(Mokashi P A)
B.A.II SEMESTER - 4
SOCIOLOGY PAPER - 6
आरोग्याचे समाजशास्त्र
प्रकरण - 3
जीवनशैली आणि आरोग्य
(क) आरोग्याच्या समस्येवरील उपाययोजना
(Remedies on Health Problems)
याचबरोबर आरोग्याच्या समस्येवरील आणखी काही महत्त्वाच्या योजना, धोरण पुढीलप्रमाणे:-
१. १९८३ सालचे आरोग्यविषयक धोरण :
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने इ. स. १९८३ साली जे आरोग्यविषयक धोरण स्वीकारले होते त्यामध्ये आरोग्याच्या समस्येवरील उपायांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश केला होता.
मुलांना होणाऱ्या धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प, गोवर, पोलिओ, क्षयरोग अशा सर्वसामान्य रोगांच्या प्रतिबंध किंवा प्रतिकारासाठी लसी
टोचणे किंवा तोंडावाटे लस देणे हा या आरोग्य धोरणाचा एक अविभाज्य भाग होता.
याशिवाय मलेरिया, कुष्ठरोग, क्षयरोग, गुप्तरोग यांच्या निर्मूलनासाठी
• सर्व प्रकारच्या रोगांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबविणे,
• राष्ट्रीय कुटुंब नियोजन म्हणजेच कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
• स्वच्छ व
शुद्ध पाणीपुरवठ्याची सोय
करणे,
• सार्वजनिक स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करणे हे आरोग्य रक्षणासाठी आवश्यक आहे.
२. राष्ट्रीय आरोग्य संवर्धन व अन्य कार्यक्रम :
यामध्ये पुढील कार्यक्रमांचा समावेश होतो -
• राष्ट्रीय स्वच्छ पाणीपुरवठा व परिसर स्वच्छता कार्यक्रम
• राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम
*राष्ट्रीय कुटुंब कल्याण व नियोजन कार्यक्रम यामध्ये 'छोटे कुटुंब सुखी कुटुंब' सारखी घोषणा महत्त्वाची ठरली.
• राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम
*राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम
*राष्ट्रीय मधुमेह नियंत्रण कार्यक्रम
*राष्ट्रीय आहार नियंत्रण कार्यक्रम इत्यादी.
त्याचप्रमाणे आरोग्य संवर्धनासाठी अर्थपुरवठा करण्याची जबाबदारी प्रामुख्याने केंद्र व राज्य सरकारने घेतली.
आरोग्य व वैद्यकीय विमा
३. आरोग्य किंवा वैद्यकीय विमा :
आधुनिकीकरण व जागतिकीकरणामुळे • मानवी जीवन खूपच गतिमान झाले आहे. पण दुसरीकडे मात्र मानवी आरोग्याला धोके निर्माण करणाऱ्या अनेक घटकांची निर्मिती झाली. मानवी आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या घटकांसाठी एक खबरदारी म्हणून आरोग्य किंवा वैद्यकीय विमा योजना निर्माण केली.
• अपघातामुळे अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास अपघाती विमा.
*प्रदूषणामुळे श्वसन रोग, फुप्फुसाचे रोग, कानाचे रोग, कर्करोग यामुळे आरोग्य बिघडल्यास विमा. नैसर्गिक आपत्ती विमा यामध्ये भूकंप, महापूर, त्सुनामी लाटा, चक्रीवादळे, भूमिस्खलन वगैरेंमुळे होणारे नुकसान.
• चंगळवादाचा अतिरेक काही वेळा होतो. हॉटेलचे जेवण, मद्यपान अशा सततच्या पाट्र्यांमुळे होणारा उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार वगैरे.
• कामाचा व्याप, कामाचे दडपण यातून ताणतणावग्रस्त स्थिती निर्माण होते. थोडक्यात, अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे आरोग्याला धोका पोहोचतो म्हणून त्यांच्यासाठी आरोग्य विमा धोरण अस्तित्वात आले. त्याचबरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC - Life Insuranec
Corporation) हे एकमेव महामंडळ प्रथम अस्तित्वात
आले. त्यानंतर अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या. उदा. बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी, आय. सी. आय. सी. आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स, एच. डी. एफ. सी. स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्स, द न्यू इंडिया अॅशुरन्स अशा अनेक आरोग्य विमा योजना अस्तित्वात आल्या.
