(Parit V. B.)
Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari
B.Com - III Sem - II
Subject- Business Regulatory Framework
Topic - बौद्धिक संपदा हक्क
(Intellectual Property Rights )
*प्रास्ताविक:-
बौद्धिक संपदा हक्क ही एक कायदेशीर संकल्पना असून ती मालकास कार्याची निर्मिती करणाच्या व्यक्तीस त्याच्या
नवनिर्मित कार्याचे हक्क प्राप्त करून देते.असे हक्क व्यवसायाच्या पद्धती अथवा प्रथेनुसार साहित्य, संगीत शोध लावण्याच्या क्षेत्रात प्रदान (Granted)केल्या जातात म्हणजेच कार्याची निर्मिती करण्यास किंवा नवीन शोध करणान्यास त्याच्या संमतीशिवाय अपहार अगर त्याचा वापर करण्याच्या विरुद्ध बौद्धिक संपदा हक्कानुसार हक्क प्राप्त करून देतो.
प्रत्येक देशाने बौद्धिक संपदा कायदा केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्व बौद्धिक संपदा संघटना (World.
Intellectual Property organization " WIPO ) त्यांचे कार्य संचलित करते.
*संघटनेची कार्ये अथवा कार्यक्षमता:-
*औद्योगिक आराखडा
*अनुचित स्पर्धापासून संरक्षण
*साहित्यिक, कलात्मक व शास्त्रीय कार्य
*मानवी प्रयत्नांच्या सर्व क्षेत्रात शोध घेणे
*व्यापार चिन्ह, सेवेचे चिन्ह व्यापारी नाव व हुद्दा
*औद्योगिक शास्त्रीय साहित्यिक कलात्मक क्षेत्रात बौद्धिक कार्यामुळे निर्माण झालेले इतर हक्क,
*बौद्धिक संपदा हक्काची प्रमुख वैशिष्ट्ये:-
१. याची निर्मिती मनाने अथवा बौद्धिक म्हणजेच बुद्धीने (Intellect) केली जाते.
२. हे हक्क अस्पर्शनीय मालमत्ता म्हणून मानण्यात येतात.
३. हे हक्क कायदेशीर असून त्यांची अंमलबजावणी करता येते.
४. पेटंट आणि प्रतिलिपी अधिकार हेच त्याचे नमुने (Form) आहेत.
५. हे अधिकार मालकास किंवा निर्मिती करणान्यास फायदा करून देतात.
६.राज्य व परराष्ट्रीय व्यवसाय अथवा व्यापाराचे व्यवहारामध्ये हे हक्क मुख्य आधार असून ते सर्व जगात मान्यताप्राप्त आहेत.
७. कायद्याने या कायदेमंडळाने संमत केल्यास या हक्कांना कायदेशीर मान्यता प्राप्त होते.
*भारतामध्ये व्यक्तिशः केलेल्या प्रयत्नामुळे मिळालेल्या प्रतिलिपी हक्कास कायद्याने किंवा संविधानप्राप्त नियमानुसार संरक्षण (Protection) दिले जाते. भारत हा जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय संघटनेचा सभासद आहे त्यामुळे भारताने बौद्धिक संपदा हक्काच्या संरक्षणासाठी अनेक कायदे संमत केले आहेत.
उदाहरण:
१. स्वामित्व हक्क अथवा एकस्व हक्क (The Patents Act, 2006 (Armended)
२. व्यापार चिन्ह कायदा १९९९ (व्यापार चिन्ह) ( Trade Mark Act, 1999 )
३. प्रतिलिपी अधिकार ( दुरुस्ती कायदा २०१२ ( The Copy Right Amendment Act, 2012)
४. औद्योगिक आराखडा कायदा २००० ( Industrial Designs Act 2000 )
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.