्यक्त होते ते-ते वाड्मय असते" असे मानले जाते. काव्य या शब्दात मानवी भावसृष्टीचे रमणीय दर्शन घडविणारे सौंदर्यप्रधान साहित्य अपेक्षित आहे.

     म्हणूनच दंडीपासून ते जगन्नाथापर्यंत संस्कृत किंवा पूर्वकालीन म्हणजेच पौर्वात्य साहित्यशास्ञज्ञानी केलेली काव्यलक्षणे हीच साहित्यलक्षणे आहेत.

     जगन्नाथाने शब्दांना महत्व दिले आहे. पण हे शब्द रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे असावेत असे म्हटले आहे. आनंदवर्धन याने 'ध्वनी' हा काव्याचा आत्मा आहे असे म्हटले आहे तर वामनाने 'रीती' ला काव्याचा आत्मा मानले. क्षेमेंद्राने औचित्यपूर्ण रचना महत्वाची मानली तर रुद्रटाने शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य असे म्हटले. विश्वनाथाने रसाला प्राधान्य दिले आहे.

       या सर्व मीमांसकामध्ये भामह हा एखाद्या रत्नहारात हिरा चमकावा तसा उठून दिसतो.

      इ. स.६०० ते इ.स. ७५० हा भामहाचा काल मानला जातो.'काव्यालंकार हा त्या काळात त्याने  लिहिलेला ग्रंथ आजही प्रमाण आहे.या ग्रंथात त्याने ३९ अलंकारांचा परामर्श घेतला आहे."व्याकरणदृष्टा उचित अशी शब्दयोजना आणि अर्थालंकार या दोन्हींची काव्याला गरज आहे" हे मत त्याने आग्रहाने मांडले.


     "शब्दार्थौ सहितौ काव्यम" अशी भामहाने साहित्याची व्याख्या केली.

म्हणजेच "शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजेच काव्य किंवा साहित्य होय" असे भामह म्हणतो.

   भामह या संस्कृत साहित्यशास्ञज्ञाला साहित्यमध्ये शब्द आणि अर्थ दोन्ही हवे आहेत. शब्द आणि त्याचा अर्थ दोन्ही महत्वाचे वाटतात. 

      कवीच्या अंत:करणातील भाव ज्याच्या आधारे व्यक्त होतात ते माध्यम असते शब्द. हे भाव समर्थपणे व्यक्त होतात ते शब्दांच्याच माध्यमातून, भामहाच्या मते,शब्द अर्थ हे केवळ वाच्यार्थ नव्हे तर रसरुप अर्थ म्हणजेच अर्थ होय.

       संस्कृत साहित्यात शब्द हे शरीर मानले आहे व आशय किंवा अर्थ हा आत्मा मानला आहे.शब्द हे बहिरंग आहे व आशय हे अंतरंग आहे.

    कसे सांगितले म्हणजेचहे शब्द किंवा बहिरंग किंवा शरीर होय.

   काय सांगितले म्हणजेच हा अर्थ किंवा अंतंरंग किंवा आत्मा होय.

      भामहाने साहित्याच्या शरीरावरुन व आत्मावरुन शब्दार्थौ सहितौ काव्यम ही  व्याख्या केली आहे.

बी. ए.भाग ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ /सञ :पाचवे / साहित्यविचार /घटक १/साहित्याचे स्वरुप / साहित्याचे स्वरुपविशेष

बी. ए.भाग ३

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ सञ :पाचवे

साहित्यविचार

घटक १साहित्याचे स्वरुप

 विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील.

        साहित्याचे स्वरुपविशेष

                   "साहित्य" हा शब्द वाड्मयाबरोबरच आपण रोजच्या व्यवहारात अनेक वेळा वापरतो. जसे लेखन साहित्य म्हणजे कागद, पेन, लिहावयाचे पॅड इत्यादी तसे बांधकाम साहित्य, स्वंपाकाचे साहित्य, शिवणकामाचे साहित्य असे वेगवेगळे शब्दप्रयोग आपण करतो तसेच वाड्ममयाच्या संर्दभातही साहित्य हा शब्द वापरला जातो.

        वाड्ममयाच्या  प्रांतात साहित्यहा शब्द व्यापक अर्थाने घेतला जातो.जसे कथा, कविता, कादंबरी, नाटक,चरिञ,प्रवासवर्णन,निबंध इ.संस्कृत साहित्यशास्ञात वाड्मयासंबंधी विचार करताना वाड्मय या ऐवजी काव्य हा शब्द वापरलेला दिसतो.तर आजच्या आधुनिक काळात  ललित वाड्मय हा शब्दप्रयोग अधिक रुढ झाला आहे.


     औषधोपचारांची माहिती किंवा एखाद्या व्यक्तीची कुंडली हेही लिहिले जाते.पण याला कुणी साहित्य  किवा वाड्मय  म्हणत नाही

 कारण वरील लेखन म्हणजे फक्त शब्दांची जुळणी असते. शिवाय साहित्य म्हणून जे लेखन ओळखले जाते ते एकाच स्वरुपाचे नसते.तर वि.स. खांडेकर यांचे क्रौचवध राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला चिं वि जोशी यांचे चिमणरावाचे चर्‍हाट किंवा गंगाधर गाडगीळांच्या कथा अशी पुस्तके साहित्य या नावाने ओळखली जातात.  पण ही पुस्तके परस्पराहून वेगळी आहेत यातील पहिला वर्ग ललित साहित्याचा व दुसर वर्ग ललित्तेतर साहित्याचा

       आधुनिक काळातही वाड्मय आणिसाहित्य हेशब्द ललित वाड्मय कीवा ललित साहित्य या अर्थाने वापरले जातात.

      पण यामुळेच केवळ ललित वाड्मय म्हणजेच वाड्मय किंवा साहित्य शिवाय दुसरे लेखन करणारी व्यक्ती साहित्यिक नव्हेच असे म्हणणेही योग्य नाही,

     साहित्य म्हणून आपण जे संबोधतो त्यात प्रामुख्याने पाच घटक असतात.

 ( १) भावतत्व(२) बुद्भितत्व(३) कल्पनातत्व(४) आकारतत्व(५) सौंदर्यतत्व

      म्हणजेच प्रथम मनाला काही भावते, बुद्भीला जणवते, कल्पनेने ते अधिक स्पष्ट होते, त्याचा आकार लक्षात येतो आणि यातूनच सौंदर्याची प्रचिती येते.

  "प्रतिभाशक्तीने प्रेरित केलेले व आनंद देणारे लेखन म्हणजे ललित साहित्य होय."  रा. ग.जाधव.

     थोडक्यात म्हणजे "जे सहित येते ते साहित्य" म्हणजेच "शब्द आणि अर्थ हे दोन्ही एकञ आले की साहित्य निर्माण होते."

बी. ए. भाग१/ ऐच्छिक मराठी(अक्षरबंध) / अभ्यासक्रमपञिका क्रं १ / विभाग ४ / चिञपट :आस्वाद प्रक्रिया / चिञपट 'ध्वनी' व 'प्रकाश योजना': तांञिक बाबी.

बी. ए. भाग१

ऐच्छिक मराठी(अक्षरबंध)

अभ्यासक्रमपञिका क्रं १

विभाग ४ 

चिञपट :आस्वाद प्रक्रिया

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

चिञपट 'ध्वनी' व 'प्रकाश योजना': तांञिक बाबी.

    प्रस्तावना: 

           चिञपटासाठी केवळ कथानक,नायक-नायिका आणि दिग्दर्शक यांचीच आवश्यकता असते असे नाही,तर एका चिञपठासाठी शेकडो कलाकार,तंञज्ञ काम करत असतात.अनेक कला मिळून एक चिञपट तयार होत असतो. यामध्ये

ध्वनीला अनन्यसाधारण महत्व आहे

'श्रवणेंद्रियाला ज्या उद्दीपनामुळे संवेदना होऊ शकते ते उद्दीपन म्हणजे ध्वनी होय'. असे अक्षरबंध या पाठ्यापुस्तकात म्हटले आहे.

      आपण चिञपट पाहत असतांना असंख्य प्रकारचे ध्वनी ऐकू येत असतात.पाञांच्या हालचालीमुळे काही ध्वनी निर्माण होतात. जसे एखाद्या स्ञीपाञाच्या बंगड्यांचा किंवा पायातल्या पैंजणांचा आवाज होतो.पुरुपाञ चालत आले की त्याच्या बुटाचा आवाज होतो. स्वंपाक घरातील शिट्टीचा आवाज...अशा असंख्य ध्वनींनी आपले जग भरले आहे.या ध्वनीच्या आवाजावरुन त्या त्या दृश्याचा विशिष्ट परिणाम अधोरेखित होतो.या शिवाय घोंघावणार्‍या वार्‍याचा,ढगांचा गडगडाट, पावसाचे कोसळणे हे आवाज ध्वनीआलेखनामुळे शक्य झाले आहे.

       एखाद्या चिञपटाचे आउटडोअर शूटींग होत असते तेव्हा चिञपटात नको असलेले आवाजही राहतात. यासाठी 'डबिंग' चा शोध लागला. नायकाचे वा अन्य पाञांचे संवाद बोलून ते 'डब' केले जाऊ लागले यामुळे  चिञपट प्रभावी झाला. काही वेळा हिंदी बोलता न येणार्‍या नटनटीसाठी दुसरेच कोणीतरी संवाद म्हणते. यामुळे चिञपट अधिक दर्जेदार झाला आहे.

