Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: शिवकालीन लष्करी प्रशासन

Friday, 25 June 2021

शिवकालीन लष्करी प्रशासन

 B.A I Sem II History Paper II (भाग ४)

शिवकालीन लष्करी प्रशासन.

        शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कालखंड पूर्व व स्वराज्य कालखंडातील लष्करी प्रशासनाचा विचार केला तर शिवाजी महाराजांनी लष्करी प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणले. दक्षिणेतील शाह्यामध्ये जाहागीरदारी सैन्य होते. तर उत्तरेतील मोगल सत्तेत मनसबदारी सैन्य होते. दोन्हीकडे ही सरदारांच्या ताब्यात सरदारांचे सैन्य असल्यामुळे मध्यवर्ती प्रशासनाच्या नेहमीच उपयोगी येईल याची खात्री नव्हती. सैन्याला पगार जहागीरदार/मनसबदार देत असल्यामुळे ते सैन्य त्यांच्याशी एकनिष्ठ असे अनेक सरदार बंडखोरी करत असत. त्यामुळे राजाला स्वतःच्या सरदारांच्या विरुद्ध अनेकदा लढावे लागे. हे वतनदारी सैन्य व्यवस्थेचे दुष्परिणाम शिवाजी महाराजांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी लष्करी प्रशासनात स्वतः जातीने लक्ष देऊन वेतनधारी मध्यवर्ती म्हणजे छत्रपतींच्या ताब्यात असलेले राजनिष्ठ,राष्ट्रीय सैन्य निर्माण केले. या सैन्यात जात,धर्म,वंश,घराणे इ.चा विचार न करता कर्तृत्ववान व्यक्तींची भरती केली. कर्तुत्ववान व्यक्तींना बढती दिली. श्रेणीबद्ध सैन्याची रचना केली. त्यांना दरमहा नियमितपणे वेतन दिले.पराक्रमी व्यक्तींचा गौरव व बढती दिली. प्रत्येक युद्धानंतर 'जखमदरबार' भरवून पराक्रमी व्यक्तींचा गौरव केला, जखमी वा मृत सैनिकांच्या पश्चातलोकांची व्यवस्था केली. सैनिकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली.

        लष्कराचे विभाग....

१). पायदळ.

         पायदळात घाटमाथ्यावरील मावळे आणि कोकणातील शेतकरी यांचा भरणा असे. पायदळाची श्रेणीबद्ध रचना होती. ती पुढील प्रमाणे...         

     १० सैनिकांचा प्रमुख  १ नाईक.         

      ५ नाईकांचा प्रमुख     १ हवालदार.   

      २ हवलदारांचा प्रमुख  १ जुमलेदार

      १० जुमलेदारांचा प्रमुख १ हजारी.   

      सर्व पायदळाचा प्रमुख सरनोबत

      

२). घोडदळ.

               घोडदळाचे दोन प्रकार होते.

    अ. शिलेदार ब. बारगीर .

  अ. शिलेदार.. स्वतःचा घोडा व हत्यारे घेऊन स्वराज्याच्या सैन्यात दाखल होणाऱ्या शिपायाला शिलेदार असे म्हणत.   ब. बारगीर.  शासकीय घोडा व हत्यारे चालवण्यासाठी घेणाऱ्या सैनिक/ घोडेस्वारास बारगिर असे म्हणत.  

       २५ बारगीर/शिलेदार यावर १ हवालदार

       ५  हवालदार यावर.            १ जुमलेदार

       ५ जुमलेदार यावर.             १ सुभेदार

       १० सुभेदार यावर.              १ हजारी

       ५ हजारी वर.                    पंच हजारी

       सर्व हजारी /पंच हजारीवर. सरनोबत

२५  घोड्यांना १ पखाली १ नालबंद  तैनातीत होते.     

       

३). राजसंरक्षक दल. 

               यालाच जिलबीचे पथक असेही म्हणत. हे राजाचे खास संरक्षक दल होते. हातात सोन्याचे कडे, दागिने, पायात तोडा,उंची वस्त्रे,अत्यंत शूर, विश्वासू, प्रसंगावधानी, अष्टावधानी, स्वामीनिष्ठ अशा लोकांची भरती यामध्ये केलेली असे.

४). गजदल . हत्ती दल हे श्रीमंतीचे प्रतीक होते. किल्ल्यांवर व शोभेसाठी तसेच तोफा वाहून नेण्यासाठी यांचा उपयोग केला जात असे.

५) उंटदल... अफजलखानाच्या पराभवानंतर त्यांच्याकडे असलेले उंटदल मराठ्यांना सापडले. तोफा व सैनिकांच्या राहण्याचे सामान वाहून नेण्यासाठी याचा उपयोग केला जात असे.

६). तोफखाना. लष्कराचा हा महत्त्वाचा विभाग होता. जाड,मध्यम व हलक्या अशा विविध तोफांचे हे दल होते

७). गुप्तहेर दल.... शिवरायांच्या बहुतांश मोहिमा या गुप्तहेर खात्याच्या माहिती नुसारच झाल्याचे आपणास दिसते. बहिर्जी नाईक दीर्घकाळ याचा प्रमुख होता.

८). आरमार दल. हा स्वराज्याचा स्वतंत्र विभाग होता. त्याच्या प्रमुखास सरखेल असे म्हणत त्याच्या हाताखालील अधिकाऱ्याला मायनाईक/दर्यासारंग असे म्हणत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...