३. पुनर्वसनात्मक उपाय :
पुनर्वसन उपचार व्यवस्था ही रोग पूर्णपणे बरा झाल्यानंतरची असते. रोग्याचा रोग बरा झाला तरी रोगी पूर्णपणे बरा झालेला नसतो. तो अशक्त झालेला असतो. रोगामुळे व्यंग आलेले असते. अपघातात हात-पाय मोडलेले असतात, दृष्टी गेलेली असते. केस गळतात, कातडीवरील सालटी निघ
असतात, रक्त साकळलेले असते. असे अनेक दोष व उणिवा राहून गेलेल्या असतात. काही रोग्यांना आर्थिकदृष्ट्या न
परवडणारे औषधोपचार व इतर उपाय चालू ठेवावे लागतात.
रोगी सगळ्याच बाबतीत कार्यक्षम कसा होईल या दृष्टीने त्याचे पुनर्वसन करणे आवश्यक असते. धरणाखाली गेलेले एखादे गाव पुन्हा वसवण्यासाठी जागा दिली तरी त्यांचे जीवन पूर्ववत होत नसते. त्यासाठी घरादाराची व्यवस्था, शाळा, मंदिर, गटारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट इत्यादी सुविधा करून दिल्या तर त्यांचे पुनर्वसन झाले असे समजले जाते. तसेच रोग्याचेसुद्धा असते. त्यांचे सर्व काही गेलेले असते. म्हणजेच शारीरिक ताकद, मनोबल, शरीराचा एखादा अवयव आणि झालेली आर्थिक हानी हे सगळे त्याला पुन्हा एकदा हवे असते आणि म्हणून रोग्याचे पुनर्वसन कोणत्या उपचार पद्धतीने वा साधनाने केले जाऊ शकते हे त्या रोग्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते. प्रथम त्याला हवी
असतात साधने, मानसिक बळ नि आर्थिक साहाय्य. एवढेच नव्हे तर त्यांचा विश्वाससुद्धा वाढविण्याची गरज असते.
१. साधने :
काही रोग्यांना शारीरिक अपंगत्व आलेले असते. त्यांचे अपंगत्व घालविण्यासाठी त्यांना विविध साधने व यंत्राची गरज असते. अपघातात हात-पाय
गेलेले असतात अशांना यांत्रिक हात, पाय उपलब्ध करून देणे. एखाद्याला बहिरेपण आले असल्यास श्रवणयंत्र देणे.
२. व्यायाम :
रोग्याला त्याच्या पुनर्वसनासाठी नुसती यंत्रे वा साधने देऊन उपयोग नसतो तर त्या साधनाद्वारे कशा प्रकारच्या हालचाली करायच्या हे शिकवावे लागते. तसेच काही रोगींना दीर्घकाळ बिछान्यावर राहिल्यामुळे बरे झाल्यानंतर स्थूलपणा आलेला असतो त्यांच्याकडून विशिष्ट व्यायाम करून घ्यावा लागत असतो. अवयवांच्या पूर्ववत हालचालींसाठी वेगवेगळे शारीरिक व्यायाम प्रकार शिकवावे लागतात.
३. मनोबल :
गेलेली शक्ती व
अवयव परत मिळाल्याचा आनंद असला तरी पूर्ववत हालचाल व कामे करता येतील की नाही या शंकेने त्याचे मन अस्वस्थ होत असते. काही वेळा अशीही मानसिकता होते की, अशा अवस्थेत लोक आपणास दूर ठेवतील. अशा प्रसंगी या रोग्यांना रोगमुक्त झाल्यानंतर काम करण्याची व जीवन जगण्याची हिम्मत दिली तर तो रोगी समाजात पुन्हा एकदा ताठ मानेने उभा राहू शकतो. डॉक्टर त्याला धीर देतात परंतु त्याचबरोबर रोग्याच्या जीवनात पोकळी निर्माण झाली. तर आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा त्याला मानसिक आधार देऊन जीवनात त्याला उभे करण्याची पराकाष्ठा करणे आवश्यक असते. असे केल्याने त्याचे जीवनमान उंचावते.
४. आर्थिक साहाय्य :
रोग्याला रोगमुक्त झाल्यानंतर बऱ्याचदा आयुष्यात पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक मदतीचीसुद्धा आवश्यकता असते. काही वेळा आर्थिक मदत मिळाली नाही तर गरीब असणाऱ्या व्यक्तीला भीक मागावी लागते. कारण अगोदरच त्याच्या उपचारासाठी सगळी आर्थिक वाताहत झालेली असते. घर, जमीन, बैलजोडी सगळे काही विकलेले असते. कर्जही काढलेले असते. तो बरा झाल्यानंतर त्याला आर्थिक मदतीची गरज असते. शासकीय मदत मिळते; परंतु ती अत्यंत कमी असते. तात्पर्य, रुग्णाला पुन्हा पूर्ववत जीवन जगू देण्यासाठी आर्थिक मदत नक्कीच मिळाली पाहिजे.
५. अंधविश्वास निवारण :
रोग बरा झाल्यानंतर खूपच शारीरिक नि मानसिक थकवा आलेला असतो. हा थकवा घालविण्यासाठी औषधोपचार चालू ठेवावा लागतो. यात रोग निवारण्यासाठी औषधाऐवजी रोग्याला ताकद निर्माण व्हावी म्हणून शक्तिवर्धक औषधे दिली जातात. ही औषधे सतत
काही काळपर्यंत घेतली तर रोगी ताठ मानेने पुन्हा समाजात वावरू शकतो. परंतु ही अशी
औषधे न देता दुसरेच धागेदोरे उतारा म्हणून कमरदोर वा हातापायाच्या मनगटात बांधले जातात. उत्साहवर्धक औषध देण्याचा प्रतिकार सुरू होतो. जुनी माणसे अशी
औषधे घेऊ देत नाहीत. घरातील वृद्ध मंडळीसुद्धा 'आमच्या काळात असे नव्हतेच' असे म्हणून रोग्याची अवहेलना करीत असतात. त्यातल्या त्यात रोगी स्त्री असेल नि ती सून असेल तर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते... वास्तविक अशा वेळी रोग्याच्या ठिकाणी मानसिक विश्वास निर्माण करायला पाहिजे. औषधोपचार करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगायला पाहिजे. येथे रोगी नि त्याचे कुटुंबीय यांच्याच मनातील अंधविश्वास निवारण करण्याचे खरेखुरे काम असते.
आरोग्याची समस्या दूर
करण्यासाठी वरीलप्रमाणे प्रामुख्याने प्रतिबंधात्मक, संवर्धनात्मक व पुनर्वसनात्मक अशा तीन उपायांचा वापर केल्यास रोगमुक्त जीवन व्यक्तीला मिळू शकेल.
जीवनाचे खरे सार, सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजेच आरोग्य होय. जीवनाचे खरे सार्थक, सुख प्राप्ती व दुःखाचे निवारण हे मानवाच्या आरोग्यमय जीवनात असते. एक म्हण आहे
की, 'शरीर धड तर
मन धड' किंवा 'सिर सलामत तो पगडी पचास' इत्यादी. आरोग्य एकीकडे तर संसारातील हजारो सुखे एका बाजूला. विद्या, बुद्धी, धन, वैभव, कीर्ती, सन्मान इत्यादी सर्व प्रकारची सुखसाधने ज्याला प्राप्त झाली आहेत तो जर पूर्ण निरोगी नसेल तर त्याला ह्या साधनांचा काय उपयोग ? निरोगी भिकारी हा रोगी कोट्यधीशापेक्षा अधिक सुखी असतो. म्हणून माणसाने सर्व गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे. कारण शरीराचा नाश झाला तर सर्व गोष्टींचा नाश होतो. माणसाने कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असले तरी प्रथमतः शरीराविषयी, निसर्ग नियमाविषयी व आरोग्य रक्षणाविषयी जाणून घ्यावे व त्यानुसार आचरण करावे हाच सुखी व समृद्ध जीवनाचा सार आहे.
आजच्या धकाधकीच्या घड्याळाच्या काट्यावर पळणाऱ्या गतिमान जीवनात, आज बदलत्या सामाजिक, औद्योगिक, आर्थिक परिस्थितीमुळे आपणा सर्वांच्या आरोग्याला रोज नवनवीन धोके पोहोचवतो आहोत. आज गतिमान इंटरनेट व फास्ट) फूडस्च्या युगात आरोग्य सांभाळणे कठीण होऊन बसले आहे.
हल्ली झाडूच्या ठिकाणी व्हॅक्युम क्लीनर, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, भांडी धुण्यासाठी डीश वॉशर, चपात्यांचे मशीन, दळणाचे मशीन, मिक्सर, ग्राईंडर, ज्यूसर, तांब्या-पितळेच्या भांड्याऐवजी स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक भांडी, फ्रीज त्यामुळे शारीरिक कष्ट कमी झाले. उभे राहून स्वयंपाक. त्यामुळे स्वयंपाक करतानाची ऊठबस कमी झाली. प्रात:विधीसाठी कमोड आले म्हणजे तिथेही गुडघ्याचे काम कमीच झाले. व्यायाम कसा व्हायचा हाच प्रश्न.
गावात शेतीकडे पाहिल्यावर पेरणीसाठी ट्रॅक्टर, कापणीसाठी मशीन, कुंभाराकडे इलेक्ट्रिक चाक, इलेक्ट्रिक ओव्हन. त्यामुळे शारीरिक श्रम कमी होत आहेत. संगणक व इंटरनेटमुळे बुद्धीला चालना कमी मिळत आहे. बटन क्लीक केले की सगळी उत्तरे मिळतात. बाहेर गावातच जाऊन यायचे म्हटले की गाडी, टू व्हीलर किंवा फोर व्हिलर. चालण्याचे कष्टच घेतले जात नाहीत. आज सर्वात मोठी अडचण व्ही., केबल नेटवर्क, इंटरनेट, फेसबुक अशा मनोरंजनाच्या अनेकविध साईटस् यामुळे यात वेळ कसा निघून जातो कळतच नाही. सोशल मीडिया, सोशल साईटस्च व्यसन म्हणजे एक संसर्गजन्य आजारच आहे. ज्यात शरीर, मन गुरफटत जाते. कुटुंब, समाज, कर्तव्य, वेळ, जबाबदारी यांचे भानच राहात नाही.
'यावरून एवढेच निष्कर्ष काढायचे की, या विज्ञानाच्या युगाने आपले शारीरिक श्रम कमी होऊन मानसिक ताण वाढत आहेत. भारतीय संस्कृतीशी व निसर्गाशी आपला संबंध, नाते तुटत चालले आहे. दुर्मीळ होत चालले आहे व आधुनिकीकरणाच्या अंधानुकरणामुळे आपले शरीर स्वास्थ्य ढासळून वेगवेगळ्या स्वरूपाचे सायको सोमॅटिक म्हणजे शरीर मानसजन्य आजार नको असताना भेट स्वरूपात मिळत आहेत.
जागतिकीकरणामुळे कोणताही आजार, रोग काही तासातच आज जगभर झपाट्याने स्वाईन फ्लू, पसरू शकतो व
सर्वांच्या आरोग्याला धोका पोहोचवू शकतो. उदा. ईबोला, कोरोना इ. म्हणून सक्षम, व्याधीमुक्त, निरोगी शरीर राहणे ही काळाची गरज आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग तसेच साथीचे रोग - चिकनगुनीया, डेंग्यू, गोवर, कावीळ अशा विविध प्रकारच्या रोगांना आपले शरीर बळी पडू नये म्हणून शरीर स्वास्थ्य टिकविणे, आरोग्यसंपन्न शरीर राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी रोज व्यायाम, योगसाधना, समतोल आहार, पुरेशी विश्रांती, निद्रा व संयम यांचे पालन केल्यास आरोग्यसंपन्न जीवन प्राप्त होऊ शकते.
जनतेचा आरोग्य स्तर वाढविण्यासाठी प्राथमिक सेवांचा स्तर जास्त महत्त्वाचा आहे आणि ती सरकारची जबाबदारी आहे. अधिक लोक या स्तरावर उपचार व प्रतिबंधक सेवा घेत असतील तर वेळ, पैसा, शरीर हानी वाचून देशाचे आरोग्य कमी खर्चात अधिक वाढू शकते. आपल्याकडे कुपोषण, मधुमेह, अति रक्तदाब असे दीर्घ मुदतीचे व क्षयरोगसारखे संसर्गात्मक आजार जास्त आहेत. तिथे प्राथमिक स्तरावर अधिक काम व्हायला पाहिजे. या संदर्भात 'वेलनेस क्लिनिक'ची
चांगली योजना आहे.
जगभर राष्ट्रीय आरोग्य योजना सामान्यपणे सामाजिक - सहभागी वर्गणी तत्त्वावर चालतात. त्यामुळे त्या प्रगतिशील, लवचीक आणि टिकाऊ झाल्या. भारतात आरोग्यावरचा सरकारी खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त एक टक्का तर जनतेचा खाजगी खर्च तीन टक्के आहे. त्यामुळे आरोग्य खर्चासाठी अधिक गुंतवणूक करणे तर आवश्यक आहेच शिवाय लोकांना त्यामध्ये आणि विशेषत: आरोग्य विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेणे आवश्यक आहे. आरोग्याची चळवळ व्यक्तीला व देशाला तारणहार ठरणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
निसर्गाने मानवाला १२० वर्षे आयुष्य दिले आहे व हे आरोग्य देताना कुठलाही मोबदला त्याने घेतला नाही. त्यामुळे आपल्याला फुकट मिळालेले लाखमोलाचे शरीर (आयुष्य) याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून निसर्ग व
शरीर या दोन्हीचे महत्त्व जाणले पाहिजे. अन्यथा आपल्याला अनारोग्य व अल्पायुष्य लाभते. डार्विनचा सिद्धांत हेच शिकवितो
"Survival
of the Fittest"
जो समर्थ असतो तोच टिकतो. इथे समर्थ याचा अर्थ जो आरोग्यसंपन्न असतो तो. In society who can survive better who is bodily, mindly,
socially and economically strong, so be healthy is the key message. आपल्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली आरोग्यच आहे.
("Investment
in Health to Built a Better future")
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.