Thursday, 3 December 2020

बी ए भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ / सञ ३/ नारायण सुर्वे- कविता - दोन दिवस

बी ए भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

सञ ३

विषय प्राध्यापक - बी के पाटील

नारायण सुर्वे- कविता - दोन दिवस

         कवी नारायण सुर्वे परिचय :

                   कवी नारायण गंगाराम  सुर्वे यांचा जन्म मुंबईत १५ आॅक्टोबर,१९२६ रोजी झाला. गंगाराम सुर्वे यांनी नारायण सुर्वेचे संगोपण केले .गंगाराम सुर्वे गिरणीकामगार होते. नारायण सुर्वेंचे बालपण याच परिसरात गेले.

      वयाच्या ३६व्या वर्षी १९६२ साली ऐसा गा मी ब्रह्म हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 

साहित्यसंपदा  :ऐसा गा मी ब्रह्म ,माझे विद्यापीठ, जाहीरनामा इ. पुस्तके नावावर आहेत.

    मिळालेली पारितोषिके :

            माझे विद्यापीठ हा काव्यसंग्रह १९६६ मध्ये प्रसिध्द झाला याला ११ पारितोषिके मिळाली,

 १९७३ सोव्हिएत लॅन्ड नेहरु अॅवार्ड माझे विद्यापीठ' ला.

१९९८पदमश्री पुरस्कार


    मराठी कवितेत स्व:ताचे वेगळे स्थान निर्माण करणारे नारायण सुर्वे यांचे१६ आॅगस्ट २०१० रोजी ठाणे येथे निधन झाले.

          दोन दिवस

दोन दिवस ही कविता दोन दिवस वाट पाहाण्यात गेले, दोन दु:खात गेले असे सांगत या दिवसांचा ताळेबंद मांडते. आता डोईवर  किती उन्हाळे राहीले याचा हिशोब कवी मांडतो आहे, कवी उन्हाळे मोजतो आहे, कारण हे जीवनच तसे आहे.

      आकाशात चंद्र, तारे आले. राञी धुंद झाल्या. पण हे निसर्गसौंदर्य कवीने कधी पाहिलेच नाही, हा आनंद घेतलाच नाही कारण....

 भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली असे कवी म्हणतात. कवीने कधी स्वत:पुरता विचार केलाच नाही. सदैव जगाचा, भोवतालचा विचार केला . म्हणूनच

   " दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो" असे कवी म्हणतात.

   भट्टीमध्ये पोलाद गरम करुन त्याला आकार दिला जातो. आपल्याही आयुष्याला असाच आकार येत गेला असे मोठ्या अभिमानाने कवी सांगतो. कवी कधीच तक्रार करत नाही.तर हे आयुष्यच बदलून टाकेन असा विश्वास व्यक्त करतो ही आशावादी  वृत्तीच कवीच्या कवितेचे वेगळेपण आहे यात शंका नाही.

बी ए भाग (१विद्याशाखीय विशेष गाभा DSC-A1) / मराठी(ऐच्छिक) पेपर क्रं१ / चिञपट: दृकश्राव्य माध्यम,छायाचिञण,पटकथा, संवाद

बी ए भाग (१विद्याशाखीय विशेष गाभा DSC-A1)

मराठी(ऐच्छिक) पेपर क्रं१

चिञपट: दृकश्राव्य माध्यम,छायाचिञण,पटकथा, संवाद

 विषय प्राध्यापक: बी.के. पाटील

       चिञपट हे एक दृक श्राव्य माध्यम :

         चिञपटाशी समानार्थी असणारे अनेक शब्द आहेत विशेषत: फिल्म, मोशन मूवी, सिनेमा हे शब्द महत्वाचे आहेत फिल्म हा शब्द प्लास्टिक कोटींगच्या पारदर्शक व गुंडाळी करता येणार्‍या रीळाशी संबंधित आहे. या मध्ये कॅमेर्‍याने चिञित केलेली दृश्य व संगीताचे तसेच ध्वनीचे संकलन करता येते आणि फिल्म यंञाच्या साह्याने पडद्यावरती दाखविते येते.

      आठ एम एम, सोळा एम एम ,पस्तीस एम एम ,सत्तर एम एम यावरुन चिञपटास फिल्म असे म्हटले जात असावे. मोशन मूवी म्हणजे चलत चिञपट

      थोडक्यात मोशनमूवी म्हणजे हलणार्‍या वस्तूचे कॅमेर्‍याच्या साह्याने केलेले चिञिकरण. सिनेमा शब्द हा इंग्रजीत आहे तो चिञपटामधील दृश्याची संबंधित आहे म्हणून चिञपट म्हणजे कॅमेर्‍याने दृश्यीत केलेल्या दृश्यांची मालिका असे म्हणता येईल .

       चिञपटात खालील बाबी असतात

      १.आयडिया म्हणजे कल्पना

       २.संकल्पना

       ३.कला दिग्दर्शक व त्याची संहिता

        ४कॅमेरा व त्याची उपकरणे

        ५.वेशभूषा व त्याची संहिता

         ६.विचार व तत्वज्ञान

         ७कथा, पटकथा, संवाद आणि गीते

           ८.प्रकाश योजना

            ९. दिग्दर्शक व त्याच्या संहिता

              १०.रंगभूषाकार

                ११.संकलक व त्याचे संकलन

                 १२.व्हिडिओ इफेक्ट

                  १३.ग्राफिक्स व पोस्टर डिझाइन

                    १४.निर्मिती व्यवस्थापन व त्याची संहिता

                      १५.प्रसिध्दी व्यवस्थापन

        अशा बर्‍याच घटकांचा समावेश होतो.

पटकथा:     

           पटकथेला इंग्रजीमध्ये स्कीन प्ले म्हणतात. पटकथेत कथेची विभागणी वेगवेगळ्या दृश्यात होते. एका चिञपटामधून दिग्दर्शकाला जसं काही सांगायचं असतं तसेच प्रत्येक दृश्यामधून  काही सांगायचं असतं. 

       पटकथेत लेखक काय सांगतो हा कळीचा मुद्दा आहे स्थुलमानाने वेळ, स्थळ, पाञपरिचय, कलाकाराची कृती, त्यांचा अभिनय, प्रकाश योजना, दृश्यामधील वातावरण, स्थळ वर्णन पाश्व संगीत ,इ.बाबी येतात.तसेच चिञीकरणानंतर संकलन!डी. आय, डबिंग' व्हिडिओ ,स्पेशल इफेक्ट,इ संस्कार होतात. पटकथा ही दिग्ददर्शक, कलादर्शक, कॅमेरामन, संगीतकार, वेशभुषाकार प्रकाशयोजनाकार,पाश्वसंगीत यांना सामग्री पुरविते.

       पटकथा म्हणजे शूटिंग करावयाच्या दृश्यांची संरचना आहे. अलीकडे पटकथेला तांञिक स्वरुप येऊ लागलं आहे.

      संवाद:

               चिञपटाची पहिली भाषा कॅमेर्‍याची असली तरी संहितामधील भाषिक सामग्रीही खूप महत्वाची आहे. उदा  शोले मधील गब्बर सिंग चा डायलाॅग 'कितने आदमी थे ? डाॅन मधील अमिताभचा डायलाॅग 'डाॅन को पकडना मुश्कील ही नही नामुमंकीन है!'  किंवा आताच्या सैराट मधील आर्चीचा संवाद'मराठीत सांगितलेलं समजत नाही का? इंग्रजीत सांगू' 

         मुळात चिञपट माध्यम चिञपटांमधून सामाजिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न करते निधान वस्तुनिष्ठतेचा आभास निर्माण करते. त्यासाठी चिञपटाची भाषा वस्तुनिष्ठतेने व्यक्त होणे गरजेचे आहे. काव्यात्मक , अलंकारीक भाषेला चिञपटामध्ये वावडे नसले तरी सर्रासपणे अशी भाषा वापरली जात नाही. तसेच उच्यारावरही लक्ष दिले जाते, अनावश्यक भाषेचा वापर टाळला जातो. 

    उदा. अलीकडच्या बबन ,ख्वाडा चिञपटामध्ये शिव्याचा वापर आहे चिञपटाची भाषा वस्तुनिष्ठ करण्याकडे तोकल आहे. अलीकडे हिंदी,मराठी चिञपटामधून व  गाण्यामधून प्रेक्षकावर्ती होणारा परिणाम लक्षात घेऊन भाषेचा वापर होताना दिसतो.

   उदा. मुन्नी बदनाम हुई. झेंडू बाम हुई या गाण्यामध्ये वापरलेला झेंडू बाम  शब्द किंवा सिंघम चिञपटामध्ये वापरलेली भाषेची टॅगलाईन 'आता माझी सटकली' यावरुन एक गोष्ट लक्षात येते समाजामध्ये संमिश्र भाषेचा वापर होतोय. म्हणून चिञपटाची किंवा गाण्याची भाषा बदलते.

बी ए भाग ३ /मराठी पेपर क्रं ७ / सञ - पाचवे /साहित्यविचार - अलंकार उपमा अलंकार-स्वरुप व उदाहरण


बी ए भाग ३

मराठी पेपर क्रं ७

सञ - पाचवे

साहित्यविचार - अलंकार

उपमा अलंकार-स्वरुप व उदाहरण

विषय प्राध्यापक-बी.के. पाटील

    मराठी भाषेतील महत्वाच्या अलंकारापैकी एक म्हणजे उपमा अलंकार आहे.

व्याख्या- जेव्हा दोन गोष्टीतील साम्य पाहिले जाते, एक वस्तू दुसर्‍या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते तेव्हा उपमा हा अलंकार होतो.

   या अलंकारात दोन गोष्टीमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते.

     उपमा अलंकारात ज्याला उपमा दिलेली असते त्या वस्तूला उपमेय म्हणतात. तर ज्याची उपमा दिलेली असते त्याला उपमान म्हणतात.

     उपमा अलंकारात दोन वस्तूमधील सारखेपणा किंवा साधर्म दाखविण्यासाठी सम, समान, परी, गत , सारखा , प्रमाणे असे शब्द वापरले जातात.

      उदा.:

१.सावळाच रंग तुझा, पावसाळी नभापरी.

      वरील ओळीत सावळा रंग हे उपमेय आहे. याउपमेयाला पावसाळ्यातल्या नभाची म्हणजे ढगाची उपमा दिली आहे. म्हणून पावसाळी नभ हे उपमान आहे

२.आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

३.असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी,

४मुंबईची घरे माञ लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी.

...........................................

  अनुप्रास अलंकार स्वरुप व उदाहरणे.

व्याख्या:   शब्दांच्या किंवा व्यंजनांच्या पुनरावृत्तीमुळे जो अलंकार होतो त्याला अनुप्रास असे म्हणतात. एकच अक्षर पुन:पुन्हा आल्याने नादमधुरता निर्माण होते व काव्याला सौंदर्य प्राप्त होते.

      उदा.

१.गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

     शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले

      रजनीतल ताम्रनील स्थिर पल जल पल सलील

       हिरव्या तटि कृष्ण मेळ खेळे

     बा भ बोरकरांची या काव्यमय ओळी अत्यंत नादमय आहेत 'ल' या अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे त्या ओळींना एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.

२.अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुल

     रुप्याचा वाळा तान्हा बाळा तीट लावू.

३,आज गोकुळात रंग  खेळतो हरी।

     राधिके जरा जपून जा तुझ्याघरी।

    असा हा अनुप्रास अलंकार. एकाच अक्षराची पुनरावृत्ती करणारा. वाचकांना मनमुराद आनंद देणारा.

...........................................

रुपक अलंकार स्वरुप व  उदाहरणे   व्याख्या: जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरुप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रुपक अलंकार होतो.

       उदा:

   १.     लहान मूल म्हणजे मातीचा गोळा.

   २.     देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर

    ३.     समिधाच सख्या या। यात कसा ओलावा।।

             कोठुनि फुलापरि। वा मकरंद मिळावा

   ४.आई भरलं आभाळ। आई नितळ सागर।

       आई चांदणं दुधाळ। आई मायेचे आगर।।

        आई सरिता निर्मळ ।आई हिरवं शिवार।

          आई फुलांचा दर्वळ ।आई मांगल्य अपार।।

    ही कविता नामदेव शिंदे यांची असून ही आईवरची कविता म्हणजे रुपक अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे.

 राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.

बी.ए.भाग३

सञ पाचवे

अभ्यासक्रमपञिका क्रं ७

(मराठी)

साहित्यविचार

अलंकार-दृष्टांत

विषय प्राध्यापक -प्रा.बी.के. पाटील.

मराठीत 'शब्दालंकार आणि अर्थालंकार असे अलंकारांचे दोन प्रकार आहेत.

१.शब्दालंकार -हे शब्दाच्या विशिष्ट रचनेवर आधारित असतात.

२.अर्थालंकार-हे अर्थावर अवलंबून असतात. अर्थालंकार हे जणू साहित्याच्या आत्माचे सौंदर्य आहेत.

दृष्टांत अलंकार : व्याख्या-एखादे तत्व ,एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.

     उदा.  

      लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा।

        ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार ।।

          संत तुकाराम महाराज यांनी वरील ओळीमध्ये दृष्टांत अलंकाराचा वापर केला आहे. ते परमेश्वराकडे लहानपण मागत आहेत . त्यासाठी मूंगीचे व ऐरावताचा  दृष्टांत  म्हणजे उदाहरण दिले आहे. मुंगी लहान होऊन साखर खाते तर ऐरावत मोठा हत्ती आहे म्हणून त्याला अंकुशाचा मार खावा लागतो.

२. निवडी क्षीर आणि पाणी,राजहंस दोन्ही वेगळाली।

      तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे,

येरागबाळाचे काम नव्हे।।

       हे दुसरे उदाहरण संत तकाराम महाराजांचे आहे. ज्याचे काम त्यानेच करावे हे सांगतांना ते राजहंसाचा दाखला देतात राजहंस पाणी आणि दूध वेगवेगळे करतो. हे काम फक्त त्यालाच जमते इतरांनी करु नये असे ते म्हणतात.

    सारांश - दृष्टांत अलंकाराचा सर्वच कवी आणि लेखकांनी भरपूर वापर केला आहे. नानाविध उदाहरणे देत, दाखले देत आपला मुद्दा वाचकांना पटवून दिला आहे.

 बी. ए. भाग ३

सञ-पाचवे

अभ्यासक्रमपञिका क्रं ७(मराठी)

(साहित्यविचार)

विषय  शिक्षक: प्रा. बी. के. पाटील

अतिशयोक्ती अलंकार:

स्वरुप व उदाहरण:

व्याख्या:   "एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून वा खुलवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो." 

            किंवा

अतिशय उक्ती म्हणजे अतिशयोक्ती होय.

  अतिशयोक्ती या शब्दाचा अर्थ आहे तिखटमीठ लावून एखादी गोष्ट सांगणे,पराचा कावळा करणे.

 आपणही बोलतांना अतिशयोक्ती अलंकार वापरतो, मिञ वा मैञिण बर्‍याच दिवसांनी आपल्याकडे आली तर आपण म्हणतो!" काय यायला रिक्षा मिळत नव्हती का काय? ही अतिशयोक्तीच आहे.

  अतिशयोक्ती उदाहरणे:

१   ती रडली समुद्रच्या समुद्र.

२    तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात,

३      दमडीचं तेल आणलं, सासुबाईंचं न्हाणं झालं,

मामंजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली.

उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला.

वेशीपर्यत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला,

बी.ए ३मराठी / पेपर क्रं ७/ साहित्यविचार अलंकार

(E-content created by Patil B. K.)

बी.ए ३मराठी 

                                                        पेपर क्रं ७ साहित्यविचार अलंकार                                                                       

 प्रश्न: अलंकार म्हणजे काय?

अलंकारांचा परिचय

प्रस्तावना -

    अलंकार म्हणजे दागिना.अलंकार म्हणजे आभूषणे एखादी स्ञी किंवा पुरुष यांचे मूळ सौंदर्य आभूषणांनी खुलून दिसते.भाषेलाही असे अलंकार आहेत. लेखक किंवा कवी आपली नेहमीची भाषा न वापरता वेगळी भाषा वापरतात. तोच आशय  वेगळ्या भाषेत सांगतात. आपल्या भाषेला नटवतात,सजवतात,खुलवतात शब्द चमत्कृती साधतात.

      'काव्याचे सौंदर्य वाढवणारे, त्यांची शोभा वाढविणारे जे गुणधर्म असतात त्यांना अलंकार असे म्हणतात.

 उदा. तुझी चाल तुरुतुरु, उडती केस भुरु भुरु,

   डाव्या डोळ्यावर बट ढळली।

    जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात,

     नागीण सळसळली ।। 

          असे प्रेयसीचे वर्णन कवी करतो. हे वाचून मनाला समाधान वाटते, ही किमया आहे भाषेची.

      व्याख्या:"कोणतेही गद्य किंवा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा काव्यात्मक साचा म्हणजे अलंकार होय."

   भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार:

    १ शब्दालंकार २ अर्थालंकार

१ शब्दालंकार: 'ज्यात शब्दचमत्कृती असते व ज्यामुळे भाषेला शोभा येते त्याला शब्दालंकार म्हणतात. 

शब्दालंकार हे शब्दांच्या विशिष्ट रचनेवर आधारित असतात. त्या शब्दांच्या जागी दुसरे शब्द योजून चालत नाही. शब्दालंकारात शब्दांचे सौंदर्य कानाला गोड वाटते.

  शब्दालंकारांचे ३ प्रकार आहेत

   १)अनुप्रास २)यमक ३)श्लेश

२ अर्थालंकार: अर्थालंकार हे अर्थावर अवलंबून असतात. एखाद्या वाक्यात किंवा ओळीत योजलेल्या शब्दांबद्दल त्याच अर्थाचे दुसरे शब्द योजले तरी त्यामुळे काहीच फरक पडत नाही. त्यास अर्थालंकार म्हणतात. अर्थ हा शब्दाचा आत्मा असतो. म्हणजेच अर्थालंकार हे आत्मा सौंदर्य असते असे म्हणायला हरकत नाही.

   अलंकारात म्हत्वाच्या चार गोष्टी:

१ उपमेय: ज्या गोष्टीचे वर्णन केले आहे ती गोष्ट. म्हणजेच ज्याला उपमा दिली आहे ते उपमेय

उदा.तुझे मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यात मुखाचे वर्णन केले आहे म्हणून मुख हे उपमेय आहे

२  उपमान: उपमेयाचे साम्य ज्या दुसर्‍या गोष्टीशी कवी दाखवत असतो तिला उपमान असे म्हणतात. म्हणजेच ज्याची उपमा दिली आहे ते उपमान आहे, 

उदा. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे. म्हणून कमल हे उपमान आहे.

३ साधर्म:  साधर्म म्हणजे समानता, उपमेय आणि उपमान यामधील साम्य किंवा सारखेपणा दाखविणार्‍या गुणधर्माला साधर्म म्हणतात.

  उदा: वरील वाक्यात मुख आणि कमल यात साधर्म दाखविणारा सुंदरता हा गुण आहे.

 ४ साधर्मसूचक शब्द:   उपमेय आणि उपमान यामधील साम्य दाखविणार्‍या शब्दाला साधर्मसूचक शब्द किंवा साम्यसूचक शब्द म्हणतात.

   उदा वरील वाक्यात कमलासारखे मुख यात सारखे हा शब्द साधर्मसूचक शब्द आहे.

बी ए भाग ३ / मराठी पेपर क्रं ७ / सञ ५ / साहित्यशास्ञ / विभाग २ / साहित्याची प्रयोजने

(E-content created by Patil B. K.)

बी ए भाग ३

 मराठी पेपर क्रं ७

 सञ ५

  साहित्यशास्ञ

  विभाग २

   साहित्याची प्रयोजने

प्रश्न योग्य पर्याय निवडा:

१ या संस्कृत साहित्यज्ञाने साहित्याची सहा प्रयोजने सांगितली आहेत.

(अ) मम्मट (ब)भामह (क)वामन (ड) विश्वनाथ

२  गंगालहरी हे काव्य ....यानी रचले.

  (अ)भरत (ब)विश्वनाथ(क)जगन्नाथ पंडित (ड)रुद्रट

३यशप्राप्ती वकीर्ती हे साहित्याचे प्रयोजन ..... आहे.

(अ)लेखकाचे (ब)वाचकाचे(क)लेखक वाचकाचे(ड)लेखकाचे

४ मम्मटाने काव्याची..... प्रयोजने सांगितली आहेत.

(अ)पाच(ब)सहा(क)सात(ड)आठ

५ साहित्यामुळे अर्थप्राप्ती व्हावी या प्रयोजनापेक्षा साहित्यामुळे कीर्ती मिळावी हे प्रयोजन ......

(अ)अधिक दुय्यम(ब)अधिक उदात्त(क)उदात्त नाही(ड)अधिक अयोग्य.

६ मम्मटाने सांगितलेले काव्याचे पहिले प्रयोजन..... आहे.

(अ)यश(ब)कांतासंमित उपदेश(क)अर्थप्राप्ती(ड)व्यवहार ज्ञान

७ साहित्यातुन व्यवहार ज्ञान मिळते हे प्रयोजन..... आहे

(अ)लेखकासाठी(ब)साहित्यासाठी(क)वाचकासाठी(ड)प्रकाशकासाठी

८निर्मितीचा आनंद हे...... साहित्याचे प्रयोजन आहे.

(अ)वाचकासाठी(ब)लेखकासाठी(क)प्रकाशकाचे(ड)साहित्याचे

९ अर्थप्राप्ती हे...... साहित्याचे प्रयोजन आहे.

(अ)वाचकाचे(ब)लेखकाचे(क)लेखक व वाचकाचे(ड)साहित्याचे

१० काव्य व्यापाराची तीन केंद्रे.... आहेत.

(अ)लेखक-साहित्यकृती-वाचक(ब)लेखक-साहित्यकृती-प्रकाशक(क)लेखक-प्रकाशक-वाचक(ड)लेखक-विक्रेता-वाचक


उत्तरे  (१)मम्मट(२)जगन्नाथ पंडित(३)लेखकाचे(४)सहा(५)यश(६)अधिक उदात्त(७)वाचकासाठी(८)लेखकाचे(९)लेखकाचे(१०)लेखक-साहित्यकृती-वाचक

Resume writing_Short answer type questions

Short answer type questions: 1.    What is the primary purpose of a resume, and how can a well-designed resume benefit a job applicant? ...