Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: May 2021

Sunday, 30 May 2021

शिवकालीन व्यापार

 (Dr. Dhere V.D.)

शिवकालीन व्यापार

B.A.I Paper II History

शिवकालीन व्यापार.

      आपण शिवकाळाचा विचार करतो. त्या काळातील व्यापार विषयक वस्तूंचा विचार करताना तत्कालीन बाजारपेठांमध्ये खरेदी-विक्रीसाठी अन्नधान्य, मसाल्याचे पदार्थ, फळे, कापड, धातू, प्राणी, चैनीच्या वस्तू, नित्य वापरातील वस्तू यांचा समावेश होत असे.

अन्नधान्य

           यामध्ये गहू, भात, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, मसूर, उडीद, इत्यादी प्रकारच्या डाळी तेलबिया, दूध, साखर, सुपारी, नारळ  यांचा समावेश असे.

मसाल्याचे पदार्थ

             यामध्ये सुंठ,हळद, मिरची, मोहरी, कांदा, लसूण,मिरी, खोबरे, वेलदोडे, गुळ, खडीसाखर, तूप, सुवासिक तेले यांचा समावेश असे.

फळे

       आंबा, नारळ, काजू, सुपारी, फणस, बदाम, खजूर, कलिंगड, लिंबे इत्यादी फळांचा यात समावेश होता.

कापड

    महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लघुउद्योगांच्या मध्ये कापडनिर्मिती होत असे. याशिवाय गुजरात, बंगाल, उत्तर भारत येथून वेगवेगळ्या प्रकारचे कापड रेशमी, सुती, मलमली, शाली, साड्या ,जाडे-भरडे कापड, चिटाचे कापड, धोतरे, लुगडी, कांबळी, इत्यादीची खरेदी-विक्री होत असे.

धातू

        लोखंड तांबे पितळ सोने

प्राणी

     घोडे, उंट, बैल, म्हशी, मांस उत्पादनाचे प्राणी, लोकर उत्पादनाचे प्राणी

चैनीच्या वस्तू

   हस्तिदंत सौंदर्यवर्धक वस्तू सौंदर्यप्रसाधने 

नित्य वापरातील वस्तू

      स्त्री-पुरुषांच्या नित्य वापराच्या शेती वापराच्या विविध वस्तू पायपोस, इत्यादी


शिवकलीन बाजारपेठा.

    कसबे च्या ठिकाणी बाजार भरत असे अनेक ठिकाणी बाजारासाठी पेठा वसविल्या होत्या. त्या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस बाजार भरत असे. यात्रा उत्सव अशा प्रसंगी ही बाजारपेठ भरत असे. सण उत्सव यात्रा याबरोबरच काही लोक गावोगावी फिरून  वस्तू विकत असत.

        शिवकाळात शेटे महाजन यांना नवीन व्यापारी पेठा वसवण्याची कामगिरी सोपवलेली होती. या मोबदल्यात त्यांना सरकारमार्फत जमिनीचे हक्क दिले जात असत. व्यापाराच्या व्यवस्था साठी पेठांच्या व्यवस्था साठी 'बिडवई' नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जात असे. त पिठांच्या संरक्षणासाठी कोतवाल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाई. शेटे - महाजन हे गोत सभेचे सदस्य होते ते सभेच्या निवडा पत्रावर आपली तराजू ही निशाणी उमटवत असत.

किल्ल्यांवरील बाजारपेठा

      शिवाजी महाराजांनी काही प्रमुख किल्ल्यांवर आसपासचे प्रजाजन, सैनिक, अधिकारी यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी खास बाजारपेठा बांधल्या. रायगड या राजधानीच्या किल्ल्यावरील बाजारपेठेचा विचार केला तर अत्यंत सुनियोजित अशी रचना आपणास दिसते.

शिवकालीन प्रमुख व्यापारी केंद्रे.

      चौल. 

     मध्ययुगीन कालखंडातील अत्यंत महत्त्वाचे बंदर होय मुंबईपासून दक्षिणेला 56 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या हे रायगड जिल्ह्यातील चौल हे बंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७०  मध्ये जिंकले या बंदरातून रेशमाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. रेशीम, निळ, अफू, मसाल्याचे पदार्थ आणि घोड्यांचा व्यापार येथून चालत असे. युरोपीय वस्तू भारतात चौलमार्गे  येत असत मलबार इथून नारळ, सुपारी, बारा तांबे इत्यादी व औषधांचा माने तसे तर मलबार ला कापड, गहू, तांदूळ, बाजरी, सुती कापड, कलाकुसरीच्या वस्तू निर्यात केल्या जात सुंदर भेटवस्तू व कलाकृतींची निर्मिती येथे होत होती.

दाभोळ

      वशिष्ठी नदीच्या मुखावर दाभोळ बंदर वसली आहे अंजनवेल आधी असाही याचा उल्लेख केला जातो पंधराव्या सोळाव्या शतकात या बाजाराची भरभराट झाली शिवाजी महाराजांची जहाजे दाभोळ - मुंबई या मार्गावर ये-जा करत असत. देशातील अनेक ठिकाणाहून कापड, गहू, बाजरी, डाळी, हा माल निर्यातीसाठी येथे येत असे. अरबस्तान, इराण, मलबार, खंबायत तसेच युरोपियनांचे जहाजे येथे व्यापारी साठी  येत. स्वराज्यातील मालाची निर्यात व परदेशी मालाची आयात यामुळे या शहराचा मोठा विकास झाला.

राजापूर

       रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीवरील हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी देशातील व्यापाऱ्यांनी येथे आपल्या  वखारी निर्माण केल्या. फ्रेंच लोक येथील लोखंड व शिशे यांचा व्यापार करत. राजापूर येथून तांबडा समुद्र व इराण येथे व्यापार चालत होता. सुती कापड, सुती धागा, मसाल्याचे पदार्थ, फळे, इत्यादी चे निर्यात येथून होत होती.

संगमेश्वर

         शास्त्री नदीच्या मुखाशी  २० मैल आत सोनावी नदीच्या संगमावर संगमेश्वर हे व्यापारी केंद्र वसले होते. देशावरून घाट मार्गाने अनेक वस्तू निर्यातीसाठी येथे येत मीठ व चिंच यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती.

वेंगुर्ला

       आंतरराष्ट्रीय फळासाठी प्रसिद्ध असलेले कोकणातील ही महत्वपूर्ण बंदर होय. जपान, सिलोन, इराण, अरबस्थान येथून व्यापारी येथे येत या बंदरातून सुती कापड, रेशमी कापड, धान्य व मसाल्याचे पदार्थ यांची निर्यात होत होती येथे डचांची वखार होती.

विजयदुर्ग

             वाघोटण नदच्या मुखाशी बसलेले विजयदुर्ग हे कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. विड्यांच्या पानाच्या वेलीची मळे येथे होते. देश-विदेशात विड्याच्या पानाची निर्यात येथून केली जात होती.

कल्याण- भिवंडी

        शिवकाळात उत्तर कोकणात हे भरभराटीस आलेले बंदर होते. उत्तर भारत, गोवळकोंडा व केरळ या राज्यातून येथे माल येत असे. येथे वस्त्र उद्योगाची भरभराट झाली होती. विणकरांची संख्या लक्षणीय होती. मुंबईचा विणकाम व्यवसाय वाढवण्यासाठी इंग्रजांनी येथील विणकरांना प्रलोभने दाखवली मात्र भिवंडीतील विणकर त्यात बळी पडले नाहीत. येथे जहाज बांधणीचा उद्योग मोठ्या प्रमाणात ऊर्जितावस्थेत आला.


शिवकालीन दळणवळणाची / वाहतुकीची साधने.

  देशाच्या औद्योगिक आर्थिक विकासात दळणवळणाच्या साधनांचा महत्त्वाचे स्थान आहे महाराष्ट्राची भौगोलिक रचना पाहता येथे पाय वाटा व गाडी वाटा मोठ्या प्रमाणात होत्या गावी एकमेकांना रस्त्याने जोडलेली होती मात्र रस्ते कच्चे होते महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांबाबत पुढील प्रमाणे आपण सांगू शकतो.

१). सुरत, धौता, नंदुरबार, बुऱ्हाणपूर रस्ता.

२). सुरत, नवापूर, खानापूर, पिंपळनेर, सटाणा, औरंगाबाद रस्ता.

३). सुरत, बुरहानपुर, धरणगाव, दौलताबाद, हैदराबाद.

४). हैदराबाद, गुलबर्गा, विजापूर, बेळगाव, गोवा.

५). सुरत, नवापूर, खानापूर, पिंपळनेर, औरंगाबाद, अहमदनगर.

६). चोल, कोळवन, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खारेपाटण, मालवण, गोवा.

जलमार्ग..

     समुद्रातून तसेच नदीतून जलमार्गाने ही मालाची ने-आण केली जाईल मिठाची वाहतूक ही बहुतांशी जल मार्गातून देशावर नेले  जाई. कोकणातील  ठाणे, वसई, तेरेखोल, विजयदुर्ग, जयगड, धरमतर इत्यादी खाड्यांमधून तसेच बाणकोट, हर्णे, देवगड, दाभोळ, मालवण, वेंगुर्ला, संगमेश्वर, चौल, कल्याण-भिवंडी या बंदरा मधून जलमार्ग जलमार्गाने वाहतूक होत होती. 

घाट मार्ग

       महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी, सह्याद्री किंवा पश्चिम घाट, व महाराष्ट्र पठार असे प्राकृतिक तीन विभाग आहेत. सह्याद्री पर्वतात तळघाट, बोरघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, खंडाळा घाट, पारघाट इत्यादी अनेक घाट मार्ग आहेत. घाटमार्गे देशावरील वस्तू कोकणात तर कोकणातील मिठ, मासे, मसाल्याचे पदार्थ देशावर आणले जाते या व्यापार संरक्षणासाठी सरकारी चौक्या बसवलेले असत. त्यावर घाटपांडे नावाचा मुख्य अधिकारी काम पाहत असे त्याच्या सहाय्यक म्हणून पत्की पानसरे मेटकरी इत्यादी लोकांची नियुक्ती केली जाई.

टपाल व्यवस्था

        शिवकाळात अत्यंत मर्यादित असाच पत्रव्यवहार होता सरकारी पत्रव्यवहार व खाजगी पत्रव्यवहार करण्यासाठी घोडेस्वार किंवा सांडणीस्वार याचा वापर होई. पत्र व्यवहार पूर्णपणे संरक्षणामध्ये होत असे पत्राची ने-आण  करणाऱ्याला 'हरकारे' असे म्हटले जाई. समुद्रातून मचव्यांच्या  आधारे ही टपालाची ने-आण होत असे. त्यांना बातमीचे मचवे असे म्हणत.

शिवकालीन वाहतुकीची साधने.

               शिवकाळात बैल, उंट, गाढव, रेडा, तट्टू, हत्ती इत्यादी जनावरांचा वापर वाहतूकीसाठी केला जात असे बैलांचा वापर तांदूळ, ज्वारी, बाजरी, गूळ, मीठ इत्यादी वस्तूंच्या गोण्या वाहून नेण्यासाठी केला जाईल 10,000 बैलांचा तांडा वाहतूक करत असे. वाहतुकीसाठी व प्रवासा साठी लागणारी जनावरे फोडण्याचे काम वंजारी लोक करत उपयुक्त युद्धसाहित्याच्या वाहतुकीसाठी वापर होईल प्रसंगी उंटांचा वापर केला जाई.

      कोकणामध्ये  मालवाहतुकीसाठी नावा होड्या,  शिबाडे, जहाजे यांचा वापर केला जाई. नदी वाहतुकीसाठी नौका समुद्रात वाहतुकीसाठी जहाजांचा वापर केला जाई. प्रवासासाठी बैलगाडीचा वापर करत असत श्रीमंत लोक घोडा, घोडा गाडी, रथ,पालखी याचा वापर करत असत.

अकेली - मन्नू भंडारी

 (Dr Eknath Patil)

F. Y. B. A., HINDI  , Paper No -   II,  Semester - II               

अकेली -  मन्नू भंडारी 


मन्नू भंडारी का जन्म 3 अप्रैल, 1931 को मध्यप्रदेश के भानपुरा गाँव में हुआ। मन्नू जी का बचपन का नाम महेन्द्रकुमारी था। घर के लोग उन्हें प्यार से मन्नू नाम से पुकारते थें। आज वही नाम हिन्दी साहित्य जगत् में रूढ और प्रसिद्ध है। मन्नू जी की उच्च शिक्षा काशी हिन्दू विश्वविद्यालय में पूर्ण हुई। उन्होंने दिल्ली विश्वविद्यालय के मिरांडा हाउस में एक कुशल मेधावी अध्यापिका के रूप में पर्याप्त ख्याति प्राप्त की। वस्तुतः साहित्य लेखन एवं अध्ययन के संस्कार उन्हें बचपन से ही प्राप्त थे। उनके पिताजी श्री सुख सम्पतराय हिन्दी पारिभाषिक कोष के निर्माता थें। साथ ही कलकत्ता में अध्यापन करते समय ही उनका संपर्क राजेन्द्र यादव जी से हुआ। तत्पश्चात् मन्नू जी का सुप्रसिद्ध साहित्यकार राजेन्द्र यादव जी के साथ सन् 1959 ई. में अन्तर्जातीय विवाह हुआ। उनका इसी तरह विवाह उन दिनों परम्परा और समाज की दृष्टि से विद्रोह ही था। दोनों में साहित्यिक रूचि एवं काबिलियत होने के कारण साहित्य ही उनके बीच प्रेम का सेतु बन गया था। तत्पश्चात् मन्नू पति की प्रेरणा और सहयोग से हिन्दी साहित्य जगत् में अपना अलग स्थान, पहचान निर्माण करती है। हालांत में स्वभावगत भिन्नताएँ ही दोनों में शरीर दरारें निर्माण करती है और दोनों भी आखिरकार अलग-अलग रहने के लिए विवश हो जाते हैं।


प्रकाशित रचनाएँ -


आत्मकथा- एक कहानी यह भी।


कहानी साहित्य - मैं हार गई, तीन निगाहों की तस्वीर, यही सच है, एक प्लेट सैलाब, त्रिशंकु


उपन्यास साहित्य - एक इंच मुस्कान (सहयोगी उपन्यास), आपका बंटी, स्वामी, महाभोज


नाटक - बिना दीवारों के घर, महाभोज (नाट्य रूपान्तर) आदि।


आदि।


आदि।


मन्नू जी का लेखन नारी के अंतदूर्वव और उनकी एकाकी मनःस्थिति का व्याख्यान ही दृष्टिगत होता है। जीवन की संतुलता, टूटते रिश्तों को सामाजिक दबावों के बीच अपने अस्तित्व के लिए जुझती नारी के अन्तर्मन से अपनी कहानियों और उपन्यासों में रूपायित करती है। इस स्थिति में वह समाज की सड़ी-गली परम्पराओं पर तीखा प्रहार करती है। मन्नू जी बडी कुशलता उनकी भाषा सहज, पर प्रभावोत्पादूक है। मन्नू जी ने नारी के दुःख, व्यथा तथा उसके की त्रासदी को चित्रित किया है। अकेलेपन से


'प्रस्तुत कहानी 'अकेली' में लेखिका सोमा बुआ का अकेलापन केवल उन्हीं का अकेलापननहीं, अपितु पूरे समाज के अकेलापन को बयान करती है। सोमा बुआ का जवान बेटा जाता रहा और पति तीरथवासी हो गए। परिवार में और कोई ऐसा नहीं, जो उनके अकेलेपन को दूर कर सकता हो । सोमा बुआ अकेली रहने को विवश है। वह इस अकेलेपन को तोड़ने के लिए छटपटाती है। यहाँ तक कि, अपने मरे • बेटे की एकमात्र निशानी अंगूठी भी बेच देती है, ताकि देवर के ससुराल वालों को शादी में वह कुछ दे सकें। वह निमंत्रण आने की संभावना से जी-तोड़ बडी तैयारी करती है, पर उन्हें बुलावा नहीं आता है। आखिर अकेलेपन के जीवन के न्तर्गत सारा सामान सहेजकर अँगीठी जलाती है। सोमा बुआ एक ऐसी उपेक्षिता वृद्धा है, जो अकेलेपन से मुक्ति की तलाश में सब-के सब में सम्मिलित तो हो जाती है, पर कहीं भी जुड़ नहीं पाती है। पुत्रहीना वृद्धा धनहीन ही नहीं, बल्कि पति के यायावरी जीवन से भी समाज में मान-मर्यादा से वंचित रहती है। वह जी तोड कोशिष करती है, ताकि उसका अकेलापन दूर हो, पर वह अकेलेपन को ढोने के लिए अभिशप्त है। सोमा बुआ की परिस्थितियों से उत्पन्न अकेलेपन को तोड़ने की छटपटाहट पाठक की संवेदना को छू लेती है। उसकी सादगी ही मन-मस्तिष्क को झकझोर करती है।नहीं, अपितु पूरे समाज के अकेलापन को बयान करती है। सोमा बुआ का जवान बेटा जाता रहा और पति तीरथवासी हो गए। परिवार में और कोई ऐसा नहीं, जो उनके अकेलेपन को दूर कर सकता हो । सोमा बुआ अकेली रहने को विवश है। वह इस अकेलेपन को तोड़ने के लिए छटपटाती है। यहाँ तक कि, अपने मरे • बेटे की एकमात्र निशानी अंगूठी भी बेच देती है, ताकि देवर के ससुराल वालों को शादी में वह कुछ दे सकें। वह निमंत्रण आने की संभावना से जी-तोड़ बडी तैयारी करती है, पर उन्हें बुलावा नहीं आता है। आखिर अकेलेपन के जीवन के न्तर्गत सारा सामान सहेजकर अँगीठी जलाती है। सोमा बुआ एक ऐसी उपेक्षिता वृद्धा है, जो अकेलेपन से मुक्ति की तलाश में सब-के सब में सम्मिलित तो हो जाती है, पर कहीं भी जुड़ नहीं पाती है। पुत्रहीना वृद्धा धनहीन ही नहीं, बल्कि पति के यायावरी जीवन से भी समाज में मान-मर्यादा से वंचित रहती है। वह जी तोड कोशिष करती है, ताकि उसका अकेलापन दूर हो, पर वह अकेलेपन को ढोने के लिए अभिशप्त है। सोमा बुआ की परिस्थितियों से उत्पन्न अकेलेपन को तोड़ने की छटपटाहट पाठक की संवेदना को छू लेती है। उसकी सादगी ही मन-मस्तिष्क को झकझोर करती है।      भारतीय साहित्य में परिवार का एक महत्वपूर्ण स्थान रहा है। पुराने समय में लोग सुख-दुःख परिवार के साथ बाँटते थे पर आधुनिक काल में यह परिवार का भाव गायब हो गया है। वृद्ध नर-नारी इस समस्या को झेलते दिखायी दे रहे हैं। इस बदली हुई पारिवारिक स्थिति को मन्नू भंडारी की कहानी 'अकेली' में दिखाया गया है।        

'अकेली' मन्नू भंडारी द्वारा लिखी गयी एक मनोवैज्ञानिक कहानी है। इस कहानी में एक ऐसी औरत का वर्णन है जो अपने पति के होते हुए भी अकेली है। उस स्त्री का नाम सोमा है। लोग प्यार से उसे सोमा बुआ कहते हैं। इस कहानी में सोमा बुआ के मानसिक संसार का वर्णन किया गया है। उसका सोचना, अलग-अलग विषयों पर उसके के विचार, परिस्थितियों को वह किस प्रकार संभालती है ? आदि को इस कहानी में दिखाया गया है।


सोमा बुआ के इकलौते जवान बेटे हरखू की असमय मृत्यु हो गयी। मानो सोमा बुआ की जवानी चली गई। उसके पति तिरथवासी हो गए। उनके हरिद्वार चले जाने के बाद सोमा बुआ अकेली रह जाती है तथा वह अपने आप को समाज को सौंप देती है। वह सामाजिक कामों में अपना मन लगा देती है। वह सारी बिरादरी को ही अपना परिजन मानती है। उनसे जुड़कर अपने मन के घावों पर मरहम लगाती फिरती है पर कोई उससे जुड़ नहीं पाता। उसे अपनी जिंदगी पास-पडोस वालों के भरोसे ही काटनी पड़ती थी। किसी के घर मुंडन हो, छटी हो, जनेऊ हो, शादी हो या गम, बुआ वहाँ पहुँच जाती और छाती फाडकर काम करती थी। हर साल में एक महिने के लिए उसके पति आते थे और सोमा बुआ के सामाजिक कामों में रोक-टोक करते थे। पति-पत्नी को एक दूसरे के साथ और सहयोग की आवश्यकता जितनी वृद्धावस्था में होती है, उतनी शायद यौवन में नहीं पर उसी का समुचित सहवास न मिले तो वृद्धत्व अधिक खलने लगता है।


एक दिन सोमा बुआ अपने पति से कहती है कि समधी के यहाँ के किसी लड़की का विवाह भगीरथ जी के यहाँ      


    हो रहा है। सोमा बुवा पुराने रिश्ते की दुम पकडकर बुलावे की प्रतिक्षा की आस लगाए बैठती है। यहाँ तक की वह  


 सारी तैयारी में बडी उत्साह के साथ लगी रहती हैं, साडी में माड़ लगाकर सुखा देती है। शादी में देने के लिए एक नई थाली में साडी, सिंदूर-दानी, एक नारियल और थोडेसे बताशे सजाए रखती है। यह सारी तैयारी उसने अपने मरे हुए बेटे की एकमात्र निशानी, अँगूठी बेचकर की है। बुलावे की प्रतिक्षा में दिनभर वह इंतजार करती रहती है। मुहरत पाँच बजे का है, मगर इंतजार में कब सात बज गए इसका पता तक नहीं लगता। अंधेरा होने जा रहा है। राधाने सोमा बुआ को सचेत करने पर उसे सच्चाई का अहसास हो जाता है। अंत में बुलावा नहीं आया। अपने-आप को अवमानित, उपेक्षित बुढ़िया सोमा बुआ के तन-मन का उत्साह बुझ जाता है। वह अपनी चूडियाँ, थाली में सजाया सारा सामान और सारी चीजें बड़े जतन से संदूक में रख देती है और बुझे हुए दिल से अँगीठी जलाने लगती है।

चीफ की दावत -भीष्म साहनी

 (Dr. Eknath Patil)

F. Y. B. A. , HINDI  ,  Paper No - II  , Semester - II              

     चीफ की दावत  -भीष्म साहनी


भीष्म साहनी जी का जन्म सन 1915 ई. में रावलपिण्डी (पाकिस्तान) में हुआ। उन्होंने लाहौर के सरकारी कॉलेज से अंग्रेजी विषय लेकर एम. ए. किया। देश के विभाजन के वक्त उन्होंने काँग्रेस की रिलीफ कमिटी में काम किया और सालभर तक बम्बई में भी रहें। बाद में दिल्ली के कॉलेज में बे अंग्रेजी के वरिष्ठ प्रवक्ता पद पर काम कर रहे थे। कुल साल मास्को में उन्होंने विदेशी प्रशासन गृह में अनुवादक के रूप में कार्य किया। टॉलस्टॉय, आस्त्रावस्की आदि की रचनाओं का भी उन्होंने अनुवाद किया। कुछ सालों तक 'नई कहानियाँ' नामक कहानी पत्रिका का भी संपादन किया।


प्रकाशित रचनाएँ -


कहानी संग्रह - भटकती राख, भाग्यरेखा, पहला पाठ, पटरियाँ, वाडवू आदि। उपन्यास - झरोखे, कडियाँ, तमस, तमाचे आदि।


भीष्म साहनी जी मानवीय संवेदनाओं के कलाकार रहे हैं। आपकी कथाओं में निम्न तथा मध्यवर्गीय परिवारों के अंतरंग चित्र बडे मार्मिक रूप में प्रस्तुत हुए हैं। आपकी कथाशैली की व्यंग्य, करुणा आदि विशेषताएँ रही हैं। आपकी भाषा में हिन्दी, उर्दू और अंग्रेजी शब्दों का अनूठा प्रयोग मिलता हैं।


प्रस्तुत कहानी 'चीफ की दावत' भीष्म साहनी जी के व्यंग्य और करुणा के अपूर्व सम्मिलन से श्रेष्ठतम् बन गई हैं। कहानी का नायक पंजाबी युवक मिस्टर शामनाथ के आरमान पूरे होने के बजाय वह अंग्रेजी सभ्यता में ऐसा रंग जाता है कि, उसे अपनी अनपढ, गरीब माँ गँवार लगने लगती है। पार्टी के दौरान वह अपनी माँ को कोने की कोठरी में छिपाता है। पार्टी में हिन्दुस्थानी अफसर और उनकी अधकचरी औरतें इसे हँसी-मजाक का विषय बनाती हैं, किन्तु अंग्रेजी साहब द्वारा आत्मीयता दिखाने पर मिस्टर शामनाथ को अपनी माँ प्यारी लगती है। जो कि, उसकी उन्नति में साधन बननेवाली है।


प्रस्तुत कहानी बडी तेजी से बदलती दुनिया में मनुष्य के बदलते नाते-रिश्तें का जिक्र करते पाश्चात्य सभ्यता के अंधानुकरण पर तीखा व्यंग्य कसती है। साहब की हाँ-में-हाँ मिलानेवाले देशी अफसर, उनकी अधकचरी औरतें, भारतीय संस्कृति की गरिमा को भूलकर पाश्चात्य संस्कृति का अधूरा अनुकरण करने की प्रवृत्ति, माता-पिता के प्रति बच्चों के बर्ताव आदि बातों को लेखक ने सबल व्यंग्य के साथ प्रकट किया है। वस्तुत: माता-पिता अपनी संतान की भलाई के लिए साक्षात् त्याग की मूर्ति होते हैं। लेखक ने कहानी में माँ के चित्रण द्वारा करुणा को मार्मिक ढंग से सफलतापूर्वक साक्षात् किया है। फलतः प्रस्तुत कहानी व्यंग्य और करुणा के अपूर्व सम्मिलन से युक्त,

पर प्रासंगिक बन गई है।


शामनाथ एक दप्तर में काम करते हैं। अपनी तरक्की के लिए चीफ को प्रसन्न करने के उद्देश्य से वे उन्हें अपने घर दावत पर आमंत्रित करते है। उनके चीफ एक अमेरिकन व्यक्ति है, अत: उन्हे प्रसन्न करने के लिए घर का पूरा वातावरण उसी रूप में प्रस्तुत करने के लिए शामनाथ और उनकी पत्नी निरंतर लगे हुए हैं। कहाँ, कब, कैसे, क्या रखना, लगाना, सजाना है, इसी तैयारी में पूरा समय व्यतित हो रहा था पर अचानक माँ का ध्यान आ गया। माँ का ध्यान आते ही दोनों पति-पत्नी बेचैन हो उठते हैं। माँ बूढी हो गयी है, अत: चीफ के सम्मुख उनका होना किसी भी दृष्टि से उचित नहीं होगा। दोनों विचार करते हैं कि माँ को कहाँ भेज दिया जाये? कभी कोठरी में, कभी बरामदे में तो कभी उनकी सहेली के पास भेजे जाने का प्रस्ताव एक-एक करके नकारे जाते हैं। अंतत: निश्चय किया जाता है कि माँ बेटे के पसंद के कपड़े पहनकर, जल्द ही खाना खाकर अपनी कोठरी में चली जायें और साथ ही ध्यान रखें कि वे सोयें नहीं क्योंकि उनकी खर्राटे लेने की आदत है।


डरी सहमी माँ बेटे की हर बात को सिर झुकाकर स्वीकार करती है। वह गाँव में रहनेवाली एक अनपढ़ और है जो प्रत्येक स्थिति में बेटे का ही भला चाहती है। शर्मिली, लजीली, धार्मिक विचारों वाली माँ को कुर्सी पर ढंग से बैठने का तरीका भी सिखाया जाता है, क्योंकि अगर कहीं गलती से साहब का माँ से सामना हो जाये तो शामनाथ को शर्मिन्दा न होना पड़े।


साहब और उनके सभी साथी लगभग आठ बजे तक पहुँच गए। विस्की का दौर चलने लगा। दफ्तर में रौब रखने वाले साहब यहाँ पूरी तरह से मुक्त व्यवहार कर रहे थे। पीना पिलाना समाप्त होने पर सभी खाना खाने के लिए बैठक से बाहर जा रहे थे कि अचानक सामने कुर्सी पर बैठी, सोती हुई माँ सामने पड गई। माँ पर बेटे को बहुत क्रोध आया पर मेहमानों के सामने कुछ भी नहीं कह पा रहे थे। शामनाथ साहब के लिए परेशान थे पर साहब तो अलग  प्रवृत्ति के व्यक्ति निकले। उन्होंने माँ से हाथ मिलाया गाना सुना विदेशी साहब के इस उन्मुक्त व्यवहार के कारण देसी साहब भी माँ को उसी दृष्टि से देखने लगे पर माँ लज्जा के कारण अपने में सिमटती जा रही थी। साहब के कहने पर उन्होंने एक पुरानी फुलकारी भी लाकर दिखाई। माँ के इस कार्य से प्रसन्न साहब चाहते है कि माँ उनके लिए एक नई फुलकारी बनाकर दें। हिचकिचाते हुए माँ उनके इस अनुरोध को स्वीकार करती है। बेटे की तरक्की का प्रश्न है इसलिए आँखों की रोशनी कम होने पर भी इसके लिए प्रयत्नशील होने का वायदा करती है। वे तो सब कुछ छोड़कर हरिद्वार जाना चाहती थी, पर इस परिस्थिति में उन्हें अपना इरादा बदलना पड़ा। इसके बाद शामनाथ निश्चिंत होकर पत्नी के साथ अपने कमरे में चले गए और माँ भी चुपचाप अपनी कोठरी में लौट गई।


कथानक की दृष्टि से यह कहानी प्रेमचंद परंपरा का ही विकास है। कहानी प्रायः अनुभूति का अभिव्यक्तिकरण होती है। 'चीफ की दावत' में घटना छोटी-सी है गहराई से देखने पर यह स्पष्ट होता है कि घटना का विकासक्रम अत्यंत स्वाभाविक है। चीफ का माँ को देखना लजा का नहीं गौरव का विषय बन गया और वहाँ से घटना ने अप्रत्याशित मोड लिया पर कहानी अभी और भी है। दावत के बाद शामनाथ का माँ के पास आना-कथानक की दूसरी विशेषता है। पहली विडंबना है माँ का फालतू सामान होना। दूसरी है पुत्र की उन्नति के लिए हरिद्वार जाने की इच्छा की बली देकर फुलकारी बनाने के लिए तैयार होना। जो माँ आत्मग्लानि बश अपने कमरे फूट-फूटकर रोती है, वहीं पुत्र की तरक्की की बात सुनकर खिल उठती है। माँ के चेहरे का रंग बदलने लगा, धीरे-धीरे उनका झुर्रियों भरा मुँह खिलने लगा, आँखों में हल्की-हल्की चमक आने लगी।

गोशाला चारा और सरपंच (व्यंग्य)

 (Dr Eknath Patil)

गोशाला चारा और सरपंच (व्यंग्य)


- शंकर पुणतांबेकर


लेखक परिचय :


आधुनिक हिंदी व्यंग्य साहित्य को बहुमुखी बनाकर आलोकित करनेवाले प्रतिभाशाली व्यंग्य लेखकों में अग्रणी डॉ. शंकर पुणतांबेकर का जन्म 26 मई, 1925 को मध्य प्रदेश के गुणा जिले में कुंभराज गाँव में हुआ। विदिशा, ग्वालियर, आगरा आदि स्थानों से एम. ए., पीएच. डी. प्राप्त करने बाद वे विदिशा (मध्यप्रदेश) तथा जलगाँव (महाराष्ट्र) में प्राध्यापक पद पर कार्यरत रहे। उन्होंने बडी सूक्ष्मता और सांकेतिकता के साथ नये सामाजिक यथार्थ और विसंगतियों को अपने व्यंग्य लेखन द्वारा वाणी दी है।


'मेरी फाँसी', प्रकाशित रचनाएँ- 'शतरंज के खिलाडी', 'दुर्घटना से दुर्घटना तक', 'कैक्टस के काँटे', 'प्रेम विवाह', 'विजिट यमराज की', 'अंगूर खट्टे नहीं है', 'पतनजली', 'एक मंत्री स्वर्गलोक में' आदि।


पुरस्कार 'मुक्तिबोध', 'अहिन्दी भाषी साहित्यिक', 'अक्षर साहित्य सम्मान', 'व्यंग्य श्री', 'कला-संस्कृति समाजसेवी' आदि।

  प्रस्तुत व्यंग्य रचना में गाँव का सरपंच ज्वालाप्रसाद गोशाला की गार्यो को दिये जानेवाले चारे में भ्रष्टाचार करता है। गाँव का पढ़ा-लिखा साक्षर युवक रामदास सरपंच के भ्रष्टाचार को प्रकाश में लाकर गाँव में प्रबोधन करने का प्रयास करता है तो उसे सरपंच के द्वारा धमकाया जाता है। सरपंच का पाला हुआ गुंड़ा कल्लू भी आगे चलकर उसका साथ नहीं देता और सरपंच की पत्नी भी उसकी निंदा करती है तो वह बौखला जाता है। चुनाव में किसी ज्योतिषी के कहने पर एक बैल को चुनाव का चिन्ह बनाकर ज्वालाप्रसाद चुनाव तो जीत जाता है किंतु इसके बाद चारा घोटाले की पूँछताछ के दौरान क्रोध में आकर प्रतिबंध करनेवाले पटेल पर किसी जानवर की तरह टूट पड़ता है। हराम के चारे से ज्वालाप्रसाद की दबंगगिरी समाप्त होकर वह खुद साँड़ बन जाता है/                                                 एक गाँव की गोशाला में स्थित गायों की यह शिकायत थी कि उन्हें पेटभर चारा नहीं मिलता है। गोशाला के निरीक्षण करनेवाले निरीक्षकों से वे अपनी शिकायतें सुनाती थी। उनके मतानुसार वहाँ का रखवालदार चारा खाता था । वास्तविकता यह थी कि इन भूखी गायों की आवाज निरीक्षकों तक नहीं पहुँचती थी क्योंकि असली घोटाला तो वहीं पर था। जो लोग इन निरीह गार्यो के चारे की मलाई बीच में हाथ मारकर खा रहे थे, वो उनकी आवाज कैसे सुन सकते थे?

गाँव का साक्षर नौजवान रामदास गायों पर होनेवाले इस अन्याय से अस्वस्थ हो गया। इन निरीह गायों को न्याय देने का निर्णय उसने ले लिया। वह गाँव के बच्चों को पढ़ाता था। गाँव की पाठशाला में रामदास अध्यापक बनने के लिए इच्छुक था पर सरपंच का दूर का कोई रिश्तेदार सरपंच ज्वालाप्रसाद के कारण वहाँ अध्यापक बन गया  /रामदास मात्र अभी तक नौकरी की खोज कर रहा था।

रामदास गायों के चारे में हो रहे भ्रष्टाचार को प्रकाश में लाने तथा गाँववालों का इसके बारे में प्रबोधन करने के लिए ढोल को गले में लटकाकर प्रभात फेरी निकालकर तीखे स्वरों में लोगों को अपना मन का आक्रोश सुनाने लगा। इससे गाँव के लोग प्रभावित हुए। 

कुछ लोग तो रामदास की इस कृति से डर गये, विशेषतः गाँव में स्थित वृद्ध लोगों को लगा कि रामदास सरपंच से बहुत बड़ी दुश्मनी मोल रहा है। सच्चाई तो यह थी कि गोशाला का रखवालदार गोबरधन और सरपंच ज्वालाप्रसाद की मिलीभगत से ही गाँयों के चारे में भ्रष्टाचार हो रहा था। बड़े बूढों के समझाने पर भी रामदास चूप नहीं बैठ सकता था। रामदास सोचता था कि चूप बैठने पर यह उन गार्यो के प्रति बड़ी संवेदनशून्यता होगी।

रामदास के प्रबोधन से सरपंच ज्यालाप्रसाद क्रोधित हुआ। सरपंच के कारण किसी जमाने में नेक और ईमानदार रहनेवाले गोबरथन की नियत को बिगाड़ दिया था। प्रारंभ में प्रामाणिकता से रखवालदारी करनेवाले, भगवान से डरनेवाले गोबरधन को एक दिन सरपंच ने लात मारकर नौकरी से निकालने की धमकी दी तो अपने बच्चों के भूखे मरने की कल्पना से वह मजबूरन यह भ्रष्टाचार करने के लिए राजी हो गया।ज्वालाप्रसाद रामदास के गाँव में स्थित प्रचार-प्रसार से बहुत क्रोधित हुआ था। उसने रामदास को बार-बार बुलावा भेजा किंतु रामदास नहीं आया। इससे वह और भी क्रोधित होकर सोचने लगा कि दो कौडी का आदमी होकर भी इतनी घमंड कहाँ से आ गयी? आखिर सरपंच ने खुद रामदास के यहाँ जाकर उसे धमकाया कि रामदास ने सरपंच के खिलाफ गाँववालों को भड़काना बंद नहीं किया तो इसका परिणाम अच्छा नहीं होगा। रामदास ने भी उल्टे जबाब में सरपंच को खरी-खोटी सुनाकर उसकी शिकायत जिला बोर्ड में करने की बात कही। घर लौटते ही ज्वालाप्रसाद रामदास को सबक सिखाने के बारे में सोचने लगा और उसने कल्लू को बुलाया। कल्लू ज्वालाप्रसाद का पाला हुआ गाँव का गुण्डा था। सरपंच के आदेश पर किसी को पीटना, दंगा-फसाद करना, आग लगाना आदि कुकर्म वह करता रहता था। कल्लू के आनेपर ज्वालाप्रसाद ने उसे रामदास को खूब पीटने को और उसकी आवाज को दबाने की बात कही तो सरपंच की आँखों में आँखें डालकर कल्लू ने रामदास का पक्ष लिया।  गोमाता के चारे में भ्रष्टाचार को भी जानता था इसलिए उसे रामदास की कृति यथायोग्य लग रही थी। उसे यह भी पता था कि सरपंच ने गाँव के रास्ते, पुल, कुएँ यहाँ तक की पब्लिक संडास में भी पैसे खाकर भ्रष्टाचार किया था। गाय तो भगवान का रूप थी। उन मूक जानवरों के चारे में किये जानेवाले भ्रष्टाचार को देखकर कल्लू सरपंच पर थूकता है, उसकी निंदा करता है .ज्वालाप्रसाद जब कल्लू को हवालात में बंद करने की धमकी देता है तो उल्टा कल्लू भी सरपंच से सभी पोल खोलने की बात कहकर रामदास को पीटने से इन्कार करता है। इससे ज्वालाप्रसाद बेबस बन जाता है।ज्वालाप्रसाद गाँव में दुकान चलाने के साथ-साथ साहुकारी करता था। चुनाव नजदीक आने पर सरपंच एक ज्योतिषी के कहने के अनुसार एक बैल खरीदता है। बैल को चुना में चिन्ह बनाकर चुनाव जीत जाता है। विरोधी उम्मीदवार को हराकर जीतनेपर सरपंच की पत्नी उस पर व्यंग्य करके निंदा करती है। पत्नी को लगता है कि अब गधे चुनाव हारकर बैल जीतने लगे हैं। कुछ दिनों के बाद सरपंच के ध्यान में यह बात आती है कि उसके द्वारा खरीदा गया वह बैल चारा नहीं खा रहा है तो सरपंच ने ज्योतिषी को बुलाया। ज्योतिषी के मतानुसार वह बैल सामान्य नहीं, खानदानी था। चुनाव जीतने के बाद वह सामान्य चारा नहीं खा सकता था। उसके लिए भ्रष्ट चारा आवश्यक था। अब सरपंच के सामने गोशाला के चारे के सिवा और कोई पर्याय नहीं था। बैल को चोरी का चारा हाथ मारकर खिलाया गया।


कुछ दिनों बाद गोशाला की गाय मर गयी। रामदास को इस घटना का पता चलने पर उसने सभी ग्राम निवासियों को गाय की भूख से मरने की बात को लेकर सचेत किया। गोवरधन और ज्वालाप्रसाद ने गाय की मृत्यू भूख से नहीं बल्कि बीमारी से होने का प्रतिवाद किया। आखिर रामदास ने ज्वालाप्रसाद की शिकायत जिला बोर्ड से की। ज्वालाप्रसाद ने इस शिकायत को साम-दाम-दण्ड-भेद से दबाने का प्रयास किया पर बात जब समाचारपत्रों तक पहुँच गयी तो पूरे मामले की जाँच के आदेश दिये गये। जाँच की जिम्मेदारी गाँव के पटेल को सौंपायी गयी। पटेल ने गोशाला पहुँचकर छानबीन का काम आरंभ किया। ज्वालाप्रसाद पटेल को उल्टे-सीधे जवाब देने लगा तो पटेल ने सीधे ज्वालाप्रसाद के घर जाकर तलाश करने का काम शुरू किया। पटेल को उसके घर से चारे की गंध आने लगी।


पटेल ने बाहर के आंगन की कोठरी खोलने का आदेश दिया तो कोठरी के ताले की चाबी बेटे के पास होने और बेटा शहर चले जाने का कारण ज्वालाप्रसाद आगे करता है। पटेल ताले को तोड़ता है तो उसकी आँखे आश्चर्य से बड़ी हो जाती हैं क्योंकि पूरी कोठरी चारों तरफ से चारे से भरी हुई नजर आती है। इस पर सवाल पूँछते ही ज्वालाप्रसाद जानवर की तरह पटेल पर ऐसे झपटता है जैसे कोई खूँखार पशू अपने शिकार पर टूट पड़ा हो। रामदास सहित सभी ग्रामवासी सरपंच ज्वालाप्रसाद की इस प्रतिक्षिप्त क्रिया को देखते हैं। उनको लगता है कि गोशाला के हराम के चारे ने ज्वालाप्रसाद को साँड़ बना दिया है।इस प्रकार अंत में पता चलता है कि, व्यक्ति का कार्य जिस प्रकार का होता है, उसकी प्रवृत्तियाँ भी उसी कार्य के अनुसार बनती हैं।

शिवकालीन उद्योग

 शिवकालीन उद्योग

B.A.I. Paper II History

शिवकालीन उद्योग

शिवकाळात खेडी स्वयंपूर्ण होती शेती हा मुख्य व्यवसाय होता. त्यासाठी लागणाऱ्या साधनांची उपयोग व्यवसाय ग्रामीण भागात सुरू होते. शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा हे कसबी कारागीर गावातच पूर्ण करत असत. त्या कारागिरांना मोबदला म्हणून आवश्यक ते धान्य शेतकरी आपल्या उत्पादनातून देत असत. कारू- नारू अर्थातच बलुतेदार आणि आलुतेदार हे गावाच्या बहुतांश गरजा पूर्ण करत होते पण तरीही काही आवश्यक बाबी तत्कालीन समाजाला ज्या होत्या त्या भागविण्यासाठी बाजारपेठा होत्या आणि या बाजारपेठांच्या हेतूने अनेक ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू होते हे कुटीरोद्योग तत्कालीन अर्थव्यवस्थेला हातभार लावत होते लोकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करत होते.

शेती बरोबरच खेड्यात अनेक प्रकारचे उद्योगधंदे प्राचीन काळापासून अस्तित्वात होते आर्थिक दृष्ट्या देश स्वयंपूर्ण होता त्यामुळे फारशी आयात करावी लागत नव्हती निर्यात मात्र भरपूर गोष्टींची होत होती शिव कालखंडामध्ये कापड जातो मीठ मत्स्य लाकूड काम अन्नधान्य यांचे निर्यात केली जात होती आणि या बहुतांश गोष्टींची उद्योग अस्तित्वात होते.

    कापड उद्योग--

  भारतातील कापड उद्योग हा सर्वात जुना अतिप्राचीन असा होता. सुती कापड, रेशमी कापड, लोकरी कापड, ताग-घायपातापासून चे कापड तयार करण्याच्या पद्धती या पारंपरिक स्वरूपाच्या होत्या. शेतातील कापूस वेचून त्यातून कापूस व बिया सुट्ट्या करून चरख्यावर त्या कापसाचे धागे तयार करून हातमागावर विणकाम करून हिरडा व अन्य नैसर्गिक गोष्टींचा वापर करून देणा रंग दिला जाईल आणि हे कापड देशात तसेच परदेशातील पाठवले जाई. 

    तत्कालीन स्त्री-पुरुषांच्या वेशभूषा मध्ये वैविध्यता होती स्त्रिया सुती रेशमी साड्या विविध प्रकारच्या चित्रांचे कपडे व साड्या वापरत असत. पण इतर जगप्रसिद्ध साडी निर्मितीचे केंद्र होते याशिवाय सासवड, सुपे, टाकळी इत्यादी ठिकाणी धोतराचे उत्पादन होई. नागपूर, माहेश्वर, आष्टी, चांदवड, सोलापूर, नागपूर, सासवड, नांदेड, शहादा जुन्नर, धनबाद, कोल्हापूर ही कापडनिर्मिती चे चांगली केंद्र होती.

   धातू उद्योग--

 लोखंड, तांबे, पितळ या धातूपासून वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवल्या जात लोखंडापासून शेतीची अवजारे, लष्करी साहित्य, शस्त्रे, कुलपे, तोफा बनवल्या जातात तांबे पासून भांडी बनविणे, देवळांचे कळस, मूर्ती तयार करण्यासाठीही धातूंचा वापर होईल सोने, चांदी, तांबे, यापासून टाकसाळीत तयार केली जात असे सोने, चांदी, हिरे, रत्न पासून दागिने बनवले जात.

मीठ उद्योग--

 समुद्र किनाऱ्यावरील मिठागारा मध्ये मीठ तयार करण्यात येत असे. मीठ आणि मच्छीमारी हे कोकण किनाऱ्यावरील दोन मोठे उद्योग होते. रत्नागिरी, ठाणे, कुलाबा, पेण, पनवेल, ठाणे, कल्याण, भिवंडी या ठिकाणी मिठागरे होती. येथे तयार होणाऱ्या मिठास देशावर मोठी मागणी होती. पण या मीठ उद्योगास बारदेश होऊन येणाऱ्या मिठाची स्पर्धा करावी लागे. त्यामुळे कोकणातील मीठ उद्योग धोक्यात आला होता. तो सावरण्यासाठी शिवाजी महाराजांनी परदेशी मिठावर ज्यादा जकात बसवली व स्वराज्यातील मीटर उद्योगाला चालना दिली.

मत्स्योद्योग--

समुद्रकिनारा, नदी, खाडी, तलाव या ठिकाणी मत्स्योद्योग चालत असे. हा उद्योग प्रामुख्याने कोळी लोक करत असत. रोहा, पेण, पनवेल, नागोठणे, कल्याण, भिवंडी येथे उद्योग भरभराटीस आणला होता सुकवलेली व खारवलेली मासळी देशावर विक्रीसाठी निर्यात होत असे.

जहाज बांधणी उद्योग--

शिवरायांची स्वराज्य जेव्हा मोरे ना जिंकले तेव्हा स्वराज्याची हद्द समुद्राला लागली. आणि समुद्रावरील परकीय सत्तांची जाणीव झाली. या सत्तांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोकणात जहाज उद्योगाची सुरुवात केली. भारतीय आरमाराची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. कोकणात मोठ्या संख्येने उपलब्ध असलेले सागाचे लाकूड आणि इतर आवश्यक लाकूड सामान जमा करून शिवाजी महाराजांनी गुराब, गलबत, पाल, शिबाड, तारू, तरांडे, मचवा,तिरकाठी इत्यादी प्रकारची जहाजे बांधण्यास सुरुवात केली रोहा, बाणवली,मालवण, देवगड, राजापूर, पनवेल, कल्याण, भिवंडी इत्यादी ठिकाणी जहाजबांधणी व दुरुस्तीचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु झाला.

  या सर्वां बरोबरच प्राथमिक जे गाव पातळीवर जे छोटे लघु उद्योग किंवा गृह होते त्यांचा विचार केला तर बलुतेदार अर्जदार यांच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी चे लघुउद्योग प्रत्येक गावात होते. तसेच प्रत्येक किल्ल्यावर शास्त्र निर्मितीसाठी शस्त्रागार होते.

मराठे कालीन अर्थव्यवस्था

 (Dr Dhere V. D.)

मराठे कालीन अर्थव्यवस्था

B.A.I. Sem. II History Paper No II 

मराठे कालीन अर्थव्यवस्था ( कृषी)

शिवकाळाचा अभ्यास करताना आपणास तत्कालीन अर्थव्यवस्था जाणून घेणे महत्वाचे आहे. त्या काळात अर्थव्यवस्थेचा भर बहुतांश शेतीवरच होता त्यामुळे शेती योग्य ठिकाणी गावचे वसाहत आणि शेतीचे उत्पन्न या बाबत आपणास विचार करावा लागतो. शिवकाळात लोक वस्ती करून ज्या घट्ट जमिनीवर घरे बांधून राहत त्यास पांढर किंवा गाव पांढरी असे म्हणत त्या लोकांची गुजराण ज्या शेतीवर होत असे त्या शेतीला काळी आई असे म्हणत असत. शेतीचे दोन प्रकार होते त्यास लागवडीखालील जमीन व वाजट जमीन असे म्हणत असत. शिव काळात एकूण तीन वेळा जमिनीची मोजणी करण्यात आली होती. मोजणीसाठी शिवशाही काठी हे साधन वापरले जात होते. जमिनीची प्रत व प्रतवारी करताना अवल सिम धूम व वाजत किंवा चारून असे चार प्रकार केलेले होते.

शिवकालीन कृषी व्यवस्था

 शेतकरी

शिव काळात शेती हाच जीवनाचा प्रमुख अर्थ प्राप्तीचा मार्ग होता तसेच जमीन महसूल हा राज्यातही मुख्य स्त्रोत होता बहुतांश कृषी व्यवस्था रयतेच्या हिताची होण्यासाठी शिवाजी महाराजांनी जमीनदारांचे जमीनदारी चे हक्क काढून घेतले जहागीर पद्धत बंद केली जमिनदारी ऐवजी रयतवारी पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे सामान्य शेतकरी व राजा यांचा प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला जमीन मोजणी नंतर त्याचे धारे म्हणजे प्रत्यक्ष खाते उतारे तयार करण्यात आले. त्यामुळे जमिनीचा किती वापर केला जातो? कोण करतो? कशासाठी करतो? येणारी पिके कोणती? याबाबतची सविस्तर माहिती लेखी माहिती उपलब्ध झाली. शेतकऱ्यांना दुष्काळ काळात किंवा नवीन शेती लागवडी खाली आणण्यासाठी तगाई हे शासकीय कर्ज देण्याची पद्धत सुरू केली. तगाई जनावरे अवजारे बी-बियाणे यासाठी अत्यल्प व्याजदराने तगाई हे कर्ज शेतकर्‍यांना दिले जात होते.

मिरासदार

  गावातील पूर्वापार रहिवासी ज्यांच्या मालकीची शेतजमीन आहे आणि जे ठराविक शेत्सरा सरकारला भारतात अशांना मिरासदार असे म्हटले जाईल मिरासदार जमिनीचे मालक असल्याने त्यांचा सन्मान गावात केला जाईल सभा व्यवस्था इत्यादी ते भाग घेत त्यांना काही ठिकाणी स्थळकरी असेही म्हटले जाई.

उपरे

गावचे रहिवाशी मात्र ज्यांना स्वतःची जमीन नाही ते दुसर्‍याची जमीन खंडाने भागाने अथवा मोलमजुरी करतात किंवा बाहेरून बाहेरील गावातून येऊन या गावातील जमीन कसतात या लोकांना उपरे असे संबोधले जाई.

    जमिनीला भुमाता असे समजले जाईल जे उपजाऊ केल्याने शेतकरी हा उत्पादक घटक असे. कागदपत्रात शेतकऱ्यांचा उल्लेख कुणबी,रयत असा केला जाई.

 बलुतेदार व अलुतेदार (कारू/ नारू)

शेतीच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अवजारांची व विविध लोकांची मदत होत असे त्यापैकी करू किंवा बलुतेदार म्हणजे शेतीसाठी आवश्यक सेवा पुरवणारे लोक होय यांना त्यांच्याकडून घेतलेल्या वर्षभरातील सेवेचा वार्षिक मोबदला म्हणून बलूते दिले जाई.  कारागिरा प्रमाणेच अन्य सेवा ही गावात आवश्यक असत मिळत त्या सर्वांना आलुतेदार असे म्हटले जाई. बलूत्याच्या प्रमाणात आलुते हे अत्यल्प असे मात्र ते दिले जात असे. बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार असत.

जमीन धरणीच्या प्रमुख तीन पद्धती होत्या त्यामध्ये

 पहिली पद्धत मिराशी किंवा तालवाहिका

मिराशी शेतकऱ्याला जोपर्यंत तो सरकारी शेतसारा करतो तोपर्यंत त्यास जमिनी पासून वंचित करता येत नसे त्याच्याकडून जमीन काढून घेतली जात नसे.


 दुसरी पद्धत उपरी 

खंडाने किंवा तात्पुरती कसण्यासाठी जमीन घेऊन ते कसणारे बसण्याची पद्धत म्हणजे उपरी उपरी ला हा अधिकार होता मात्र जमिनीची मालकी नव्हती.


तिसरी हे वतन जमीन धारणा पद्धती होती.

ग्राम अधिकारी व कारागीर यांना वतन जमीन मिळत असे.


मराठी कलिन कृषी तंत्र

तत्कालीन शेतीचा विचार करता बैलजोडी शेतीची अवजारे बी-बियाणे खते व साधने याद्वारेच शेती फसवणूक केली जात असे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत होता प्रामुख्याने शेती ही पावसावर अवलंबून होती काही शेती पटस्थळ किंवा मोठस्थळ म्हणजे बागायती देखील होती.

मनुष्यबळ

शेतीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती शेतकरी आपल्या शेतात सहकुटुंब कसवणूक करत असे. काहीवेळा त्यासाठी इतरांची मदत घेतली जात असे त्याला पैरा असे म्हणतात.

बैल जोडी

पशुधन हे शेतीसाठी आवश्यक होते बैलजोडी द्वारे नांगरणी व इतर शेतीची कामे केली जात असत युद्धजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांची जनावरे पळवून नेले जात असे शेती मोडकळीस येत असे थोडक्यात गाई-बैल याद्वारे शेती होते हे लक्षात घेऊन शिवरायांनी त्यांच्या रक्षणाकडे विशेष लक्ष दिले.

अवजारे

शेती व्यवसायासाठी अवजारांची गरज होती त्यासाठी बलुतेदारांची मदत घेतली जात असे नांगरणीसाठी नांगर, कुळव, तिफण, कोळपा, निलंगा, पाटे इत्यादी लोहार सुतार बनवत असत तर त्यासाठीची चर्म साहित्य हे  चांभारा कडून घेतले जाई. पाभर वगैरे कुंभाराकडून घेतली जाई.

बी-बियाणे/ बेवळा

शेतकरी आपल्या उत्पादीत धान्य मधूनच  बी-


Dhere Sir, [26.05.21 10:55]

बियाणे बेवडा चांगल्या प्रकारे काढून वेगळे काढून ठेवत असे ते काळजीपूर्वक जपले जाईल एकमेकास बी-बियाणे देताना ते दीड च्या दराने दिले जाईल बियाण्यांसाठी गरजू शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत म्हणजेच तगाई दिली जाई.

खते

 शेती उत्पन्न चांगले येण्यासाठी शेतकरी शेणखताचा वापर करत असे. त्यासाठी त्याचे स्वतःचे जित्राब म्हणजे गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, गाढव इत्यादी या पशुधनाच्या मलमूत्र पासून खत तयार करून ते शेतात टाकले जाई.

  बहुतांशी शेती ही पावसावर अवलंबून होती त्यामुळे मोसमी पाऊस सुरू होण्या अगोदर जमीन तयार करून ती पेरणीयोग्य करून त्याची पेरणी केली जाई. रोहिणी नक्षत्रातच पेरणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असे.

शेत जमिनीचे प्रकार


शेत जमीनीचे एकूण चार प्रकार केले होते ज्यामध्ये 

अव्वल,

 सिम,

 दुम 

आणि चारहुम किंवा वाजट

अव्वल

ज्या जमिनीतून हमखास दरवर्षी चांगले उत्पादन येईल अशा जमिनीस अव्वल जमीन असे म्हटले जाई. यात पुन्हा दोन उपप्रकार होते.१) बागायती २) जिरायती.

१.१ बागायती जमिनी चे पुन्हा दोन उपप्रकार पडतात.  पटस्थळ.  -- डोंगर उंचवट्यावर पाणी पाटाने अथवा तलाव, कालवा यातील पाटाने पाणी आणून जी जमीन सिंचित किंवा बागायत केली जात असे त्या जमिनीचा  पाटस्थल असे म्हणतात

१.२. मोटस्थळ.-- जे शेतकरी स्वतःची विहीर काढून त्या विहिरीला मोट जोडून त्याद्वारे शेती सिंचित बागायती करत असत अशा जमिनीस मोटस्थल जमीन असे म्हणत.

 सिम 

ज्या जमिनीत सलग प्रत्येक वर्षी पीक न येता एखादे वर्ष पडीक केल्यानंतर किंवा वेगळे पीक घेतल्यानंतर उत्पादन येते अशी जमीन म्हणजे सिम जमीन होय.

दुम

जी जमीन एकदा कसं पीक घेतल्यानंतर पुन्हा एक, दोन, किंवा तीन वर्षे पडीक टाकावी लागते त्यानंतरच पीक उत्पादन घेता येते अशा जमिनीस दुम जमीन असे म्हणतात.

  चारहुम किंवा वाजट

ही जमीन खडकाळ आहे ज्यात गवतात शिवाय काही उत्पादित होत नाही अशा जमिनीस वाजट किंवा चारहुम जमीन असे म्हणतात.

जिरायत जमिनीत शक्यतो सर्वसाधारण पिके घेतली जात तर बागायती जमिनीत ऊस, हळद, कापूस, भाजीपाला इत्यादी नगदी पिके घेतली जात.

कृषी उत्पादने

दैनंदिन वापरासाठी लागणारे सर्व उत्पादने शेतकरी आपल्या शेतीच्या मगदुराप्रमाणे उत्पादित करत असे. ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, राळे, बार्गा,गहू, जवस, तेलबिया. कडधान्य ज्यामध्ये मूग, मसूर, तूर, उडीद, मटकी, हुलगा इत्यादी डाळ वर्गीय पिके.

विविध प्रकारची फळे महाराष्ट्रात उत्पादित होत असतात त्यामध्ये कोकणात आंबा, फणस,कोकम  तर देशावर चिंच, बोर, लिंबू, केळी इत्यादी.

नगदी पिके /व्यापारी पिके

शेतकऱ्याला रोख पैसा किंवा नगर मिळवून देणारी पिके हीसुद्धा आवश्यक होते व त्यानुसार आपल्या शेतीच्या मगदुरानुसार शेतकरी ही व्यापारी पिके घेत असे.

ज्यामध्ये कापूस, ऊस, खाऊची पाने, मसाल्याचे पदार्थ तेलबिया,   भुईमूग शेंग, करडई, सुंठ, मिरची, कांदा, लसूण, खोबरे, वेलदोडे, गुळ, खडीसाखर, तूप, मध, मोहरी, आणि इतर पिके. तंबाखू, हळद, नारळ-सुपारी इत्यादी घेत असे. 


सरकार गावातील काही जमिनी या इनाम जमिनी देतसे ज्‍यामध्‍ये खालील कामांचा समावेश होता.

सनदी इनाम/ दीवान निसबत इनाम.

शासकीय कामासाठी ज्या लोकांची नेमणूक केली जाईल त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हे सनदी ईनाम दिली जात असे ही जमीन शेतसाऱ्यात सवलत असणार होती.

देवस्थान इनाम

साधुसंत फकीर मठ मंदिरे मशिदी इत्यादींना दिलेले उत्पादन योग्य जमीन इनाम जमीन.

अग्रहार ईनाम

ब्रह्म वृदास अथवा एखाद्या ब्राह्मणास शिक्षण हेतूने दिलेले ईनाम म्हणजे अग्रहारी ईनाम होय.

बलुतेदारांना दिलेली इनाम जमीन

पाटील कुलकर्णी देशमुख शेटे महाजन देशपांडे इत्यादींना अक्कल आजबे यांचा विचार करता इनाम जमिनी दिली जात असे.महाराना हाडकी हाडोळा व म्हारकी इनाम जमीन दिली जात असे. सुतार की भटकी सोनार की परीट की या नावाने उल्लेख आढळणारे जमिनी या त्या त्या व्यवसायिकांना इनाम दिलेली असत.

इतर इनाम जमिनी

राजा आपल्या लेकिस दूध-भात किंवा साडी-चोळी इनाम देत असे सैनिकांच्या आईला किंव्हा बायकोस राजाकडून   सोळकर चोळखण इनाम दिले जाई. युद्धामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांनाही इनामी जमीन दिली जात असे.

जमीन मोजणी

  शिवशाही काठी या द्वारे शिवकाळात जमिनीची मोजणी केली गेली. ही काठी पाच हात पाच मुठीआणि तीन तांसु इतक्या लांबीची होती. वीस चौरस काठ्याचा एक पांड तयार केला जाई. 20 पांडाचा मिळून एक बीघा तयार होईल 20 चौरस बिघे यांचा एक चावर निर्माण होई. जमीन मोजणी साठी सरकारी अधिकारी व गावातील महार या वतनदारांची मदत होत असे.

सारा आकारणी..

शिवकाळात सरकारने  प्रतवारीनुसार  सारा आकारणी केली होती. जमिनीचे चार प्रकार केले होते. त्यानुसार सारा आकारणी केली जात असे त्यास धारा आकारणी असेही म्हटले जात असे.इ.स.१६३६ मध्ये पहिल्यांदा पुणे जहागिरीची जमीन मोजणी  दादोजी कोंडदेव ने केली.इ.स.१६४८ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी पुन्हा मोजणी केली तर


Dhere Sir, [26.05.21 10:55]

इसवी सन१६७८ मध्ये अण्णाजी दत्तो यांनी तिसऱ्यांदा मोजणी केली.

सारा करण्याचे प्रमाण हे जरी प्रतवारीनुसार असले तरी येणाऱ्या उत्पन्नातून दोन प्रकारे शेतसारा शेतकरी भरू शकत असे.

१)  नक्त   २) बटाई

येणाऱ्या उत्पन्नाचे पाच भाग करून तीन भाग शेतकऱ्याला तर दोन भाग सरकारात  ( २/५)शेतसारा म्हणून जमा करावे लागत असत. तत्कालीन कागदपत्रांत `राजभाग पाचदुई` असा उल्लेख आढळतो.

१)  नक्त =  नक्त म्हणजे रोख स्वरूपात पैशाच्या स्वरूपात शेतसारा भरणे.

ऊस, फळे, आले, हळद, कापूस इ. नगदी पिकांवर नक्त सारा आकारला जाई.

 २) बटाई = बटाई म्हणजे उत्पादित धान्याचा हिस्सा वाटणी प्रमाणे शेतसारा म्हणून भरणे.



छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या शेतीविषयक सुधारणा

रयत हाच केंद्रबिंदू मानून शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली ज्यामुळे त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी आवश्यक बाबींकडे विशेष लक्ष दिले. ज्यामध्ये रयतेला त्रास किंवा आजार वाढतो ती इनामदारी जागीरदार पद्धत त्यांनी पहिल्यांदा बंद केली. त्याऐवजी शासकीय नोकर म्हणून सर्व कार्यवाही सुरू केली ज्यामुळे कालपर्यंत जो इनामदार पाटील होता. तो आता गाव कामगार पाटील झाला.

१). गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी चे काम पाटलास दिले गेले.

२). नवीन नवीन जमीन लागवडीखाली आनील त्यास शेत साऱ्यातून माफी देण्यात आली. पहिल्या वर्षी इस्तवा म्हणजे करमुक्त जमीन दिली. तर इथून पुढे सलग आठ वर्ष काही प्रमाणात कर वाढवत आठ वर्षानंतर पूर्ण कर घेण्याची मुभा पाटलास दिली.

३). ज्या रयते कडे जमीन कसण्याची कुवत आहे. मनुष्यबळ आहे पण जमीन नाही. अथवा बैलजोडी नाही अथवा बियाने नाही त्यांना सरकारकडून नवीन जमीन आणि तगाइ हे कर्ज दिले गेले.

४). एखादा शेतकरी कष्टाने जमीन करतो आहे मात्र अपेक्षित उत्पन्न न आल्याने त्याची आर्थिक पत ढासळली आहे तो तरी फेडू शकत नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली गेली.

५). नदी, नाले, ओढे यावर बंधारे बांधून बागायती शेती साठी प्रोत्साहन दिले गेले.

६). नवनवीन बाजारपेठा उसवून शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळेल तो विक्री करू शकेल व स्वतःचे उत्पन्न वाढवू शकेल यासाठी प्रयत्न केले गेले.

७). शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नव्हते. ज्यांना सैनिकी व्यवसायात आवड आहे अशा सर्वांसाठी सैनिक भरती केली ज्यामुळे चार महिने शेती आणि आठ महिने सैनिकी नोकरीतून उत्पन्न वाढवून स्वतःची प्रगती करणे शेतकऱ्याला शक्य झाले.

पुराभिलेखागार

 पुराभिलेखागार

B.A.III paper XVI  History Module I 

पुराभिलेखागार

प्रस्तावना

प्राचीन काळी हाताने लिहिलेले लिखित मजकूर म्हणजे पुराभिलेख. आणि हे लेख लिहिलेल्या हस्तलिखितांचे दस्तावेज व पुरातन लेख जतन करून ठेवण्याची ठिकाण म्हणजे पुराभिलेखागार. पुरा म्हणजे प्राचीन किंवा पुरातन किंवा जुने आणि अभिलेख म्हणजे दस्तावेज किंवा कागदपत्र यांचे आगार म्हणजे पुराभिलेखागार. ऐतिहासिक कागदपत्रे ऐतिहासिक वस्तू जिथे एकत्रित संग्रह करून ठेवलेले असतात अशा शास्त्रीय पुराभिलेखागार असे म्हणतात याला इंग्रजी भाषेत archives असे म्हणतात.

    यातील बहुतांश कागदपत्रे ही इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात कारण ही कागदपत्रे व प्रकाशित असून अस्सल व अव्वल स्वरूपाचे असतात. ही संदर्भ साधने प्राथमिक असल्याने इतिहासावर नव्याने प्रकाश टाकू शकतात. पुराभिलेखागार मध्ये खाजगी, वैयक्तिक दस्तावेज, सरकारी कागदपत्रे व इतिहासाची साधने काळजीपूर्वक व्यवस्थित जतन करुन ठेवलेली असतात. पुराभिलेखागार मधील अस्सल कागदपत्रांच्या आधारे राजकीय आर्थिक सामाजिक व धार्मिक इतिहासाची वास्तव मांडणी करता येते.

दप्तर खान्याची निर्मिती

               युरोपात प्राचीन काळी ग्रीक व रोमन कळपासून कागदपत्रांची काळजी घेऊन ती जपून ठेवली जात होती इंग्लंडमध्ये इसवीसन अकराशे 19 मध्ये सरकारी कागदपत्रे व दप्तरे जपून ठेवण्यासाठी सरकारी दप्तर खान्यांची स्थापना करण्यात आली.

     प्राचीन व मध्ययुगीन काळातील पुराभिलेखागार

                 जेव्हा कागदाचा शोध लागला नव्हता तेव्हा शालवृक्षाच्या सालीपासून केलेले किंवा ताडपत्र किंवा ताल पत्र लेखनासाठी वापरले जात होते. ताडपत्र तयार करणे अत्यंत कष्टाचे व जिकिरीचे काम होते ताडपत्रावरील हस्तलिखित पुढची पिढी किंवा पूर्वजांचा वारसा म्हणून श्रद्धापूर्वक जपून ठेवत याशिवाय भूर्जपत्रे चर्मपत्रे ताम्रपत्रे शिलालेख तयार करून प्राचीन काळी लेखन करीत असत.

कागदाच्या व छापण्याच्या शोधानंतर पूर्वी ठराविक लोकांसाठी दिला जाणारा ज्ञानाचा वारसा हा व्यापक झाला सर्वत्र प्रचार सुरू झाला यूरोपमध्ये पंधराव्या व सोळाव्या शतकात ज्ञानाचे सार्वत्रिकरण झाले भारतात एकोणिसाव्या शतकात या सार्वत्रीकरण सुरुवात झाली.

   भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात हस्तलिखित दस्तावेज मिळाली आहेत. प्राचीन काळी वेद, उपनिषद, आरण्यके, ब्राह्मन्ये दीपवंश, महावंश, श्री चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र, सातवाहनाची गाथा सप्तशती, कौटिल्याचे अर्थशास्त्र हे प्राचीन काळातील पुराभिलेख आहेत. याशिवाय शेव, वैष्णव, शक्ती पंत, शाक्त, नाथ, महानुभाव, जैन, बौद्ध धर्मग्रंथ, बनभट्टाचे हर्ष चरित्र, विशाखा दत्ताचे बुद्धचरित, परमानंदाचे शिवभारत, बाबरनामा, बखरीतील लेखन, युरोपीय प्रवाशांचा प्रवास वृत्तांत, प्राचीन व मध्ययुगीन नाटके, चिनी प्रवाशांची प्रवास वृत्त, धार्मिक वांडमय दस्तावेज पुराभिलेख घरामध्ये जपून ठेवली जातात. इंग्लंडमध्ये इसवीसन १८८३ मध्ये द पब्लिक रेकॉर्ड कायदा अस्तित्वात आला. इंग्लंडने आपल्या वसाहती असलेल्या देशांमध्येसुद्धा दप्तरखाने सुरू केले युरोपीय राष्ट्रे प्रमाणे पुराभिलेखागार सुरू केल्याने या देशांचा इतिहास लिहण्यात महत्त्वाची मदत झाली.

भारतातील पुराभिलेखागार 

ब्रिटिश कालखंडात भारतात पुराभिलेखागार चळवळीचा उगम झाला यापूर्वी राजे विविध रोजगार आणि त्यांची सरकारी कागदपत्रे जपून ठेवत असत 1919 मध्ये भारतीय ऐतिहासिक पुरविले कागार आयोग स्थापन करण्यात आला 1929 पासून सर्व अभिलेखागार ही सर्व भारतीयांच्या साठी खुली झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या दत्त खाण्याची जतन व देखभाल याकडे भारताने विशेष लक्ष पुरवले व शासकीय अंदाजपत्रकात त्यासाठी खर्चाची तरतूद केली राष्ट्रीय अभिलेखागार ही सर्वात मोठी संस्था नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आली.

मुंबई येथील शासकीय अभिलेखागार (१८२५)

पुण्याचे शासकीय अभिलेखागार (पेशवे दप्तर)

भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे

 डेक्कन कॉलेज पुराभिलेखागार

वि का राजवाडे अभिलेखागार

कोल्हापूर अभिलेखागार

विदर्भ अभिलेखागार

औंध जिल्हा सातारा येथील अभिलेखागार

नागपूरचे अभिलेखागार

औरंगाबाद येथील अभिलेखागार

    नवी वानगीदाखल देता येतील

पुराभिलेखागारची  वैशिष्ट्य

यात मूळ लिखित पुरावे दस्तावेज व कागदपत्र जतन करून ठेवली जातात.

येथील कागदपत्र मुळे मानवी संस्कृती वारसा व परंपरेचे जतन होते.

येथील कागदपत्रांचा ऊपयोग संशोधना शिवाय सरकारी अधिकाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरतात.

सरकार विविध खात्यातील महत्त्वाची कागदपत्रे येथे जतन करून ठेवते.

येथील कागदपत्रांवरून मानवाच्या झालेल्या सर्वांगीण प्रगती विकास परिवर्तनाचा इतिहास समजतो.

म्हणून पुराभिलेखागार हा प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा समजला जाते.

भावना

 

राधानगरी महाविद्यालय राधानगरी

बीए भाग 1 सेमेस्टर 2

पेपर क्र .2 सामान्य मानसशास्त्र

टॉपिक 3 भावना

1)  व्यक्तीमधील ....................... आंदोलित अवस्था म्हणजे भावना होय

क)    प्रक्षुब्ध

ख)   सुखद

ग)     दुःखद

घ)     संथ

2)  ………………. वर्तनावर प्रभाव टाकतात

क)    भावनानुभव

ख)   शब्दांनुभव

ग)      प्रेरणानुभव

घ)     वैफल्यवस्था

3)  भावना…………….. सज्ज ठेवतात

क)    कृतीसाठी

ख)   धावण्यासाठी

ग)     हल्ला करण्यासाठी

घ)     माघार घेण्यासाठी

4)  …………………. वर्तनाला आकार देतात

क)    भावना

ख)   प्रेरणा

ग)     वेदना

घ)     चेतना

5)  भावना ……………….. मदत करतात

क)    अंतरक्रीयेस

ख)   संघर्षास

ग)     लढण्यास

घ)     रडण्यस

6)  ……………….. लक्षणावरून भावनांचे स्वरूप लक्षात येते

क)    शारीरिक

ख)   मानसिक

ग)     सामाजिक

घ)     आर्थिक

7)  ………………… प्रवृत्ती भावना निर्माण करतात

क)    जन्मजात

ख)   अध्ययन

ग)     साधक

घ)     अभीसंधित

8)  ………………………यांच्या मते शारीरिक बदल व भावनानुभव एकाच वेळी घडतात

क)    कॅनन बार्ड

ख)   जेम्स लँग

ग)     शक्टर सिंगर

घ)     फ्रॉइड

9)  ……………………. बोध कशा प्रकारे होतो याला भावनेमध्ये महत्त्व आहे

क)    प्रसंगाचा

ख)   वेळेचा

ग)     समाजाचा

घ)     वातावरणाचा

10) ……………………हा घटक भावनानुभवाबाबत महत्व बजावतात

क)    अँमिगडला

ख)   हृदय

ग)     मज्जापेशी

घ)     मन

11) व्यक्ती मधील प्रक्षुब्ध आंदोलित अथवा अवस्थेची अवस्था………………. होय

क)    प्रेरणा

ख)   बोधावस्था

ग)     भावना

घ)     आबोवस्था

12) सुखद व दुःखद अनुभूती निर्माण करणाऱ्या मनाच्या……………………अनुभूतीस भावना म्हणतात

क)    प्रकट

ख)   अप्रकट

ग)      बोधात्मक

घ)     अबोधात्मक

13) रॉबर्ट प्लुटचिक  व स्ट्रंगमन यांनी सुमारे ………………… पद्धतीने भावनांचे स्पष्टीकरण केले आहे

क)    ४०

ख)   ३०

ग)     ०९

घ)     २२०

14) भवानांच्या विविध व्याख्येमध्ये ………………. महत्वाचे ठळक वैशिष्ट्ये आढळतात

क)   

ख)  

ग)    

घ)    

15)  ……………. या संशोधकांनी 2005 मध्ये भावनांची कार्य स्पष्ट केली आहेत

क)    प्लुटचीक

ख)   फ्रेंडरीक्सन

ग)     मँकडुगलन

घ)     फ्रॉईड

16)  ………………. हे मेंदूमधील भावनिक केंद्र मानले जाते

क)    मज्जामेंदू

ख)   लहान मेंदू

ग)     अमायगडाला

घ)     अग्रखंड

17) एकमन यांनी ……………… प्रदर्शित करण्याचे काही नियम स्पष्ट केले आहेत

क)    वासना

ख)   प्रेरणा

ग)     भावना

घ)     आक्रमण

18)  ………………  या सिद्धांतानुसार भावनानुभवामध्ये अध:श्चेतकाची भूमिका महत्त्वाचे असते

क)    जेम्स लँग

ख)   कॅनन बर्ड

ग)     सेक्टर सिंगर

घ)     लँझरस

19)  ………………. यांचा भावना विषयक सिद्धांत हा बोधात्मक मध्यस्थी सिद्धांत म्हणून ओळखला जातो

क)    जेम्स लँग

ख)   कॅनन बर्ड

ग)     शँक्टंर सिंगर

घ)     लँझरस

20)  ………….. यांच्या मते अगोदर शारीरिक प्रतिक्रीया घडून येतात व नंतर भावनिक अनुभव येतात

क)    जेम्स लँग

ख)   कॅनन बर्ड

ग)     शँक्टंर सिंगर

घ)     लँझरस

21)  कँनन-बार्ड यांच्या मते सर्व प्रकारच्या भावनिक अनुभवावर ……………….. चे नियंत्रण असते

क)    मज्जारज्जू

ख)   मोठा मेंदू

ग)     लहान मेंदू

घ)     हायपोथँलँमस

22) भीतीमुळे ……………… ग्रंथीमधून अँन्ड़्रेनिल नावाचा सराव वेगाने होतो

क)    स्वादुपिंड

ख)   वृककस्थ

ग)     लाळरस

घ)     विनाल

23) सभोवतालचे उद्दीपक व प्रतिक्रिया यातील दुवा म्हणजे ……………. होय

क)    भावना

ख)   प्रेरणा

ग)     संघर्ष

घ)     बोधन

24) अँव्हेरील या संशोधकांने 1975 मध्ये सुमारे ………………. भावनानुभवाची यादी तयार केली

क)    २००

ख)   ५००

ग)     १००

घ)     ३००

 

25)  ……………….. मध्ये अमायगडला नावाचा अवयव असतो

क)    पार्श्व खंड

ख)   कुंभ खंड

ग)     मध्य खंड

घ)     आग्रं खंड

26) मानवामधील सहा भावनांचे प्रकार जगामध्ये सार्वत्रिक असतात असे ……………… स्पष्ट केले

क)    पाँल एकमन

ख)   राँबर्ट

ग)     स्मिथ

घ)     मॅकडूगल

 

योग्य पर्याय खालीलप्रमाणे

1)  क) प्रक्षुब्ध

2)  क) भावनानुभव

3)  क) कृतीसाठी

4)  क) भावना

5)  क) अंतरक्रीयेस

6)  क) शारीरिक

7)  क) जन्मजात

8)  क) कॅनन बार्ड

9)  क) प्रसंगाचा

10) क) अँमिगडला

11) ग) भावना

12) ग) बोधात्मक

13) ख) ३०

14) क)

15) ख) फ्रेंडरीक्सन

16) ग) अमायगडाला

17) ग) भावना

18) ख) कॅनन बर्ड

19) ग) शँक्टंर सिंगर

20) क) जेम्स लँग

21) घ) हायपोथँलँमस

22) ख) वृककस्थ

23) क) भावना

24) ख) ५००

25) ख) कुंभ खंड

26) क) पाँल एकमन

 

 

 

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...