Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: December 2020

Friday, 11 December 2020

बी. ए. भाग :२ /मराठी अभ्यासकक्रमपञिका क्रं४/ सञ:३/ पाठ्यपुस्तक:काव्यगंध / कविता:जातीय दंगल :१२भानगडींची१३वळणे-अजीम राही

बी. ए. भाग :२

मराठी अभ्यासकक्रमपञिका क्रं४

सञ:३

पाठ्यपुस्तक:काव्यगंध

विषय प्राध्यापक:प्रा. बी. के. पाटील

कविता:जातीय दंगल :१२भानगडींची१३वळणे-अजीम राही

        'जातीय दंगल:१२भानगडींची१३ वळणे :दंगलीची भीषणता.

     या कवितेत दंगलीची भीषणता कवी व्यक्त करतात. माणसं एकमेकावर गुरगुरु लागली की दंगल जवळ आली असं समजाव असं ते म्हणतात. जातीयदंगलीच्या राञीचे भयाण वर्णन करताना ते म्हणतात, समष्टीच्या झाडाचा मोहर गळतो आणि मेंदूत कळकट विचार थैमान घालतात. दंगलीत लोकांची भाषाही बदलते.सगळे गावच दहशतीने पोखरुन गेले आहे. पशुपक्षी यांच्याही जीवनावर दंगल परिनाम करते.

        गावात एरवी एकोपा असतो.सामंजस्य, समन्वय असतो. पण दंगलीच्या राञी हे सगळे संपते.या राञी विसंवादाचे रक्त भळाभळा वाहू लागते. जखमांचा मोसम येतो. या दंगलीच्या राञी कवीने काय करावं असा प्रन्न अजीम राही यांना पडतो. कविता जाळून कवीने दगडफेकीत सामील व्हावं की काय? सगळं सौजन्य गळून पडतं गावाचं आरोग्य बिघडतं अन कुटिल कारवाया कळस गाठतात.

   माञ शेवटी कवी म्हणतात:

"मंदिरावरचा कबुतरांचा थवा

मशिदीच्या घुमटावर येऊन विसावतो".

     या ठिकानी कवी आशावाद सूचित करतो. दंगलीत सामान्य माणसे कशी होरपळतात याचे वास्तव वर्णन कवी करतो. दंगलकाळातील गावाची वेगवेगळी रुपे कवी शब्दबध्द करतो.

        या कवितेतील शब्द फार वेगळे व अर्थपूर्ण आहेत उदा.शब्दांचे थवे पसार होणे,समष्टीच्या झाडांचा मोहर झडणे, विवेकाची मळवाट ओस पडणे,मणुसकीचे व्याकरण विसरणे इ. हे नवे वाकप्रचार दंगलीची भयानकता वाढवतात

बी. ए. भाग :२/ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं: ४/ पाठ्यपुस्तक :काव्यगंध./सञ:३/ घटक:३ /अजीम नवाज राही(वंचितांची कविता) / कवी अजीम राही यांचा परिचय.

बी. ए. भाग :२

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं: ४

पाठ्यपुस्तक :काव्यगंध.सञ:३

विषय प्राध्यापक :प्रा. बी. के. पाटील घटक:३ अजीम नवाज राही(वंचितांची कविता)

        कवी अजीम राही यांचा परिचय.

           कवी अजीम राही यांचा जन्म१मे१९६५ रोजी झाला.बुलडाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुक्यातील सावरखेर्डा हे त्यांचे मूळ गाव आहे. ते आठवी पासून मराठी माध्यामात  शिकले.याचा परिणाम दहावीत ते मराठी भाषेच्या पेपरमध्ये नापास झाले व त्यांचे शिक्षण तेथेच थांबले.

  पण मराठीत नापास झालेल्या या कवीच्या कविता कालांतराने दहावी मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडल्या गेल्या दुष्काळ व पडझड या त्या कविता होत.

      गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, संत विद्यापीठ अमरावती,त्याच्या कविता अभ्यासाला आहेत.

     अजीम नवाज राही यांच्या कवितांचे इंग्रजी व हिंदी अनुवाद झाले आहेत.

   राही यांना मिळालेले पुरस्कार :

            *महाराट्र फाऊंडेशन

             *महाराट्र शासनाचा कवी  केशवसुत पुरस्कार

* इंदिरा संत काव्य पुरस्कार

*नारायण सुर्वे काव्य पुरस्कार

*लोकमत साहित्य पुरस्कार

*शरच्चंद्र मूक्तिबोध पुरस्कार

*कवी कुसुमाग्रज पुरस्कार

    *प्रकाशित कवितासंग्रह*

*व्यवहाराचा काळा घोडा

*कल्लोळातला एकांत:२०१२

*वर्तमानाचा वतनदार:२०१७

    कवी सावरखेडा येथे पैनगंगा सह. सूत गिरणीॅत काही काळ जनसंपर्क अधिकारी होते.

     सध्या ते सावरखेडा येथेच वास्तव्याला आहेत.

        दुष्काळ: काही दाहक संदर्भ:कवी अजीम राही यांच्या जीवनावर-भोवतालावर झालेला परीणाम

        " दुष्काळ:काही दाहक संदर्भ" या कवितेत दुष्काळाचे ह्रदय पिळवटून टाकणारे वर्णन येते. कवी जेथे राहतात त्या बुलडाणा जिल्यातील परीसरात सततच दुष्काळच दिसतो, या दुष्काळाचा कवीच्या जीवनावर परिणाम झाला आहे. तिथला निसर्ग शेतीभाती, पशुपक्षी यावरही दुष्काळाच्या झळा दिसतात.

      करपलेले गवत, आटलेल्या विहिरी,तळ शोधणारी धरणे  या मुळे कवीचे मन अस्वस्थ होते,रानातून उपाशीपोटीच गायीगुरे आली आहेत. व्याकूळ वासरे हंबरत आहेत. घरे दुष्काळाच्या झळांनी उदासवाणी दिसत आहेत. वसती समस्यानी घेरलेल्या आणि काळोखात बुडाल्या आहेत. सगळ्या भवतालला वेढून असलेली उदासी कवीच्या मनालाही वेढून घेते. 

     कवी म्हणतात:

" पारावरच्या म्हातार्‍या कुतार्‍यांच्या चर्चा गप्पा

क्षीण डोळ्यात भाकरीची आकृती"

       कवी तपशिलात जाऊन दुष्काळाचे वर्णन करतो, कूवळ पशुपक्षी नव्हेत तर म्हातारे व मुलेही दुष्काळाने कसनुसे झाले आहेत. म्हातार्‍या माणसांच्या क्षीण डोळ्यात भाकरीचे स्वप्न करपले आहे तर लहान मुलांच्या चेहर्‍यावर भीती आहे ती बालपनच विसरुम गेली आहेत. 

        बारीकसारीक तपशिलामुळे दुष्काळाची दाहकता वाचकांच्या अंगावर येते जे भोगले ते तसे थेटपणे मांडणे ही या कवीची भूमिका आहे.

       थोडक्यात कवी स्व:च्या जीवनावर आणि भवतालावर दुष्काळाचा कोणता परिणाम झाला ते व्यक्त करतात.

बी. ए भाग २/ सञ : ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ / पाठ्यपुस्तक : काव्यगंध / वास्तववाद : भयभीत वर्तमानाला आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया

 बी. ए भाग २ 

 सञ  : ३ 

  मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

  पाठ्यपुस्तक  : काव्यगंध

  विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील

      वास्तववाद : भयभीत वर्तमानाला आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया.

         वास्तववाद ही कविता भयभीत आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया आहे. 

    "जी बीजे पेराल, तशी पिकं निघतात.

       तिरस्कार, घृणा, हिंसा यांची बीजे पेराल तर

        रक्तानं रंगलेल्या पिकांची कापणी करावी लागेल

          आणि खळ्यात तुडवल्या जातील उदध्वस्त वस्ता" 

   असे कवी म्हणतात.