   चिञपटासाठी प्रकाश योजना हा देखिल महत्वाचा घटक आहे. आज अत्याधुनिक कॅमेरे उपल्बध आहेत.  हे कॅमेरे अतिसूश्म गोष्टींची नोंद घेतात पण कॅमेरा उत्तम असून उपयोगाचा नाही. तर कॅमेर्‍यासाठी 'प्रकाशयोजना अतिशय गरजेची असते. 

     उत्तम प्रकाशयोजनाकार हा योग्य दर्जाचा प्रकाश योग्य वस्तूवर वा पाञावर टाकतो.यामुळे जसे हवेतसे दृश्य घेता येते. चिञपटाच्या प्रत्येक युनिटबरोबर स्वतंञ जनरेटरची व्यवस्था असते. त्यावर प्रकाशयोजना राबवली जाते. प्रकाशयोजनेचे दोन प्रकार आहेत. पहिला, वास्तववादी प्रकाश आणि दुसरा नाट्यात्मक प्रकाश होय प्रकाश योजनेसाठी काळे कापड, थर्मोकोल, सॅटीनचे कापड, वेगवेगळे आरसे हॅलोजन दिवे यांचा वापर केला जातो. यामुळे परिणामकारक व उठावदार दिसते.

Thursday, 3 December 2020

बी. ए. भाग २/ मराठी अभ्यासक्रम पञिका ४ सञ ३ / काव्यगंध/ नारायण सुर्वे (श्रमविषयक कविता) /५ नेहरु गेले त्या वेळची गोष्ट

(E-content created by Patil B. K.)

बी. ए. भाग २

मराठी अभ्यासक्रम पञिका ४

सञ ३

काव्यगंध

नारायण सुर्वे  (श्रमविषयक कविता)

५ नेहरु गेले त्या वेळची गोष्ट

          नेहरु गेले त्या वेळची गोष्ट: राजकीय भान व्यक्त करणारी कविता

              ही सुर्वे यांची महत्वाची कविता आहे. १९६४ च्या मे महिन्यात एका संध्याकाळी रेडिओवर नेहरु गेले ही बातमी प्रसृत झाली. ही बातमी ऐकताच सुर्वे यांना धक्का बसला, आता प्रकाश संपला हे पार्लमेंटमध्ये उच्चारलेले वाक्य त्यांच्या कानात घुमत होते.

      या कवितेचे एक वैशिष्टे म्हणजे कवीने पं. नेहरु यांच्या निधनानंतर लिहिलेल्या या कवितेत नेहरुंचे कार्य, त्यांचे चरिञ याविषयी एकही ओळ नाही.पण सुर्वे यांच्या कवितेतील सुचकताफार बोलकी असते.अनेक संदर्भांना ही कविता सहज स्पर्श करते.

   "पाठ शेकवत बसलेली घरे कलकलली

      शहर कसे करडे होत गेले

       नंतर अजिरी

 पुढे..... काळोखाने माणिक गिळले."

  इथे शहर करडे होणे नंतर अजिरी होणे व काळोखाने माणिक गिळणे या सगळ्या अवस्था एकाचवेळी शहराच्या व देशाच्याही आहेत,सगळ्यासमोर अंधार पसरला. कारखाने बंद पडले.  ओले खमीस खांद्यावर टाकून सगळे घरी गेले. म्हणजे जणू प्रत्येकाच्या घरातील  माणूस दिवंगत झाला आहे व सगळे ओलेत्याने, दहनानंतर घरी परतणारे अंतेवासी आहेत.

"क्या हुआ ए सुंद्रे!

'आज लोबन मत जला!...,नेहरु गये।।'

'सच, तो चलो आज छुट्टी!....'

     वेश्यावस्तीतले हे चिञ रंगवताना जीवनाची शुद्र पातळीही गाठली आहे. सुट्टी मिळाली हा आनंद काहींना वाटतो आहे,

   पण कवीला याचा राग नाही तर यांनाही समजून घेण्याची व्यापक सहानुभूती कवीकडे आहे. या दृष्टीने 'लोबन मत जला' हे वाक्य महत्वाचे आहे. सबंध पीडित जगाचा हुंदका या कवितेत कवीने साध्या शब्दांत टिपला आहे.

पुढे कवीला एक हातगाडीवाला भेटतो. तो कागदी खोळीत उजेड घेऊन चाचला होता. एका उदास वृत्तीला या हातगाडीवाल्याच्या रुपाने प्रकाशाने उजळले आहे.

  पं. नेहरुसारखा युगंधर नेता गेला. यामुळे राष्टीय व आतरराष्टीय पातळीवर काय घडले हे इतिहासात लिहिले जाईल .पण या घटनेने सामान्यांच्या जीवनात काय घडले हे टिपण्याचे काम या ललित कवितेने केले आहे.

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing