Friday, 28 May 2021

कौटुंबिक हिंसाचार

 

B.A.II SEMESTER - 4 PAPER - 5

 प्रकरण 2 कौटुंबिक हिंसाचार

हुंडाप्रथा आणि हुंडाबळी या समस्येवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना :

 

) सुयोग्य स्थळाची निवड :

           विवाह जमविताना वरपक्ष अत्यंत लोभीवृत्तीने व बाजारू पद्धतीने हुंड्यासाठी वाटाघाटी करीत असेल तर वधूपक्षाने मुलगी देण्याचे टाळावे. सुयोग्य , चांगले स्थळ म्हणजे केवळ श्रीमंत स्थळ असे न मानता कमी उत्पन्न असलेल्या पण सज्जन, सालस, कष्टाळू व होतकरू तरुणास वर म्हणून पसंती द्यावी. वधूचे शिक्षण, गुणवत्ता इत्यादींकडे दुर्लक्ष करून केवळ हुंड्यासाठी अडून बसणाऱ्या तरुणास स्वतः वधूने व वधूपित्याने नकार द्यावा. किंबहुना हुंडा न मागणाऱ्याशीच विवाह करेन असा दृढनिश्चय करून तो अंमलात आणावा.

) जाणीव जागृती :

            अलीकडे स्वतः कष्ट न करता दुसऱ्यांच्या जीवावर ऐषाराम करण्याची चंगळवादी वृत्ती तरुणांमध्ये वाढत चाललेली आहे. म्हणूनच ते अधिकाधिक हुंडा मागतात. म्हणून स्वकष्टावर जगावे व हौसमौज करावी, तसेच हुंडा घेणे हा केवळ कायदेशीरच नव्हे तर नैतिक व मानवताविरोधी गुन्हा आहे अशी जाणिव जागृती तरुणांमध्ये निर्माण केली पाहिजे. यासंदर्भात शिक्षणसंस्था, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पोलिसयंत्रणा, सरकार व प्रसारमाध्यमे इत्यादींनी संयुक्तपणे समाजात हुंडाविरोधी मनोवृत्ती निर्माण करण्याची चळवळ उभारली पाहिजे.

) सामाजिक दबाव:

         हुंडा मागणाऱ्या व हुंडा घेऊन विवाह करणाऱ्या तरुणावर व त्याच्या कुटुंबावर समाजाने बहिष्कार टाकावा, त्यांचा जाहीर निषेध करावा. अशा विवाहात सहभागी होऊ नये. शिवाय हुंडा घेणे हे अप्रतिष्ठेचे, दुर्बलतेचे व लोभीपणाचे लक्षण आहे अशा विचारांचा प्रसार व प्रचार कराव. त्यामुळे हुंडाविरोधी वातावरण निर्मितीस चालना मिळेल. हुंडा न घेता विवाह करणाऱ्या तरुणांचा समाजाने जाहीर सत्कार करावा. त्यामुळे इतरांना तसे करण्याची प्रेरणा मिळेल.

) आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार :

            आंतरजातीय विवाहामुळे वधूवर निवडीचे क्षेत्र विस्तारून हुंड्याशिवाय अनुरूप जोडीदार मिळण्याची शक्यता वाढते. म्हणून वधूपक्षाने जातीपातीचा विचार करता हुंड्याशिवाय विवाह करण्यास तयार असणाऱ्या परजातीतील गुणवान कर्तृत्ववान तरुणास पसंती द्यावी. आंतरजातीयविवाह हे बहुधा प्रेमविवाह असतात ते हुंड्याशिवाय होतात असा अनुभव आहे. म्हणून अशा विवाहास पालकांनी संमती द्यावी. जर पालकांची संमती मिळत नसेल तर अशा विवाहास सेवाभावी संस्था व पोलिसयंत्रणा यांनी पाठिंबा व मदत द्यावी.

) आर्थिक स्वावलंबन:

              आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून राहील अशा मुलीपेक्षा अर्थार्जन करणाऱ्या नोकरीव्यवसाय) मुलींशी हुंड्याशिवाय विवाह करण्यास आजकाल प्राधान्य मिळू लागले आहे. म्हणून मुलींना शिकवून नोकरी मिळवून देऊन म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून मगच त्यांचा विवाह करावा. अशा मुलीस विवाहानंतर पतीने सोडून देण्याचा धोका फारसा नसतो आणि जरी दिले तरी अशी मुलगी पतीच्या सासरच्या आधाराशिवाय समर्थपणे जगू शकते.