         आज जगभरात द्बेष, हिंसा यांचेच राजकारण दिसते.काही व्यक्ती मुद्दामच वंश, धर्म यांचा आधार घेतात आणि माणसामाणसात भेद निर्माण करतात. प्रेम दिल्याने प्रेम वाढते ही शिकवण जणू विसरुनच गेली आहे. सुंकुचित अस्मितांचे मुद्दे पुढे करुन माणसामाणसातील दरी वाढविण्याचे काम सुरु आहे.हेच वास्तव आज कवीला अस्वस्थ करत आहे. कवी डहाके याकडे मोठ्या गंभीर नजरेने बघतात.

   शेतात आपण जे पेरतो तेच उगवते त्याच प्रकारे हिंसा आणि द्बेष यांची पेरणी करुन त्याचेच पीक काढणारे काही जण आहेत. त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे असे कवीला वाटते. 

   समाजात  एकोपा असावा. एकमेकात प्रेम - जिव्हाळा असावा असे कवीचे स्वप्न आहे समताधिष्ठित समाज निर्माण करावा असे कवीला वाटते  पण असे वाटणार्‍यांची संख्या फारच कमी आहे.

      समाजात समता असावी असे वाटणार्‍या लोंकांच्या विचाराचे कोंब खुडले जात आहेत. माणूसपण धोक्यात आणले जात आहे 

    असे एक दाहक वास्तव ही कविता वाचकांच्या समोर आणते वाईट गोष्टी टाळून वास्तवाचा हा विस्तव हातात घेऊन काटेरी रानातून जायचे आहे आणि तो पुढच्या पिढीकडे सोपवायचा आहे.

      पण हा विस्तव सकारात्मक कामासाठी वापरायला हवा अशी कवी सुचना  करतात.

    

अशी ही कविता वास्तववाद एक भीषन वास्तव वाचकासमोर उभे करणारी, धोक्याची सुचन करणारी कविता आहे.

बी. ए. भाग २ / मराठी /अभ्यासक्रमपञिका क्रं४ सञ ३/ पाठ्यपुस्तक :काव्यगंध/ पुतळे : पुतळ्याच्या माध्यमातून विकृत राजकारण.

बी. ए. भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं४

सञ ३

पाठ्यपुस्तक :काव्यगंध

विषय प्राध्यापक: प्रा. बी. के. पाटील

 पुतळे :  पुतळ्याच्या माध्यमातून विकृत राजकारण.

           पुतळे कविता एका वेगळ्या विषयावर नेमकेपणाने बोट ठेवते.समाजातील थोर लोकांच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीला व्हावी, त्यांचे स्मरण राहावे म्हणून पुतळे उभे केले जातात. हे पुतळे त्या-त्या समाजाचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक प्रतीक असतात.समाजाच्या अस्मितांचे प्रतिबिंब या पुतळ्यात पडलेले असते.

   पण हे झाले आदर्श विचार. आज समाज इतका बदलला आहे, इतका विकृत झाला आहे की जगभर पुतळे तोडफोड करायचे काम बिनधास्तपणे सुरु आहे.

      अफगाणिस्तानातील गौतम बुध्दाचे सहाव्या शतकातील दोन पुतळे तालिबानी लोकांनी डायनामाईट लावून फोडले. पुण्यातील संभाजी उद्यानातील कवी राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही विकृत माणसांनी फोडला. अशा घटनांनी कवीचे संवेदनशील मन अस्वस्थ होते आणि पुतळा सारखी कविता जन्म घेते.

     यापुतळ्यांना स्व:ला काहीच कळत नसतं आणि उन्हापावसात उभं राहायची त्यांना गरजही नसते. पुतळ्यांची गरज असते आपल्याला .आपण पुतळे उभे करतो त्यांना हार वगैरे घालतो. पूजा करतो.पण दुसर्‍या कोणालाही हे पुतळे नको असतात. त्यांची मर्जी फिरली की ते दुसरे पुतळे उभे करतात.

   कवी म्हणतात:

    " एक पुतळा उभारला की तुम्ही

       एक पींजरा तयार करता

       आणि तुम्ही उभारलेल्या पुतळ्यांच गाणं

          जे जात नाही त्यांना त्यात टाकता."

       म्हणजेच आपल्या विचारांना विरोध झालेला कोणालाच चालत नाही. लगेच पिंजरे तुरुंग तयारचअसतात.या पुतळ्याखाली चौथर्‍यातून बंद ओठांची व हात बांधलेली माणसे दडपली जातात.

     आज जगभर पुतळे उभा करुन त्यामागे एक राजकारण खेळणे, सांस्कृतिक संघर्ष करणे हेच सुरु आहे. याकडे ही कविता लक्ष वेधते.

बी.ए.भाग २ / मराठी/ अभ्यासक्रमपञिका ४ सञ: ३/पाठ्यपुस्तक -काव्यगंध/ खेळ : मुक्तपणे जगू इच्छिणार्‍या मुलीच्या आयुष्याचा खेळ

बी.ए.भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका ४

सञ: ३पाठ्यपुस्तक -काव्यगंध.

विषय प्राध्यापक बी के पाटील

     खेळ : मुक्तपणे जगू इच्छिणार्‍या मुलीच्या आयुष्याचा खेळ

        खेळ ही आकाराने लहाण पण मोठा आशय सामावणारी त्यांच्या कवितापैकी एक महत्वाची कविता आहे.

  या कवितेत लहान मुली खेळ  खेळत आहेत.

    "कुणी घ्या जाई

       कुणी घ्या चमेली

       कुणी घ्या गुलाब"

           असे म्हणत आहेत.हे एक साधच  गाणं आहे. इथे प्रत्येक मुलीला हव्या त्या रंगाचे, हव्या त्या वासाचे फूल निवडायचे स्वातंञ्य आहे. या खेळात एक मुक्तपणा आहे. स्वच्छंदीपणा आहे.

     हा  खेळ संपतो आणि एक भयानक वास्तव समोर येतं, मग निवडीचं स्वातंञ्य संपत आणि रागावणं, भुवया चढवून दटावणं, गुरकावून, आरडून ओरडून गप्प बसवणं सुरु होतं .हे प्रत्येकीच्याच वाट्याला येतं. खेळातला मुक्तपणा संपतो.

   खेळात स्वातंञ्य आहे . पण ते प्रत्यक्षात देणे यात मोठा धोका आहे असे पुरुषांना वाटते. मुली खरेतर सक्षम आहेत! सामर्थवान आहेत.  याची पुरूषाना कल्पना आहे माञ मुलींना स्व:ताचे सामर्थ माहीतच नाही.

        आणि खेळ खेळता खेळता मुलींच्या आयुष्याचाच खेळ होतो हे वास्तव या लहानशा कवितेत कवी प्रभावीपणे दाखवितात.

बी. ए. भाग २/ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ /सञ ३/ पाठ्यपुस्तक - काव्यगंध/ कविता -आख्यान-वसंत आबाजी डहाके/

बी. ए. भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

सञ   ३ पाठ्यपुस्तक - काव्यगंध.

कविता -आख्यान-वसंत आबाजी डहाके.

विषय प्राध्यापक -प्रा. बी. के. पाटील.

           आख्यान-जागतिकीकरणामुळे माणसाच्या आयुष्याची झालेली परवड.

              आख्यान ही दीर्घ कविता आहे.जागतिकीकरणामुळे, काॅर्पोरेट जीवनामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे हरवले आहे. त्याच्या अस्तित्वाची परवड सुरु आहे. ही परवड कवीने या कवितेत मांडली आहे. हे आख्यान पूर्वीही चालू होतं आणि आत्ताही चालूच आहे.

     हरिश्चंद्राचा मुलगा रोहित याला बळी देण्याऐवजी शनु:शेपाचा बाप फायद्यासाठी शनु:शेपाला बदली बळी देण्याचे कबूल करतो, हा उल्लेख कवी करतो व आपलाही बदली बळी दिला जातो असं म्हणतो. केवळ मूठभर धान्याच्या बदल्यात  आपला बळी दिला आहे.या राजकारणी व श्रीमंतांनी एक गुढी उभारली आहे. ते बुध्दीजीवी लोकांची बुध्दी विकत घेतात.आज लोकांची गुणवत्ता ही एक विकत घेण्याची वस्तू बनली आहे. पण कवीची मूल्यांवर निष्ठा आहे. त्यामुळे त्याला भ्रमिष्ट झाल्यासारखे वाटत आहे.

       पूर्वी भूकंप , दुष्काळ,पूर यामुळे लोक गाव सोडून जात  माञ आज विकास आला की माणसं देशोधडीला लागतात.  ज्या व्यक्तींचं जगणं हरवलं आहे त्यांनु आपल्या मुळांचा शोध घेणं हे सुध्दा या कवितेच सुञ आहे या महानगरात मनासारखे जगता येत नाही आणि मागे जायची दारे बंद झाली आहेत. गावी एक समूहभाव होता. आता शहरात काॅर्पोरेट कल्चरमुळे हा समूह भाव गाडला गेला आणि एकाकीपण उरले आहे. 

     आता बदकं आणि राजहंस यांच्यात सत्तास्पर्धा सुरु आहे. यात बदक असणं हे कमीपणाचं आहे आणि राजहंस श्रेष्ठ आहेत असं ठरवलं आहे. पण हे राजहंसानी स्व:च ठरवलं आहे. यात बदकांचा सहभागच नाही. आज शोषकच इतिहास लिहीत आहेत. खरं तर शोषितांनी इतिहास लिहायला हवा, असं कविला वाटतं

      सामान्य माणूस टिकला पाहिजे,जगला पाहिजे असं स्वप्न कवी डहाके यांची ही कविता बघते आहे. काळोखात दिवट्या घेतलेल्या माणसांचा एक जथा  पुढे सरकतो आहे. 

     हा जथा पृथ्वीला सावरुन धरेल असा आशावाद ही कविता व्यक्त करते.

बी ए भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४/ सञ :३/ काव्यगंध/ वसंत आबाजी डहाके:महानगरीय कविता.

 बी ए भाग  २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

सञ  :३ काव्यगंध

विषय प्राध्यापक प्रा. बी के पाटील

वसंत आबाजी डहाके:महानगरीय कविता.

परिचय  :वसंत आबाजी डहाके यांचा जन्म ३०मार्च,१९४२ रोजी यवतमाळ जिल्हातील बेलोरा या गावी झाला.१९६० पासून ते कविता लेखन करत आहेत. १९६६साली सत्यकथा मासिकात योगभ्रष्ट कविता प्रसिद्भ झाली. चंद्रपुरमधिल २०१२च्या ८५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    १९७२चा योगभ्रष्ट हा त्यांचा पहीला काव्यसंग्रह,त्या नंतर शनु:शेष, चिञलिपी इ. काव्यसंग्रह प्रसिद्भ झाले. 

    काव्य लेखनामागे डहाके यांच्याजाणिवांचे अंत:सूञ आहे.

त्या संध्याकाळी समूद्र या कवितेतील वसंत आबाजी डहाके  यांच्या मनाची अवस्था  :

        या कवितेत  कवी समुद्र आपल्याला रक्ताळलेल्या घोड्यासारखा दिसला असे म्हणतात. कवी मुबईभर फिरला.त्याला कुठेच करमेना.पण प्रत्येक क्षणी समुद्र आपल्या आसपास आहे असेच त्याला वाटत होते.

     ही कविच्या मनाची अवस्था आहे .

मुंबई हे महानगरीय कवीला समुद्रासारखे विशाल, घोड्यासारखे गतिमान वाटले. माणसे विवीध कारणांनी जीवनभर दु:खी असतात.ती आपले दु:ख विसरायला समुद्रावर जातात. या संगळ्याचे दु:ख समुद्र पोटात घेतो. या अर्थाने समुद्र, संध्याकाळ आणि समुद्राचे जखमी असणे यांचे जवळचे नाते आहे असे कविला वाटते.

       मुंबईतला अरबी समुद्र हा दृश्य आहे. तो  दिसतो. पण असाच एक अदृश्य समुद्र कवीच्या मनातही आहे, या कवितेत तो कविची साथ सोडतच नाही कविला कुठेच करमत नाही भटकंतीत सर्वच ठीकांनी हा समुद्र आहेच

    या कवीतेत ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे सुखाचे झबले घालून प्रत्यक्षात दु:खच आपल्याकडे येत असते.आपल्याला वाटते सुख आले आहे, हीच अनुभूती कवी घेतो.

Friday, 4 December 2020

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ शब्दाचे मोल ¤ चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (1927)

(E-content created by Dr V. S. Patil)

  बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ शब्दाचे मोल ¤

              चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (1927)                 

▪️शब्दाचे मोल▪️

                  मध्य प्रदेशातील रायपूर येथे जन्म. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर येथे उच्च शिक्षण . नामवंत वकील ,गांधीवादी विचारांचा प्रभाव. अंतयात्रा , काळाची पावले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंजिल दूरच राहिली, माणूस नामा, मानवनिष्ठ अध्यात्म, शोध गांधींचा, समाजमन , सहप्रवास,सूर्योदयाची वाट पाहूया अशा मराठी पुस्तकांचे लेखन न्यायमूर्ती का हलफनामा , लोकतंत्र एंव राहों के अन्वेषण ही हिंदी पुस्तके प्रसिद्ध इ.स.2004 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.

                त्यांच्या काळाची पावले या पुस्तकातून 'शब्दाचे मोल' हा उतारा घेतलेला आहे वडील दादा धर्माधिकारी यांच्या सहवासात झालेली घडण, वक्तृत्वाची तयारी वगैरे अनुभव लेखकाने कथन केले आहेत जो प्रयोग करतो,आव्हानांच्या परिक्षेला सामोरे जातो, तो यशस्वी होतो हा संदेश येथे मिळतो

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ पन्नासपैकी शून्य मार्क्स ¤ शांता शेळके

  बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ पन्नासपैकी शून्य मार्क्स ¤

              शांता शेळके (1922-2002)

                        

                   

▪️पन्नासपैकी शून्य मार्क्स ▪️

                      प्रसिद्ध मराठी लेखिका, कवयित्री,अनुवादक व गीतकार. 'नवयुग ' या साप्ताहिकात नोकरी.नागपूर,मुंबई येथे मराठीचे अध्यापन. कविता,कथा,कादंबरी,व्यक्तिचित्रे,बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा,आत्मकथन,अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारावर लेखन.वर्षा,रूपशी,तोच चंद्रमा....,गोंदण,ओळख,जन्मजान्हवी,पूर्वसंध्या,इत्यर्थ इ.काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रकाशित. मुक्ता आणि इतर गोष्टी हा कथासंग्रह व स्वप्नतरंग ही कादंबरी प्रकाशित. शब्दांच्या दुनियेत हा ललितलेखसंग्रह. कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद. धुळपाटी हे आत्मकथन. हायकू या जपानी काव्यप्रकारात लेखन. पश्चिमरंग,वडीलधारी माणसे ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके.आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. अनेक ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे वाड़मयीन पुरस्कार. 

            'पन्नासपैकी शून्य मार्क्स ' या पाठात शांता शेळके यांनी शालेय जीवनातील लहानसा पण महत्त्वपूर्ण अनुभव सांगितला आहे.मुलांच्या शाळेत एकटीच मुलगी,मराठी विषयात अतिशय हुशार असल्यामुळे जागृत झालेला सुक्ष्म अहंकार,शाळा तपासणीत झालेले कौतुक,पण गणितात पडलेले पन्नासपैकी शून्य मार्क्स मिळाल्यामुळे झालेले गर्वहरण,या अनुभवाच्या माध्यमातून शांता शेळके यांनी माणसाला कितीही मोठे यश मिळाले तरी माणसाने अहंकारी न होता सदैव नम्रता अंगी बाणवावी अशी शिकवण देण्याचा प्रयत्न केला आहे.नेमक्या आणि प्रासादिक शब्दकळेमुळे हा अनुभव विलक्षण प्रत्ययकारी झाला आहे.

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ वाटेवरच्या सावल्या ¤ कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर

 बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ वाटेवरच्या सावल्या ¤

       कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर (1912-1999)

         ▪️वाटेवरच्या सावल्या▪️

                 आधुनिक कवी,नाटककार व कादंबरीकार. 'जीवनलहरी','विशाखा','किनारा,'मराठी माती,'स्वगत',' हिमवर्षाव,'वादळवेल', महावृक्ष इ.काव्यसंग्रह प्रकाशित. 'दुसरा पेशवा',कौंतेय','आमचं नाव बाबूराव ','ययाती आणि देवयाणी','वीज म्हणाली धरतीला','नटसम्राट 'ही नाटके प्रकाशित. कालिदासाच्या 'मेघदूता'चे तसेच अन्य पाश्चात्य नाटकांचे मराठीत रूपांतर 'वैष्णव ','जान्हवी,'कल्पनेच्या तीरावर 'या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. शिवाय कथा,निबंध आणि काव्यसमीक्षात्मक लिखाणही त्यानी केलेले आहे.साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ या पुरस्कारानी ते सन्मानित आहेत.

             'वाटेवरच्या सावल्या' या पाठात कुसुमाग्रज यांनी त्याच्या बालपणातील सुंदर आठवणी ओघवत्या भाषेत कथन केल्या आहेत.कौटुंबिक वातावरण,माध्यमिक शाळेत असताना साहित्य,कला,क्रिडा,नाटक यांची लागलेली गोडी,वाचनाचे संस्कार, एका फकिराची अरेरावी वृत्ती व त्याच्याशी झालेली झटापट,शिक्षकांच्या अध्यापनातून झालेले काव्याचे संस्कार, क्रिकेट या खेळाची मनस्वी आवड आणि त्यासाठी केलेल्या खटपटी यांचे मनोरम वर्णन कुसुमाग्रजांनी केले आहे.शिवाय 'वणी' नावाचे लहानसे गाव, या गावातील ग्रंथालय,चिपळूणकरांची ग्रथमाला,गडकर्याची नाटके,कवितासंग्रह,कादंबर्‍या इ.वाचन,नाटके आणि काव्याच्या छंदापायी गणित विषयात आलेले अपयश;हे सारे काही या पाठात कुसुमाग्रजांनी आत्मियतेने कथन केलेले आहे.

                      नाशिकच्या एच.पी.टी.महाविद्यालयात शिकत असताना कुसुमाग्रज गणित विषयात नापास झाले.एक वर्ष वाया गेले.वडिलांना झालेल्या दु:खाने त्याना खुप वाईट वाटले.पुढे त्यांनी झटून अभ्यास केला.मराठी आणि इंग्रजी विषयात बी.ए. झाले या पाश्र्वभूमीवर त्यानी पुढे केलेली प्रगती थक्क करून सोडते.

बी.ए. भाग-१ मराठी /आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ निवड- यशवंतराव चव्हाण ¤

  बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ निवड- यशवंतराव चव्हाण ¤

        

      यशवंतराव बळवंतराव चव्हाण  (1913-1984)

              महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेते.सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग, 1942  च्या छोडो भारत आंदोलनात सहभाग,स्वतंत्र भारताचे संरक्षणमंत्री,गृहमंत्री,अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री. कार्यक्षम मंत्री,उत्तम संसदपटू,उदारमतवादी नेते,वक्ते आणि लेखक म्हणून परिचित. 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र. 'सह्याद्रीचे वारे',युंगातर या दोन संग्रहातून विचारप्रवर्तक भाषणे प्रकाशित. 

▪️निवड▪️

           या पाठातून यशवंतराव चव्हाण यांच्या महाविद्यालयीन जडणघडणीचा प्रत्यय येतो.कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते, कायद्याच्या शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश, वाचनाशी जडलेले नाते,शिक्षणाबरोबर समाजकारण, राजकारणातील सक्रियता,अभ्यासमंडळे,सभा-संमेलनातील सहभाग या सर्वांमुळे कायद्याच्या प्रथम वर्षांत आलेले अपयश,त्यावर केलेली मात,दुसरे महायुद्ध,या महायुद्धाचा भारतावर झालेला परिणाम,वेगवेगळ्या विचारसरणीशीं करावा लागलेला संघर्ष यांचे इ.बाबींचे चित्रण या लेखात केले आहे.शिक्षण घेत असताना आपल्या वर्तमान जगण्याशी असलेले नाते,त्यात सक्रिय सहभाग असूनही आपले व्यक्तीमत्व कसे संपन्न,विविधांगी आणि सुसंस्कृत करता येते याचा प्रत्यय या पाठातून येतो.

मराठी अभ्यासपत्रिका -3 / सेमिस्टर -III / बी.ए. भाग- 2/ नाटक- काय डेंजर वारा सुटलाय! लेखक-जयंत पवार

(E-content created by Dr V. S. Patil)

मराठी अभ्यासपत्रिका -3 , सेमिस्टर -III       बी.ए. भाग- 2

नाटक- काय  डेंजर वारा सुटलाय!लेखक-जयंत पवार 

नाटक:

         नाटक हा एक वाड़मय प्रकार आहे.नाटक दृकश्राव्य वाड़मय प्रकार आहे. या घटकाचा अभ्यास केल्यावर आपल्याला- 

* नाटक या वाड़मय प्रकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतील. 

* नाटकाच्या दृकश्राव्य स्वरूपाचे वेगळेपण नोंदवता येतील. 

* नाटक या वाड़मय प्रकाराच्या जन्माचा इतिहास सांगता येईल. 

* नाटक या वाड़मय प्रकाराची व्याखा करता येईल. 

● नाटक व्याख्या●

1) शब्दांनी तयार झालेले संवाद साभिनय सादर करावयाची कला म्हणजे नाटक. 

2) एका मानवी समूहाने दुसर्‍या मानवी समूहासमोर सादर करावयाची कला म्हणजे नाटक.

3) नाटक म्हणजे शब्दांपासून तयार होणारी संहिता आणि या संहितेचे सादरीकरण म्हणजे नाटक. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, अभिनय,इ.घटकांच्या मदतीने करता येते.पण या सर्व घटकांची सुप्त शक्ती शब्दानी तयार झालेल्या संहितेत असावी लागते.

● नाटकाचे घटक ●

 ( अ) विषयसूत्र 

 ( ब)  संविधानक 

 ( क) पात्रचित्रण

 (ड)   संवाद

● नाटकाचे प्रकार ●

                  1) शोकात्मिका(Tragedy)

                   2) सुखात्मिका (Comedy)

                   3)क्षोभप्रदान नाट्य            (Melodrama)

                   4) प्रहसन ( Farce)

■ नाटकांचे उपप्रकार ■

                 1) एकांकिका

                 2) दिर्घांक 

                 3) पथनाट्य 

                 4) एकपात्री प्रयोग 

                 5) नाट्यछटा

                 6) संगीतिका 

                 7) नभोनाट्य 

   ▪️ नाटकांचे आशयानुरूप वर्गीकरण ▪️

   1) पौराणिक 

   2) ऐतिहासिक 

   3) समस्याप्रधान

    अ) सामाजिक 

    ब) राजकीय 

    क) दलित 

    ड) स्त्रीवादी 

    इ) चर्चाप्रधान

बी. ए. भाग 1 / मानसशास्त्र परिचय / प्रकरण-1----मानसशास्त्राची ओळख

 

            के. वाय. एकल (मानसशास्त्र विभाग)

                                                   बी. ए. भाग 1

                    मानसशास्त्र परिचय

            प्रकरण-1----मानसशास्त्राची ओळख

          मानसशास्त्र म्हणजे कायआधुनिक जगामध्ये मानसशास्त्र हे प्रगत शास्त्र मानले जाते मानवी प्रेरणांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून मानवी वर्तन व मानसिक प्रक्रियांचे गुड करण्याचा यशस्वी प्रयत्न मानसशास्त्र करत आहे यशस्वी प्रयत्न मानसशास्त्र करत आहेजीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे जग जवळ आले आहेमानसशास्त्राच्या अभ्यासामुळे मानवी वर्तन या मागील कारणांचा उलगडा करता येणार आहे 1850 नंतर मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला चालना मिळाली

        मानसशास्त्राची व्याख्या--मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये Psychology हा इंग्रजी प्रतिशब्द आहे या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील दोन शब्दापासून झाली आहे Psyche म्हणजे आत्मा आणि Logas म्हणजे शास्त्र किंवा कारण होय पूर्वी मानसशास्त्र हा स्वतंत्र अभ्यास विषय नव्हता तत्वज्ञानाचा एक भाग म्हणून त्याचा विचार केला जात असेल एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळालीग्रीक विचारवंतांनी आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्र होय असे सांगितले हरीश ऑरी स्टाउटल मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र बोथावस्तचे शास्त्र वर्तनाचे शास्त्र अशा स्वरूपात मानसशास्त्राच्या व्याख्या मध्ये बदल होत गेले विल्यम वुट यांनी 1879 साली जर्मनीमध्ये पहिली लिफझिक येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि इथून पुढे मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला

          मानसशास्त्राच्या आधुनिक व्याख्या

  “” वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय” रॉबर्ट एस फेल्डमन

,” वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र” लेस्टर ए लॅपटॉन

वर्तन आणि बोधनिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय” रॉबर्ट ए बॅरोन@@

      थोडक्यात--मानसशास्त्र म्हणजे मानव व मानवेतर प्राण्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय

           मानसशास्त्रामध्ये मानव व मानवेतर प्राण्यांचे या शारीरिक हालचाली चा समावेश वर्तनात होतोशब्दांची रचना इत्यादी घडामोडींचा समावेश होतो,'उद्या पक्का ला अनुसरून व्यक्ती किंवा एखाद्या सचिवाकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय उडवत या मानसशास्त्रज्ञाने वर्तनाचे सूत्र पुढील चौकटीत मांडले आहे त्या सूत्रातील संज्ञांची माहिती घेतल्यास वर्तनाचा अर्थ लक्षात येतो

                      वर्तन = उद्दीपक + सजीव +. प्रतिक्रिया

                 Behaviour = stimulus + organism + response

                      B.           =.       S.      +.         O.       +.    R

    1) उद्दीपक

    2) सजीव किंवा व्यक्ती

     3) प्रतिक्रिया

मानसिक प्रक्रिया

बोधनिक प्रक्रिया

मानसशास्त्र एक विज्ञान किंवा शास्त्र

                  मानसशास्त्रातील आजचे (आधुनिक) दृष्टिकोन

   मानसशास्त्रातील दृष्टिकोन त्या शास्त्रातील वेगवेगळ्या घटकांवर प्रकाश टाकतातमानसशास्त्रातील वेगवेगळे दृष्टिकोन त्यांच्या विचारसरणीनुसार वेगवेगळ्या घटकांना महत्त्व देतात त्यानुसार व्यक्ती वर्तनाचा अभ्यास करतात मानसशास्त्रामध्ये आज चार प्रमुख दृष्टिकोनाला महत्त्व आहे हे चार दृष्टिकोन व्यक्ती वर्तनाच्या शारीरिक व मानसिक घटकावर लक्ष केंद्रित करत आहेत ते दृष्टिकोन पुढील प्रमाणे

1)      मनोगतीक दृष्टिकोन -व्यक्तीचे अंतरंग समजून घेणे/स्वतःला समजून घेणे

2)      वर्तनवादी दृष्टिकोन- व्यक्तीच्या बाह्य वर्तनाचे निरीक्षण

3)      बोधनिक दृष्टिकोन- अर्थ समजून घेणे

4)      मानवतावादी दृष्टिकोन- अद्वितीय गुणांनी युक्त मानव

                मानसशास्त्रीय संशोधन

   मानव हा स्वभावताच जिज्ञासू आहे जेव्हा एखादी वस्तू तो प्रथम पाहतो तेव्हा त्या वस्तू बद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण होते ती वस्तू केव्हा कुठून कशी आली असावी याचा तो विचार करू लागतो त्यातून संशोधनाला दिशा प्राप्त होते

   संशोधन या संकल्पनेची व्याख्या पुढीलप्रमाणे

--संशोधन म्हणजे नवीन तत्य व तत्त्वे यांच्या शोधासाठी केलेले सातत्यपूर्ण चिकित्सात्मक व सखोल परिक्षण होय;

,--संशोधन म्हणजे नव्या ज्ञानाच्या शोधासाठी पद्धतशीर केलेली चौकशी होय

मानसशास्त्रीय संशोधनामध्ये एखाद्या घटने मागील कार्यकारण संबंध शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो यासाठी विविध पद्धतीचा अवलंब केला जातो

या ठिकाणी आपण मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या सहसंबंध संशोधन आणि प्रायोगिक संशोधन पद्धती ची माहिती घेणार आहोत

   सहसंबंधात्मक संशोधन

          1)   धनात्मक सहसंबंध

           2)ऋणात्मक सहसंबंध

           3) शून्य संबंध

प्रायोगिक संशोधन

     वर्तना मागील कारण नेमकेपणाने निश्चित करणारी शास्त्रशुद्ध पद्धती म्हणजे प्रयोग होय संदर्भात कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी एका परीवर त्यात हेतुपुरस्सर बदल करून वर्तनामध्ये त्याला अनुसरून बदल होतो का हे पाहणे म्हणजे प्रयोग होय एका अर्थाने नियंत्रित वातावरणातील निरीक्षणाला प्रयोग असे म्हणतातपरिणाम आहे असे तो खात्रीपुर्वक सांगु शकतो

     व्याख्या—"प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केले जाणारे वस्तुनिष्ठ निरीक्षण होय;

      प्रयोगशाळेत एखादी घटना मुद्दाम व योजनापूर्वक निर्माण करून व परिस्थितीवर संपूर्णतः नियंत्रण ठेवून केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय;

            मानसशास्त्रीय प्रयोगाच्या पद्धतीचे स्वरूप लक्षात येण्यासाठी पुढील संकल्पना महत्त्वाच्या आहेत 

1)      प्रयोगकर्ता

2)      प्रयुक्त

3)      परिवर्त्य- परिवर्त्याचे प्रकार

अ.    स्वतंत्र परिवर्त्य

आ.  परतंत्र परीवर्त्य

इ.      स्थिर परीवर्त्य

प्रयोग यामधील काही टप्पे किंवा पायऱ्या

1)      समस्या

2)      सिद्धांत कल्पना

3)      प्रायोगिक आराखडा

4)      नियंत्रण

5)      सिद्धांत कल्पना तपासणे

6)      प्रदत्त विश्लेषण

7)      फलीते तेव्हा निष्कर्ष

8)      पडताळा

             समूह

          प्रायोगिक पद्धती मध्ये दोन प्रकारचे समूह वापरले जातात त्यामध्ये प्रायोगिक समूह आणि नियंत्रित समूह असे दोन प्रकार आहेत

          प्रायोगिक अडथळे/धोके हॅलो

 मानसशास्त्र प्रयोग हे व्यक्तीवर आणि प्राण्यावर केले जातात व्यक्तीचे वर्तन हे गुंतागुंतीचे आहे तरीसुद्धा आधुनिक मानसशास्त्रीय तंत्रे प्रायोगिक उपकरणे या आधारेमानसशास्त्रज्ञ व अभ्यासक संशोधन करीत आहेत संशोधन करताना अनेक अडथळे येतात ते पुढील प्रमाणे

1)      प्रयुक्त न मिळणे

2)      नियंत्रणाचा अभाव

3)      प्रयोग शाळेतील सुविधा

4)      कृत्रिम परिस्थिती

5)      वातावरणीय परिणाम

प्रयोग पद्धतीमध्ये जरी काही अडथळे असले तरी मानसशास्त्राच्या अभ्यासाची सर्वश्रेष्ठ व शास्त्रीय अभ्यास पद्धती म्हणून या पद्धतीला मान्यता प्राप्त झाली आहे वरील अडथळे जर कमी केले तर निष्कर्ष अचूक मिळतील

 

 

 

 

 

 

 

   

 

 

 

 

 

 

 

बी.ए. भाग ३ /मराठी अभ्यासक्रमपञिका७ / सञ पाचवे/ साहित्यविचार घटक १/ ललित साहित्य म्हणजे काय ?

बी.ए. भाग ३

मराठी अभ्यासक्रमपञिका७

सञ  पाचवे

साहित्यविचार घटक १

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

ललित साहित्य म्हणजे काय ?

    प्रस्तावना :

               साहित्याचा अभ्यास करतांना एक गोष्ट लक्षात येते की,सर्व सामान्य माणसाच्या व्यावाहारिक जीवनात साहित्य हा शब्द अनेकदा वापरला जातो. हा शब्द साधन या अर्थी वापरला जातो. जसे चिञकलेचे साहित्य म्हणजे ब्रश,पेन्सिल, रंग, कागद इ,होय. तर बांधकाम साहित्य म्हणजे वाळू, सिमेंट पाणी, घमेली इ. होय.

   तर कथा, कविता, इतिहास, भूगोल रसायनशास्ञ हे सर्व साहित्य आहे.पण कथा, कविता, कादंबरी नाटक इ. उल्लेख केला तर ते ललित साहित्य आहे असे म्हणता येईल आणि इतिहास, भूगोल, गणित, भूमिती हे सर्व ललितेतर अगर शास्ञीय वाड्मय म्हणता येईल. 

   काही साहित्य हे समूहनिर्मित असते, त्याला लोकसाहित्य म्हणतात तर काही साहित्य हे व्यक्तिनिर्मित असते त्याला ललित साहित्य म्हणतात. 

       ललित साहित्याचा अभ्यास करत असतांना वाड्मयाच्या परंपरेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. भारतीय साहित्यशास्ञात सर्वप्रकारच्या वाड्मयालाकाव्य या एका शब्दात बांधले होते. कथा, कविता, कादंबरी, नाटक इ. वाड्मयाचे सर्व प्रकार या एका शब्दाने व्यक्त होत होते.

      पण काळाच्या ओघात कितीतरी बदल घडत जातात. तसेच बदल वाड्मयीन शेञात झाले आहेत.वाड्मय, सारस्वत, ललित साहित्य अशी नवनवी नावे काव्याला मिळाली या बाबत डाॅ यशवंत मनोहर म्हणतात,"संस्कृत साहित्य विचारात साहित्याला उद्देशून काव्य ही संज्ञा वापरली जात असे. वाड्मयाचा केवळ पद्य भाग म्हणजेच काव्य नव्हते. कथा,कविता,नाटक अशा सर्व साहित्याला उद्देशून काव्य ही संज्ञा वापरली जात होती. 

        थोडक्यात म्हणजे आजचे वाड्मय किंवा साहित्य आणि पूर्वीचे काव्य यात मूलभूत फरक नाही तर काळानुरूप झालेला तो एक शब्दबदल आहे. रसिकांना आनंद देण्याचे काम पूर्वीही काव्य करत होते आणि आजही ललित साहित्य करत आहे.

   ललित साहित्याची व्याख्या :

       १)    "जे लालित्यपूर्ण असते ते ललित साहित्य होय " अशी ललित साहित्याची एक व्याख्या करता येते

        २) प्रतिभाशक्तीने प्रेरित केलेले व आनंद देणारे लेखन म्हणजे ललित साहित्य    -रा.ग. जाधव.

  थोडक्यात "ललित म्हणजे सुंदर. ललित म्हणजे काव्यपूर्ण.

     ललित म्हणजे विदग्ध. ललित म्हणजे Beautful ,Fine.

 ललित साहित्य हे लालित्यपूर्ण असणारे,भावनांचा आविष्कार करणारे तसेच कल्पनेचा विलास दाखविणारे ते ललित साहित्य होय.

बी. ए भाग ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ / सञ पाचवे/ साहित्यविचार / घटक १/ आधुनिक मराठी साहित्यिकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या

बी. ए भाग ३

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७

सञ  पाचवे

साहित्यविचार     घटक  १

विषय प्राध्यपक प्रा. बी. के. पाटील

  आधुनिक मराठी साहित्यिकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या :

    प्रस्तावना : 

        आपण पाहिले शेकडो वर्षापूर्वी पौर्वात्य म्हणजे संस्कृत साहित्यकारांनी काव्य म्हणजेच साहित्याची व्याख्या करुन ठेवली आहे

     आधुनिक मराठी साहित्यातही ना. सी. फडके यांच्याही आधीपासून मराठी साहित्याची व्याख्या लेखक करत आहेतच. या बाबत पुढील  साहित्यिकांचा विचार पाहू

   १. विनोबा भावे  : विनोबा भावे म्हणजे विनायक नरहरी भावे. हे भारतीय स्वातंञ्य सैनिक होते.भूदान चळवळीचे महत्वाचे काम त्यांनी केले अहींसा व करुणा ही त्यांच्या जीवनातील मोठी दोन तत्वे होती. त्यानी आयुष्यभर 'भगवदगीतेला मतृस्थानी मानले. ते स्थितप्रज्ञ वृतीचे होते.निष्काम कर्मयोग ही त्यांची साधना होती.त्यानी समाधी मरण स्वीकाले.

     स्वत:च्या आईला गीता समजावी म्हणून त्यांनी गीताई हे गीताचे मराठीत भाषांतर केले.या पुस्तकाच्या २४४ आवृत्या आणि अडतीस लाख प्रती खपल्या आहेत 

भारत सरकारने त्यांना भारत रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.

 विनोबा भावे यांचीसाहित्याची व्याख्या  :

         "साहित्य म्हणजे सत्यनिष्ठ आणी सत्यानुभवाचे, जे समाजजीवनाला संस्कारित आणि संपन्न करुन सोडते असे अलिप्त चिंतन होय".

२. अरविंद वामन कुलकर्णी :

     मराठीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून अ वा कुलकर्णी जाणकारांना माहित आहेत.नाट्यतंञाविषयी त्यांचा संशोधन प्रबंध मौलिक आहे. सामाजिक जाणिवा व्यक्त करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली तसेच १९६० चे महत्वाचे कवी म्हणूनही ओळखले जातात.

अ. वा.  कुलकर्णी यांची व्याख्या :

      " साहित्य म्हणजे एका व्यक्तिमनाला भावलेल्या कलात्मक सत्याचा आविष्कार होय". या व्याखेत कलात्मक सत्याला महत्व दिले आहे.

गंगाधर गाडगीळ:

     यांना ८५वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभले.५० वर्षापेक्षा अधिक काळ दर्जेदार लेखन ,अर्थशास्ञाचे प्राध्यापक, कुशल प्रशाशक सहा कादंबर्‍या. सहा नाटके,सात समीक्षा ग्रंथ मुंगीचे महाभारत सारखे आत्मचरिञ त्यांच्या  नावावर आहे

  गंगाधर गाडगीळांची व्याख्या

         जीवनात जे भीषण असतं, जे अटळ पराजय असतात, ज्या जीवघेण्या वेदना असतात, एकाकीपणा असतो, माणसामाणसांच्या संबंधातून निर्माण झालेले शोकनाट्य असतं त्याचा लाव्हारस साहित्यातून व्यक्त होत असतो". 

  अशा प्रकारच्या मराठी साहित्यातील लेखक समीक्षकांनी  केलेल्या साहित्यविषयक व्याख्या आहेत.

बी.ए भाग ३/ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ / सञ पाचवे/ साहित्यविचार/ पौर्वात्य साहित्य लक्षणा व भामहाची साहित्य व्याख्या

बी.ए भाग ३

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७

सञ   पाचवे

साहित्यविचार

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

पौर्वात्य साहित्य लक्षणा व  भामहाची साहित्य व्याख्या :

        प्रस्तावना:

                     संस्कृतमध्ये साहित्याला 'काव्य' हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला जातो.काव्याच्या केवळ पद्यभागासच तो वापरला जातो असे नसून सगळ्याच साहित्याचा अंर्तभाव या 'काव्य' शब्दात केला जात असे." वाणीच्या माध्यमातून जे-जे व्यक्त होते ते-ते वाड्मय असते" असे मानले जाते. काव्य या शब्दात मानवी भावसृष्टीचे रमणीय दर्शन घडविणारे सौंदर्यप्रधान साहित्य अपेक्षित आहे.

     म्हणूनच दंडीपासून ते जगन्नाथापर्यंत संस्कृत किंवा पूर्वकालीन म्हणजेच पौर्वात्य साहित्यशास्ञज्ञानी केलेली काव्यलक्षणे हीच साहित्यलक्षणे आहेत.

     जगन्नाथाने शब्दांना महत्व दिले आहे. पण हे शब्द रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे असावेत असे म्हटले आहे. आनंदवर्धन याने 'ध्वनी' हा काव्याचा आत्मा आहे असे म्हटले आहे तर वामनाने 'रीती' ला काव्याचा आत्मा मानले. क्षेमेंद्राने औचित्यपूर्ण रचना महत्वाची मानली तर रुद्रटाने शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य असे म्हटले. विश्वनाथाने रसाला प्राधान्य दिले आहे.

       या सर्व मीमांसकामध्ये भामह हा एखाद्या रत्नहारात हिरा चमकावा तसा उठून दिसतो.

      इ. स.६०० ते इ.स. ७५० हा भामहाचा काल मानला जातो.'काव्यालंकार हा त्या काळात त्याने  लिहिलेला ग्रंथ आजही प्रमाण आहे.या ग्रंथात त्याने ३९ अलंकारांचा परामर्श घेतला आहे."व्याकरणदृष्टा उचित अशी शब्दयोजना आणि अर्थालंकार या दोन्हींची काव्याला गरज आहे" हे मत त्याने आग्रहाने मांडले.


     "शब्दार्थौ सहितौ काव्यम" अशी भामहाने साहित्याची व्याख्या केली.

म्हणजेच "शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजेच काव्य किंवा साहित्य होय" असे भामह म्हणतो.

   भामह या संस्कृत साहित्यशास्ञज्ञाला साहित्यमध्ये शब्द आणि अर्थ दोन्ही हवे आहेत. शब्द आणि त्याचा अर्थ दोन्ही महत्वाचे वाटतात. 

      कवीच्या अंत:करणातील भाव ज्याच्या आधारे व्यक्त होतात ते माध्यम असते शब्द. हे भाव समर्थपणे व्यक्त होतात ते शब्दांच्याच माध्यमातून, भामहाच्या मते,शब्द अर्थ हे केवळ वाच्यार्थ नव्हे तर रसरुप अर्थ म्हणजेच अर्थ होय.

       संस्कृत साहित्यात शब्द हे शरीर मानले आहे व आशय किंवा अर्थ हा आत्मा मानला आहे.शब्द हे बहिरंग आहे व आशय हे अंतरंग आहे.

    कसे सांगितले म्हणजेचहे शब्द किंवा बहिरंग किंवा शरीर होय.

   काय सांगितले म्हणजेच हा अर्थ किंवा अंतंरंग किंवा आत्मा होय.

      भामहाने साहित्याच्या शरीरावरुन व आत्मावरुन शब्दार्थौ सहितौ काव्यम ही  व्याख्या केली आहे.

बी. ए.भाग ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ /सञ :पाचवे / साहित्यविचार /घटक १/साहित्याचे स्वरुप / साहित्याचे स्वरुपविशेष

बी. ए.भाग ३

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ सञ :पाचवे

साहित्यविचार

घटक १साहित्याचे स्वरुप

 विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील.

        साहित्याचे स्वरुपविशेष

                   "साहित्य" हा शब्द वाड्मयाबरोबरच आपण रोजच्या व्यवहारात अनेक वेळा वापरतो. जसे लेखन साहित्य म्हणजे कागद, पेन, लिहावयाचे पॅड इत्यादी तसे बांधकाम साहित्य, स्वंपाकाचे साहित्य, शिवणकामाचे साहित्य असे वेगवेगळे शब्दप्रयोग आपण करतो तसेच वाड्ममयाच्या संर्दभातही साहित्य हा शब्द वापरला जातो.

        वाड्ममयाच्या  प्रांतात साहित्यहा शब्द व्यापक अर्थाने घेतला जातो.जसे कथा, कविता, कादंबरी, नाटक,चरिञ,प्रवासवर्णन,निबंध इ.संस्कृत साहित्यशास्ञात वाड्मयासंबंधी विचार करताना वाड्मय या ऐवजी काव्य हा शब्द वापरलेला दिसतो.तर आजच्या आधुनिक काळात  ललित वाड्मय हा शब्दप्रयोग अधिक रुढ झाला आहे.


     औषधोपचारांची माहिती किंवा एखाद्या व्यक्तीची कुंडली हेही लिहिले जाते.पण याला कुणी साहित्य  किवा वाड्मय  म्हणत नाही

 कारण वरील लेखन म्हणजे फक्त शब्दांची जुळणी असते. शिवाय साहित्य म्हणून जे लेखन ओळखले जाते ते एकाच स्वरुपाचे नसते.तर वि.स. खांडेकर यांचे क्रौचवध राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला चिं वि जोशी यांचे चिमणरावाचे चर्‍हाट किंवा गंगाधर गाडगीळांच्या कथा अशी पुस्तके साहित्य या नावाने ओळखली जातात.  पण ही पुस्तके परस्पराहून वेगळी आहेत यातील पहिला वर्ग ललित साहित्याचा व दुसर वर्ग ललित्तेतर साहित्याचा

       आधुनिक काळातही वाड्मय आणिसाहित्य हेशब्द ललित वाड्मय कीवा ललित साहित्य या अर्थाने वापरले जातात.

      पण यामुळेच केवळ ललित वाड्मय म्हणजेच वाड्मय किंवा साहित्य शिवाय दुसरे लेखन करणारी व्यक्ती साहित्यिक नव्हेच असे म्हणणेही योग्य नाही,

     साहित्य म्हणून आपण जे संबोधतो त्यात प्रामुख्याने पाच घटक असतात.

 ( १) भावतत्व(२) बुद्भितत्व(३) कल्पनातत्व(४) आकारतत्व(५) सौंदर्यतत्व

      म्हणजेच प्रथम मनाला काही भावते, बुद्भीला जणवते, कल्पनेने ते अधिक स्पष्ट होते, त्याचा आकार लक्षात येतो आणि यातूनच सौंदर्याची प्रचिती येते.

  "प्रतिभाशक्तीने प्रेरित केलेले व आनंद देणारे लेखन म्हणजे ललित साहित्य होय."  रा. ग.जाधव.

     थोडक्यात म्हणजे "जे सहित येते ते साहित्य" म्हणजेच "शब्द आणि अर्थ हे दोन्ही एकञ आले की साहित्य निर्माण होते."

बी. ए. भाग१/ ऐच्छिक मराठी(अक्षरबंध) / अभ्यासक्रमपञिका क्रं १ / विभाग ४ / चिञपट :आस्वाद प्रक्रिया / चिञपट 'ध्वनी' व 'प्रकाश योजना': तांञिक बाबी.

बी. ए. भाग१

ऐच्छिक मराठी(अक्षरबंध)

अभ्यासक्रमपञिका क्रं १

विभाग ४ 

चिञपट :आस्वाद प्रक्रिया

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

चिञपट 'ध्वनी' व 'प्रकाश योजना': तांञिक बाबी.

    प्रस्तावना: 

           चिञपटासाठी केवळ कथानक,नायक-नायिका आणि दिग्दर्शक यांचीच आवश्यकता असते असे नाही,तर एका चिञपठासाठी शेकडो कलाकार,तंञज्ञ काम करत असतात.अनेक कला मिळून एक चिञपट तयार होत असतो. यामध्ये

ध्वनीला अनन्यसाधारण महत्व आहे

'श्रवणेंद्रियाला ज्या उद्दीपनामुळे संवेदना होऊ शकते ते उद्दीपन म्हणजे ध्वनी होय'. असे अक्षरबंध या पाठ्यापुस्तकात म्हटले आहे.

      आपण चिञपट पाहत असतांना असंख्य प्रकारचे ध्वनी ऐकू येत असतात.पाञांच्या हालचालीमुळे काही ध्वनी निर्माण होतात. जसे एखाद्या स्ञीपाञाच्या बंगड्यांचा किंवा पायातल्या पैंजणांचा आवाज होतो.पुरुपाञ चालत आले की त्याच्या बुटाचा आवाज होतो. स्वंपाक घरातील शिट्टीचा आवाज...अशा असंख्य ध्वनींनी आपले जग भरले आहे.या ध्वनीच्या आवाजावरुन त्या त्या दृश्याचा विशिष्ट परिणाम अधोरेखित होतो.या शिवाय घोंघावणार्‍या वार्‍याचा,ढगांचा गडगडाट, पावसाचे कोसळणे हे आवाज ध्वनीआलेखनामुळे शक्य झाले आहे.

       एखाद्या चिञपटाचे आउटडोअर शूटींग होत असते तेव्हा चिञपटात नको असलेले आवाजही राहतात. यासाठी 'डबिंग' चा शोध लागला. नायकाचे वा अन्य पाञांचे संवाद बोलून ते 'डब' केले जाऊ लागले यामुळे  चिञपट प्रभावी झाला. काही वेळा हिंदी बोलता न येणार्‍या नटनटीसाठी दुसरेच कोणीतरी संवाद म्हणते. यामुळे चिञपट अधिक दर्जेदार झाला आहे.

   चिञपटासाठी प्रकाश योजना हा देखिल महत्वाचा घटक आहे. आज अत्याधुनिक कॅमेरे उपल्बध आहेत.  हे कॅमेरे अतिसूश्म गोष्टींची नोंद घेतात पण कॅमेरा उत्तम असून उपयोगाचा नाही. तर कॅमेर्‍यासाठी 'प्रकाशयोजना अतिशय गरजेची असते. 

     उत्तम प्रकाशयोजनाकार हा योग्य दर्जाचा प्रकाश योग्य वस्तूवर वा पाञावर टाकतो.यामुळे जसे हवेतसे दृश्य घेता येते. चिञपटाच्या प्रत्येक युनिटबरोबर स्वतंञ जनरेटरची व्यवस्था असते. त्यावर प्रकाशयोजना राबवली जाते. प्रकाशयोजनेचे दोन प्रकार आहेत. पहिला, वास्तववादी प्रकाश आणि दुसरा नाट्यात्मक प्रकाश होय प्रकाश योजनेसाठी काळे कापड, थर्मोकोल, सॅटीनचे कापड, वेगवेगळे आरसे हॅलोजन दिवे यांचा वापर केला जातो. यामुळे परिणामकारक व उठावदार दिसते.

Thursday, 3 December 2020

बी. ए. भाग २/ मराठी अभ्यासक्रम पञिका ४ सञ ३ / काव्यगंध/ नारायण सुर्वे (श्रमविषयक कविता) /५ नेहरु गेले त्या वेळची गोष्ट

(E-content created by Patil B. K.)

बी. ए. भाग २

मराठी अभ्यासक्रम पञिका ४

सञ ३

काव्यगंध

नारायण सुर्वे  (श्रमविषयक कविता)

५ नेहरु गेले त्या वेळची गोष्ट

          नेहरु गेले त्या वेळची गोष्ट: राजकीय भान व्यक्त करणारी कविता

              ही सुर्वे यांची महत्वाची कविता आहे. १९६४ च्या मे महिन्यात एका संध्याकाळी रेडिओवर नेहरु गेले ही बातमी प्रसृत झाली. ही बातमी ऐकताच सुर्वे यांना धक्का बसला, आता प्रकाश संपला हे पार्लमेंटमध्ये उच्चारलेले वाक्य त्यांच्या कानात घुमत होते.

      या कवितेचे एक वैशिष्टे म्हणजे कवीने पं. नेहरु यांच्या निधनानंतर लिहिलेल्या या कवितेत नेहरुंचे कार्य, त्यांचे चरिञ याविषयी एकही ओळ नाही.पण सुर्वे यांच्या कवितेतील सुचकताफार बोलकी असते.अनेक संदर्भांना ही कविता सहज स्पर्श करते.

   "पाठ शेकवत बसलेली घरे कलकलली

      शहर कसे करडे होत गेले

       नंतर अजिरी

 पुढे..... काळोखाने माणिक गिळले."

  इथे शहर करडे होणे नंतर अजिरी होणे व काळोखाने माणिक गिळणे या सगळ्या अवस्था एकाचवेळी शहराच्या व देशाच्याही आहेत,सगळ्यासमोर अंधार पसरला. कारखाने बंद पडले.  ओले खमीस खांद्यावर टाकून सगळे घरी गेले. म्हणजे जणू प्रत्येकाच्या घरातील  माणूस दिवंगत झाला आहे व सगळे ओलेत्याने, दहनानंतर घरी परतणारे अंतेवासी आहेत.

"क्या हुआ ए सुंद्रे!

'आज लोबन मत जला!...,नेहरु गये।।'

'सच, तो चलो आज छुट्टी!....'

     वेश्यावस्तीतले हे चिञ रंगवताना जीवनाची शुद्र पातळीही गाठली आहे. सुट्टी मिळाली हा आनंद काहींना वाटतो आहे,

   पण कवीला याचा राग नाही तर यांनाही समजून घेण्याची व्यापक सहानुभूती कवीकडे आहे. या दृष्टीने 'लोबन मत जला' हे वाक्य महत्वाचे आहे. सबंध पीडित जगाचा हुंदका या कवितेत कवीने साध्या शब्दांत टिपला आहे.

पुढे कवीला एक हातगाडीवाला भेटतो. तो कागदी खोळीत उजेड घेऊन चाचला होता. एका उदास वृत्तीला या हातगाडीवाल्याच्या रुपाने प्रकाशाने उजळले आहे.

  पं. नेहरुसारखा युगंधर नेता गेला. यामुळे राष्टीय व आतरराष्टीय पातळीवर काय घडले हे इतिहासात लिहिले जाईल .पण या घटनेने सामान्यांच्या जीवनात काय घडले हे टिपण्याचे काम या ललित कवितेने केले आहे.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...