Thursday, 22 April 2021

Sociology/Syllabus/2020-21

 

Shivaji University,Kolhapur

Radhanagari Mahavidyalaya,Radhanagari

Syllabus

Year : 2020 -2021

Semester  : 2

Subject : Sociology    Paper No: 2. Applied Sociology  (उपयोजित समाजशास्त्र)

.क्र.

वर्ग

पेपर क्र.

घटक

.

 बी.. 1

 2 .

1.समाजशास्त्रातील सैधातिक दृष्टीकोन:

 प्रास्ताविक, सैधातिक दृष्टीकोन,समाजशास्त्रज्ञाची भूमिका

ऑगस्ट कोम्प्त; जीवन व परिचय

M.N.श्रीनिवास यांचे योगदान

धर्म आणि समाज

कार्ल मार्क्सचे योगदान

.

 बी.. 1.

 2.

2.समाज आणि जनसंपर्क माध्यमे

प्रास्ताविक ,व्याख्या,वैशिष्टे,प्रकार ,

जनसंपर्क माध्यमाचा समाजावर परिणाम

.

 बी..1.

2.

3. आधुनिक समाजातील सामाजिक परिवर्तन

 प्रास्ताविक,अर्थ,

 आधुनिकीकरण व जागतिकीकरण

 आधुनिकीकरण : व्याख्या,वैशिष्टे,महत्व

 जागतिकीकरण : व्याख्या,वैशिष्टे,महत्व

 सामाजिक चळवळी

.

बी..1.

2.

4. समाजशास्त्राची उपयोगिता

   प्रास्ताविक,अर्थ, समाजशास्त्राची उपयोगिता

   सामाजिक धोरण ,वैशिष्टे

   सामाजिक नियोजन ,उद्दीष्टे

                                             

 

 

 

 

 

Shivaji University,Kolhapur

Radhanagari Mahavidyalaya,Radhanagari

Syllabus

                                                                       Year : 2020 -2021

                                                                              Semester : 4

Subject :Sociology  Paper No: 6. Sociology of Health (आरोग्याचे समाजशास्त्र )

.क्र.

वर्ग

पेपर क्र.

घटक

.

 बी..

 6.

Introduction to Sociology of Health

A) Meaning of Nature of Sociology of

Health

B) Subject matter of sociology of Health

C) Importance of Sociology of Health

.

 बी.. .

 6.

 Major Diseases in India

A) Cancer - Causes and Remedies

B) Heart diseases - Causes and Remedies

C) Diabetes - Causes and Remedies

.

 बी...

6.

 Social Dimensions of Health

A) Traditional Dimensions of Health

B) Modern Lifestyle and problems of

Health

C) Remedies on Health Problems

.

बी...

6.

Health Policy in India

A) Health Policy for children and women

B) Health policy for old age

C) Health policy for BPL

 

                                               

 

 

 

 

 

Shivaji University,Kolhapur

Radhanagari Mahavidyalaya,Radhanagari

Syllabus

                                                                       Year : 2020 -2021

                                                                              Semester : 4

Subject :Sociology  Paper No:5. Gender and Violence  (लिंगभाव आणि हिंसाचार  )

 

.क्र.

वर्ग

पेपर क्र.

घटक

.

 बी..

 5.

. लिंगभाव आणि हिंसाचार

  प्रास्ताविक,लिंगभाव अर्थ,लिंगभावविषयक हिंसाचाराचे स्वरूप ,प्रमुख मुद्दे

.

 बी.. .

 5.

. कौटुंबिक हिंसाचार

प्रास्ताविक,अर्थ , हुंडा प्रथा , कारणे,उपाय,,घटस्फोट कारणे आणि उपाय

  

.

 बी...

5.

 . स्त्रियांविरोधातील अत्याचार

आदिवासी महिला ,ग्रामीण महिला,नागरी महिलांवरील अत्याचार व उपाययोजना

.

बी...

5.

 . कामाच्याठिकाणी स्त्रियांचा होणारा छळ

स्त्रियांचा छळ,प्रकार , विशाखा मार्गदर्शक कायदा २०१३

 

 

 

 

 

 

 

Shivaji University,Kolhapur

Radhanagari Mahavidyalaya,Radhanagari

Syllabus

Year : 2020 -2021

Semester : 4

Subject :H.S.R.M.  Paper No:2. HISTORY OF SOCIAL REFORMS IN MAHARASHTRA  (महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास )

.क्र.

वर्ग

पेपर क्र.

घटक

.

 बी..

2.  

.प्रारंभीची सामाजिक सुधारणा

  सामाजिक सुधारणा चळवळीच्या अगोदरच्या समाजजीवन ,१९ व्या शतकाच्या सुरुवातीची सामाजिक परिस्थिती , परमहंस सभा,प्रार्थना समाज ,महर्षी वि.रा.शिंदे.

.

 बी.. .

 2.

. महिला सुधारक

सावित्रीबाई फुले ,ताराबाई शिंदे ,पंडिता रमाबाई

  

.

 बी...

2.

 . सामाजिक सुधारक

लहूजी साळवे यांचे कार्य ,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य.संत गाडगे महाराज यांचे कार्य ,अण्णाभाऊ साठे यांचे कार्य

.

बी...

2.

 . शेक्षणिक सुधारक

कर्मवीर भाऊराव पाटील,शिक्षणमहर्षी बापुजी साळोखे ,स्वामी विवेकानंद ,पंजाबराव देशमुख

 

 

 

 

Monday, 19 April 2021

बी.ए.भाग-१ (मराठी आवश्यक) / अनंत फंदी

                                                      अनंत फंदी   (इ. स. १७४४-१८१९)

      'फंदी आनंदाची कविता सवाई सोटा सोटा रे'असा आत्मविश्वास घेऊन मराठी शाहिरी काव्यात आपले नाव अजरामर करणारा कवी म्हणजे आनंत  फंदी होय. त्यांच्या जन्म मृत्यु संदर्भात नेमकी माहिती उपलब्ध नाही. पेशवे काळातील हा एक महत्त्वाचा कवी. आनंत फंदी यांचे गाव संगमनेर.पूर्वजांचा व्यवसाय गोंधळी पणाचा व सराफीचा होता. आपल्या कवित्वाच्या बळावर तो प्रसिद्ध शाहीर झाला. व पुढे अहिल्याबाई होळकर यांच्या सल्ल्याने तो कीर्तन करण्यास प्रवृत्त झाला. व पुढे तो प्रसिद्ध कीर्तनकार झाला. आनंद फंदी चे पोवाडे, लावण्या, कटाव व फटके उपलब्ध आहेत. आनंत फंदी यांचा 'खर्ड्याच्या लढाईवर' पोवाडा प्रसिद्ध आहे. 'माधव ग्रंथ' हा त्यांच्या नावावर आहे.

 ' जमाना आला आला उफराटा ' या लावणीत अनंत फंदी यांनी पेशवे काळातील अनागोंदीचे चित्र रेखाटले आहे. सुन, लेक, शिष्य अनुक्रमे सासू, वडील आणि आणि गुरूला किंमत देत नाहीत. त्यांची निंदा करतात जावई सासूला किंमत देतो व आईला लावंडून देतो. बहिणीला अपशब्द वापरून मेहुणीचे लाड पुरविणारा भाऊ, आईवडिलांची निर्भत्सना करुन बायकोचे लाड पुरवणारा लबाड मुलगा, मालकावर उलटनारे चाकर, बेईमान सावकार, दरबाराची बिघडलेली शिस्त, व्यापारी लोकांनी केलेली लूट, फालतू लोकांना आलेली किंमत, चमचेगिरीचा सुळसुळाट या सारख्या अनेक घटकांचे  स्पष्ट शब्दात फंदी यांनी वर्णन केले आहे.

       'हे मूर्खा खून तर्का' जीवनातील काही कटू अनुभवातून आणि भोवतालच्या परिस्थितीच्या निरीक्षणातून आनंत फंदीच्या लेखणीला धार चढत गेली. त्यातूनच काही उपरोधिक लावण्याची रचना झाली त्यातील एक लावणी म्हणजे 'हे मूर्खा खून तर्का' होय. यामधून दिसते तसे नसते हे सत्य त्यांनी उपरोधक पद्धतीने मांडले आहे. बाहेरून जे चांगले वाटते तसे आतूनच असेलच असे नाही. याची अनेक उदाहरणे कवीने या लावणीतून दिली आहेत. आणि सावधपणे जगाकडे पाहण्याचा सल्ला दिला आहे. उपदेशपर रचना, मौलिक व्यावहारिक संदेश, रांगडी भाषा, व्यवहार ज्ञान सडेतोडपणा ही फदीच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.

बी. ए. भाग-१/(मराठी आवश्यक)/ संत नामदेव

                                                          संत नामदेव ( इ.स. 1270 - इ.स.1350)

         मराठीतील पहिले भाव कवी ,पद्य चरित्रकार, आत्मचरित्रकार, आख्यान कवी, भागवत धर्माचे पहिले संघटक आणि प्रचारक, कीर्तन परंपरेचे प्रवर्तक अशा अनेक दृष्टीने नामदेवांचे व्यक्तिमत्व संपन्न आहे. त्यांची अभंगवाणी म्हणजे त्यांच्या भाव वेड्या उदात्त, प्रसन्न, सोज्वळ आणि निष्पाप अशा व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार आहे. नामदेवांनी मराठी, हिंदी आणि इतर भाषांमधून रचना केल्या आहेत. त्यांच्या नावावर आज सुमारे अडीच हजार अभंग आहेत. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकवणारे हे पहिले मराठी संत होत. त्यांनी पंजाबमधील 'घुमान'येथे वास्तव्य केले. शिखांच्या 'गुरू ग्रंथ साहिब' मध्ये त्यांच्या रचनांचा समावेश आहे. आत्मचरित्र, संतचरित्र, तीर्थावळी, समाधी, बाळक्रीडा चे अभंग अशी बहुविध रचना त्यांनी केली आहे. सुंदर शब्दचित्रे, उत्तम भावकाव्य आणि उत्कट भक्ती ही त्यांच्या अभंगाची वैशिष्ट्य आहेत.

 'पतितपावन आहेस म्हणून' या अभंगांमध्ये नामदेवांच्या उत्कट विठ्ठलभक्तीचा आविष्कार झाला आहे. नामदेवांची विठ्ठलावर अपार श्रद्धा आहे. त्यांची मनोभावे सेवा करावी, त्याला सगुण रूपात पाहावे ही त्यांची इच्छा आहे. मात्र कठोर, आर्त भक्ती करूनही विठ्ठल त्यांना भेटत नाही त्यावेळी नामदेव विठ्ठलाला स्पष्ट शब्दात सुनावतात हे विठ्ठला तू पतीत लोकांना पावन करून घेणारा आहेस म्हणून मी तुझ्या दारात आलो आहे, पण तू  भेट देत नाहीस म्हणून मी रागावून माघारी जात आहे. तू कृतघ्न आहेस, अभिमानी आहेस त्यामुळे पतित-पावन म्हणून घेण्याचा तुला अधिकार नाही. हातात झेंगट घेऊन मी तुझा कृतघ्नपणा दवंडीच्या द्वारे साऱ्यांना सांगणार आहे. हे देवा तुझ्या कडून मला काही नको तुझ्यावर माझे प्रेम आहे म्हणून हा सारा खटाटोप सुरू आहे. या अभंगांमधून नामदेवांचे विठ्ठलावरील निस्सीम प्रेम व भक्ती व्यक्त होते.

           'वैष्णवांचा धर्म' या अभंगात पंढरपूर विठ्ठलाचे महत्त्व येते. वैष्णवाणी  एकदा तरी पंढरपुरात जावे व तिथल्या भक्तिमय वातावरणात स्वतःचे जीवन मुक्त करून घ्यावे. विठ्ठल हा जिवलग असून त्याला उराउरी भेटावे. त्या भेटी मधील प्रेम, सुखाचा अनुभव घ्यावा. त्याचे मुख दर्शन झाल्यानंतर स्वतःच्या जीवावरून लिंबलोन उतरू टाकावे, विठ्ठल दर्शनाने अंतर्बाह्य कैवल्याचा अनुभव येतो व ब्रम्हानंदी ची अनुभूती येते आणि यासाठीच नामदेव रात्रंदिवस विठ्ठल भक्तीत रममाण होतात.

बी ए भाग ३/ पेपर क्रमांक १५ / सञ सहा

                                                                        बी ए भाग ३

                                                        पेपर क्रमांक १५/ सञ  सहा

योग्य पर्याय निवडा:

१  संवादाला.........असे म्हटले जाते?

अ)संवाद

ब)संज्ञापन

क)निवारा

ड)संज्ञापनशास्ञ

२  .......ही मानवाची मूलभूत गरज आहे?

 अ)संवाद

ब)भूक

क)वस्ञ

ड)निवारा

३  .......म्हणजे व्यक्तीने स्व:शीच साधलेला संवाद?

अ)गट संवाद

ब)आंतरव्यक्ती संवाद

क)जनसंवाद

ड)आत्मसंवाद

४  बातमी लिहिताना..........जाहिरातदाराच्या प्रभावाखाली असता कामा नये?

 अ) लेखकांने

 ब)वार्ताहराने

  क)वाचकाने

  ड)साहित्यिकांने

५  बातमीलेखन हे एक प्रकारचे ....... आहे

अ)कथन

ब)वाचन

क)संवाद

ड)स्वागत

६  वाचक अत्यंत चिकित्सकपणे  ...... वाचत असतात?

अ)गोष्ट

ब)कविता

क)कथा

ड)बातमी

७  ...........हे मोठ्या कौशल्याचे काम असते?

अ)लेखन

ब)वाचन

क)संपादन

ड)मांडणी

८ .........हा वृत्तपञातल्या सर्व संपादकीय मजकुराला जबाबदार असतो?

अ) संपादक

ब)वार्ताहर

क)वाचक

 ड)लेखक

९  वृत्तसंपादक अगर वरिष्ठ उपसंपादक यांच्याकडे........पानाची जबाबदारी असते?

अ)मजकूर

ब)शीर्षक

क)लेखन

ड)संपादकीय

१०  दैनंदिन वार्तासंकलनाचे नियोजन.......निगराणीखाली होत असते?

अ)संपादकांच्या

ब)मुख्य वार्ताहराच्या

क)उपसंपादकांच्या

ड)निवासी संपादकांच्या

टिप प्रश्नांची योग्य उत्तरे ठळक अक्षरात आहेत

बी ए भाग १ /सञ २ / अभ्यासक्रमपञिका क्रं २ / पाठ्यपुस्तक अक्षरबंध (बाकी सर्व ठीक आहे) /लोकनाथ यशवंत

                                                         पाठ्यपुस्तक: अक्षरबंध (बाकी सर्व ठीक आहे)

लोकनाथ यशवंत

कवी परिचय

कवी लोकनाथ यशवंत यांचा जन्म १३मार्च१९७६ रोजी झाला. ते आंबेडकरवादी कवी आहेत. त्यांची कविता वास्तवाला भिडणारी आहे तसेच ती जीवघेणे अनुभव व्यक्त करते भगवान गौतम बुध्द यांच्या'**प्रतितसमुत्पाद** या तत्वाचा विचार मांडून कवी मानवाचे दु:खी जीवन दु:खमुक्त करु पाहतात. यातुन माणूस निसर्ग आणि समाज यांच्या धारणतत्वात जी मूल्यनिष्ठा आहे ती कवी टिकवू बघतात

    लोकनाथ यशवंत यांची कविता आक्रस्ताळी नाही .ती वेदना, विद्रोह आणि नकार यांना विवेकाचा आयाम देते.

     कवीने गौतम बुध्दांच्या प्रज्ञा, शील ,करुणा, अहिंसा आणि सदाचार या तत्वांचा स्वीकार केला आहे. माणूस हा केंद्र मानला आहे. लोककल्यानाचा विचार करता करता वाड:मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये यांची जोपासना केली आहे.

लोकनाथ यशवंत यांचे प्रकाशित कवितासंग्रह

*आता होऊन जाऊ द्या १९८९

*आणि शेवटी काय झाले? १९९५

*पुन्हा चाल करु या!२००९

*बाकी सर्व ठीक आहे२०१४

योग्य पर्याय निवडा

१ पुढीलपैकी कोणता कवितासंग्रह कवी लोकनाथ यशवंत यांचा नाही ?

अ)किडे जगतात घाणीत

ब)आता होऊन जाऊ द्या

क)आणि शेवटी काय झाले?

ड)बाकी सर्व ठीक आहे

२ कवी लोकनाथ यशवंत यांचा जन्म किती साली झाला?

अ)१९७४

ब)१९७६

क)१९७८

ड)१९८०

३ लोकनाथ यशवंत यांचा पहिला कवितासंग्रह किती साली प्रसिध्द झाला?

अ)१९८७

ब)१९८९

क)१९९१

ड)१९९३

४ 'जिवाचा आटापिटा' या कवितेतील तो कशासाठी जिवाचा आटिपिटा करीत आहे?

अ)कवीशी मैञी व्हावी म्हणून

ब)आपणही कवी व्हावे म्हणून

क)कवीची जात कळावी म्हणून

ड)कवीने दारू पिऊ नये म्हणून

५ जिवाचा आटिपिटा या कवितेतील कवीच्या मुलांची नावे काय होती?

अ)मुक्तछंद आणि समुद्र

ब)अभंग आणि ओवी

क)समीक्षा आणि कला

ड)कादंबरी आणि पोवाडा

६'मुख्य प्रवाह' या कवितेत शहरात राहून माणसाशी कसे वागायचे असते असे कवी म्हणतात?

अ)एकदम तोडून टाकायचे

ब)हळूहळू दूर सारायचे

क)त्याचा खून करायचा

ड)गोड गोड वागायचे

७ मुख्य प्रवाह या कवितेत  कोणती गोष्ट हाडे पोखरत आहे, असे कवी म्हणतात?

अ)पालेभाज्यांची रसायने

ब)पेट्रोलचा काळा धूर

क)मतलबी वागणे

ड)संवेदनहीनता

९ कवी लोकनाथ यशवंत यांना पुढीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही?

अ)महाराष्र्ट राज्य वाड:मय पुरस्कार

ब)भैरु रतन दमाणी पुरस्कार

क)अस्मितादर्श वाड:मय पुरस्कार

ड)महाराट्र साहित्य परिषद पुरस्कार

१० मुख्य प्रवाह या कवितेत शहरात गेल्यानंतर कसे प्रेम दाखवावे, असे कवी म्हणतात?

अ)मनाच्या तळापासून

ब)भडभड बोलून

क)सामनेवाल्याला तोलत

ड)मनात काहीही असलं तरी

*टिप - योग्य उत्तरे 'ठळक' केली आहेत


बी. ए. भाग दोन/ सञ-४/ अभ्सासक्रमपञिका क्र-६ / पाठ्यपुस्तक -जुगाड (कादंबरी)

पाठ्यपुस्तक -जुगाड (कादंबरी)

१ शशाच्या पुण्याच्या कंपनीतील कोणाचे लग्न होते?

अ)गोपीचंद ब)डिसुझा क)माळवी ड)प्रभू

२ पुषप्या कोणतं गाणं सतत गुणगुणत असे?

अ)मंदी ब)रंगी क)चंपी ड)शांती

३टेलिको या मोठ्या कंपनितील नोकरी मणेर याला कामिळाली नाही?

अ)त्याचा अनुभव कमी पडला

ब)त्याच्याकडे शैक्षणिक पाञता नव्हती.क)तो लेखी परीक्षेत नापास झाला

ड)तो मेडिकल परीक्षेत अनफिट ठरला

४श्री लाॅजमध्ये जिन्याखाली विटा रचून बनवलेल्या खोलीत कोण राहत होते

अ)शशा ब)गोपीचंद क)पुषप्या ड)मणेर

५ पुण्यातील श्री लाॅजमधील किती नंबरच्या खोलीत शशा राहत होता?

अ)पंचावन्न ब) छपन्न क)सत्तावन्न ड)अठावन्न

६पुण्यात शशा राहत होता त्या लाॅजचे नाव काय होते?

अ)श्रीराम लाॅज ब)श्री लाॅज क)अशोक लाॅज ड)सूरज लाॅज

७ पुण्यातील 'श्री लाॅज' च्या मालकाचे नाव काय होते?

अ) पाटील ब)शामराव जोशी क)राहेरकर ड)शितोळे

८ किरण गुरव यांनी पुढीलपैकी कोणत्या वाड:मयप्रकारात लेखन कूले आहे?

 अ)चरिञ ब) कथा क)नाटक ड)प्रवासवर्णन

९ 'जुगाड' ही कादंबरी पहिली आवृत्ती किती साली प्रकाशित झाली?

अ)२०१६ ब)२०१७ क)२०१८ ड)२०१९

१०पुढीलपैकी कोणता कथासंग्रह किरण गुरव  यांचा नाही?

अ)उखडलेली झाडे ब)राखीव सावल्यांचा खेळ क)श्रीलिपी ड)बाळूच्या अवस्थांतराची डायरी

   उत्तरे ..............

१    माळवी

२     मंदी

३     तो मेडीकल परीक्षेत अनफिट ठरला

४      मणेर

५       सत्तावन्न

६       श्रीलाॅज

७        शितोळे

८        कथा

९        २०१८

१०      उखडलेली झाडे

बी ए भाग -२ /पेपर क्रमांक-६ / सञ-४/ जुगाड (कादंबरी) किरण गुरव


जुगाड (कादंबरी)  -- किरण गुरव

लेखक परिचय -

          किरण गुरव ककोल्हापूर जिल्यातील राधानगरी तालुक्यातील 'राधानगरी गावचे सुपुञ आहेत.

शिवाजी विद्यापीठातील विशेष कक्षामध्ये अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. 

किरण गुरव यांचे तीन कथासंग्रह आणि एक कादंबरी प्रकाशित आहे.

कथासंग्रह -

*राखीव सावल्यांचा खेळ

*श्रीलिपी

*बाळूच्या अवस्थांतराची डायरी

*कादंबरी लेखन-जुगाड कादंबरी२०१८

किरण गुरव यांना मिळालेले पुरस्कार-

*जळगाव येथील भवरलाल अॅंड कांताबाई जैन फाऊंडेशनचा सन २०१६-१७ चा ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखन पुरस्कार.

*महाराट्र फाऊंडेशन अमेरिका व साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ललित पुरस्कार

*महाराष्र्ट शासनाचा ग. ल. ठोकळ पुरस्कार

*मुंबई मराठी साहित्य संघाचा 'कथाकार शांताराम पुरस्कार'

*शरद प्रकाशनचा'बाबुराव बागुल पुरस्कार'

*जुगाड  या कादंबरीला २०१८ चा पद्मश्री डाॅ, विखे -पाटील पुरस्कार'(प्रवरानगर)

*जुगाड या कादंबरीला सन २०१८चा भी. ग. रोहमारे पुरस्कार(कोपरगाव)

*जुगाड या कादंबरीला सन२०१८चा ए. पा. रेंदाळकर पुरस्कार(रेंदाळ)

*स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०१८-हरी नारायण आपटे पुरस्कार

*दिल्लीच्या साहित्य अकादमीतर्फे बडोदा येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत कथावाचनासाठी निमंञण

*'श्रीलिपी' याकथासंग्रहातील'वडाप' या कथेचा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील अभ्यासक्रमात समावेश.

जुगाड शब्दाचा अर्थ-

     जुगाड म्हणजे कमी खर्चात राबविलेली अभिनव कल्पना किंवा शोध.

    हा भारतीय शब्द आता केवळ आपला राहिला नाही तर बी. बी. सी. ने जगभरातल्या व्यक्तींना फोटो पाठवायचं आवाहन केलं होतं त्यात 'जुगाड' शब्दाचा वापर केला होता.

*कादंबरीतील महत्वाचे मुद्दे-

*शशाच्या पुण्यातील नोकरीच्या शेवटच्या दिवसाचे वर्णन

*इनकाम असोसिएटस एजन्सीचे काम

* जुगाड कादंबरीतील भोपे मेसबद्दलचे शशाचे अनुभव

*डुणूग  यांच्या कल्पना टूल्समधील शशाच्चा मुलाखतीचा अनुभव

*पहिले किलन अनलोड करतानची धामधूम: लेखक किरण गुरव यांचे अनुभव

*राधामाई साईटवर काम करतानाची कन्सट्रक्शन काॅट्रक्टरची लेखकाची माहिती

*राधामाईच्या प्रोजेक्ट इन्सपेक्शनची माहिती

*पांडूने मारलेल्या नागाचे वर्णन

*काॅलमवर केलेले मार्किंग त्याचा शशाने घेतलेला शोध.*

राधामाई प्रोजेक्टवरील शशा व सीमा देसाई यांच्यातील नाजुक बंध 

*जुगाड कादंबरीचा भोवताल व समाज चिञण

* राधामाईचे चेअरमन शेणोलीकर चव्हाण यांची व्यक्तीरेखा

*व्यक्तीरेखा

१ शशा

२ सीमा देसाई

३पुषप्या सावंत

४युसूफ,जय,साजी,सुब्रम्हण्यम

*जुगाड कादंबरीची किरण गुरव यांची भाषा:वाड:मयीन सौंदर्याचा नमुना.

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing