Wednesday, 2 June 2021

वाहरू सोनवणे

 राधानगरी महाविद्यालय

 मराठी आवश्यक              बी.ए.भाग-1 

विषय शिक्षक: प्रा.डॉ.विश्वास पाटील 

वाहरू सोनवणे जन्म इ.स. 19 50

    नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्री खेड येथे जन्म. आदिवासी साहित्य प्रवाहातील महत्त्वाचे समकालीन कवी व चळवळीतील कार्यकर्ते. आदिवासींच्या मूलभूत  प्रश्नांसाठी अविरत लढा त्यांनी दिलेला आहे. गोधड,रोडाली हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. गोधड कविता संग्रहाचा पहाड जीने लगा या नावाने हिंदी अनुवाद झालेला आहे. वाहरू सोनवणे यांच्या निवडक कविता प्रकाशित आहेत कोल्हापूर येथे 2000 साली झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. पाचवे आदिवासी साहित्य संमेलन पालघर, परिवर्तन साहित्य संमेलन साकोली, दुसरे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन शहादा या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर त्यांनी लेखन केले आहे. गोधड या काव्यसंग्रहाचा अर्थ सांगताना कवी म्हणतो गोधड या काव्यसंग्रहाचा जाणकार चुकीचा अर्थ लावतात. ही गोधड आदिवासींच्या वेदना, व्यथांची नसून सडलेल्या फाटलेल्या समाजव्यवस्थेची ही गोधड आहे. ती बदलण्याची ही वेळ आलेली आहे. आदिवासींची परिस्थितीही फाटक्या मळलेल्या गोदडी प्रमाणे झालेली आहे. त्यामध्ये काही सुधारणा नाही, वर्तमान परिस्थितीत ते गुदमरून गेले आहेत.  पिढ्यान पिढ्या अज्ञान, दारिद्र्यामुळे त्यांचे शोषण होत आहे. गेल्या कित्येक पिढ्यामध्ये ही व्यवस्था तशीच आहे. आता या व्यवस्थेत जीव गुदमरून जातोय. कारण ही व्यवस्था जीर्ण आणि मळकट झाली आहे. तिचा कुबट आंबट वास येत आहे. ती आता बदलायला हवी. फाटकी गोधडी, आंबट वास या प्रतिमा ही खूप बोलक्या आहेत. भारतीय समाजातील शोषित उपेक्षित घटकांची व्यथा-वेदना या कवितेतून व्यक्त होतांना आपल्याला दिसते.

    चळवळ म्हणजे या कवितेतून मानवी समाजाला गतिमान करणाऱ्या कृतिशील प्रवाहाचे चित्रण आलेले आहे. कवीला परिवर्तनाची आस आहे. तो स्वतः चळवळीतील कार्यकर्ता असल्याने आपल्या न्याय हक्कासाठी चळवळ उभी करतो. मात्र ही चळवळ म्हणजे जत्रा किंवा नदीला आलेला पूर नाही. सतत विकसित होत जाणारा हा प्रवाह आहे. चळवळ ही माणुसकीची मूलभूत गाभाभूत घटक आहे. मानवतेच्या प्रस्थापनेसाठी अखंड कार्यरत असणाऱ्या चळवळींना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विरोध करणारे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून अडथळे आणणारे अनेक घटक असतात. तरी याविषयी व्यवस्थे मधून चळवळ विशाल महासागरा कडे वाट काढत असते. परिवर्तनवादी चळवळीच्या केंद्रस्थानी माणूस असायला हवा. हे कवी  विशेषत्वाने इथे नोंद करतात.

विंदा करंदीकर

 *राधानगरी महाविद्यालय 

 मराठी (आवश्यक) 

 बी.ए. भाग-1 

विषय शिक्षक: प्रा.डॉ.विश्वास पाटील

 विंदा करंदीकर इ.स. 19 18- इ.स.2010* 

     विंदा करंदीकर हे मराठी वागणमयाची विविध दालने समृद्ध करणारे प्रयोगशील कवी. कविता, गीते, समीक्षा, बाल कविता, लघुनिबंध, अनुवाद असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरुपिका इत्यादी काव्यसंग्रह. राणीची बाग, एकदा काय झाले, सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कस वाला, पिशी मावशी आणि तिची भुतावळ, आडम तडम हे बालकवितासंग्रह. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ हे लघुनिबंध संग्रह. अरिस्टॉटलचे काव्य-शास्त्र, पाऊस भाग 1, राजा लिअर हे अनुवादित ग्रंथ. परंपरा आणि नवता हा समिक्षा लेख संग्रह. सावंतवाडी येथे 1996 मध्ये झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान.

     माझ्या मना बन दगड ही एक वेगळी सामाजिक जाणीव व्यक्त करणारी कविता. समाजामधील ज्या लोकांना नीटपणे प्राथमिक गरजाही मिळालेले नाहीत त्यांचा आक्रोश ऐकून आपणाला काहीही करता येत नाही. म्हणून स्वतःच्या मनाला कवी म्हणतो माझ्या मना बन दगड इथल्या शोषित, वंचितांना कोरडी सहानुभूती दाखवून काहीही उपयोग नाही. मात्र हेच लोक एक दिवस क्रांतीचे दूत बनून येतील असा आशावादही व्यक्त केला आहे. कुडकुडणारे हे जीव पाहू नको! डोळे शिव! माणूस मिथ्या, सोने सत्य! यासारख्या अवतरणा मधून त्यांच्या कवितेची सामर्थ्य केंद्रे स्पष्ट होतात.

     झपताल या कवितेमध्ये संसारिक स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध अशा पैलूंचे चित्रण येते. बाळाला दुध पाजणारी, स्वयंपाक करणारी, कपडे धुणारी, अशी ती अनेक रूपात नाना कामे करीत सबंध घरभर भिरभिरत असते. स्वागत करताना ती सुहासिनी असते, वाढताना यक्षणी असते,  मुलाना भरवताना पक्षिनी असते, तर बचत करुन साठवताना सहिता असते. हा सगळा संसाराचा गाडा ती दहा फूट खोलीमध्ये दिवसाच्या चोवीस मात्रा कशी बसवते याचे कवीला आश्चर्य वाटते. प्रेम जाणिवेच्या विविध छटा या कवितेमधून विंदा करंदीकर प्रकट करताना दिसतात.

बालकवी

 राधानगरी महाविद्यालय मराठी (आवश्यक) बी.ए.भाग-1

सत्र-2

विषय शिक्षक- प्रा.डॉ.विश्वास पाटील 


बालकवी इ. स. (18 90- इ. स. 19 18) 

          त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा जन्म खानदेशातील धरणगाव येथे झाला. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे एरंडोल, यावल, जामनेर बेटावर या ठिकाणी तिसरीपर्यंत शिक्षण. अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये व महाबळेश्वरच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत काही काळ शिक्षक 1907 साली जळगाव येथे भरलेल्या मराठी कवी संमेलनात डॉक्टर कीर्तिकर यांच्याकडून बालकवी '' ही उपाधी मिळाली. भादली स्टेशन जवळ रूळ ओलांडताना आगगाडी खाली अपघाती निधन. बालकवींची समग्र कविता पुस्तक रूपाने प्रसिद्ध. कल्पकता वेधकता आणि उत्प्रेक्षा ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. निसर्ग प्रेम आणि बालसुलभ भाव अशा विविध रंगांनी त्यांची कविता नटलेली आहे. निसर्ग वर्णन पर सौंदर्यवादी कवितांचे लेखन करून त्यांनी मराठी काव्य विश्वात मौलिक भर टाकली आहे.

     फुलराणी ही बालकवींची कविता खूप लोकप्रिय झाली. या कवितेचा विषय अगदी साधा आहे. हिरव्या हिरव्या गवतात उगवलेल्या बारीकशा कळीचे गोजिरवाण्या रविकिरनासी  लग्न ठरते. सगळेजण तिची चेष्टा मस्करी करतात. तिला रात्री प्रीतीची स्वप्ने पडतात आणि सकाळी तिचे रवीकिरण अशी लग्न होते. विषय काय तेवढाच परंतु आपल्या तरुण प्रतिभेने बाल कवीने या कवितेत एक नितांत सुंदर प्रेम कथा गुपली आहे. निसर्गातील विविध घटकांवर मानवी भावभावनांचे आरोपण केल्यामुळे ही कविता मन मोहून टाकते. फुलराणीच्या विवाहाचे वर्णन करताना तेजोमय नव मंडप, दिव्य वराडी, लाल सुवर्णी झगे, गुलाबी फेटा, मंगल पाठ, सनई या शब्दांनी मांगल्य आणि पवित्रता वाढविण्यास मदत केली आहे.

     अप्सरांचे गाणे या कवितेमधून सौंदर्यासाठी तळमळणार्‍या बालकवींच्या संवेदनशील मनाचे प्रगटीकरण होते. परी किंवा अप्सरा या रात्रीच्या वेळी आनंदाची उधळण करत मौज मजा करत पृथ्वीवर भ्रमंती करतात. अशी एक कल्पना आहे. या स्वर्गीय अप्सरा स्नानासाठी पृथ्वीवर सुंदर जागेचा शोध घेत फिरतात. त्यांचे मोहक वर्णन बालकवींनी केले आहे. या अप्सरा फुलांच्या गर्भात लपलेल्या गंगेत स्नान करू इच्छितात तिथे उतरत असताना शुभ पुकेसरणा धक्का लागू नये म्हणून खबरदारी घेतात. तेथील वातावरणाचे निसर्गातील विविध घटकांचे वर्णन करताना बालकवींच्या प्रतिभेला बहर आला आहे.

होमरूल चळवळ

Sawant S. R. 

BA---2  इतिहास - पेपर--नं--6--होमरूल चळवळ---भारतीय स्वतंत्रतेच्या इतिहास होमरूल चळवळीला महत्त्वाचे स्थान आहे.आपल्या देशाचा कारभार आपन पहाने.यालाच  होमरूल चळवळ असे म्हटले जाते.ङाॕ अंनी बेझंट व लोकमान्य टिळकांनी ही चळवळ  भारतात सूरु केली .या चळवळीने भारतीय  स्वातंत्र्याला गती दिली.अॕनी बेझंट या आयृलंङ मधील 1893 मध्ये  त्या भारतात आल्या.हिंदू धर्म  हिंदू तत्त्वज्ञान  यांचा  त्यानी अभ्यास केला.त्यानिच भारतामध्ये थिआॕसाॕफीकल सोसायटीची स्थापना केली .त्यांनी  राष्ट्रीय सभेचे सदस्यत्व श्विकारले होते,त्यांनी मदृस येथे काॕमन विल हे वृत्त पञ सुरू  केले.इग्लंङ मध्ये जावून त्यानी भारतीय स्वातंत्र्याचा  पुरस्कार केला .न्यु इङीया नांवाचे वृत्त पञ त्यांनी  सुरु केले.भारताला स्वातंत्र्य मिळावे यांच्या साठी  सप्टेंबर 1916 मध्ये त्यांनी  होमरूल लीगची स्थापना  केली.पहिल्या महायुद्धात  इग्लंङ भारतातील होमरुल चळवळी मुळे अङचनित होते.या वेळी सरकारने या चळवळी  विरुध् कठोर कारवाई केली.या मध्ये बेझंट यांना आपले  वृतपञ कारखाना  विकावा लागला.तरी देखील  हि चळवळ भारतात  वाढत गेली. लोकमान्य  टिळकांनी  केसरी व मराठा वृत्त  पञातून होमरुल चळवळीचा  प्रसार करून हि चळवळ  सवृ सामान्यतः  मानसापयृत नेवून पोहचली.त्या मुळे ही चळवळ  पुढे  देशभर पोहचली.पुढे  टिळक व बेझंट यांनी देशभर दौरे काढून हि चळवळ  लोकप्रिय  केली.महिलानी देखील या चळवळीत भाग घेतला.होमरुल चळवळीच्या दबावामुळे सरकारने काही राजकीय सुधारना देन्याचा निर्णय घेतला.जसे भारतात  होमरुल चळवळीचे काम  होते त्याच पध्दतीने परदेशात ही या चळवळीचे पङसाद उमटले अमेरिकेतील लोकांची  सहानुभूती  भारतीय  स्वातंत्र्य  चळवळीस मिळाली.एकंदरीत होमरूल चळवळी मुळे भारतीय  स्वातंत्र्यास गती पृप्त झाली.

BA--- 3 इतिहास पेपर नं -- १२

(Sawant S. R.) 

BA--- 3 इतिहास पेपर नं -- १२-- -- सातवाहन--सातवाहनांच्या वंश त्यांचे मुळ स्थान.कालखंड  याच्या विषयी मत मतांतरे दिसुन येतात ते आयृ की अनायृ,या बाबत मत भैद असून  वशिष्टी पूञ पुलुमायी  याच्या नाशिक येथिल,शिला लेखावरून सातवाहन ब्राम्हण होते.असा उल्लेख केला आहे.माञ उपलब्ध पुराव्यावरुन सातवाहन हे दक्षिण भारतातील  प्रभावि सत्ता होति.असे स्पष्ट होते सातवाहन हे कृष्णा व गोदावरीच्या खोर्यात रहात होते.तेव्हा पासुन त्याना आंध्र.असे समजले जाते.त्याचि सत्ता  साधारन 300 वषृ होति.त्यानी पैठन येथे आपली राजधानी स्थापन केली.सातवाहनानना सातकनृ शालीवाहन असे देखील  म्हटले  जाते. आधृपृदेश महाराष्ट्रात या ठिकाणी आपले राज्य  स्थापन केले होते .मौयृ सत्तेच्या  पतना नंतर सिमूक हे या सत्तेचे  संस्थापक आहेत. यालाच पुरानात भृत्य असे म्हटले जाते. यांने जैन व बोध्द विहार यानां बाधकामासाठी मदत केली.

पहीला सातकनी---- सिमूख मृत्यू पावल्या नंतर काही कालावधी नंतर पहिला  सातकनी हा राज्यावर सत्तेवर आला.त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठा राज्य विस्तार केला.महाराष्ट्रातील नायनिका हीच्याशी विवाह केल्याने त्याच्या महाराष्ट्रातील सत्तेला बळकटी आली त्याने वैदिक धार्मिकतेचा पुरस्कार केला.त्यानेआपल्या विजया मुळे त्याने राजसु यञ व दोन अश्व मेघ यञ केला. त्याने फार मोठा दानधर्म  केला होता.

हालराजा----  सातवाहन घरान्यात नांवारूपास आलेला राजा म्हणजे  हाल होय. त्याच्या काल खङांस शांतियुग असे म्हटले  जाते.तो 

उत्तम कवि होता. पृकृत भाषेतील.गाथा सप्तशती हा गृथं त्याने लिहिला असे मानले जाते.माञ हालाच्या कार्यकीदीत सात वाहनांचा शकसत्तेशी सघषृ सुरु झाला.परीनामी अनेक पृदेशावरील सत्ता  सातवाहनांना सोङावी लागली

BA--3 इतिहास पेपर नं -- 12

(Sawant S. R.) 

BA--3  इतिहास  पेपर  नं  --  12 

Periplus of the Erythrean sea---इस पूर्व  4 शतका पासुन भारतात परकीय  प्रवाशानी व्यापारी व राजकीय  संबंधातीतुन बौद्ध  तिथृ क्षेत्रानां भेटी देन्यास सुरवात केली त्यांनी  जी पृवास वणृने लीहुन ठेवली आहेत  त्या  पैकी periplus हा एक greek  पृवाशाने जल पयृटन करून  भारतात पृवेश केला त्याने यूनानी भाषेत  जे पुस्तक  लिहले त्याचे नाव  पेरील्पस आॕफ एरिथिरीयन आहे या पुस्तकात .तांबङा समुद्र  पशियन खाङी व हिंदी महासागरातून होनारी व्यापाराची माहीती लिहुन ठेवली आहे त्याने gulf मधूनभिरता बारोबर  होनार्या सागरी  व्यापाराची माहीती लिहून ठेवली आहे .त्याच बरोबर सागरी  व्यापारी बंदरे त्यातील  अंतर  .समुद्रातील धोके याची माहीती व्यापारी व नौदलातील मंङळीना होत होता तांबङ्या समुद्राच्या  पलीकडच्या  भारतीय  कीनार्याना गंगा  नदी असे नांव दिले या गृथांत व्यापाराची स्थिती .बंदरे.अंतरे.वनस्पती .व्यापारी  वस्तू याची  ठिकाणे  दिली  आहेत gulf किनाऱ्यावरील व्यापार बंदरे त्यातील अंतरे सागरी टप्पे  याची  माहीति त्याने या गृथांत लिहुन ठेवली आहे मात्र  या माहितीची शहाणीशा होने गरजेचे आहे  त्याच बरोबर  इतिहास लेखन करीत असताना काळजी  घेतली पाहीजे.तसेच लेखकाला  भारतीय  भाषेचे ञान नसल्याने प्रसंगी चूकीची माहिती  मिळू शकते माञ या गृथांतुन भारतीय धर्म .राजकीय जिवन सामाजिक जिवन त्यातील वैशिष्ट्ये  .कला व्यापार इत्यादी विषयी माहिती मिळन्यास .या गृथांतून  मदत होते.

BA 2 इतिहास पेपर नं 6

 (Sawant S. R.)

BA 2 इतिहास  पेपर  नं  6 

महत्वाचे मुख्य  मुद्दे  

1)28-12-1885 मध्ये राष्ट्रीय congarashची स्थापना मुबंई मध्ये झाली. 

2)congarash चे दुसरे आधिवेशन    28-12-1886 रोजी कलकत्ता येथे दादाभाई  नौरोजी याच्या अध्यक्षतेखाली  भरले

3)तिसरे अधिवेशन 1887 मध्ये madras येथे तैयबजी यांच्या  अध्यक्षतेखाली  भरले

4)चौथे अधिवेशन 1888मध्ये अलाहाबाद मध्ये भरले त्याचे अध्यक्ष skotishव्यापारी jorge bul हा होता

5) पाचवे अधिवेशन  मुंबई येथे  वेडरबन यांच्या  अध्यक्षतेखाली  झाले या काळात  राष्ट्र सभेने शेतकऱ्यांच्या   युवकांच्या मजुराच्या समस् मांङल्

6) दादाभाई  नौरोजीनि 1887 मध्ये england  मध्ये इंडियन रिफाॕम असोशियन स्थापन केले दादा भाईनि england  मध्ये india  नांवाचे मासिक सुरु केले त्या मुळे भारतीयानां 1992 चा कायदा मिळाला

7) जहालवादी विचारसरणीला नवराष्टवाद असे म्हटले  जाते जहालराष्टवाद हा आतंरराष्टीय घङामोङी भारताची आथिक पिळवनूक .बिटीशांचे संकट ग्रस्ताकंडे झालेले दूलृक्ष.lord karzenची दङपशाही.1892 च्या कायद्याने केलेली निराशा सामाजिक  सुधारणा चळवळी. बंगालचीफाळनी .लाल बाल पाल यांचे  नेतृत्व .या सर्व  घटकांमुळे भारतीय  समाजात  जागृती  घङून आली त्या नंतर  बंगाल फाळणी विरोधी आंदोलन उभेराहिले1906 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते आणि  याच अधिवेशनात  स्वदेशी .बहिष्कार .राष्ट्रीय शिक्षण.आणि  स्वराज्य  हे ठराव पास केले गेले .त्या नंतर काही मुद्दा वरुन जहाल व मवाळ याच्या मध्ये मतभेद होवून 1907 च्या  सुरत अधिवेशना मध्ये  congersh मध्ये फूट पङली राष्ट्र सभेच्या आंदोलना मुळेच 12-12-1911 मध्ये  बंगालची फाळणी रद् केली गेली

Resume writing_Short answer type questions

Short answer type questions: 1.    What is the primary purpose of a resume, and how can a well-designed resume benefit a job applicant? ...