) स्त्रीपुरुष समानता :

               स्त्रियांच्या इतर समस्यांप्रमाणेच हुंड्याची समस्या देखील पुरुष श्रेष्ठ स्त्री कनिष्ठ या लिंगभेदावर आधारलेली आहे. म्हणून हुंड्याची समस्या सोडविण्यासाठी वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रात स्त्रीपुरुष समानतेचे तत्त्व अंमलात आले पाहिजे.

) छळाचा धैर्याने सामना करणे :

          हुंड्यापायी वधूचा छळ सुरू झाल्यास त्या वधूने तिच्या मातापित्यांनी घाबरून, गोंधळून जाता या संकटाचा धैर्याने सामना करावा. वर त्याच्या कुटुंबियांना छळ बंद करावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल याची समज द्यावी. गरज पडल्यास पोलीसात रीतसर तक्रार नोंदवावी. पोलीस कारवाई करण्यास कुचराई करीत असतील तर स्थानिक नेते, सेवाभावी संघटना, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींची मदत घ्यावी. खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेत अडकता वेळ पडल्यास पतीस घटस्फोट देऊन दुसऱ्या सज्जन पुरुषाशी पुनर्विवाह करण्याची तयारी ठेवावी. म्हणजे हुंडाबळी होण्याचा अनर्थ टळेल.

 

अभ्यासक्रमपञिका : ६

 बी. ए. भाग:२

सञ: ४

अभ्यासक्रमपञिका : ६

विषय प्राध्यापक: प्रा बी के पाटील

प्रश्न:योग्य पर्याय निवडा.

१)   राधामाईच्या प्रोजेक्ट साईटवर शशाला भेटायला कोण आले?

अ)   गोपीचंद

ब)    पुषप्या

क)   दासगुप्ता

ड)    कोया सेठ

२)   "हे असं......... पर्मनंट राहण्यापेक्षा तिकडं पुण्यात टेपररी राहणं काय वाईट हाये" गोपीचंद म्हणाला?

अ)   कामापुरतं

ब)    तेवढ्यापुरतं

क)    नामवालं

ड)    तात्पुरतं

३)   "मी या प्लॅन्टचा इंजिनिअर कमी आणि......... जास्त झालोय आजकाल" असं शशा म्हणाला.

अ)   वर्कर

ब)    फिटर

क)    टुरिस्ट गाईड

ड)    पाहुणा

४)   पुषप्याला इंडिया फोर्जमध्ये पर्मनंट नोकरी मिळाली. कारण मुलाखत घेणारा कंपनीचा टेक्निकल एक्सपर्ट..........

अ)   पुषप्याचा पाहुणाच निघाला

ब)    पुर्वी श्री लाॅजवर राहत असे

क)    पूर्वी पुषप्याचा सहकारी होता

ड)    जुना मिञ होता

५)   राधामाईचे चेअरमनसाहेब स्वत: मुंबईला जाऊन काय  घेऊन आले होते?

अ)   नवा एक्सपर्ट फिटर

ब)    नवे किलन

क)   बाथरुमसाठीनळ,शाॅवर

ड)    विलायती दारुचा सेट

६)   राधामाईच्या चेअरमनने बाथरुमसाठी नळ, शाॅवर आणले त्याचे बिल किती होते?

अ)   अठरा हजार

ब)    सदतीस हजार

क)    सेहेचाळीस हजार

ड)    बाहत्तर हजार

७)   शशाच्या रुममधल्या सगळ्या अडगळीच्या वस्तू त्याला काय म्हणत आहेत असं शशाला वाटू लागलं?

अ)   बघतोस काय हो बाहर.....

ब)    तु बी हिथं आन आमी बी हिथंच......

क)   बघताय काय सामील व्हा.....

ड)   बघतोस काय मुजरा कर ......

८)   " बघताय काय सामील व्हा " असं शशाला कोण म्हणतय असं त्याला वाटलं ?

अ)   पाटगावातील गावकरी

ब)    साईटचे रिगर

क)    रुममधल्या वस्तू

ड)    बाॅयलर व किलन

९)   शशाच्या आईचा काळजाचा ठोका का चुकला ?

अ)   शशाने आत्महत्या प्रयत्न केल्याचे समजले म्हणून

ब)    शशा परस्पर लग्न करुन घरी आला म्हणून

क)    शशा अवचित व अवेळी घरी आला म्हणून

ड)    शशा खड्यांत पडल्याचे समजले म्हणून

१०)   " काम करनेवाले आदमीने जादा सोचना नहीं चाहिए, जादा....... भी नहीं चाहिए " असं जय म्हणाला ?

अ)   बोलना

ब)    कमाना

क)    प्यार करना

ड)    सोना

उत्तरे............

१)    अ) गोपीचंद

२)    क) नामवाला

३)    क) टुरिस्ट गाईड

४)    ब) पूर्वी श्री लाॅजवर राहत असे

५)    क) बाथरुमसाठी नळ, शाॅवर

६)    ड) बाहत्तर हजार

७)    क) बघताय काय सामील व्हा,..

८)     क) रुममधल्या वस्तू

९)    क) शशा अवचित व अवेळी घरी आला म्हणून

१०)   अ) बोलना

प्रमाणलेखनाचे नियम

 बी.ए.भाग: ३

अभ्यासक्रमपञिका :१५

सञ : ६

मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी

 विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

विभाग : ३

प्रमाणलेखनाचे नियम

१) नियम१ स्पष्टोच्यारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा उदा.-गुलकंद,चिंच,तंटा,आंबा

संस्कृत नसलेले मराठी शब्द शुर्षबिंदू देऊनच लिहावेत 

उदा.दंगा, तांबे, खंत ,संप

अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधी कधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य.

उदा.'वेदांत'(वेदांमध्ये) आणि'वेदान्त'(तत्वज्ञान),देहांत(शरीरांत)आणि'देहांत'(मृत्यू)

    काही शब्दामधील अनुस्वारांचा उच्यार अस्पष्ट असतो. कधी कधी तो उच्यारला जात नाही.

उदा. हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही.

   अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. ते हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी काही असे लिहावे.

नियम २ य,र,ल,व,श,ष,स, ह यांच्या पूर्वी येणार्‍या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा

उदा. सिंह, संयम, मांस

उच्यारानुसार लेखन करावयाचे म्हणून सिंह ऐवजी सिंव्ह, संयम ऐवजी संय्यम. मांस ऐवजी मांव्स, संहार ऐवजी संव्हार असे लिहिण्याची गरज नाही.

नियम ३ नामाच्या व सर्वनामाच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा

उदा, लोकांना, मुलांना, तुम्हास, लोकांसमोर, घरांपुढे. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रुप होते. त्याला'सामान्यरुप' असे म्हणतात

उदा.पञ या शब्दाला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लावल्यास पञांने असे रुप होते, यातील पञा हे सामान्य रुप होय, 

   या नियमानुसार नामाच्या व सर्वनामाच्या अनेचवचनातील सामान्यरुपांवर विभक्तिप्रत्यय लावतांना किंवा शब्दयोगी अव्यय लावतानाअनुस्वार द्यावयाचा आहे

उदा.आदेशांत, विभागांकडून, सदस्यांच्या, पुस्तकांवर, या सारख्या शब्दांच्या बाबतीत अनुस्वार देणे आवश्याक आहे.

आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला  पाहिजे

उदा. राज्यपालांचे अभिभाषण, मुख्यमंञ्यांचा दौरा, तुम्हाला, आपणांस

नियम ४

वरिल नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी व्युत्पत्तीने सिद्द होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.

    या नियमानुसार स्पष्ट किंवा अस्पष्ट उच्यार न होणारा कोणताही अनुस्वार शब्दांवर द्यावयाचा नाही

उदा. घरें, रुपें, नामें करणें बोलणें

मौखिक इतिहास

 मौखिक इतिहास

बी. ए.३ पेपर क्र.१६ घटक २ ब.

मौखिक इतिहास 

इतिहास लेखन करत असताना विविध साधनांचा वापर करावा लागतो. जसे की प्राथमिक साधने, दुय्यम साधने, लिखित साधने, अलिखित साधने यांच्याबरोबरच आपणास मौखिक इतिहासाचा हे आधार इतिहासलेखना करीता घ्यावा लागतो.

मौखिक इतिहास म्हणजे काय?

   'जेव्हा ऐतिहासिक ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहचवण्याचे कार्य संभाषणाच्या माध्यमातून होते तेव्हा त्याला मौखिक इतिहास असे म्हणतात'. मुख्य म्हणजे तोंडावाटे प्रकट झालेला इतिहास म्हणजे मौखिक इतिहास होय.

पॉल थॉमसन याने ओरल हिस्ट्री  सोसायटीची स्थापना केली.श्रॉफ यांनी १९८२ मध्ये National Archivel of Oral History  ची स्थापना केली.

  मौखिक इतिहासात खालील बाबी चा समावेश होतो.

१) पोवाडे २) लोककथा ३) उखाणे ४)  म्हणी ५) वाक्प्रचार ६) गीते ७) मुलाखती इत्यादी.

  १) पोवाडे :- वीरांच्या पराक्रमाचे विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे व एखाद्याच्या सामर्थ्याची गुण, कौशल्य इत्यादींच्या वाढवण्यासाठी प्रशस्ती किंवा स्तुति स्तोत्र म्हणजे पोवाडा  होय. साधारणतः दहाव्या शतकापासून पोवाड्यांची सुरुवात झाली याची तीन कालखंड पडतात. अ) शिवकालीन पोवाडे ब) पेशवेकालीन पोवाडे क) ब्रिटिश कालीन पोवाडे 

इतिहास लेखनात पोवाड्यांचा प्राथमिक साधने म्हणून वापर केला जात नसला तरी प्राथमिक साधन पर्यंत जाण्याचा मार्ग म्हणून पोवाडे कडे पाहिले जाते.

२) लोककथा 

          एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने चालत आलेल्या गोष्टींना लोककथा असे म्हणतात. डॉ. कृष्णदेव उपाध्याय यांनी लोककथांचे खालील प्रकार सांगितले आहेत.

१. प्रेम कथा. प्रेमिक, भाऊ बहिणी वरील कथा

२.  नीतिकथा. महाभारत रामायण जैन कथा इत्यादी

३.  व्रतकथा.  विविध धर्मांच्या साठी या कथा आहेत.

४.  मनोरंजक कथा

५.  दंत कथा. परंपरेने चालत आलेल्या आख्यायिका.

६. पौराणिक कथा.  नलदमयंती, हरिश्चंद्र इत्यादी.

३) उखाणे:- सेक्सी कूटप्रश्न, ब्रह्मज्ञान, प्रहेलिका हे  संस्कृत प्रतिशब्द आहेत उखाणा जरी  लेखनात प्रतीकात्मक असला तरी इतिहासलेखनात एखादी घटना समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो.

४). म्हणी:-  म्हणी, उखाणे प्रमाणेच मौखिक लोकसाहित्यात असली तरी पण छोटेखानी गद्य ऐतिहासिक वांग्मयीन कृती असते मार्मिकपणे शक्य तितक्या मोजक्या शब्दात सत्य प्रकट करण्याचे वचन म्हणजे म्हण होय.

५) वाक्प्रचार:- गेले का म्हणीप्रमाणे स्वयंपूर्ण नसतो जगातल्या कोणत्याही भाषेत एकेरी शब्द बरोबर ज्याचा अर्थ सहजगत्या न लागता लागतो असा शब्द समूह आणि कधीकधी वाक्य म्हणजे वाक्प्रचार होय. उदाहरणार्थ घोडामैदान जवळ आहे, अनगोनदी कारभार, दोर कापून टाकले इत्यादी.

६) गीते:- गीतांचे ही विविध प्रकार आहेत. अ. विधी गीते-- धर्मविधी आचरण प्रसंगी गायले जाणारे गीते. ब. संस्कार गीते-- पुनर्जनन, नामकरण, जावळ काढणे, उपनयन, विवाह, ऋतू, डोहाळा इत्यादी प्रसंगी गायली जाणारी गीते क. उपासना गीते-- विविध व्रतवैकल्ये उपासने प्रसंगी गायले जाणारे गीते. ड. सणांची गीते-- नागपंचमी संक्रांत मंगळागौरी इत्यादी. इ. भक्ती / नृत्य गीते . फ. श्रमगीते-- दळण प्रसंगी गायिली जाणारी जात्यावरची गीते.

७) मुलाखत. वरील सर्व घटकांची माहिती गोळा करण्याचा मार्ग म्हणजे मुलाखत तंत्र होय मौखिक इतिहासात मुलाखतीला महत्त्वाचे स्थान आहे ऐतिहासिक घटना त्याशी संबंधित ज्याने पाहिलेली, ऐकलेली अशी घटना लिहून घेणे म्हणजे मुलाखत घेणे होय. या पद्धतीचे अनेक फायदे आहेत मुलाखतीचा उपयोग प्राथमिक संदर्भ साधनांमधून केला जातो. उद्यानात स्वातंत्र्यसंग्रामातील साक्षीदार असलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची मुलाखत.

मौखिक इतिहासाचे फायदे.   

१). राजकीय इतिहासाला अज्ञात राहिलेल्या सामाजिक आर्थिक घडामोडींची माहिती मिळते.

२). राजकीय इतिहासातील विविध व्यक्ती आणि संस्था यांच्या भूमिका समजून घेण्यास मदत होते.

३).  तत्कालीन समाज जीवनाच्या संस्कृतीक प्रेरणा व कामगिरी जाणून घेण्यास मदत होते.

४). इतिहासाच्या निर्मितीमध्ये नायक वगळता इतर व्यक्तींची कामगिरी समजण्यास मदत होते.

मौखिक इतिहासाचे तोटे...

१).    पूर्णतः  स्मरणावर आधारित असल्याने चुकीची माहिती मिळू शकते.

२). वस्तुनिष्ठ तिचा अभाव जर एखाद्या व्यक्तीविषयी पूर्वग्रह असेल तर चुकीची माहिती मिळू शकते.

३).  कथागीते यांच्यामध्ये उत्तरोत्तर भर पडत असल्याने मूळ घटना बाजूला राहते.

रसविचार

 बी. ए, भाग ३

अभ्यासक्रमपञिका :१२

सञ:  ६

पाठ्यपुस्तक :साहित्यविचार

विभाग :२

रसविचार

विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील

प्रश्न: योग्य पर्याय निवडा.

१)   ..........भाव हे'आस्वाद्यतेचा कंदच' होत असे म्हटले आहे ?      अ)   स्थायी

 ब)   अनुभाव

 क)   व्यभीचरी

  ड)   रतिभाव

२)   भरताने कोठेही......... विवेचन केलेले नाही?

अ)  स्वेदचे

ब)   स्तंभचे

क)   कंपचे

ड)    चित्तवृत्तीचे

३)   'वाक्यम रसात्मकम काव्यम' ही उक्ती कोणाची आहे?

अ)  विश्वनाथ

ब)   मम्मट

क)   कुंतक

ड)    भामह

४)   पौर्वात्यांनी आर्थी व्यंजनेचा कोणता प्रकार सांगीतला आहे

अ)   वस्तूध्वनी

ब)    अलंकारध्वनी

क)    रसध्वनी

ड)    संवेदना ध्वनी

५)   'चर्वणा हाच रसाचा प्राण होय' असे कोणी म्हटले आहे?

अ)   भरत

ब)    रुद्रट

क)   भट्टनायक

ड)   विश्वनाथ

६)   शांतरसात मनाची द्रूत अशी अवस्था होते त्यास काय म्हणतात?

अ)   प्रसाद

ब)    माधुर्य

क)    क्रांती

ड)    ओज

७)   भरताच्या मते, रसनिष्पती हेच काव्याचे........फलित होय?

अ)   अंतिम

ब)    पहिले

क)    दुसरे

ड)    तिसरे

८)   ........ हा अॅरिस्टाॅटलचा प्रसिद्ध सिद्धांत आहे?

अ)   नाट्यभाव

ब)    कॅथार्सिस

क)    भावनास्वाद

ड)     ओजोगुण

९)    अनिलांनी कोणत्या नव्या रसाचा पुरस्कार केला आहे?

अ)   क्रांती

ब)    प्रक्षोभ

क)    शांत

ड)    प्रेयान

१०)   डाॅ के ना वाटवे यांनी ........ या ग्रंथात स्थायीभावाना भावबंध किंवा  सेंटिमेंट म्हटले आहे?

अ)     नाट्यशास्ञ

ब)      रसविमर्श

क)    वस्तुध्वनी

ड)     रसध्वनी

उत्तरे............

१)  अ)  स्यायी

२)   ड)  चित्तवृत्तीचे

३)   अ)  विश्वनाथ

४)    क)  रसध्वनी

५)    क)  भट्टनायक

६)    ब)   माधूर्य

७)    अ)  अंतिम

८)      ब)  कॅथाॅर्सिस

९)     ब)    प्रक्षोभ

१०)   ब)   रसविमर्श

मुद्रितशोधन

 बी.ए.भाग  :३

अभ्यासक्रमपञिका :१२

सञ:६

विभाग :३ मुद्रितशोधन

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

प्रश्न:योग्य पर्याय निवडा.

प्रास्ताविक :        

                मुद्रित मजकूर अधिकाधिक निर्दोष व्हावा म्हणून मूद्रितशोधन केले जाते.मुद्रिते वाचून चुकांचे दिग्दर्शन करणे म्हणजे मुद्रित शोधन होय.

मुद्रितशोधनाचे हे काम मूद्रितशोधक(प्रुफ-रीडर वा करेक्टर) आणि मुद्रित सहायक किंवा मूळप्रत वाचक (काॅपी होल्डर) अशा दोन व्यक्तिद्वारा होत असते. अनेकदा माञ दोन व्यक्तींचे कार्य एकच व्यक्ती करते.

१)  मुद्रितशोधनाचे ......... प्रकार आहेत?

अ)   चार

ब)    तीन

क)    दोन

ड)    पाच

२)   ............महत्वाच्या संदर्भग्रंथाचे मुद्रितशोधन करतांना फारच दक्षता घ्यावी लागते ? 

अ)   अ)मुद्रितशोधन

ब)     संदर्भग्रंथ

क)    इतर ग्रंथ

ड)    कोश

३)   ........,पंचांग या विषयावरील ग्रंथाचा समावेश संकीर्णमध्ये होतो?

अ)   कला

ब)    पुस्तक

क)    नाटक

ड)    संगीत

४)   ............पुस्तकात सनावळ्या लक्षपूर्वक पहाव्या लागतात?

अ)   इतिहासाच्या

ब)    भूगोलाच्या

क)    समाजशास्ञाच्या

ड)    अर्थशास्ञाच्या

५)   ............मुद्रितशोधनात वेळेला फार महत्व असते?

अ)   कथा

ब)    कविता

क)    वृत्तपञीय

ड)    कादंबरी

६)   वृत्तपञातील..........फार महत्व असते?

अ)   बातम्यांना

ब)    अग्रलेखांना

क)    वाचकांच्या पञव्यवहारांना

ड)    जाहिरातींना

७)   मुद्रण व्यवसायात.......... फार महत्व असते ?

अ)   तंञाला

ब)    रचनातंञाला

क)    कौशल्याला

ड)      मुद्रिताला

८)   लेखकाचा आशय वाचकापर्यत निर्दोषपणे पोहचवण्याची जबाबदारी........... पार  पाडावी लागते ?

अ)  मूद्रितशोधकाला

ब)    लेखकाला

क)    बातमीदाराला

ड)    संपादकाला

९)   मुद्रितशोधनातून........... प्रकारे संधी मिळू शकतात?

अ)   तीन 

ब)    चार

क)    दोन

ड)    पाच

१०)   अलीकडे.......... सुविधेमुळे मुद्रितशोधकांची संख्या घटवली आहे?

अ)    स्पेलचेकर

ब)     मुद्राचेकर

क)    वृत्तचेकर

ड)     अक्षर चेकर

उत्तरे...............,,..

१)   ब)  तीन

२)   ड)  कोश

३)   ड)  संगीत

४)   अ)  इतिहासाच्या

५)   क)  वृत्तपञिय

६)   ड)  जाहिरातींना

७)  ब)  रचनातंञाला

८)  अ)  मुद्रितशोधकाला

९)   क)  दोन

१०)  अ)  स्पेलचेकर

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing